सर्वोत्तम कादंबरीसाठीच्या जागतिक स्पर्धापैकी ‘बुकर’ या वार्षिक सोहळय़ाची धामधूम पहिल्या १३ कादंबऱ्यांच्या दीर्घ यादीपासून सुरू होते. त्यात भारतीय वंशाच्या नावांचा समावेश असला, तर वृत्तघुसळण करणाऱ्या आपल्याकडच्या माध्यमांना मिरवण्यापुरता बुकराभिमानाचा पुळका येऊ लागतो. यंदा तो जोराने येऊ घातला आहे, तो केनियात जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये वाढलेल्या चेतना मारू या लेखिकेच्या ‘वेस्टर्न लेन’ या कादंबरीमुळे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दोन-तीन पिढय़ांपूर्वी व्यापारानिमित्ताने भारत सोडून देशाटन करणाऱ्या, केनियामार्गे ब्रिटन गाठणाऱ्या गुजराती समुदायाची पुढली पिढी साहित्यात हिशेब मांडू लागलेली अलीकडे प्रकर्षांने दिसते. त्यातही निरा या आठमाही पेय-पोयीसारखी ‘दु:ख विक्री केंद्र’ असा लेखनाचा आंतरराष्ट्रीय ठसा या लोकप्रियतेच्छू लेखिकांनी मांडला आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीत जन्मलेल्या अवनी जोशी यांची आपल्या सर्वपरिचित पुण्यात घडणारी ‘गर्ल इन व्हाइट कॉटन’ (ब्रिटनमधील नाव बण्र्ट शुगर) कादंबरीदेखील याच ठशाचा एक नमुना. बुकरमधील लघुयादीत शिरकावामुळे या कादंबरीची बरीच चर्चा झाली. पण हा नमुना पहिल्यांदा बहुचर्चित केला झुंपा लाहिरी यांनी आपल्या अमेरिकेत लिहिलेल्या कथा-कादंबऱ्यांतून. भारतीय मुळांच्या देखाव्यातील अमेरिकनत्व किंवा ब्रिटनत्व यांच्यात फिरणाऱ्या ‘नेटफ्लिक्स’कुलीन रंजनाचे ग्लोबलमूल्य प्रचंड असल्याचे पुन्हा-पुन्हा समोर येते. चेतना मारू यांच्या ‘वेस्टर्न लेन’ या पहिल्याच कादंबरीचे बुकरच्या तेरांत येणे, हे अगदी ताजे उदाहरण. बुकरच्या दीर्घ यादीतील समावेशामुळे ते लख्ख झाले. पण इतरही काही चमचमणारी ब्रिटिश-भारतीय नावे आहेतच.
त्यातील पहिले ज्योती पटेल यांचे. त्यांच्या ‘द थिंग्ज दॅट वुई लॉस्ट’ या कादंबरीतील प्रमुख पात्राला आपल्या भारतीय वंशाचे कुतूहल आहे. त्या देशात आपण राहत नाही, त्या देशातील गुजराती नामक भाषा आपल्याला बोलता येत नाही, याची सल आहे. ज्योती पटेल यांच्या कुटुंबाचा प्रवासही चेतना मारू यांच्याप्रमाणेच केनियामार्गे ब्रिटन असाच आहे. पण गेल्या वर्षी अनेक महत्त्वाच्या पारितोषिकांसाठी स्पर्धा करणारी शीना पटेल ही लेखिका जन्माने आणि कर्माने शुद्ध ब्रिटिश. तिकडे सिनेमा-टीव्हीवरील दिग्दर्शनात गुंतलेली असतानाही शीना पटेल हिची ‘आय अॅम फॅन’ ही कादंबरी करोनोत्तर काळातील पुस्तकविश्वात सरस ठरली. प्रीतीदु:खात डुंबलेली त्यातील नायिका आपल्या इच्छुकनायकाचा हरमार्गाने पिच्छा पुरवताना दिसते. ‘आय अॅम फॅन’ची आपल्याकडच्या माध्यमांनीही दखल घेतली, हे विशेष होते.
बुकरच्या लांबोडक्या यादीत आत्ता झळकलेल्या चेतना मारू यांचा साहित्यिक भविष्यकाळ उत्तम असल्याचा दाखला ‘पॅरिस रिव्ह्यू’ या अमेरिकी नियतकालिकाने पार गेल्या वर्षीच देऊन ठेवला आहे. पॅरिस रिव्ह्यू १९९३ सालापासून आपल्या वर्षभरातील अंकांतून आलेल्या सर्वोत्तम कथेला ‘प्लिम्टन’ या तब्बल १० हजार डॉलर इतक्या मोठय़ा पुरस्काराने गौरवते. हे पुरस्कार पटकावणाऱ्यांची यादी पाहिली तर त्यात एलिझाबेथ गिल्बर्ट, ओतेशा मॉशफेग, वेल्स टॉवर, एमा क्लाईन असे दिग्गज सापडतात. गेल्या वर्षी हा पुरस्कार चेतना मारू हिला तिच्या ‘ब्रदर्स अॅण्ड सिस्टर’ या कथेसाठी मिळाला होता. या कथेची नायिका ओमा घरातील अस्सल भारतीय लग्नसोहळा सुरू असताना एका सहलीवर असताना आपल्या ब्रिटिश मित्रासह आपापल्या धर्मसंकल्पनांचा शोध लावताना दिसते. तर नव्या ‘वेस्टर्न लेन’ कादंबरीतील गोपी ही नायिका आपल्या भारतीय मुळांतील, मातृमुखी असणाऱ्या गुजराती भाषेतील आणि भवतालातील नातेचक्रातील दु:खांचा पसारा आवरताना भेटते.
चेतना मारू यांच्या कथा आणि कादंबरीबद्दल बोलताना पश्चिमी नजरेतून परंपरा आणि त्यामागे असलेल्या वांशिकदृष्टय़ा भारतीयत्वावर बोट ठेवले जाते. मात्र या भूमीशी कुठल्याही स्तरावर संबंध नसलेल्या आणि केवळ नावाने जगासाठी (आणि आपल्याकडेही उगाचच) भारतीयत्व ठसलेल्या या लेखिका स्वत:ला परंपराबाह्य आधुनिक जगतात रमवणे अधिक पसंत करतात. जन्माने ब्रिटिश, कर्माने आणि देशाने अमेरिकी आणि आता तन-मनाने इटलीत वावरणारे झुंपा लाहिरी गेली काही वर्षे इटालियन भाषेत लेखन करून, त्याचे इंग्रजीत भाषांतर करत दोन दशकांपूर्वीचे ‘दु:ख विक्री केंद्र’ चालवत आहेत. त्याच्या शाखा ‘नवग्लोबल’ शीना पटेल, ज्योती पटेल आणि चेतना मारू या ब्रिटिश लेखिका पुढे नेत आहेत. यातल्या चेतना मारू हिचा समावेश बुकरच्या लघुयादीत झाल्यास आपली माध्यमे तिच्याबाबत इथल्या साहित्य जगताला अधिकाधिक साक्षर करण्याचे कार्य पार पाडतील.