बुधवार २२ मेची दुपार… ऑफिसमधील जेवणाच्या सुट्टीत येणाऱ्या शनिवारपासून चालू होणाऱ्या तीन दिवसाच्या सुट्टीत काय करायचं याबद्दलच्या कार्यक्रमाची गप्पाष्टकं रंगली होती. पुढल्या आठवड्यात शाळेलाही सुट्टी असल्यानं बऱ्याच जणांनी युरोपात कुठेतरी सुट्टी घालविण्याचा बेत आखला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अचानक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बोलावण्यात आलं. पूर्वी आखलेल्या मंत्र्यांसोबतच्या बैठका रद्द करण्यात आल्या. लॉर्ड डेव्हिड कॅमरॉन – ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी महत्त्वाचा परराष्ट्र दौराही रद्द केला. अनेक कॅबिनेट मंत्र्यांना ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधान ऋषी सुनक यांचं घर आणि कार्यालय येथे ताबडतोबीनं पाचारण करण्यात आलं. न्यूज चॅनलवर तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. काहींनी भाकित केलं की पंतप्रधान राजीनामा देणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या स्थनिक निवडणुकांमध्ये सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह (मराठी प्रचलित प्रतिशब्द ‘हुजूर’) पक्षाचा मोठा पराभव झाला होता. विरोधी लेबर (मजूर) पक्षानं बहुतांशी स्थानिक निवडणुकींवर वर्चस्व मिळवलं होतं. त्यामुळे काही कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या संसद सदस्यांनी पुन्हा पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. काही पत्रकारांनी मात्र ‘पंतप्रधान निवडणुकीची घोषणा करणार’ असं भाकित केलं.
ब्रिटनचा सध्याचा संसदीय काळ या वर्षअखेरपर्यंत वैध आहे. परंतु गेल्या काही महिन्यांत झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लेबर पार्टीनं वर्चस्व दाखवलं होतं. बहुतांश अभ्यासकांच्या अंदाजानुसार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला फटका बसून लेबर पार्टीला बहुमत मिळेल असं दिसतं आहे. अशा परिस्थितीत ऋषी सुनकही आगामी निवडणुका वर्षाच्या शेवटी होतील असं सांगत होते, त्यामुळे इतक्या लगेच निवडणुका होतील या भाकितावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं.

हेही वाचा – ट्रेडमार्कचा वाद : मॅकडोनाल्ड्स पुन्हा बाद

‘पंतप्रधान संध्याकाळी पाच वाजता एक मोठी घोषणा करणार’ असं त्यांच्या कार्यलायातून सांगण्यात आलं. ‘१०, डाऊनिंग स्ट्रीट’मध्ये जगभरातील बातमीदार आपला ठिय्या धरून होते. तशातच पावसाचा जोर वाढला. जसजसे पाच वाजत आले तसतसं चार जुलैला ब्रिटनमध्ये निवडणुका घेतल्या जातील यावर बऱ्याच बातमीदारांचं एकमत होऊ लागल्याचं दिसलं. हे जर खरं ठरलं तर सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसणार होता. पावसाचा जोर जरी कमी झाला, तरी त्याची संततधार चालू होती. अखेर त्या प्रसिद्ध दरवाज्यातून बाहेर पडून ऋषी सूनक यांनी चार जुलैला निवडणुका होतील अशी घोषणा केली. पावसाच्या रिपरिपीची तमा न बाळगता त्यांनी लोकांना कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला मत देण्याचं आवाहन केलं आणि निवडणुकीचा शंख फुंकला.
जवळपास १८ महिन्यांपूर्वी जेव्हा ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे पंतप्रधान पद स्वीकारलं तेव्हा महागाईचा दर कमी करण्याचं आणि बाहेरून येणाऱ्या अवैधिक लोकांचं प्रमाण करण्याचं आश्वासन दिलं होतं. आरोग्य सुविधा सुधारणं, नवीन रोजगार निर्माण करणं हाही त्यांच्या आश्वासनांचा भाग होता. नेमकं २२ मे च्या बुधवारी सकाळीच इंग्लंडमधला महागाईचा दर तीन टक्क्यांहून खाली आल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. जवळपास एक वर्षापूर्वी हाच दर १० टक्क्यांपेक्षा जास्त होता. एका नव्या अहवालानुसार, ब्रिटनमध्ये अवैधमार्गानं येणाऱ्या आश्रितांमध्ये (असायलम सीकर्स) घट झाली होती. दरवर्षी ब्रिटन यामागे कोट्यवधी पौंड गुंतवतं. यामुळे महागाई आणि इमिग्रेशन (वैध वा अवैध स्थलांतर) नियंत्रण ही बऱ्याच मतदारांची मागणी होती. म्हणूनच ऋषी सुनक यांनी सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्याची धक्कादायक घोषणा केली.

ऑक्टोबर २०२२ मध्ये योगायोगानं दिवाळीच्या पहिल्या दिवशी जेव्हा ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा काहींना अगदीच आश्चर्य वाटलं होतं. अर्थात त्यांचं नाव लोकांना परिचित होतं. त्यांची राजकीय कारकीर्द लक्षवेधी होती. अर्थमंत्री म्हणून करोनाच्या महासाथीमध्ये त्यांनी ब्रिटनचा कारभार कुशलतेनं सांभाळला होता. त्यानंतर यांनी तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या बेलगाम कार्यपद्धतीला रामराम ठोकला आणि त्यांना पदच्युत केलं. त्यानंतर झालेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकीत त्यांना लिझ ट्रस यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण लिझ ट्रस यांचं सरकार केवळ दोन महिनेच टिकलं. त्यांनी जाहीर केलेल्या आततायी आयकर कायद्यांमुळे आर्थिक बाजारांत एकच खळबळ उडाली. ब्रिटनचं चलन – स्टर्लिंग पाउंड इतकं घसरलं की, आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी व्याजदर अचानक वाढवावा लागला.

अशा स्थितीत ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे पंतप्रधानपद म्हणून पदभार स्वीकारला! हा ब्रिटनच्या नव्हे जगाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा बदल होता. अनेकांनी त्यांची तुलना ओबामांशी केली. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच, ज्याचे पालक या देशात स्थलांतरित झाले अशा आणि हिंदू धर्मीय व्यक्तीनं एवढ्या उच्चपदाकडे भरारी घेतली, असं रास्त कौतुकही झालं.

हुजूर पक्षानं ब्रिटनवर २०१० पासून सत्ता गाजवली आहे. योगायोगानं मीदेखील त्याच दरम्यान इथे कामानिमित्त स्थलांतरित झालो. गेल्या चौदा वर्षांत येथील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. लोकांचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. उदाहरणार्थ, मी प्रथम इथे आलो तेव्हा बहुतांशी लोकांना हिंदी आणि हिंदू यांतील फरक कळत नव्हता. भारतीय जेवण म्हणजे नान, चिकन टिक्का मसाला, समोसा, भजी, डोसा आणि पुलाव यापुरतंच मर्यादित होतं. आताशा लोक भारतीय जेवणाचं प्रादेशिक वर्गीकरण करतात. त्यांना भारतीय, पाकिस्तानी, नेपाळी आणि श्रीलंकन असा फरक समजू लागला आहे! भारतीय वंशाचे लोक केवळ व्यापार आणि तंत्रज्ञान यापेक्षा इतर कला आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये उच्च पदावर दिसू लागले आहेत. केवळ भारतीयच नव्हे तर इतर वंशाचे आणि वर्णाचे लोकही सामाजिक आणि राजकीय पटलावर ठळकपणे दिसू लागले आहेत. एका अभ्यासानुसार, ब्रिटिश लोकांची विचारसरणी अधिकाधिक प्रगत होत आहे. उदा. हल्ली केवळ १०-१५ टक्के लोकच समलिंगी संबंधांना मान्य करत नाहीत. दहा वर्षांपूर्वी हेच प्रमाण ४०-५० टक्के होतं.

निष्पक्षता हा ब्रिटिश मूल्यांचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथं आर्थिक, सामाजिक, वांशिक किंवा वर्ण या गोष्टींवर राखीव जागा ठेवल्या जात नसल्या तरी, या समाजांतल्या लोकांना व्यवस्थित मदत आणि आधार देऊन त्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. विविधता ही केवळ लिंग, वंश, वर्ण यांसारख्या गोष्टींवर अवलंबून न ठेवता, विविध विचारसरणींना मुभा देणं हे महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे एका हिंदू धर्मीय आणि स्थलांतरित पालक असलेल्या व्यक्तीनं या देशाचं पंतप्रधान पद भूषवणं हे जितकं महत्त्वाचं होतं; तितकंच सहज घडलेलं, काहीसं अपरिहार्यच वाटलं.

गेल्या काही वर्षांत इथं स्थलांतरित झालेल्या अनेक व्यक्तींनी महत्त्वाची सरकारी पदं भूषविली आहेत. इंग्लंडप्रमाणेच, स्कॉटलंड आणि वेल्स यांसारख्या प्रदेशांच्या राजकीय पटलावर इतर धर्माचे आणि वंशाचे लोक कार्यरत आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. कारण ही दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या विचारसरणींवर अवलंबून असणार आहे. विरोधी लेबर पार्टीनं लोकांना गेल्या चौदा वर्षांच्या वनवासापासून सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. तर ऋषी सुनक यांनी लोकांना त्यांच्या जवळपास दोन वर्षांच्या कालखंडावर चढता कौल देण्याचं आवाहन केलं आहे. विविध राजकीय अंदाजांद्वारे लेबर पार्टीला बहुमत मिळणार असं भाकित केलं जातं आहे.

राजकारणामध्ये आठवडा हाही एक मोठा कालखंड असतो असं म्हटलं जातं. निवडणुकांना जवळपास काहीच दिवस उरले आहेत आणि राजकीय रणमधुमाळीचा शंखनाद अद्याप घुमतो आहे! आगामी काही दिवसांत दोन्ही महत्त्वाच्या पक्षांद्वारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी उच्चरवात घोषणा केल्या जातील. त्यातल्या काही अवाजवी असतील. कदाचित काही स्टंटही केले जातील. ऋषी सुनक किंवा किअर स्टॅमर (Kier Stammer) किंवा आणखी कोणी… ब्रिटनचं पंतप्रधानपद चार जुलैनंतर स्वीकारतील, हेच केवळ आता ठोसपणे सांगता येईल!

हेही वाचा – तैवानने मोदींचे अभिनंदन केले, चीनचे काय बिघडले?

सध्या तरी कन्झर्व्हेटिव्ह आणि लेबर या दोन महत्त्वाच्या पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. लिबरल डेमोक्रेटिक आणि ग्रीन पार्टी हे इतर पक्ष जरी ब्रिटनच्या सर्व भागांत प्रसिद्ध नसले तरीही त्यांच्याकडे काही महत्त्वाचे विभाग आहेत; आणि जर संसद त्रिशंकू झाली, तर या पक्षांना अधिकच महत्त्व प्राप्त होईल. स्कॉटिश नॅशनल पार्टी ही स्काॅटलंडमध्ये तर प्लाइड कॅमरी ही वेल्समध्ये जास्त सक्रिय आहे. अतिक – कठोर धारणांची रिफॉर्म पार्टी काही ठराविक भागांतच सक्रिय आहे. ऋषी सुनक यांनी लगेचच डर्बी या मध्य- इंग्लंडच्या शहरातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. सर किअर स्टार्मर यांना मात्र थोडा वेळ लागला आणि निवडणुकीच्या घोषणेनंतर तीन दिवसांनी ससेक्समधून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. सर एड डेवी जे लिबरल डेमोक्रॅटी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी विंडरमेअर येथील तलावात एक छोटी बोट चालवून प्रचाराचा आरंभ केला. दुर्दैवाने ही बोट उलटली झाली आणि त्यांचं हसं झालं! येत्या दिवसांत पंतप्रधान पदासाठी उत्सुक असलेले नेते आणि त्यांचे कार्यकर्ते बरेच स्टंट करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील. मतदारही प्रत्येक पार्टीचा जाहरीनामा आवर्जून वाचेल, टीव्ही, सोशल मीडिया, वर्तमानपत्रे यांमध्ये या जाहीरनाम्यावर खुली चर्चा होईल. इथले बरेच लोक पिढ्यान् पिढ्या एकाच पक्षाचं समर्थन कतात. सहसा कर्मचारी/ कामगार वर्ग लेबर पक्षाला समर्थन करतो. परंतु गेल्या काही वर्षांत कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळेही बरेचसे लेबर पक्षाला समर्थन करू लागले आहेत. व्यावसायिक वर्ग, काही उच्चभ्रू आणि ज्येष्ठ नागरिक सहसा कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला पसंती देतात.

निवडणुकांना दहाच दिवस उरले आहेत. तरीही जनमताचा कौल कुठल्या बाजूनं जाईल हे ठामपणे आत्ताच सांगणं कठीण आहे. करोना टाळेबंदी उठवल्यानंतर अर्थव्यवहार सुरू व्हावेत, लोकांनी बाहेर जाऊन खावं, यासाठी ‘रेस्तराँच्या बिलात सूट’ ही योजना अमलात आणल्यामुळे सुनक यांना ‘डिशी ऋषी’ असं टोपणनाव पडलं होतं. त्यांची खेळी फलदायी ठरेल की लोक वैतागून लेबर पार्टीला बहुमत देतील हे पुढल्या काही दिवसांतच कळेल.

wizprashant@gmail.com