ऑलिम्पिकसारख्या भव्य स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतात. त्यांतील बहुतेक सुविधा केवळ त्या स्पर्धेपुरत्या म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपातील असतात. पण अशा स्पर्धांच्या निमित्ताने शाश्वत मूल्यांचे जतन, जोपासना व संक्रमण मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठीही प्रयत्न केले जातात. पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने जगभर पोहोचवण्यात येणाऱ्या संदेशाविषयी…

पॅरिसमध्ये या आठवड्यात ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. अधिक वेगाने, आणखी उंच आणि अधिक ताकदीने (फास्टर, हायर, स्ट्राँगर) ही तिहेरी प्रेरणा घेऊन स्पर्धांत भाग घेणारे क्रीडापटू आणि त्यांच्या जोडीला सर्वच जग महिनाभर या खेळामध्ये आकंठ रंगून जाईल. अर्थात या लेखाचा विषय ऑलिंपिकमधील खेळांची स्पर्धा, विक्रम, कोण सर्वांत जास्त जलद धावपटू आहे, कोणाला तो ‘सुवर्ण बूट’ मिळाला, कोणत्या संघाने सर्वांत जास्त पदके मिळवली याबद्दलचा नाही. तर ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने जगभरात ऑलिम्पिक म्हणजे खेळाच्या माध्यमातून जी मूल्ये समाजमानसात रुजवायची आहेत, त्याबद्दलचा आहे. खेळांमधून आपल्याला पदकांपलीकडे काय मिळवायचे आहे? तर या अटीतटीच्या स्पर्धेपलीकडे जात उत्तमता, परस्पर आदर व मैत्रीभाव या तीन मूल्यांचा जगभर प्रचार-प्रसार व्हावा व या क्रीडाशिक्षणातून अधिक उन्नत असा समाज निर्माण व्हावा. हा लेख त्या तीन मूल्यांबद्दल…

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Loksatta chaturang  Temperament Obsessive Compulsive Personality Disorder
स्वभाव-विभाव :परिपूर्णतेचा अट्टाहास
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय
University level admission to vacant posts in agriculture postgraduate course Pune news
कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त; आता विद्यापीठ स्तरावर विशेष प्रवेश फेरी
swearing ceremony in Mumbai left many political workers across state despairing
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता

हेही वाचा >>> Budget 2024 : ना निर्यात, ना हमीभाव

उत्तमता या शब्दाची पहिली ओळख शाळा महाविद्यालयात झाली १९७० च्या दशकात, तीन अगदी वेगळ्या स्राोतांद्वारे! सावरकरांची कविता त्यात पहिली. मग जसे खेळाचे वेड लागले तसे सर्जी बुबका या रशियन (युक्रेनी) बांबू उडी (पोल व्हॉल्ट) मारणाऱ्या खेळाडूबद्दल वाचनात येऊ लागले. बांबू उडी हा अत्यंत अवघड खेळ. सर्जी बुबकाचा जन्म डिसेंबर १९६३मध्ये झाला. त्याला अशक्य असे बहुधा काहीच नव्हते. त्याची प्रत्येक उडी नवीन विक्रमाकडे जाणारी होती. कधी काळी असंभवनीय वाटणारी सहा मीटरची उंची (सुमारे २० फूट) त्याने पार केली. प्रत्येक उडीत इतर स्पर्धक बाद होत असताना त्याची पुढची उडी मात्र स्वत:शीच स्पर्धा करणारी असे. इंग्रजीतील ‘रेझ द बार’ (रेझ द बार) हा वाक्प्रचार बहुधा सर्जीमुळेच आला असावा, इतपत शंका यावी असा तो उंच उंच जात असे. जुलै १९९४ मध्ये ६.१४ मीटरच्या उडीसह त्याने १७ वा आणि अंतिम विश्वविक्रम नोंदविला! तो मोडायला २०२४ हे वर्ष उजाडावे लागले. पुरुषांसाठी सध्याचा पोल व्हॉल्ट जागतिक विक्रम एप्रिल २०२४ मध्ये अमेरिकेत जन्मलेल्या स्वीडिश व्हॉल्टर आर्मंड डुप्लांटिसने ६.२४ मीटर या नव्या उंचीवर नेऊन ठेवला. बुबकाच्या पुढे दोनच आहेत. हे वाचताना हेही लक्षात घेतले पाहिजे की गेल्या काही वर्षांतील विक्रम हे फायबरचे हलके पण ताकदवान व तरीही लवचीक पोल वापरून नोंदविण्यात आले आहेत. असो.

याच काळात जगावर राज्य केले रोमानियाची नादिया कोमानेसी हिने. १९७६ च्या मंट्रियाल येथील ऑलिम्पिक स्पर्धेत तिने जणू काही बालपणातच (१४ वर्षे) प्रथम जिम्नॅस्टिक्स या अत्यंत अवघड खेळात १० पैकी १० म्हणजे ‘परफेक्ट टेन’ गुण मिळवले. आणि एकदा नाही तर त्याच स्पर्धेत आणखी सहा वेळा! इंग्रजीत ‘परफेक्ट टेन’ म्हणजे कधीही न चुकणारा. ती कधी चुकतच नसे! तिची प्रत्येक हालचाल अतिशय डौलदार, सुबक आखीवरेखीव असे. अनेक कसरती करून जमिनीवर उतरतानाचे म्हणजे लँडिंगचे दृश्यही अतिशय देखणे आणि १०० टक्के अचूक असे. हेही स्मरणात ठेवले पाहिजे की त्यावेळी आजसारखे प्रगत दर्जाचे संगणक, कॅमेरा साहित्य नव्हते! नंतरही नादिया चर्चेत येण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रोमानियातील कम्युनिस्ट पक्षधार्जिणे सरकार आणि पोलिसांच्या सततच्या टेहळणीला आणि स्वातंत्र्याच्या संकोचाला कंटाळून तिने नोव्हेंबर १९८९ मध्ये गुपचूप हंगेरीची सीमारेषा ओलांडली. पुढे तिने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. जिम्नॅस्ट म्हणून निमुळत्या पट्टीवर देखणी हालचाल करणारी नादिया म्हणजे उत्तमत्तेचे पर्यायी नाव.

हेही वाचा >>> Budget 2024 : नेहमीचीच मलमपट्टी…

याच सुमारास म्हणजे १९८२ मध्ये अमेरिकन उद्योग जगतातील उदाहरणावर आधारित अनेक उद्याोगांच्या उत्तमतेच्या सुरस कथा जगासमोर आणल्या एका पुस्तकाने. या पुस्तकाचे शीर्षक होते, ‘इन सर्च ऑफ एक्सलन्स’ उत्तमतेच्या शोधात… टॉम पीटर्स आणि रॉबर्ट वॉटरमॅन ज्युनियर यांच्या या पुस्तकामुळे जणू जगभर उत्तमतेचा शोध पुन्हा नव्याने सुरू झाला. त्यापूर्वीच मुंबईत एक संस्था कार्यरत होती. तिचे नाव होते ‘इंडियन सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ एक्सलन्स’.

उत्तमता

हे केवळ क्रीडांगणावर नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अंगीकारण्याचे मूल्य आहे. उत्तम स्वयंपाक करता येणे, हस्ताक्षर उत्तम असणे, कार्यालयातील सजावट उत्तम, कामांमधील नोंदी नीटनेटक्या, हातात दिलेले काम केवळ कटकट म्हणून टिकमार्क पद्धतीने पूर्ण न करता १०० टक्के जीव ओतून करणे म्हणजे उत्तमतेची साधना. पुस्तके- प्रकाशने यामध्ये डोळ्यांत खडे गेले असे वाटावे अशा शुद्धलेखनाच्या चुका नकोत, ही उत्तमतेची मानसिकता. राग- विस्तारताना प्रत्येक स्वर अचूक लागणे ही गायनातील उत्तमता. उदाहरणे देऊ तितकी कमीच. खेळातून समाजात रुजले पाहिजे ते ‘चलता है सबकुछ’ या मनोवृत्तीचे विसर्जन करण्याचे, स्वत:ला ताणण्याचे, उत्तमतेचा ध्यास घेण्याचे, जुगाड संस्कृतीतून सुबक-उत्तम-मनोहारी वस्तू, प्रक्रिया, वातावरण व संस्कृती जोपासण्याचे. त्यासाठी हे ऑलिम्पिक समितीने सांगितलेले पहिले मूल्य.

परस्परांचा आदर

दुसरी दोन मूल्ये समजण्यात अवघड नाहीत पण कृतीत आणाण्यास खूप अवघड आहेत. परस्पर आदर हे महत्त्वाचे मूल्य ऑलिम्पिक चळवळीतून जगभर रुजले पाहिजे. समोरचा प्रतिस्पर्धी खेळाडू शत्रू नाही ही भावना ठेवून वर्तन करणे. स्पर्धा संपल्यानंतर एकमेकांच्या कामगिरीचे दिलदारपणे कौतुक करणे म्हणजे आदर. त्याबरोबरच पालन करायचे आहे नियमांच्या चौकटीचे, आखून दिलेल्या बंधनाचे, व नियमाप्रमाणे वागण्याचे-खेळण्याचे. ‘प्ले बाय द रुल बुक’ हे केवळ खेळात नाही तर सर्वच क्षेत्रात हवे, त्याला अपवाद कोणीच नाही. आजच्या भारतात या मूल्याची उद्योगक्षेत्र, राजकारण, नोकरशाही, सेवाक्षेत्र, वैद्याकीय व्यवसाय आणि अनेक ठिकाणी नितांत गरज आहे. ऑलिंपिक संघटनेने परस्पर आदर या मूल्याचा परीघ आणखी मोठा केला आहे. आदर म्हणजे स्वत:बरोबर आजूबाजूच्या पर्यावरणाचा, वनस्पतींचा, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा आदर. यामध्ये मूळ भावना आहे दुसऱ्याच्या अधिकाराचा उपमर्द होणार नाही याची. माझ्या वागणुकीमुळे दुसरा दुखावला जाणार नाही आणि आमचे विचार, वेशभूषा, भाषा, भोजन, वंश हे वेगवेगळे असले तरी या साऱ्याचा आदर करून सौहार्दाने राहणे म्हणजे आदर या मूल्याची प्रत्यक्षात कृती करणे.

मैत्री

आज मैत्री हा शब्द दुर्मीळ झाला आहे. मी आणि ते, आपण आणि इतर, हा आपल्या गटातला आणि तो आपल्या गटातला नाही अशी भावना हा समाजामध्ये खोलवर पसरलेला नवा व्हायरस आहे. जातीवरून राज्या दुफळी निर्माण झाली आहे, निवडणुकीचे राजकारण आता कोण कोणत्या जातीचा यावर ठरताना दिसते, अशा स्थितीत हे मूल्य फार महत्त्वाचे ठरते.

ऑलिम्पिक चळवळीमुळे जगभरात या तीन मानवी मूल्यांचे जतन, जोपासना व संक्रमण मोठ्या प्रमाणात व्हावे ही अपेक्षा या संकल्पनेमागे असावी. खेळांच्या स्पर्धा यापुढेही होत राहतील. अशा भव्य स्पर्धांसाठी मोठी स्टेडियम बांधली जातात आणि काही दिवसांतच ती जमीनदोस्तही करता येतात (अमेरिकेतील क्रिकेट स्टेडियमप्रमाणे). पण उत्तमता, परस्पर आदर आणि मैत्री ही सार्वकालिक मूल्ये मानवाला प्रगती व आनंदाच्या दिशेने नेणारी आहेत. या तीन मूल्यांचा पाया सर्व देशांमध्ये रुजला, बळकट झाला तर मग संत ज्ञानेश्वरांचे पसायदानातील आर्जव प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही. पॅरिसनिमित्ताने तसा प्रयत्न व्हावा!

kanitkar.ajit@gmail.com

Story img Loader