कोकणातल्या निसर्गाबद्दल अनेकजण भरभरून बोलत असतात. तो टिकवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असंही म्हणत असतात. पण याबाबत केवळ सभा-परिसंवादांमधून गळा काढत न बसता लोकांपर्यंत पोहोचण्याचं, त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य समजावून सांगण्यासाठी आपल्या आयुष्याचा काही काळ खर्ची घालायला कोणी फार पुढे येताना दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील नरवण या लहानशा गावातला आशुतोष जोशी हा तरुण मात्र परदेशातलं उच्च शिक्षण, आर्थिक लाभ आणि त्यातून आलेलं सुखासीन आयुष्य दूर ढकलून सध्या या मोहिमेवर बाहेर पडला आहे. कोकणच्या किनारपट्टीवरील निसर्ग आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आशुतोषने रायगड जिल्ह्यातील रेवस इथून पदयात्रेला गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी सुरुवात केली आहे. या जिल्ह्याच्या सागरी भागातून निरनिराळ्या गाव, वाड्या-वस्त्यांमध्ये फिरत स्थानिक लोकांशी चर्चा करून माहिती घेत तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचला असून सध्या राजापूर तालुक्यात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा