सत्यजीत तांबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्याचे युग हे संगणक युग आहे, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जात असे. पण कृत्रिम बुद्धिमत्तेने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) सारे आयाम बदलले आणि यापुढील युग एआयचे असेल हे नक्की झाले. चॅटजीपीटीच्या माध्यमातून घराघरांत शिरलेल्या या एआय नामक यंत्रणेने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पण हिंदीत एक म्हण आहे- ‘घी देखा, लेकिन बडम्गा नहीं देखा,’ तशी या एआयची गत आहे.

अगदी महिन्याभरापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरातील आघाडीच्या उद्योजकांची भेट घेतली. विषय होता या एआयचे जगावर होऊ शकणारे नकारात्मक परिणाम! एआय विकसित झाल्यापासूनच या तंत्रज्ञानाने मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर हल्ला चढविला आहे आणि मानवी बुद्धीने त्यापुढे हात टेकले आहेत. या तंत्रज्ञानाने उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय सज्ज आहेत का?

एआय आणि डिजिटल साक्षरता

आजचा भारत विकसित आणि प्रगत आहे, असे कितीही म्हटले, तरी प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास ती बदलण्यासाठी आवश्यक असलेली लवचीकता काही आपल्याला साध्य करता आलेली नाही. आज स्मार्टफोन कंपन्यांसाठी आपला देश ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. १३० कोटींच्या या देशात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. मात्र हा फोन वापरताना सुरक्षेची काळजी कशी घ्यावी, याबाबत मात्र बहुसंख्य लोक अनभिज्ञच आहेत. अनेक जण केवळ मनोरंजनासाठीच स्मार्टफोन विकत घेतात. हे मनोरंजन करून घेताना आपली वैयक्तिक माहिती अगदी सहज विविध कंपन्यांच्या हाती जात आहे, याची त्यांना जाणीवही नसते. आधुनिक उपकरणे, नवे तंत्रज्ञान ज्याच्या हाती असते, त्याला ते कसे वापरावे याची माहिती असतेच, असे नाही.

बहुतेक वेळा ती नसतेच! देशभरातील सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. ऑनलाइन फसवणूक आज नित्याची बाब झाली आहे. नेटफ्लिक्सवरची ‘जमतारा’ ही वेब-सीरिज अनेकांनी पाहिली असेल. भारतातील डिजिटल-निरक्षरतेचे सार त्यात उतरले आहे. सायबर विश्वातील या सापळय़ांमध्ये अलगद सापडणारे अनेक जण आहेत. साक्षर-निरक्षर असा कोणताही भेदभाव या सापळय़ांत अडकणाऱ्यांमध्ये करता येत नाही. दोन्हीकडचे लोक यात फसल्याची अनेक उदाहरणे आहेत. तंत्रज्ञान वापरण्याचे अर्धवट ज्ञान असलेल्या भारतासारख्या देशात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अतिप्रगत तंत्रज्ञानाचा शिरकाव होणे, हा माकडाच्या हाती कोलीत देण्याचा प्रकार आहे.

वेगवेगळय़ा सॉफ्टवेअर कोड्सद्वारे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणे, अशी एआयची सोपी व्याख्या होऊ शकते. यंत्राने मानवी मन आणि बुद्धिमत्ता एवढय़ा सोप्या पद्धतीने आत्मसात केली पाहिजे की, त्या यंत्राला माणूस करत असलेले कोणतेही काम करणे शक्य झाले पाहिजे. एआय तंत्रज्ञान विकसित करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे. एआयचा विचार करताना त्याचाच भाग असलेल्या मशीन लर्निगचाही विचार व्हायला हवा. मशीन लर्निग म्हणजे एखाद्या संगणकाने किंवा एखाद्या प्रणालीने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय नवी माहिती स्वत:हून आत्मसात करणे! नेमक्या याच टप्प्यावर सगळे बिनसण्याची सुरुवात होते.

शिक्षण आणि रोजगार यांचे काय?

भारतीयांना तंत्रज्ञानाबाबत फार शिक्षण मिळत नाही. एआय म्हटले की, अनेकांच्या डोळय़ांसमोर मानवजातीचा ताबा घेणारे रोबो येतात. अशांसाठी एआय म्हणजे फक्त माणसाच्या आज्ञा स्वीकारणारे किंवा माणसाने विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणारे एक उपकरण असते. पण ही यंत्रेच आजकाल माणसावर आणि मानवी वर्तनावर बारीक लक्ष ठेवून आहेत, ही वस्तुस्थिती अनेकांना माहीत नसते.दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारतातील बेरोजगारी! देशाचा बेरोजगारी दर झपाटय़ाने वाढत असताना हे एआय तंत्रज्ञान भारतात येणे प्रचंड घातक ठरू शकते. अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो. या तंत्रज्ञानामुळे रोजगारांवर कुऱ्हाड कोसळली, तर लोक सरकारविरोधात बंडाचा झेंडा नक्की फडकावतील. लोकांच्या भावनांची धग तंत्रज्ञानाला समजू शकत नाही (कदाचित?) पण सरकारला तर नक्कीच लोकभावनेचा रोख समजतो. त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाची पायाभरणी करताना त्याखाली मानवजातीचा बळी दिला जाणार नाही ना, याची खातरजमा सरकारला करावी लागले. ती न करता हे तंत्रज्ञान स्वीकारले, तर समाज दुभंगेल आणि ती विनाशाची नांदी ठरेल. संपूर्ण जगभरात नेमक्या याच कारणामुळे एआय तंत्रज्ञानाविषयी धास्ती निर्माण झाली आहे.

जगाची सावध भूमिका

जगभरातील नेते, उद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती या नव्या तंत्रज्ञानाबाबत प्रचंड सावध भूमिका घेत आहेत. तसेच या तंत्रज्ञानाच्या विपरीत परिणामांविषयी जाणीव-जागृती करू लागले आहेत.अगदी अलीकडचेच उदाहरण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन! हे तंत्रज्ञान ‘धोकादायक’ ठरू शकते आणि याचे समाजावर होणारे परिणाम अद्याप समोरच आलेले नाहीत, असे त्यांनी निक्षून सांगितले. स्टिफन हॉकिंग्ज हे नाव विज्ञान-तंत्रज्ञान जगतात खूप मोठे आहे. त्यांनी लावलेल्या अनेक शोधांमुळे मानवी जीवन समृद्ध झाले आहे. २०१४ मध्ये त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल एक गंभीर वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, या तंत्रज्ञानाचा पूर्ण विकास ही मनुष्यजातीच्या अंताची नांदी ठरू शकते. हे तंत्रज्ञान झपाटय़ाने स्वत:ची पुनर्रचना करेल, स्वत:ला विकसित करेल. मनुष्यजमात मात्र उत्क्रांतीच्या नियमांनी बांधलेली आहे. ती या तंत्रज्ञानाच्या वेगाशी स्पर्धा करू शकणार नाही आणि नामशेष होईल.‘टेस्ला’चे संस्थापक इलॉन मस्क आणि ‘अॅपल’चे सहसंस्थापक स्टीव्ह वॉझ्नियाक यांनीही या तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना सावध पवित्रा घ्यावा, असे म्हटले आहे. त्यांच्या मते हे तंत्रज्ञान समाज आणि मानवजात या दोहोंसाठी मोठी जोखीम आहे. विशेष म्हणजे स्टिफन हॉकिंग्ज वगळता वर उल्लेख केलेले तिघेही अमेरिकेचे आहेत आणि सध्या ज्या चॅटजीपीटीने जगभरात भल्याभल्यांच्या काळजात धडकी भरवली आहे, तेदेखील अमेरिकेचेच अपत्य आहे.

एआय तंत्रज्ञानाच्या संस्थापकांपैकी एक असलेले शास्त्रज्ञ जेफ्री हिन्टन यांच्या मते तर हवामान बदलाच्या धोक्यापेक्षाही मोठा आणि तातडीचा धोका या नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झाला आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या विपरीत परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हिन्टन यांनी गूगल कंपनीतली नोकरी सोडली. कृत्रिम तंत्रज्ञान ज्या झपाटय़ाने अनेक क्षेत्रांमध्ये पाय रोवत आहे, ते समाजासाठी प्रचंड धोकादायक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोलाचे बोल

‘ब्लॅक मिरर’ किंवा ‘सोशल डिलेमा’ या गाजलेल्या माहितीपट आणि चित्रपटामध्ये या नव्या तंत्रज्ञानाची काळी बाजू आपण याआधीच बघितली आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर नित्यनेमाचा झाला की आपल्यापुढे काय वाढून ठेवले जाईल, याचे चित्रण करणारी अनेक पुस्तकेही आहेत. पण अजूनही कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आपण तयार नाही, ही गोष्ट आपण कबूल करायला हवी. आपणच कशाला, हे तंत्रज्ञान आणि त्यापाठोपाठ येणारी जटिल आव्हाने स्वीकारण्यासाठी जगही तयार नाही. याचे सर्वात साधे कारण म्हणजे लोकांना हुशारी आणि बुद्धिमत्ता यातला फरकच कळत नाही.
जग आणि जगातील लोक हुशार आहेत, यात वादच नाही. पण बुद्धिमत्ता हा वेगळा प्रांत आहे. सगळेच हुशार लोक बुद्धिमान असतात असे नाही. तंत्रज्ञान सारखेच आहे. पण ते वापरण्याची पद्धत हुशारीवर अवलंबून आहे. नव्या कल्पना आजकाल समोरच येत नाहीत. त्यामुळेच असेल कदाचित, पण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी मन यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने म्हटले आहे की, आम्ही आमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आणि शक्तिशाली यंत्र बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.

सरतेशेवटी एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे तंत्रज्ञान दुधारी तलवारीसारखे आहे. ती वापरण्याची कला आपल्याकडे नसेल, तर त्या तलवारीने आपलीच खांडोळी होऊ शकते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेची तलवार हाती घेण्याआधी ती योग्य पद्धतीने हाताळणे शिकून घेणे केव्हाची चांगले!