बद्री नारायण

उत्तर प्रदेशातील ‘न्याय’ झटपट झाला… पोलिसांच्या विशेष कृती पथकाने (स्पेशल टास्क फोर्स – एसटीएफ) गुरुवारी, १३ एप्रिल रोजी जाहीर केले की त्यांनी बसपचे माजी आमदार राजू पाल यांच्या २००५ मधील हत्येप्रकरणी २००८ पासून तुरुंगात असलेले माजी खासदार अतीक अहमद यांचा १९ वर्षीय मुलगा असद अहमद याला गोळ्या घातल्या आहेत…. मग दोनच दिवसांनी अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केल्याचे चित्रवाणी वाहिन्यांवरून दिसले. या दोघांना पोलीस नियमित वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. राजू पाल खून खटल्यातील साक्षीदार उमेश पाल या वकिलाची हत्या करणाऱ्या बंदूकधाऱ्यांमध्ये असदचा समावेश असल्याचा दावा एसटीएफने केला आहे. मार्च २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून पोलीस चकमकी आणि तथाकथित ‘झटपट न्याय’ हा यूपीमध्ये जोरदार चर्चेचा विषय झाला आहे. राज्य सरकारचा वरदहस्त लाभलेल्या या कारवायांबद्दल जनतेच्या मोठ्या वर्गाचा आक्षेप तर नाहीच, उलट पाठिंबा दिसून येतो.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?

योगी आदित्यनाथ यांनी कधीही राज्यातील पोलिस चकमकींबाबत दिलगिरी व्यक्त केलेली नाही (१८ एप्रिल रोजी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री या नात्याने बोलताना, ‘आपल्या राज्यातील उद्योजकांना आता माफियांचे भय उरलेले नाही’ असा दावा आदित्यनाथ यांनी केला, ती अतीक अहमदच्या हत्येनंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया मानली जाते). आदित्यनाथ यांनीच ‘मतदारांना आता सुरक्षेची हमी आहे’ असा प्रचार २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी करताना राज्य पोलिसांच्या या कृतींना ‘सुरक्षा’ या कथानकात गुंफले होते. जमीन बळकावणारे आणि गुन्हेगारांपासून सामान्य लोकांच्या सुरक्षेचे आश्वासन आदित्यनाथ यांनी दिले होते आणि उत्तर प्रदेशला शांततामय समाज म्हणून प्रगत करण्याचे आश्वासन दिले होते. याच आदित्यनाथ यांची ‘बुलडोझर बाबा’ अशी प्रतिमाही २०२२ च्या निवडणूक प्रचारादरम्यान पुढे आली. ‘सुरक्षे’चा अजेंडा बळकट करण्यासाठी बुलडोझर वापरून गुंड आणि दंगलखोर म्हणून राज्याच्या समजल्या जाणाऱ्या लोकांच्या मालमत्तेची नासधूस करण्याचा आदेश दिल्याबद्दल आदित्यनाथ यांची कीर्ती पसरली. भाजपच्या इतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यात गुन्हेगारीविरोधात योगी मॉडेलचे अनुसरण केले आहे. योगी यांची प्रतिमा ‘गुन्ह्यांबद्दल शून्य सहनशीलता असलेले मुख्यमंत्री’ अशी दाखवण्यासाठी पोलीस चकमकींचाही उल्लेख करण्यात येतो. ‘सरकार गुन्हेगारांची गय करणार नाही’ असे सतत सांगितले जाते आणि चकमकींमुळे ते लोकांना खरे वाटत राहाते.

आणखी वाचा- ‘यूपी’ची बातमी दिली, म्हणून ‘भारताची बदनामी’ झाली?

उत्तर प्रदेशातच नव्हे तर राज्याबाहेरही ‘कणखर आणि प्रभावी मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा विकसित करण्यात आदित्यनाथ यांना यामुळे मदत झाली आहे. हिंदी भाषिक पट्ट्यामधील अन्य राज्यांतील भाजप समर्थकांसाठी ते नायकच ठरले आहेत, असे दिसून येते. खुद्द उत्तर प्रदेशात आदित्यनाथ यांच्याबद्दलचे मत विचारले की “वो सब ठीक कर देंगे”, असे सांगून माणसे विषय टाळतात. या राज्यात मुख्यमंत्र्यांना हल्ली बाबा किंवा महाराज म्हणून संबोधले जाते.

कायदा आणि सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेचा आधार निर्माण करणारे योगी हे पहिले मुख्यमंत्री नाहीत. याच राज्यात चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती यांचेही त्यांच्या कार्यकाळात, माफिया आणि शक्तिशाली गुंडांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याबद्दल कौतुकच झाले होते. मात्र, योगी एक पाऊल पुढे गेले आहेत. नागरी हक्क कार्यकर्त्यांकडून आणि अधूनमधून न्यायालयांकडून टीका होत असतानाही, ‘राष्ट्रनिर्माणा’साठी किंवा ‘राज्य-निर्माणा’साठी, सर्वांगीण प्रगतीसाठी आता या राज्यात पोलीस चकमकी आवश्यक, म्हणून न्याय्य आहेत. हे कथन असे की, गुंड उत्तर प्रदेशची प्रतिमा खराब करतात आणि विकासाची गाडी रुळावरून घसरण्यास केवळ हे गुंडच कारणीभूत आहेत. तसेच, गुंडांचा नायनाट करणे हे जनतेला ‘सुरक्षा’ देण्यासाठी आवश्यक पाऊल आहे ! शांततापूर्ण वातावरण गुंतवणूकदारांना उत्तर प्रदेशाकडे आकर्षित करेल असाही तर्क मांडला जातो. या कथानकाला उत्तर प्रदेशात व्यापक मान्यता आहे.

जमिनीच्या विक्री-खरेदीसाठी ‘सुरक्षा’

योगींच्या ‘सुरक्षा’ कथानकाची ही लोकप्रियता उत्तर प्रदेशच्या समाजामधील बदलांशीदेखील जोडलेली आहे, विशेषत: शहरी मध्यमवर्ग आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीशी. हा वर्ग वाढू लागला, त्यांच्याकडे गुंतवणूक-योग्य पैसा असू लागला तेव्हापासून याही राज्यात जमीन ही एक मौल्यवान वस्तू बनली आहे… पण उत्तर प्रदेशात जमीनजुमला ही असुरक्षितता देखील वाढवणारी मालमत्ता ठरत आली आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय हिंदूंपैकी काहीजण धर्माच्या चौकटीतूनच भूमाफियांकडे पाहातात- ‘इथले अनेक डॉन मुस्लिम आहेत’, असाच विशेषत: मध्यमवर्गाचा समज आहे.

आणखी वाचा-देवाच्या दारात एवढे अपघात का होतात?

उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरे – आग्रा, अलीगढ, कानपूर, लखनौ, अलाहाबाद आणि बनारस – वेगाने विस्तारत आहेत. छोट्या शहरांमध्येही नागरीकरणाची प्रक्रिया वेगवान झाली आहे, त्यामुळे शहरांभोवतीच्या ग्रामीण भागातही कायापालट झाला आहे. गावठाणे आणि शहरांमधील जमिनीचे मूल्य वाढले आहे. महामार्गांच्या विस्तारामुळे महामार्गालगतच्या गावांसह जमिनीच्या किमतीत वाढ झाली आहे. अशाच वेळी, भू-माफियांमुळे दैनंदिन जीवनात या गुन्हेगारांकडून छळ आणि अपमान सहन करणाऱ्या मालमत्ताधारक वर्गांची असुरक्षितता वाढली आहे. मध्यमवर्गीयांमधील असुरक्षिततेची हीच भावना योगींनी त्यांच्या ‘सुरक्षा’ कथानकाला बळकटी देण्यासाठी वापरली आहे. चकमकी आणि तत्सम राज्य कारवायांमधून योगींचे सरकार माफिया आणि जमीन बळकावणाऱ्यांना सामान्य लोकांच्या जमिनी आणि संपत्तीपासून दूर ठेवण्याचा संदेश देऊ पाहाते.

गेल्या काही वर्षांत, या ‘सुरक्षा’ कथानकाने योगींसाठी प्रचंड राजकीय भांडवल निर्माण केले आहे. योगींची लोकप्रियता वाढत असल्यामुळे भाजपला निवडणुकीत फायदा होतो आहे.

लेखक ‘गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्था, अलाहाबाद’ येथे प्राध्यापक आहेत.