फार्मसिस्ट म्हणजे कोण? डी. फार्म, बी. फार्म किंवा फार्म डी. किंवा त्यातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेली व्यक्ती. अशा व्यक्ती नोंदणीकृत फार्मसिस्ट होऊ शकतात. त्यांना स्वत:चे औषध दुकान सुरू करता येते किंवा रुग्णालय, फार्मा कंपनी, औषध नियंत्रण, क्लिनिकल ट्रायल्स अशा अनेक क्षेत्रांत संधी मिळू शकते. त्यापैकी औषध दुकानदारांविषयी जाणून घेऊया.

जगात काही ठिकाणी अशा किरकोळ औषध विक्रेत्यांना ‘कम्युनिटी फार्मसिस्ट’ असेही संबोधले जाते. कम्युनिटी फार्मसिस्ट हा त्या व्यवसायाचा समाजाभिमुख चेहरा असतो. औषध खरेदी-विक्री, साठवण, कालबाह्य झालेला माल काढून टाकणे, रुग्णास औषधे देणे, रेकॉर्ड्स ठेवणे, अकाउंट्स, जीएसटी अशी अनेक कामे त्यांना करावी लागतात. स्वत:चे दुकान आणि त्यात एकच फार्मसिस्ट असल्यास त्यालाच बॅक ऑफिस सांभाळावे लागते. तोच सीईओ, सीएफओ, सीओओ असतो. साहाय्यक स्टाफ असला, तरीही सर्व व्यवस्थापन आणि जबाबदारी त्या एकाच फार्मसिस्टवर येते. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फार्मसिस्ट दुकानातच अडकून पडतो. साहजिकच सणवार, छंद, सुट्ट्या वगैरे चैन त्यांना परवडत नाही. आणखी एखादा फार्मसिस्ट नेमल्यास यापैकी काही करता येईलही, मात्र सहसा हे त्यांना परवडणारे नसते.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड

हेही वाचा >>>अन्य धर्मीयांनी बदलावे मग आम्ही बदलू, यासारखा अविवेक नाही!

अशा छोट्या दुकानदारांचा व्यवसाय काही वर्षांपूर्वीपर्यंत बरा चालत असे. त्यांना कामाचे समाधानही मिळत असे, पण आता परिस्थिती वेगळी आहे. फार्मसिस्टमध्ये अस्वस्थता दिसते. दुकानांची संख्या प्रचंड वाढली आहे. साहजिकच त्यांच्यातील चढाओढही वाढत आहे. त्यातच अनेक रुग्ण सवलती मिळविण्यासाठी औषधांची खरेदी ऑनलाइन करतात आणि औषध दुकानांकडे पाठ फिरवितात. (त्यात अद्याप इंटरनेट फार्मसीविषयी सुस्पष्ट कायदे करण्यात आलेले नाहीत.) मात्र आणीबाणीच्या वेळी रात्री-बेरात्री कोपऱ्यावरील दुकानदाराकडेच धाव घेतात आणि तोही दुकान उघडून औषधे देतो. गेल्या काही वर्षांत अनेक जेनेरिक दुकाने सुरू झाली. कॉर्पोरेट फार्मसी चेन शॉप्सही वाढत आहेत आणि डिस्काउंट, स्वस्त ब्रँड्सचा पर्याय हा तिथेही एक आकर्षक मुद्दा आहे. लहान औषध दुकानांतही जेनेरिक पर्याय उपलब्ध असतातच की. पण औषध कायद्यानुसार ‘डॉक्टरांनी जे लिहिले तेच’ दिले जाणे अपेक्षित असते. म्हणून नियमांना धरून चालणारे फार्मसिस्ट ‘ब्रँड सब्स्टिट्युशन’ करत नाहीत.

आणखी एक बाब म्हणजे डिस्पेन्सिंग डॉक्टर्स. जुन्या (१९४० च्या) कायद्यातील ‘शेड्युल के’च्या आधारे विविध पॅथींचे काही (सर्व डॉक्टर्स स्टॉक करत नाहीत) डॉक्टर्स औषधाच्या स्ट्रिप्सच्या स्ट्रिप्स, लोशन्स, क्रीम्स, टॉनिक्स असा सरसकट भरपूर स्टॉक ठेवतात आणि रुग्णांना तिथूनच देतात. ते रुग्णहित आणि रुग्णसुरक्षेसाठी योग्य आहे का? १९४० च्या काळाचा विचार करता ‘शेड्युल के’ ही तरतूद योग्यच, पण आता सर्व औषधे पॅक होऊन येतात. गल्लीबोळांत दवाखान्यांच्या बाजूलाच औषधांची दुकाने आहेत. आजच्या काळात दवाखान्यांत औषधांचा स्टॉक ठेवण्याची गरज आहे का? आणि ठेवला तरी किती, कोणती अत्यावश्यक औषधे हा कळीचा मुद्दा. याबाबत ‘शेड्युल के’ मध्ये सुस्पष्टता नाही. ‘शेड्युल के’च्या सर्व शर्ती पाळल्या जातात का हे कितपत बारकाईने पाहिले जाते? कालबाह्य ‘शेड्युल के’मध्ये दुरुस्ती नको? डिस्पेन्सिंग डॉक्टर्स इतरही काही देशांत आहेत. मलेशियातील पाहणीनुसार औषधे लिहून देणाऱ्या (स्टॉक न करणाऱ्या) डॉक्टर्सपेक्षा सातपट जास्त औषधे डिस्पेन्सिंग डॉक्टर्स देतात, झिम्बाब्वेमध्ये हेच प्रमाण दुप्पट दिसले. म्हणजेच स्वत: औषधे देताना गरजेपेक्षा अधिक अतार्किक, वापर होतो का? भारतात असे काही अभ्यास झाल्याचे ऐकिवात नाही.

हेही वाचा >>>आपल्या संरक्षणदलांची सद्य:स्थिती काय आहे?

बहुतांश फार्मसिस्ट कामातील नीतिमत्तेला सर्वोच्च प्राधान्य देतात. रुग्णाची सुरक्षा केंद्रस्थानी असावी, अशी त्यांची मनोधारणा असते. ते पूर्णवेळ त्यांच्या दुकानात थांबतात. झोपेच्या गोळ्या, अँटिबायोटिक्स किंवा तत्सम औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय देत नाहीत. त्यांच्या परिसरातील डॉक्टर्सही त्यांचा आदर करतात. पण काही दुकानांत फार्मसिस्ट हजर नसतात. प्रिस्क्रिप्शनशिवायही औषधे दिली जातात आणि त्यांच्यामुळे सारेच फार्मसिस्ट्स बदनाम होतात, हे वास्तव अन्यायकारक आहे. सुक्याबरोबर ओलेही जळतेच. कायद्याची कडक अंमलबजावणी नको का? आणखी एक चिंतेची बाब- म्हणजे नावापुरती पदवी वा पदविका घेतलेले फार्मसिस्ट. त्यांनी प्रामाणिकपणे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले नसते. महाविद्यालयात केवळ प्रवेश घेतात पण उपस्थित राहत नाहीत. बोगस फार्मासिस्टचे प्रमाण वाढत आहे की काय, अशी शंका येते.

बदलत्या काळानुसार व्यवसायातील स्पर्धा वाढणार आहेच आणि त्यात टिकून राहायचे तर चांगल्या सेवा देऊन रुग्णांशी नाते अधिक सशक्त करावे लागणार आहे, हे फार्मसिस्ट जाणून आहेत आणि त्यांना यासाठी अनुकूल वातावरण हवे आहे. परदेशांत फार्मसिस्ट डॉक्टर्स आणि रुग्ण यांतील दुवा म्हणून काम करतात. आपल्याकडेही फार्मसिस्ट रुग्णमित्र झाले, तर सामाजिक आरोग्य लक्षणीयरीत्या उंचावेल. भारतातही अनेक फार्मसिस्ट स्वत:हून रुग्णांचा रक्तदाब, रक्तातील शर्करेचे प्रमाण तपासून देतात. औषधे कशी घ्यायची हे समजावून सांगतात. इन्हेलर, इन्सुलिन पेनचा वापर शिकवतात, क्षयरोगसाठीची शासनाची डॉट्सची मोफत औषधे ठेवतो. औषधाचा डोस चुकवू नये म्हणून काही रुग्णांना ‘रिमाइंडर मेसेजेस’ पाठवात. वृद्ध रुग्णांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी विनंती केल्यास त्यांची आठवडाभराची औषधे कप्पे असलेल्या औषधांच्या बॉक्समध्ये भरून देतात, ज्यायोगे त्यांचा गोंधळ न होता औषधांचे वेळापत्रक नीट पाळले जाते.

परदेशात ‘वार्धक्यस्नेही फार्मसी’ ची संकल्पना रुजत आहे. भारतातही तसे बदल करणे आवश्यक आहे. जगातील ५५ देशांतील कम्युनिटी फार्मसीमधून रुग्णांना फार्मसिस्ट लसटोचणी करतात, व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन करतात. भारतातही अनेक फार्मसिस्ट अशा सेवा देण्यास उत्सुक असू शकतात. एखादा उजळणी पाठ्यक्रम किंवा एखादी परिषदही त्यांना प्रेरणा देऊन जाते. मात्र उत्साह टिकावा यासाठी पोषक वातावरणाचा अभाव आहे. रुग्णांनाही अशा सेवांचे मोल असते की नाही कोण जाणे. ‘सेवे’पेक्षा ‘सूट’ किती यावरच त्यांचा भर असतो. मग फार्मसिस्ट अधिक धडपड न करता हिरमुसला होऊन आपला फक्त दुकानदार बनून राहतो.

इंग्लंड, आयर्लंड, अगदी इजिप्त, थायलंडसारख्या देशांतही शासनानेच फार्मसीचे महत्त्व ओळखून सोयीची विनाविलंब सेवा मिळावी यासाठी रुग्णांनी सर्वसामान्य तक्रारींसाठी फार्मसीचा आधार घ्यावा असे आवाहन केले आहे. रुग्णांना तारक आणि डॉक्टर्सना पूरक अशी ही व्यवस्था प्राथमिक आरोग्य सेवेचा भक्कम पाया बनत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकास ध्येय तीन (उत्तम आरोग्य आणि कल्याण) गाठण्यासाठीच्या प्रगतीचे जे मानक दिले आहेत त्यापैकी एक फार्मसिस्टची घनता हे आहे. आरोग्यक्षेत्रासाठी ज्या चार मुख्य स्तंभांचा उल्लेख केला आहे ते आहेत डॉक्टर, परिचारिका, दंतवैद्याक आणि फार्मसिस्ट्स आहेत. आंतरराष्ट्रीय मजूर संघटना, जागतिक आरोग्य संघटना यांनी तर पूर्वीच फार्मसिस्टना आरोग्य व्यावसायिक म्हटले आहे. ओईसीडीने शिफारस केली आहे की फार्मसिस्टच्या कामाच्या कक्षा वाढवून त्यांना अधिक व्यापक भूमिका दिली तर आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल, यामुळे देशाला आर्थिक बचतही होते. तर असे हे फार्मसिस्टचे माहात्म्य आणि महत्त्व जागतिक स्तरावर आहे.

दुकानदार ते रुग्णस्नेही आरोग्य व्यावसायिक असे परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, कायदे अंमलबजावणी या साऱ्या आघाड्यांवर काम करावे लागेल. फार्मसिस्ट या आरोग्य साखळीतील निसटलेल्या कडीला आरोग्यव्यवस्थेच्या मुख्य साखळीत गुंफणे आवश्यक आहे. आरोग्यसेवा समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचा सहभाग वृद्धिंगत करणे गरजेचे आहे. फार्मसिस्टना बळ दिले तर प्राथमिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल. जागतिक फार्मसिस्ट दिवसानिमित्त हा संकल्प करणे महत्त्वाचे आहे.

Symghar@yahoo. Com