एजाजहुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संस्कृतीत पानांना प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व असल्याने या नागवेलींच्या मळय़ांची शेतीही आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात बहरली. खाण्यापासून ते विविध विधींपर्यंत नागवेलीच्या पानांना महत्त्व आहे. परंतु काळाच्या ओघात अन्य शेतीकडे शेतकरी वळू लागल्याने पानमळे दुर्मीळ होऊ लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि पंढरपूर भागात मात्र अनेक शेतकऱ्यांनी या पानमळय़ांची शेती अद्याप बहरलेली ठेवली आहे.

तांबूल अर्पण करण्याचा विधी भारतात देवांपासून पितरांपर्यंत आणि पूजेपासून श्राद्धापर्यंत चालत आला आहे. ‘पान’ हे पृथ्वीवर सांडलेल्या अमृतातून निर्माण झालेल्या नागवेलीचे आहे, असे मानले जाते. तांबूल सेवनाबद्दल आयुर्वेदातही बरेच लिहिले गेले आहे. नागवेलीची पाने, चुना, सुपारी, कात, वेलची, लवंग, जायफळ, कस्तुरी, केशर अशा विविध तेरा पदार्थाच्या एकत्रीकरणामुळे पानाच्या विडय़ाला ‘त्रयोदशगुणी’ असेही म्हटले जाते. एकीकडे धार्मिक विधीत पानसुपारीला पहिला मान असताना दुसरीकडे श्रृंगारिक लावण्या, कवने यांमध्ये विडय़ाचे उल्लेख आढळतात. पूर्वीच्या काळात राजदरबारी विडा उचलण्यावर शौर्याचे मोजमाप होई. नृत्यांगनेची अदाकारी, शायरांचा मुशायरा, संगीताची मैफील, कव्वालीचा मुकाबला, गायनाची जुगलबंदी या गोष्टीही पानविडय़ाशिवाय रंगत नसत. पूर्वीच्या काळी पानांच्या विडय़ांना सार्वजनिक शिष्टाचाराचाच भाग मानले जात असे.

आता काळ बदलला आहे. एका गोष्टीची जागा हळूहळू दुसऱ्या गोष्टीने घेतली आहे. यात पानांच्या विडय़ांचेही स्थान केवळ मानापुरतेच उरले आहे. परिणामी, नागवेलीच्या पानांच्या उत्पादन घटत चालले आहे. पानमळे आक्रसत आहेत. पूर्वी केवळ पानमळय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या गावांची ओळख आता लुप्त होऊ लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अनेक गावे पूर्वी पानमळय़ांसाठी सर्वदूर विख्यात होती. -काही गावांच्या नावातच पानाचा उल्लेख आना नावापुरताच उरला आहे. उदाहरणार्थ पान मंगरूळ वगैरे.

बदलत्या परिस्थितीनुसार पानमळे आता दुर्मीळ समजले जातात. यात आपल्या पूर्वजांची परंपरा जपण्यासाठी काही गावांमध्ये नव्या पिढीकडून पानमळय़ांची जोपासना होत आहे.

अक्कलकोट तालुक्यातील कडबगावचे महिबूब राजेभाई मुल्ला असो वा पंढरपूर तालुक्यातील देवडे गावचे समाधान सुतार, या मंडळींनी सेंद्रिय पानमळय़ांची जोपासना कायम ठेवली आहे. कष्टाने आणि तेवढय़ाच कौशल्याने केल्या जाणाऱ्या पानमळय़ांतून वर्षभर उत्पन्न घेतले जात आहे. अक्कलकोट तालुका पंचायत समितीचे माजी सभापती असलेले महिबूब मुल्ला यांच्या वडिलांनी यापूर्वी १९६५ ते १९९० या कालावधीत नऊ एकर क्षेत्रात पानमळा फुलविला होता. नंतर त्यात खंड पडला. मात्र अलिकडे करोनाकाळात महिबूब मुल्ला यांनी शेतीकडे पूर्ण लक्ष दिले आणि शेतीनेच त्यांना आर्थिक आधार दिला. त्या अर्थाने करोनाचा प्रादुर्भाव जगासाठी शाप ठरला असताना मुल्ला कुटुंबीयांसाठी वरदानच मानला गेला. कारण करोनाकाळात टाळेबंदीमुळे मुल्ला कुटुंबीयांनी शेतीलाच आधार मानले होते. त्यातूनच तीन एकर क्षेत्रात ध्यास घेऊन पानमळय़ाची निर्मिती झाली. तसे पाहता तीन एकर क्षेत्रात पानमळा करणे ही कठीण बाब होती. परंतु जिद्द, चिकाटी परिश्रम आणि कौशल्य वापरून आता तिसऱ्या वर्षांत अपेक्षेपेक्षा भरघोस उत्पन्न मिळत असल्यामुळे मुल्ला कुटुंबीय समाधानी आहेत. पूर्वी नऊ एकर क्षेत्रात पानमळा असताना दररोज किमान दोनशे टोपल्या भरून पानांचे उत्पादन निघत असे. आता तीन एकर क्षेत्रात दररोज ३० ते ४० टोपल्या विडय़ाच्या पानांचे उत्पादन घेतले जात आहे. सोलापूर आणि पुण्यात विडय़ाचे पान विकले जाते. सध्या विडय़ांच्या पानांचा दर प्रति टोपली ७०० रुपये इतका मिळतो. एका टोपलीत तीन हजार पाने असतात. मुल्ला यांच्या पानमळय़ामध्ये ८० टक्के विडय़ाची पाने राजवड जातीची तर २० टक्के पाने गावरान आहेत. यात पाफडा प्रकाराचीही पाने आहेत. पाफडा पान कोलकाता पानासारखे कडक आणि तुलनेत जाडसर असते. तर दुसरे नरम आणि मऊ पान असते. त्यास कळी असेही म्हटले जाते. एकदा पानमळा लावला की पुढे १६-१७ वर्षे उत्पादन घेतले जाते. वर्षांतून फक्त एक-दोन महिन्यांचा खंड असतो. तेवढा अपवाद वगळता वर्षभर ‘पानमळा म्हणजे जणू हातात पैशांचा खुळखुळा’ असे समीकरण कृतीत उतरते.

सेंद्रिय पानवेलीची शेती लागवड साधारणत: ऑगस्टमध्ये केली जाते. सुपीक आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन पानमळय़ासाठी अत्यावश्यक आहे. पानवेली शेतीसाठी प्रथम नांगरणी करून सरी काढली जाते. दोन सरींतील अंतर साधारणपणे दोन ते अडीच फूट असते. तीन डोळय़ांचे रोप सहा इंच जमिनीत भात रोपाप्रमाणे लावले जाते. एका गुंठय़ात सुमारे ३०० वेलींची लागवड करता येते. पानवेलीच्या वाढीसाठी शेवरा किंवा शेवगा झाडांच्या बारीक काठय़ांचा आधारे द्यावा लागतो. किंवा शेवग्याच्या झाडांची अगोदरच लागवड करून त्यानंतर साधारणपणे सहा-सात महिन्यांनी पानवेलीची लागवड केली जाऊ शकते. आधार देण्यासाठी वापरली जाणारी काठी दहा फूट उंच असते. एकदा वापरलेली काठी किमान १५ वर्षे टिकून राहते. पानवेलीच्या शेतीसाठी सेंद्रिय खतांचे डोस द्यावे लागतात. पहिला डोस लागवडी अगोदर चांगले कुजलेले शेणखत प्रति गुंठा एक ट्र?ॅक्टर भरून द्यावे लागते. दुसरा डोस लागवडीनंतर ९० दिवसांनी प्रति गुंठा एक ट्र?ॅक्टर शेणखत द्यावा लागतो. तिसरा डोस लागवडीनंतर १५० ते १६० दिवसांनी ट्र?ॅक्टरभर शेणखत या स्वरूपात द्यावा लागतो. चौथा डोस लागवडीनंतर २८० दिवसांनी तांबडी माती प्रति गुंठा दीड ट्र?ॅक्टर भरून द्यावी लागते. तर पाचावा शेवटचा डोस १९५ दिवसांनी िनबोडीची पेंड प्रति गुंठा ३० ते ४० किलोप्रमाणे देणे उचित ठरते.

पानमळय़ावर प्रामुख्याने मर, करपा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. परंतु सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पानवेली ताकदवान राहून कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. दर चार ते पाच दिवसाआड पानमळय़ाला पाणी द्यावे लागते. त्यासाठी पाण्याची उपलब्धता असणे अत्यावश्यक आहे. मुल्ला यांच्या शेतात जुनी विहीर असून त्यात मुबलक पाणी आहे. त्यामुळं पाण्याची अडचण येत नाही. पानमळय़ातून एकरी दीड लाखाहून अधिक उत्पन्न मिळण्याची खात्री असते. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला, तर पानवेलीची शेती प्रचंड कष्टाची आणि किचकट ठरली जात असून विशेषत: उंच वेलीवरची पाने तोडण्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित मजूर लागतो. परंतु कुशल आणि प्रशिक्षित मजुरांचे उपलब्ध होणे हे आता सहजसुलभ बाब राहिली नाही. त्यामुळे या शेतीचे अस्तित्वच धोक्यात येण्याच्या मार्गावर असल्याचे मानले जाते. मात्र सततचे प्रयत्न, चिकाटी, शेती विभागाचे साह्य, तज्ज्ञ शेती अधिकारी मंडळींचे मार्गदर्शन घेत काही शेतकरी पानमळा करीत आहेत.

पंढरपूर तालुक्यातील देवडे येथील समाधान सुतार यांची तिसरी पिढी पानमळय़ात आहे. अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात त्यांनी तीन वर्षांपूर्वी पानमळा उभारला आहे. यात त्यांनी शेवगा शेंगाचे आंतरपीकही घेतले आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर सुतार यांनी अगोदर शेवगा शेंगाच्या झाडांची लागवड केली. सहा-सात महिन्यांनी शेवग्याची झाडे वाढली आणि उंच झाली. तशी पानवेलीची लागवड केली. शेणखत आणि लेंडीखत वापरून नित्य नियमानुसार दर चारपाच दिवसाआड पाणी दिल्याने पानवेलींची चांगली वाढ होत गेली. लागवडीनंतर सहा महिन्यांनी पानवेलीची तोडणी करून विडय़ांची पाने बाजारात विकायला पाठवली. हिरवे, काळपट पान परिपक्व होऊन काढणीला येते. पाने कापण्यासाठी पत्री नख अंगठय़ात बसवू पाने कापण्याची पद्धत आहे. १५-१६ फूट उंचीपर्यंत वाढलेली पानवेली कापण्यासाठी वेळूची शिडी वापरली जाते. वर्षांत साधारणपणे श्रावण महिन्यात पानवेली खाली जमिनीपर्यंत आणली जाते. नंतर पुन्हा वर उंचावर चढविली जाते. या सर्व कामांसाठी कुशल, प्रशिक्षित मजूर लागतात. सध्या एकंदर सर्वत्र शेतमजुरांची कमतरता असताना पानमळय़ांसाठी काम करणारे कुशल, प्रशिक्षित मजूर दुर्मीळ ठरले आहेत. महिबूब मुल्ला यांच्या पानमळय़ात जुने मजूर टिकून आहेत. नव्या पिढीलाही कौशल्यावर आधारित प्रशिक्षित केले जात आहे.

समाधान सुतार यांच्या दहा गुंठे क्षेत्रातील पानमळय़ातून उत्पादित विडय़ांची पाने महिन्यात चारपाच वेळा बाजारात विक्रीसाठी पाठवली जातात. खर्च वजा करून महिन्यात किमान दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. पंढरपूर, मोडिनब, निमगाव केतकी येथील बाजारात विडय़ाची पाने विक्रीसाठी पाठविली जातात. एकंदरीत, वेळोवेळी घेतलेले कष्ट, नियोजन, मार्गदर्शन या आधारे पानवेलीची शेती हमखास आणि दीर्घकालीन म्हणजे १५-१६ वर्षांपर्यंत उत्पन्नाची खात्री देते, हे मात्र तेवढेच खरे.

अकलूजच्या लक्षभोजनात विडय़ाची पाने

विडय़ाचे पान आरोग्यासाठी गुणकारी आहे. जेवणानंतर पान (तांबूल सेवन) खाण्याची पूर्वापार पद्धत आहे. म्हणूनच अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या १९७२ साली विवाह सोहळय़ातील लक्षभोजनात तेवढय़ाच प्रमाणावर उपलब्धता झालेल्या विडय़ांच्या पानांची गोष्ट आजही रंगतदार ठरते. अकलूजचे मोहिते-पाटील हे महाराष्ट्रातील तालेवार घराणे. १९७२ साली सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी आपले पुत्र विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विवाह सोहळय़ात आयोजिलेले लक्षभोजन त्या वेळी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला होता. त्या वेळी झालेल्या लक्षभोजनानंतर लाखभर पाहुणे मंडळींसाठी एकाच वेळी विडय़ांची पाने कोठून आणायची, असा प्रश्न समोर आला होता. त्या काळी अक्कलकोट परिसरात मोठय़ा प्रमाणावर पानमळे होते. मोहिते-पाटील यांनी दुधनीचे सातिलगप्पा म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधून अक्कलकोट भागातून मालमोटार भरून विडय़ांची पाने मागविली. पानांनी भरलेली मालमोटार अकलूजमध्ये आली. लक्षभोजनात अक्कलकोटच्या विडय़ाच्या पानांनी रंगत आणली. म्हेत्रे यांनी पाठविलेल्या विडय़ाच्या मोबदल्यात मोहिते-पाटील यांनी त्याच मालमोटारीत साखर भरून अक्कलकोटला पाठवली होती.

aejajhusain.mujawar@expressindia.com