सुहास सरदेशमुख

एक सहा मजली आरस्पानी इमारत. साधारणत: २५ हजार चौरस फुटांची असेल. काचांमुळे चमचमणारी, आलिशान. दोन हजार हेक्टरवरील औद्योगिक शहरात घडणाऱ्या प्रत्येक बाबीवर नजर ठेवता येईल अशी. या इमारतीत नियंत्रण कक्षाची क्षमता. वीज, पाणी, वेगवान इंटरनेट सुविधा, कोणताही बिघाड संगणकावर ओळखून तो तातडीने दुरुस्त करणारी यंत्रणा, बैठका घेण्याची व्यवस्था. मालवाहतूक करण्यासाठी रुंद आणि गुळगुळीत रस्ते. ही सारी सुविधा औरंगाबादच्या विमानतळापासून १२ किलोमीटरवर. हे केंद्रस्थान आहे विकासाचे. ‘औरिक’ हे त्याचे लघुनाम. औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी. आता याच भागात ‘इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’ उभे केले जाणार आहे. शेजारून जाणारा मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग उद्योगी माणसाला भुलवणारा. त्यानेही उद्योगांना नवे बळ दिले.

Chandrapur , Bus Tap Karo,
चंद्रपूरच्या ध्येयवेड्या तरुणांनी स्थापन केली ‘बस टॅप करो’ कंपनी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
Loksatta explained Why has the issue of ash management in thermal power plants come into the spotlight
विश्लेषण : औष्णिक विद्याुत प्रकल्पातील राख व्यवस्थापनाचा मुद्दा चर्चेत का आला?

ज्यांच्या जमिनीवर ‘औरिक’ची इमारत उभारली ते सुभाष रामराव इत्थर यांच्याकडे आता ‘टिॲगो’ कार आहे. त्यांनी घर बांधले आहे. त्यांनी पाच मुलींची लग्ने लावली आहेत. रांजणगावला साडेआठ एकर जमीन घेऊन ते शेती करत आहेत. आता जमिनींच्या व्यवहारांत कौटुंबिक अडचणी खूप आहेत. लाडगाव असो की, करमाड. दोन्ही गावांतील जमिनींवर आता बहिणींचे दावे वाढले आहेत. त्यातून न्यायालयातील प्रकरणांची संख्या वाढू लागली आहे. ज्यांच्या जमिनी औद्योगिक वसाहतींमध्ये वापरल्या गेल्या त्यांच्या घरात बहिण-भावाच्या नात्याची वीण मात्र उसवली आहे. पैसा वाढला तसे बिअरबार वाढले. व्यसनाधीनता वाढली. ज्यांना पैसा हाताळता आला नाही ते बसलेले असतात गावातील टपरीवर, चहापाणी करत. पण, करमाडच्या भगवानराव मुळे यांच्याकडे कामासाठी वेळ कमी पडतो. त्यांचे टायरचे शोरुम आहे. पेट्रोल पंप आहे, एक उद्योगही थाटण्याची तयारी सुरू आहे, श्री पॅकेजिंग नावाचा. चौघे भाऊ उद्योगात रमले आहेत. ज्यांनी पैशातून नवी गुंतवणूक केली, शेती घेतली त्यांचे एक पाऊल पुढे आहे. पण, त्याच वेळी समृद्धीतून आलेला चंगळवाद आता या परिसरात कमालीचा वाढतो आहे. करमाडचे सरपंच विठ्ठल कोरडे म्हणाले, ‘‘औरंगाबादपासून ४० किलोमीटपर्यंत साखरपुडय़ाचे कार्यक्रमही जंगी होतात. हुंडय़ात आता किमान २५ तोळे ही किमान अपेक्षा आहे या भागात. हे बदलायला हवे होते. पण बदलाला आकार देताना काही बाबी सुटून गेल्या हातातून. ’’

उद्यमशीलता
परदेशात शिकून परतल्यानंतर औरंगाबादमध्ये वडिलांच्या उद्योगाला पुढे नेणारे औरंगाबादमध्ये ३०-३५ तरुण उद्योजक आहेत. कोणी वजन वाहून नेणारे रोबो विकसित केले, तसेच दुसरीकडे बिअरला लागणारे पाणी आणि दुष्काळ असा विषय चर्चेत आला तेव्हा बिअरच्या बाटल्या धुण्यासाठी कमी पाणी आणि अधिक दाबाची हवा असणारे ‘नोजल’ तयार करणारे. जगभरातील व्यवस्थान कौशल्याचे प्रयोग तरुण उद्योजक त्यांच्या कंपन्यांमध्ये करत आहेत. जगभरात विनाचालक चारचाकी गाडी असावी असे प्रयोग सुरू आहेत. त्याची संकल्पना, त्याची आखणी करणारे उद्योजकही औरंगाबादचे. विविध प्रकारे औद्योगिक उत्पादनातील वेल्डिंगचे नवे तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारे रोबोज औरंगाबादच्या औद्योगिक जगात आता सहजपणे दिसतात.

हे सारे घडले कसे?
उद्यमशीलता घडविण्याचे खरे श्रेय हे बजाज कंपनीच्या औरंगाबादमधून उत्पादन सुरू करण्याच्या निर्णयाचे. दुचाकी आणि पुढे तीन चाकी रिक्षा उत्पादनास बजाजने सुरुवात केली अणि या उत्पादनास लागणारे अनेक सुटे भाग निर्मितीचे छोटे उद्योजक निर्माण झाले. त्यांनी केवळ उद्योजकता अक्षरश: लहान बाळासारखी सांभाळली. नवे कौशल्य देऊन मनुष्यबळ निर्माण करण्याचे मोठे काम १९८९ ते २००० पर्यंत औरंगाबादच्या उद्योजकांनी केले. या काळात वाळुज ही औरंगाबादची औद्योगिक वसाहत वाढली. या उद्योजकांची मुले पुढे परदेशी शिकली आणि पुन्हा औरंगाबादला आल्यानंतर जगात वापरल्या जाणाऱ्या औद्योगिक प्रारुपांचा इथे प्रयोग करू लागली आहेत.

क्षेत्रफळ : १०,१३८ हजार चौरस किलोमीटर
लोकसंख्या : १६.९६ लाख

नद्या : गोदावरी, सुखना, गिरना, शिवना, दुधा, खाम
आरोग्य केंद्रे : ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११४ उपकेंद्रे, ५ ग्रामीण रुग्णालये
शाळा : ४ हजार ६००
महाविद्यालये : १८३
वैद्यकीय महाविद्यालये : ०३
उद्योग : ४६० मोठय़ा कंपन्या
लघुउद्योग : ३०८९. एकूण चार हजारांहून अधिक कंपन्या
शेती : ७ लाख ७५ हजार ७०० हेक्टर
जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा लेणी, बीबी का मकबरा ही ऐतिहासिक स्थळे. शिवाय पैठणी, हिमरु शालसारख्या वीणकाम क्षेत्रातील कुशल कामगार हे जिल्ह्याचे वैशिष्टय़.

करमाड: प्रगतीचे प्रतीक
दहा हजार लोकवस्तीच्या करमाड नावाच्या गावात आता राष्ट्रीयीकृत बँकेसह वीस बँका आणि पतसंस्था आहेत. लाखांचे व्यवहार सहज होतात. गावात पेट्रोलपंप आहेत, चारचाकी गाडय़ांच्या टायरचे शोरुम आहे. फॉच्र्युनरपासून ते जगभरातील सर्व चारचाकी ब्रॅण्ड्च्या कार करमाडमधील रस्त्यांवर धावताना दिसतात. ज्यांचे अर्थव्यवस्थापन चांगले, पैसा फिरवण्याची क्षमता अधिक अशा व्यक्तींची महिन्याची उलाढाल दोन ते पाच लाखापर्यंतची आहे.

कमतरता काय?
उद्योगनगरीसाठी आवश्यक असलेल्या काही सुविधांची मात्र येथे कमतरता जाणवते. अपुरी विमान सेवा, पुण्यासारख्या शहराला जाणारा रस्ता चांगला नसणे या कमकुवत बाजू. दरडोई उत्पन्न वाढविण्याच्या योजनांकडे दुर्लक्ष हेही ठळकपणे दिसते.

८० देशांत निर्यात
संशोधन, जिज्ञासूपणाला चालना देणारी साखळी निर्माण करावी लागते. हे सारे अन्न साखळीसारखे. त्यासाठी वेगवेगळय़ा संस्था उभा कराव्या लागतात हे भानही येथील उद्योजकांमध्ये आहे. हे विकसित होताना कौशल्य वाढविणाऱ्या संस्था आणि अभ्यासक्रमातील बदलापर्यंतचे प्रयोग सुरू असतात. त्यातून जगभरातील ८० देशांत औरंगाबादमधून निर्यात होते. शिवाय संरक्षण साहित्य आणि आता रेल्वेचेही सुटे भाग निर्मितीसाठी उद्योजक पुढे येऊ लागले आहेत. हे वाढीला प्रोत्साहन देणारे आहे.

Story img Loader