डॉ. शंतनु अभ्यंकर

श्री. रामकृष्ण यादव ऊर्फ रामदेवबाबा यांचं आणि माझं अगदी घट्ट नातं आहे. गेली काही वर्षं कधी अचंब्याने, कधी अविश्वासाने तर क्वचित असूयेने मी त्यांचे चाळे न्याहाळतो आहे. त्यांच्या ज्या विखारी आणि विषारी जाहिरातीवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बंदी घातली, त्या बाबतही मी पूर्वी इथं (लोकसत्ता, १३ डिसेंबर २०२२) लिहिलं होतं. त्यांच्या विपणन कौशल्याला सलाम ठोकत, मला देशद्रोही किंवा धर्मद्रोही ठरवून कोणी लाथ घालेल या भयाने मी विचार करू लागतो; इतकी सगळी माणसं इतक्या सगळ्या अशास्त्रीय, छद्माशास्त्रीय, अर्धशास्त्रीय फसव्या दाव्यांना का भुलतात? याचंही काही शास्त्रीय कारण असेलच ना?

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

तेव्हा सहजच भुलणाऱ्या या मानवी मनाचा हा मागोवा.

जादूई रोगमुक्तीची अपेक्षा मानवी मनामध्ये असतेच असते. दिव्यदृष्टी मिळून आपल्याला गुप्तधन मिळेल अशी सुप्त इच्छा जशी असते, तशीच ही इच्छा. आपल्या लोककथांतून, पुराणांतून अशा कथा आहेतच. कोड, कुबड, महारोग, अंधत्व, वंध्यत्व असे काय काय आजार आणि जादूई उपचारांमुळे त्यातून तत्क्षणी मुक्ती. तेव्हा असं काहीतरी असू शकेल अशीच आपल्या मनाची बैठक असते. साहजिकच आपण अशा दाव्यांकडे सहानुभूतीने पाहातो.

जे आपल्याला वाटत असतं त्याचे पुरावे आपल्याला आपोआपच आसपास सापडायला लागतात (कन्फर्मेशन बायस). ही कोणा व्यक्तीची नाही तर एकूणच मानव जातीची मानसिकता आहे. मग अमुक एका उपचाराने गुण येतो म्हटलं की त्याच उपचाराने गुण आलेली माणसं भेटतात, त्याचीच माहिती पेपरात नजरेस येते आणि आपला समज अधिकाधिक घट्ट होतो. गैरसमज रुजण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. वास्तविक भवताल तोच आणि तसाच असतो. आपण त्यातून आपल्याला हवं ते वेचत असतो. आपण नवीन सेल्टॉस घेतली की लगेच रस्त्यावर कितीतरी सेल्टॉस दिसतात; तसंच हे.

हेही वाचा >>> उत्तरदायित्वाच्या निश्चितीचे ऐतिहासिक पाल!

प्रस्थापित आरोग्य व्यवस्था, औषध कंपन्या आणि डॉक्टरांनी पेशंटला लुबाडल्याच्या इतक्या सत्यकथा ऐकू येतात, की या साऱ्या व्यवस्थेबद्दल एक प्रकारची सूडभावना आणि अविश्वास लोकांच्या मनात असतोच. त्या खतपाण्यावर कृतक वैद्याकीचं तण माजतं. प्रस्थापित व्यवस्था ‘नफा’ एवढं एकच उद्दिष्ट ठेवून काम करते हे एकदा मनावर ठसलं, की पर्यायी औषधवालेसुद्धा नफाच कमवत असतात हे लक्षातच येत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या, राक्षसी प्रचार यंत्रणा वगैरे दोन्हीकडे आहे.

लोककथा, अन्न, कपडेलत्ते, करमणूक याप्रमाणेच वैद्याकीय समजुती, उपाय हे सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग असतात. आपल्या आज्या-पणज्यांनी आपल्यासाठी केलं ते आपण आपल्या नातवंडा-पंतवंडांसाठी सुचवत असतो, करत असतो. त्याविषयी आपल्याला विशेष ममत्व असतं. म्हणूनच अशा उपचारांबाबत शंका म्हणजे धर्मद्रोह, देशद्रोह हे ठसवणंही सोपं असतं. परंपरेने चालत आलेले हे उपचार काळाच्या कसोटीवर टिकले आहेत आणि म्हणून ते सुरक्षितच असणार अशी आपली घट्ट समजूत असते. पण खरं सांगायचं तर काळाची अशी काही कसोटी नसतेच. जरा बरोबर, जरा चुकीच्या अशा अनेक गोष्टी काळाच्या कसोटीवर टिकलेल्याच होत्या. सापाचं विष उतरवणं, मुलांच्या नाळेला शेण लावणं, रजस्वला अपवित्र असते अशी समजूत हे सगळं काळाच्या कसोटीवर टिकलेलंच आहे, पण चुकीचं आहे. तेव्हा काळाची कसोटी लावण्यापेक्षा विज्ञानाची कसोटी लावणं अधिक श्रेयस्कर नाही का?

आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी टप्प्यावर आजार गाठतोच आणि आजाराच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तो असह्य आणि असाध्य होतोच. याचा वेग आणि वेदना ही व्यक्तीगणिक वेगळी. पण आशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. जगायची आणि आपल्या सुहृदाला जगवायची उमेद देत राहते. शिवाय योग्य उपचार आर्थिक आवाक्यात नसतील, कॅन्सर हॉस्पिटल लंकेत असेल, तर उपयोग काय? काहीतरी करणं आणि समाधान मानून घेणं, एवढंच तर हातात उरतं.

हेही वाचा >>> प्रादेशिक अभ्यासात उच्च शिक्षण संस्थांचे स्थान

‘आता याहून अधिक काहीच करता येणार नाही’ असं पर्यायीवाले कधीच म्हणत नाहीत. आशेचा नंदादीप ते तेवत ठेवतात. अर्थात तेल वातीचा खर्च पेशंटकडूनच घेतात. या नंदादीपाची ऊब आवडते ते तेल वातीच्या खर्चाची तमा बाळगत नाहीत. आधुनिक वैद्याकीत असं करणं गैर मानलं जातं. आजाराबद्दल सत्य आणि संपूर्ण माहिती मिळणे हा पेशंटचा अधिकार मानला जातो. तेव्हा खोटी आशा लावण्यापेक्षा वस्तुस्थितीला सामोरं जाण्याचे मार्ग आपण जोडीने धुंडाळू, अशी भूमिका असते. टाइप वन मधुमेह, रक्तदाब किंवा संधिवाताच्या पेशंटना कायम औषधे लागतील, त्यांचे काही सहपरिणामही असतील, असंच सांगितलं जातं; केमोथेरपी अथवा शस्त्रक्रियांपूर्वी साऱ्या फायद्या-तोटयांची सविस्तर माहिती दिली जाते, पूर्वसंमती घेतली जाते आणि हेच योग्य आहे.

कधी या साऱ्या विकार वेदनेला काही कारण देता येतं, तर कधी नाही. साऱ्याच प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला ठाऊक नाहीत. मग असल्या अज्ञानी, अर्धवट, अबल विज्ञानापेक्षा साऱ्याच आजारांवर रामबाण उपाय आहेत; कुठलाही कॅन्सर, लकवा, संधीवात, असाध्य रोग हमखास बरा करतो, अशा छातीठोक गर्जना मोह घालतात. त्या करणारे ज्ञानवंत आणि त्यांचे ज्ञान बलवंत वाटू लागते. मग इस्रायलहून मधुमेहाचं अक्सीर औषध आणायला कुणीही ७० रुपये सहज देतो.

आधुनिक औषधं म्हणजे सगळी ‘केमिकल’ आहेत अशी भाषा असते. मित्रांनो, जगात केमिकल नाही असं काय आहे? हा केमोफोबिया, चिरफाडीचं (हा खास त्यांचा शब्द) भय, ही साइड इफेक्टची भीती जाणीवपूर्वक जोपासली जाते. यावर धंदा पोसला जातो. खरं तर सगळ्याच औषधांचे काही ना काही सहपरिणाम, मग त्यात चांगले -वाईट दोन्ही आले, असणारच आणि असतातच. फक्त आधुनिक वैद्याकीत असे परिणाम नोंदवण्याची, अभ्यासण्याची आणि सुसह्य करण्याची शिस्तबद्ध पद्धत आहे. काही दिव्यौषधींना सहपरिणाम नाहीत असं म्हणणं म्हणजे वाळूत तोंड खुपसून बसण्यासारखं आहे. ते मुळी अभ्यासलेच गेलेले नाहीत हे विधान वस्तुस्थितीला धरून आहे. देणारे भक्तिभावाने औषधे देतात, घेणारेही मनोभावे घेतात. अनेक घोटाळे होत राहतात. विषप्रयोग झालेली मूत्रपिंडं आणि यकृतं घेऊन पेशंट पुन्हा येतात, त्यावेळी काळीज विदीर्ण होतं. असे प्रकार आधुनिक औषधांच्या बाबतीतही संभवतात. पण त्याला काहीतरी पूर्वकल्पना, दादफिर्याद, नोंद, प्रसंगी ते औषध बाजारातून मागं घेणं वगैरे प्रकार आहेत. पर्यायी पॅथींमध्ये औषध मागं घेतल्याचं एक तरी उदाहरण आहे का? हे तर जाऊच दे, गरोदर स्त्रीने घेऊ नये, डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही असं एकही औषध नसावं? सगळी औषधं लहान, थोर सगळ्यांना चालतात? हा औषधांचा दिव्य प्रभाव नसून इथं अभ्यासाचा अभाव आहे. कोणी ‘हे घे औषध’ म्हणून नकळत पाणी दिलं तरी आता काहीतरी इष्ट होणार या आशेने रोग्याला किंचित बरं वाटायला लागतं. (इष्टाशा अर्थात प्लॅसीबो परिणाम) कुठल्याही औषधाची कामगिरी किमान अशा परिणामापेक्षा तरी सरस हवी. होमिओपॅथी वगैरे ‘शास्त्रांनी’ ही पायरीही पार केलेली नाही.

मात्र दावे मोठ्ठे मोठ्ठे केले जातात आणि पेशंटची खुशीपत्रं, खुशी चलचित्रं, कोणी बड्यांनी केलेली भलामण पुरावा म्हणून दाखवतात. कुठल्याशा शकुंतलाबाईंना कुठलंसं मलम लावून मांडी घालून बसता यायला लागलं हा शास्त्रीय पुरावा ठरत नाही. पण असल्या भावकथांना पेशंट भुलतात, काय काय ऑनलाइन मागवतात आणि गंडतात. करून बघायला काय हरकत आहे, घेऊन बघायला काय हरकत आहे, जाऊन बघायला काय हरकत आहे, तोटा तर नाही ना अशा प्रकारचे युक्तिवाद करत माणसं करून, घेऊन आणि जाऊन बघतात. न जाणो गुण येणारच असेल तर आपणच गेलो नाही असं नको व्हायला, अशी त्यांची मानसिकता असते. यातूनही यांचं फावतं. वास्तविक सगळं करून, बघून अभ्यासून मगच औषध बाजारात यायला हवं. करून बघण्याची जबाबदारी पेशंटची नाही आणि काही प्रयोग करून बघायचे असतील तर रीतसर परवानगी, संमती वगैरे असायला हवी.

बाबांच्या औषधींनी भरतभूची प्रकृती सुधारणार असेल तर छानच, फक्त त्या औषधीचे रोकडे मूळ सामर्थ्य दाखवावे लागेल एवढेच. shantanusabhyankar@hotmail.com

Story img Loader