पद्माकर उखळीकर
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनापासून दिल्ली वेगळ्याच अर्थाने चर्चेत आहे. तर त्यानंतर झालेल्या राजकीय बदलानंतर दिल्लीचे नाव माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याभोवती फिरत आहे. असो, आपण महिलांना नेतृत्व मिळत नाही अशी चर्चा नेहमी करतो. सध्या मात्र दिल्लीची धुरा एका महिलेकडे आली आहे. उच्चशिक्षित, विवेकी, अभ्यासू चौकसबुद्धी असलेल्या आतिशी सिंग यांच्याकडे आम आदमी पक्षाने या पदाची धुरा सोपविली आहे. आता त्या संधीचे सोने करतील की, वरिष्ठांच्या चौकटीत राहून काम करतील, हे पाहण्यासारखे असेल. 

आतिशी मार्लेना सिंग यांचा जन्म ८ जून १९८१ साली झाला. सामाजिक कार्यापासून कारकीर्द सुरू करू आता त्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचल्या आहेत. खरे तर अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना सुद्धा आपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी आपचा करिष्मा कायम ठेवला. एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी हा आम आदमी पार्टीचा कणा ठरला. वरिष्ठ नेत्यांना एकापाठोपाठ अटक होत असताना, सरकारची विश्वासार्ह कायम ठेवण्यात या कार्यकर्त्यांनीच मोलाचा हातभार लावला आणि त्यात आतिशी आघाडीवर होत्या. 

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”

आज आतिशी या एक राजकारणी म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्या मूळच्या उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या आहेत. राजकीय कार्यकर्ता म्हणून जेव्हा त्यांची इनिंग सुरू झाली तेव्हा त्या दिल्लीच्या जनतेत लोकप्रिय झाल्या. एक नवीन स्वच्छ प्रतिम मतदारांसमोर उभी राहिली. तसाही आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा पाठिंबा होताच. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत कालकाजी या विधानसभा मतदारसंघातून आतिशी सिंग निवडून आल्या. सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय कार्यकर्ता, दिल्ली विधानसभेच्या सदस्य आणि आता थेट राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री अशा पायऱ्या त्या चढत गेल्या. आम आदमी पक्षानेही त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. नवनवीन संधी दिल्या. विविध पदांवर नियुक्ती करून जबाबदारी घेण्यास सक्षम केले. 

हेही वाचा >>>धर्माधिष्ठित मतपेढीची जुळवाजुळव

आज आतिशी यांचे पक्षातील स्थान अनन्यसाधारण आहे. त्या आम आदमी पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीच्या सदस्य आहेत आणि दिल्ली सरकारमध्ये शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, संस्कृती आणि पर्यटन मंत्री आहेत. जुलै २०१५ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या मुख्यतः शिक्षणविषयक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. अभ्यासू, उच्चशिक्षित, प्रखर वक्तृत्व असलेल्या आतिशी सिंग या दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री आणि तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.

दिल्लीत वाढलेल्या आतिशी सिंग यांनी स्प्रिंगडेल्स स्कूल (पुसा रोड), नवी दिल्ली येथे शालेय शिक्षण घेतले. २००१ मध्ये सेंट स्टिफन्स कॉलेज, दिल्ली येथून इतिहासात पदवी प्राप्त केली. त्यानंतर लगेचच, त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात २००३ मध्ये चेव्हनिंग शिष्यवृत्तीवर इतिहासात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. आतिशी सिंग यांनी काही काळ आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली विद्यालयात अध्यापन कार्य केले. तिथे त्यांनी सेंद्रीय शेती आणि प्रगतिशील शिक्षण प्रणाली यासारख्या कामांत सहभाग घेतला आणि अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर काम केले. मध्यप्रदेशातील भोपाळजवळील एका छोट्या गावात त्यांनी सामाजिक कार्य केले.

हेही वाचा >>>कुलगुरू पदाची अवनती जुनीच… डॉ. रानडे हे त्यातील नवे पान!

जानेवारी २०१३ मध्ये आम आदमी पक्षासाठी धोरणे तयार करण्यात आतिशी यांचा सहभाग होता. २०१५ मध्ये मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील जल सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला. या आंदोलनादरम्यान आणि त्यानंतर झालेल्या कायदेशीर लढाईत आप नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांनी पाठिंबा दिला. २०२० च्या निवडणुकीनंतर त्यांनी आपच्या गोवा युनिटच्या प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतिशी यांची पूर्व दिल्लीच्या लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून आपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्याकडून त्या चार लाख ७७ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाल्या. या निवडणुकीत त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. 

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर सौरभ भारद्वाज यांच्यासह कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना दिल्ली सरकारमध्ये सहभागी करून घेण्यात आले. २०२० पासून त्या कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी इतरही अनेक महत्वाची पदे सरकार आणि संघटनेत भूषविली आहेत. त्या अनेक सांविधानिक पदांवरही होत्या आणि आहेत. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

२०२२-२३ साली त्यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. २०२२-२३मध्ये प्रश्न आणि संदर्भ समितीच्या सदस्य, २०२२-२३ मध्ये महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्य २०२२-२३ मध्ये आचार समिती सदस्य, २०२२-२३मध्ये अल्पसंख्यांक कल्याण समिती सदस्य, २०२२-२३मध्ये शिक्षण स्थायी समिती सदस्य, २०२२-२३ मध्ये आरोग्यविषयक स्थायी समिती सदस्य अशा महत्त्वाच्या समित्यांच्या सदस्यपदी त्यांनी काम केले. कामाचा प्रदीर्घ अनुभव आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. पक्षाची भूमिका आतिशी नेहमी हिरीरीने मांडत आल्या आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर आतिशी या आता दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. या पदाच्या माध्यमातून त्या दिल्लीला विकासाची नवी उंची गाठण्यास साहाय्यभूत ठराव्यात, हीच अपेक्षा.