भास्कर सावंत

खेळ हाच ज्याचा श्वास, खेळ हेच त्याचे कुटुंब, खेळ हेच ज्याचं जगणं अशा वि. वि. करमरकरांनी उतारवयातही चपळता, रोखठोक व तर्कशुद्ध विचार मांडण्याची वृत्ती कायम ठेवली होती. खेळाडू वा क्रीडा संघटनांवरील अन्यायावर बेधडक निर्भयपणे भिडणारे करमरकर आजही अनेकांना आठवतात. वृत्तपत्रातील रीतसर नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही देशी व ऑलिम्पिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेड्यापाड्यात भटकंती केली. खेळांच्या स्पर्धांचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत याचा अखंड ध्यास घेऊन ‘महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थे’ची त्यांनी निर्मिती केली. रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत देशी खेळांच्या स्पर्धांचे महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेमार्फत आयोजन करण्यात ते अग्रेसर राहिले.

Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?
Senior BJP leader Chandrakant Patils reaction on post of Guardian Minister of Pune
आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसतात : भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील
Rashtriya Swayamsevak Sangh on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होताच संघ स्वयंसेवकामध्ये आनंद…..
all we imagine as last night got news award
मराठमोळ्या छाया कदम यांच्या चित्रपटाचा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर सन्मान; मिळाला ‘हा’ प्रतिष्ठित पुरस्कार
sachin tendulkar inaugurates ramakant achrekar memorial
क्रीडासाहित्याचा आदर करण्याची सरांची शिकवण! प्रशिक्षक आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणावेळी सचिनकडून आठवणींना उजाळा

हेही वाचा >>> प्रभावी शिक्षणासाठी एवढे कराच!

भारतातील इंग्रजी दैनिकांचे खेळाचे स्वतंत्र पान व इंग्रजी क्रीडा पत्रकारिता गेली शे-दीडशे वर्षे रूढ आहे. मात्र जून १९६२पासून मराठीत खऱ्या अर्थाने त्याचे बीजारोपण झाले ते वि. वि. करमरकरांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्याच लेखणीतून. ‘वि.वि.क.’ या नावाने प्रचलित असलेले विष्णू विश्वानाथ करमरकर जन्मत: नाशिकचे. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८चा. माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. पदवी परीक्षेपर्यंत ते नाशिकच्याच हंसराज प्रागजी ठाकरशी महाविद्यालयात शिकले. मात्र त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए. झाले. वि. वि. करमरकरांचे वडील डॉ. वि. अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर. मुलानेही आपल्याच क्षेत्रात कार्यरत व्हावे अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र वडिलांनी ‘विष्णू’चा बाळ- हट्ट पुरविला. निवडलेल्या क्षेत्रात त्यांना आडकाठी येऊ दिली नाही. वडील व आई सुशीलाताई यांनी करमरकरांना संस्कारित केले. रत्ना थोरात व माणिक मराठे या बहिणींनी व मेहुण्यांनी त्यांना प्रेम व आधार दिला.

शालेय जीवनात प्रा. ग. वि. अकोलकर, रि.पु. वैशंपायन व भट तर महाविद्याालयात प्रा. वसंत कानिटकर, प्रा. आचार्य, प्रा. सोहोनी, प्रा. राम बापट, मुंबई विद्याापीठात प्रा. दांतवाला, प्रा. कांता रणदिवे व प्रा. अप्पू नायर यांनी करमरकरांच्या आचार-विचारांना दिशा दिली.

लोकशाही समाजवादी विचाराने क्रियाशील असलेल्या करमरकरांनी डॉ. राम मनोहर लोहिया, एस.एम. जोशी, मधु लिमये यांना आपले आदर्श मानले. पत्रकारिता करताना द्वा. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, दि. वि. गोखले, साखळकर, पुरुषोत्तम महाले, चंद्रकांत ताम्हणे, दिनू रणदिवे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे ‘रसरंग’ साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस. एम. जोशी, यांनी सहकारी तत्त्वावर चालवलेल्या दैनिक ‘लोकमित्र’मधून केली. जून १९६२पासून टाइम्स समूहाचे महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख आणि सहसंपादक (क्रीडा) या नात्याने खेळाच्या पानाचे यशस्वी संपादन केले. खेळाच्या बातम्या, समीक्षण व स्तंभलेखन याविषयी मराठी माणसाची अतृप्त, तहान-भूक भागवण्यास करमरकरांची क्रीडा पत्रकारिता पूरक ठरली आणि सर्व मराठी वृत्तपत्रांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.

हेही वाचा >>> उपसभापतीपद विरोधी पक्षाकडे देण्यामागची पक्षीय सहिष्णुता आज कुठे आहे?

क्रिकेट कसोटी मालिका, क्रिकेट विश्वाचषक, ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांची दैनंदिन क्रीडा समीक्षा करणारे वि. वि. करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांनी उचलून धरले. मात्र याच काळात खेळाचे हौशी स्वरूप झपाट्याने बदलत गेले. पाश्चात्त्य दुनियेइतके अफाट प्रमाणात नसले तरीही भारतीय क्रीडा क्षेत्रात साधारणत: मध्यम स्वरूपाच्या उद्योग समूहाचे (इंडस्ट्री) रूप येत आहे. त्याचा वेध करमरकरांनी सर्वप्रथम घेतला. औद्योगिक समूहात अटळ असलेली स्टेडियम, क्रीडा संकुले यांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांनी १९९३ पासून झगझगीत प्रकाश टाकला. उत्सवमूर्ती सुरेश कलमाडी यांच्या बेगडी क्रीडाप्रेमावर टीकेची धार सतत धरत राहिले. याआधी १९८२च्या दिल्ली, एशियाड बांधकामात सुमारे १०० पर्यंत अनामिक मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’ या वृत्तलेख-मालिकेमधून मांडली.

दक्षिण कोरिया, क्युबा, केनिया आदी छोट्या देशांच्या तुलनेतील भारतीय खेळाडूंचे मागासलेपण त्यांना डाचत असल्यामुळेच या तफावतीच्या गोष्टी ते नेहमी मांडत राहिले. खेळ हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, ही व्यथा ते सातत्याने व्यक्त करत. खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्याकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्याकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वत: केले, सहकाऱ्यांमार्फत करून घेतले. बड्या क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी व दूरदर्शनवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समीक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समीक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर इतर वृत्तपत्रांप्रमाणे ‘लोकसत्ता’तही त्यांनी लेखमाला लिहिल्या होत्या.

हेही वाचा >>> राहुल गांधींसारख्यांच्या आत्मसंतुष्टतेमुळेही लोकशाही मरत असते…

खेळासाठी झोकून काम करणाऱ्या या पत्रकाराने क्रीडा कार्यकत्र्यांची भूमिकाही बजावली. १९९०दरम्यान त्यांना सहकार कला क्रीडा मंडळाने एस. एम. जोशी स्मृती पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात लवचिकता ठेवली नाही. सत्याचा ध्यास धरत राहिले. यात खुपसण्यासारखे काही नसले तरी क्रीडा क्षेत्रात करमरकरांची शिडी वापरून वर चढलेल्यांनी त्यांच्यापासून दुरावा ठेवला… अर्थात, यामुळे करमकर खंतावले नाहीत. या अर्थाने ते एकमेव होते. आता करमरकर नाहीत… यापुढे क्रीडा क्षेत्रात करमरकरांसारखी माणसे शोधावी लागतील… घडवावी लागतील!

वि. वि. करमरकर हयात असताना ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचे हे परिष्करण आहे.

Story img Loader