सुजय पतकी

ध्रुव ताऱ्याइतकी अढळ असलेली नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने निवडणुकीय यशात परावर्तित करण्याचे शिवधनुष्य अमित शाह यांनी पेलले. भारतीय जनता पक्षाला जगातील सगळय़ात मोठा राजकीय पक्ष बनवणे असो की एकामागून एक निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक विजय मिळवून देणे असो, यात अमित शाह यांना तोड नाही.

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Chandrasekhar Bawankule , Chandrasekhar Bawankule bjp state president,
प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे तूर्तास कायम? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत संघटनात्मक घडी राखण्याचे प्रयत्न
गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास

आज देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांचा वाढदिवस. सर्वप्रथम त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा. अमित शाह यांच्याकडे पाहताना ‘न्यायात्पथ: न प्रविचलन्ति धीरा:’ हे धैर्यशील व्यक्तिमत्त्व अधोरेखित करणारे सुवचन ठरते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि आर्य चाणक्य यांचावर गाढ श्रद्धा आणि त्यांचा प्रभाव असलेले अमित शाह. चाणक्यांनी प्रचलित व्यवस्थेवर नुसती टीका करून न थांबता एक आदर्श राज्यव्यवस्था यशस्वीपणे उभारून दाखवली. तर सावरकरांनी स्वतंत्र भारत कसा असेल याची मांडणी केली. राष्ट्रकार्यासाठी फक्त विद्वत्ता असून चालत नाही. व्यवहारज्ञान, प्राप्त परिस्थितीचे अचूक आकलन, भविष्याचा वेध घेणारी दृष्टी, नेतृत्वगुण, आपला प्रतिस्पर्धी व त्याची व्यूहनीती ओळखण्याची क्षमताही असावी लागते. हे चाणक्य आणि सावरकरांच्या उदाहरणातून आपल्याला दिसते. याच दोन प्रेरणांच्या जोरावर अमित शाह नावाचा लोहपुरुष उभा आहे.

२२ ऑक्टोबर १९६४ ला अमित शाह यांचा मुंबईत जन्म झाला. काही काळ मुंबईतलं वास्तव्य मग पुढे गुजरातला ते गेले. पुढे मेहसाणा इथे शिक्षण आणि नंतर विज्ञानशाखेतील पदवी शिक्षण घ्यायला ते अहमदाबादला आले. मधल्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले, पुढे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी झाले आणि १९९१ मध्ये थेट लालकृष्ण अडवाणीजींच्या निवडणुकीचे प्रचार प्रमुखच झाले. पुढे १९९७ मध्ये आमदार झाले आणि संसदीय राजकारणाचा अव्याहत प्रवास सुरू झाला. या सगळय़ा प्रवासात त्यांचा अत्यंत व्यवहारी विचार, स्वत:च्या विचारसरणीवर श्रद्धा आणि विजिगीषू वृत्ती कायम दिसून येते. यात त्यांच्यातला चतुरस्रपणावर ते कधीच अन्याय होऊ देत नाहीत. सत्ता हे विचारसरणी रुजविण्यासाठी साधन आहे याची पक्की जाणीव त्यांना असते. ती जाणीव केवळ सत्ता मिळेपर्यंत न राहता विचारसरणीवर सत्ता टिकवण्यासाठी कायम असते.

हेही वाचा >>>पुरोगाम्यांनो, जातगणनेला भिऊ नका!

असं म्हणतात की १९८२ मध्ये अमित शाह पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींना गुजरातमध्ये भेटले होते, तेव्हा अमित शाह यांचं वय होतं १८ आणि मोदीजींचं ३२. अगदी पहिल्या भेटीत अमित शाह यांच्या मनात मोदीजींबद्दल अपार कुतूहल निर्माण झालं. पुढे एकलव्याने जशी साधना केली तशी अमित शाह यांनी केली. १९८८ च्या अहमदाबाद महापालिका निवडणुकांच्या वेळेस, मोदीजींच्या हाताखाली अवघ्या २३ वर्षांचे अमित शाह घडत होते.

काँग्रेसच्या गरिबी हटाओच्या घोषणेचे फलित म्हणजे फक्त काँग्रेसच्या नेत्यांचीच हटलेली गरिबी. शाहबानोसारख्या प्रकरणातून उघडपणे मुस्लीम तुष्टीकरण दिसत होतं. या सगळय़ाबद्दल जनतेच्या मनात रोष आहे, त्यांना आपल्या सोबत जोडलं पाहिजे अशी मोदीजींची धारणा होती. आपण आपल्या विचारसरणीशी घट्ट आहोत हे दाखवलं की माणसं आपोआप जोडली जातील हे अमित शाह, मोदीजींकडून शिकले. यातून एक गोष्ट त्यांनी मनात पक्की केली की मतदार विकासाच्या विचारसरणीशी जोडला गेला पाहिजे. संघटनबांधणीचं कौशल्य आणि निवडणूक तंत्र याच्या जोरावर अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष सर्वाधिक यश मिळवत १० कोटी सदस्य असलेला जगातील सगळय़ात मोठा राजकीय पक्ष झाला.

१९९० च्या दशकांत मोदीजींच्या हाताखाली घडत असताना, मोठी स्वप्नेच पाहावीत आणि कृतीत आणावीत हा विचार अमित शाह यांच्याविचारशैलीत आणि कार्यशैलीत जाणवतो. २०१४ मध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यावर अमित शाह स्वत: सत्तेत सहभागी न होता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. एखाद्या राज्यात पक्षाचे अस्तित्व नगण्य असेल पण ते राज्य आपण जिंकून दाखवू याच ईर्षेने ते निवडणुकीच्या िरगणात उतरतात. ही ईर्षां आहे म्हणूनच त्रिपुरासारख्या कम्युनिस्टांचा गड असलेल्या राज्यात भाजपचे एकदा नव्हे तर दोनदा सरकार स्थापन होऊ शकले. पश्चिम बंगालमध्ये पक्ष २०१६ मध्ये पक्षाचे फक्त तीन आमदार होते. ते २०२१ मध्ये ७७ झाले. निवडणुकांमधील त्यांची बूथ रणनीती, भाषणे, त्यांचे मेळावे हे जणू माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्गच होते. याच गुणांच्या बळावर त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या तीन वर्षांतच १३ राज्यांमध्ये सत्ता संपादित केली.

हेही वाचा >>>तथाकथित मान्यवर लेखक, कलावंत, विचारवंतांना अजूनही आपली तथाकथित तटस्थता सोडवत नाही, ते का?

अमित शाह आणि मोदीजी हे एक प्रकारचे अद्वैत आहे असे जाणवते. नरेंद्र मोदीजींच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या राजकीय टप्प्यावर अमित शाह सावलीसारखे उभे राहिलेत. एका प्रखर पुरुषाची सावली बनून राहणे सोपे नाही. ज्या राजकीय गुरूने आपल्याला घडवले त्याला गुरुदक्षिणा म्हणून स्वत:चं आयुष्य देऊन टाकणं हे फार दुर्मीळ. २००१ मध्ये मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि अमित शाह त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी झाले. तेव्हापासूनचे दोघांचे एकत्र असणे ही पक्षाची ताकद ठरली आणि विरोधकांच्या पोटातील गोळा.

२००० च्या दशकांतील काँग्रेसच्या राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण कोणतं असं विचारलं तर नरेंद्र मोदीजी यांचा द्वेष, राष्ट्रवादाने प्रेरित प्रत्येकाचा द्वेष. त्यामुळेच हिंदू दहशतवादसारख्या कल्पना जन्माला घालायच्या, त्यातून या देशातील बहुसंख्यांच्या मनाला टोचणी देत राहायची. त्याच्या जोडीला नरेंद्र मोदीजींच्या सोबत जे जे असतील त्यांना आयुष्यातून उठवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. अमित शाह हे या काँग्रेसी मानसिकतेचे बळी ठरले. सर्व तपास यंत्रणांचा ससेमिरा अमित शाह यांच्या मागे लावला होता. पुढे तर काँग्रेसने त्यांना गुजरातमधून दोन वर्षांसाठी हद्दपार केलं. दोन वर्ष अमित शाह स्वत:च्या घरापासून, घरच्यांपासून दूर राहिले. या काळात त्यांनी जे सोसले असेल त्याची कल्पनापण करणे कठीण. पण इतके होऊनही अमित शाह दीर्घद्वेषी झाले नाहीत की द्वेषाने आंधळे झाले नाहीत. आज अनेक लोक खोचकपणे विचारतात की इतकी सत्ता असताना, इतकी संसाधने हातात असताना अमित शाह अमुकतमुक माणसाला जेलमध्ये का नाही टाकत? अमित शाह हे कायम व्यक्तीच्या विरोधात नाही, तर प्रवृत्तीच्या विरोधात लढाई करतात. म्हणूनच त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या कारकीर्दीत, त्वेषाने प्रवृत्तीच्या विरोधात लढाई छेडल्याची उदाहरणे आढळतील, पण द्वेषाने कृती केल्याचे एकही उदाहरण आढळणार नाही.

१९४७ साली देश स्वतंत्र झाल्यावर स्वत:चं वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची स्वप्न बघणाऱ्या हैद्राबादच्या निजामाला तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी सरळ केले. इतकेच नव्हे तर देशभर विखुरलेली संस्थाने विलीन केली. हे करताना नाठाळ संस्थानिकांना वठणीवर आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेद असे सगळे मार्ग वापरले. एक राष्ट्र उभे राहते तेव्हा स्वत:चे अस्तित्व बाजूला ठेवून राष्ट्र नावाच्या संकल्पनेत विरघळून जावेच लागते. पण काही असंतुष्ट असतात. तेच फुटीरवादी वृत्तीतून शहरी नक्षलवादाला जन्म देतात, घुसखोरांचे त्राते होतात. एकाच देशात एका राज्याला वेगळा आणि उर्वरित देशाला वेगळा कायदा असायला हवा म्हणून आग्रही असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेली शक्ती आणि प्रेरणा अमित शाह यांनी या नतद्रष्टांना ठेचायला वापरली. ३७० कलम हटवणे असो की एनआरसीच्या माध्यमातून देशात शिरून देश पोखरणाऱ्यांची हकालपट्टी असो वा शहरी नक्षलवाद्यांची पाळेमुळे खणणे असो, हे अवघ्या साडेचार वर्षांत गृहमंत्री या नात्याने अमित शाह यांनी करून दाखवलं. जी ट्वेंटी परिषदेचे काश्मीरमध्ये नियोजन हे तर जगाला देशाची पर्यायाने गृह मंत्रालयाची क्षमता दर्शविणारे आहे.

अमित शाह यांचे या देशाबाबतचे राजकीय आणि सामाजिक आकलन आणखी एका बाबतीत दिसून आले, ते म्हणजे तिहेरी तलाकच्या संदर्भात. तिहेरी तलाक ही मुस्लीम स्त्रियांच्या आयुष्याची ससेहोलपट करणारी पद्धती. ही अमानुष पद्धती नष्ट झालीच पाहिजे असे मनापासून मोदीजींना दीर्घकाळ वाटत होते. पण यावर बंदी आणली तर त्याचे पडसाद काय उमटतील याबद्दल मतमतांतरे होती. पण अमित शाह यांचा या देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दलचे आकलन इतके जबरदस्त, की त्यांनी मोदीजींना कायदा-सुव्यवस्थेबाबत आश्वस्त केले आणि झालेही तसेच. धर्माध मुस्लीम सोडले तर बहुसंख्य मुस्लीम पुरुषांनी आणि तमाम मुस्लीम स्त्रियांनी याला प्रचंड पाठिंबा दिला. एक ऐतिहासिक निर्णय यशस्वी झाला.

अमित शाह वरून जितके कडक वाटतात तसे ते नाहीत हा त्यांच्यासोबत काम केलेल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. २०१८ साली खास स्व. लतादीदींना भेटायला अमित शाह मुंबईत आले होते. त्या भेटीत जवळपास एक तास त्यांची आणि दीदींची केवळ गाणी, संगीतकार यावर चर्चा झाली. स्वरसम्राज्ञी आणि कानसेन यांच्यात सुरू असलेला संवाद ऐकून उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. अमित शाह यांचे इतिहास, संस्कृती या विषयांतील वाचन दांडगे आहे आणि इतकेच नाही, देशभरातील उत्तम साहित्य सर्व भाषांमध्ये कसे नेता येईल हा विचारही त्यांच्या डोक्यात सुरू असतो.

नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ध्रुव ताऱ्याइतकी अढळ आहे यात शंकाच नाही. पण ती लोकप्रियता सातत्याने निवडणुकीय यशात परिवर्तित करण्याचे शिवधनुष्य अमित शाह यांनी पेलले. भारतीय जनता पक्षाला जगातील सगळय़ात मोठा राजकीय पक्ष बनवणे असू दे की एकामागून एक निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक विजय मिळवून देणे असू दे, यात अमित शाह यांना तोड नाही. घराणेशाहीची मुळे खोलवर रुजलेल्या देशांत, आपल्या घराण्याची सरंजामशाही म्हणजेच लोकशाही असे वागणाऱ्यांना नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह यांनी चांगलेच जेरीस आणले, याचा असंख्य भाजप कार्यकर्त्यांना आणि करोडो भारतवासीयांना आनंदच आहे. या सरंजामशाही शक्तींशी लढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांला, अमित शाह यांना न भेटतादेखील पक्ष कायम आपल्या पाठीशी आहे असा विश्वास वाटणे ही त्यांनी उभ्या केलेल्या कामाची ताकद आहे. ती अशीच वृद्धिंगत होऊ दे, तिला उदंड आयुष्य आणि यश लाभू दे याच आजच्या दिनी शुभेच्छा!

लेखक महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते आहेत.

Story img Loader