सुनील माने
गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करत असताना आंबेडकर…. आंबेडकर असे सहा वेळा म्हणत, ‘हे नाव घ्यायची एक फॅशन झाली आहे. इतक्या वेळा जर तुम्ही देवाचे नामस्मरण केले असते तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती झाली असती…’ अशी मल्लिनाथी केली. या वक्तव्यावर गदारोळ सुरू झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर अमित शहांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. शहांनी १२ वर्षात पहिल्यांदा पत्रकारपरिषद घेतली ती यावर स्पष्टीकरण देण्यासाठी. मात्र या वेळीही त्यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफी न मागता, काँग्रेसने आंबेडकरांवर अन्याय केला, हे सांगितले. दुसऱ्याचे चूक, म्हणून अमित शहा यांनी केलेल्या या प्रमादाची तीव्रता कमी होत नाही.

मुळात मनुवादी विचार करणाऱ्या आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या अमित शहा यांना बाबासाहेब आणि त्यांच्या विचारांचे काही देणे – घेणे नाही हे सर्वश्रुत आहे. बाबासाहेबांबद्दल तोंडदेखला अभिमान व्यक्त केला, तरीही त्यांच्या जे मनात दबले होते ते ओठांवर आले आहे. अमित शहांना आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो : होय, माझ्यासह कोट्यवधी लोक डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या विचारांवर जगणारे आहोत. बाबासाहेबांनी ज्या क्रांतिकारी भूमिका, निर्णय घेतले आणि त्या निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली, यामुळे देशातल्या तमाम दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि महिला यांच्यासह स्वातंत्र्य, समता, बंधुता मांडणाऱ्या समाज घटकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. समाजाला एकत्रित करण्याचे महत्त्वाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात केले. हाच विचार अंगिकारत आम्ही फक्त आंबेडकर… आंबेडकर… हे नाव घेऊनच जगू इच्छितो. भारतातल्या जाती, धर्म आणि वर्णव्यवस्थेने सर्व समाजात ज्या पद्धतीची दुफळी अनाचार माजवला होता तो बाबासाहेबांनी अत्यंत कष्टाने, अभ्यासाने आणि आपल्या जीवनाची, आरोग्याची पर्वा न करता लोकांसाठी खस्ता खाऊन संपवला.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Sharad Pawar EVM Markadvadi
Sharad Pawar on EVM: ‘छोट्या राज्यात विरोधक, मोठ्या राज्यात भाजपा’, शिंदे-अजित पवार गटाच्या मतदानाची आकडेवारी देत शरद पवारांची टीका
What is the 4B movement that started in South Korea
स्त्री ‘वि’श्व : ‘४ बी’ चळवळ समजून घेताना…

संविधान निर्मिती आणि बौद्ध धर्म अंगीकारण्याची त्यांची भूमिका हा त्याचाच परिपाक आहे. संविधानात डॉ. आंबेडकरांमुळे सामाजिक न्यायाची दृष्टी आली. तत्कालीन सामाजिक – राजकीय व्यवस्थेने बाबासाहेबांची भूमिका मान्य केल्यामुळे आम्हा सर्व लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. पण हेच बदल पारंपारिक जात, धर्म, वर्ण व्यवस्था मांडणाऱ्या समाज घटकांना आजही मान्य नाहीत हे वारंवार सिद्ध होत आहे. अमित शहा यांच्या तोंडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जी कुत्सित भावना व्यक्त झाली ती या भूमिकेचा परिपाक आहे.

पुण्यात दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या एका शंकराचार्यांनी वैदिक संविधान म्हणजे मनुस्मृती असे वक्तव्य केले आहे. मनुस्मृतीचा मी अभ्यास केला आहे त्याच्यातील विषमता आणि घटनेतील समता ही कोणत्याही अभ्यासकाला सहज कळण्यासारखी आहे. याउलट बाबासाहेबांनी जे संविधान या देशाला दिले, ते सर्व जाती – धर्म यांना एकत्र बांधून ठेवणारे आहे. अमित शहा वा त्यांच्या पक्षातले अनेकजण आम्ही बाबासाहेब आणि संविधान मानतो असे म्हणत असताना, त्यांच्यासह त्यांच्या बगलबच्चांनी बाबासाहेबांचे विचार आणि ते कृतीत आणण्याच्या कार्यक्रमाला गेल्या ११ वर्षांत पद्धतशीर नेस्तनाबूत केलेले पाहायला मिळते. बाबासाहेबांनी केलेल्या चळवळीचा लाभार्थी म्हणून मी हे सांगू शकतो. भाजप सत्तेत आल्यापासून समाजातील दुफळी, वेगवेगळ्या जाती, धर्मावर आधारित विषमता असे मुद्दे सुरू आहेत त्यातीलच हा एक प्रकार आहे. अमित शहांच्या मतानुसार बाबासाहेब ही एक फॅशन आहे. मात्र बाबासाहेब हा आमचा श्वास आहे. या देशात कोणीही वरच्या – खालच्या जातीचा नाही, ‘सर्व नागरिक समान आहेत’ असे बाबासाहेबांमुळे घटनेत नमूद झाले. म्हणून बाबासाहेब खुपतात. जो समाज आपल्या स्वत:ला आणि समाजबांधवांना माणूस म्हणून जगू देत नाही, त्यावर सूड घेण्याची पुसटशीही इच्छा बाबासाहेबांना झाली नाही.

बाबासाहेबांनी १९१९ मध्ये दलितांचे प्रतिनिधी म्हणून साउथबरो कमिशनपुढे साक्ष दिली तेथून त्यांची कारकीर्द सुरू झाली, तेव्हापासून महापरिनिर्वाण (डिसेंबर १९५६ ) होईपर्यंत त्यांचे कार्य अथक सुरू होते. हा अवघा ३७ वर्यांचा कालखंड बाबासाहेबांना मिळाला. इतक्या कमी वेळात त्यांनी काय काय केले? याचा अभ्यास जरी अमित शहांनी केला तरी त्यांना बाबासाहेब काय होते याचे आकलन होईल.

उत्तरप्रदेश मधील ७ लाख मुले आज शाळाबाह्य आहेत, अशी संसदेत परवा माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातल्या ३० हजार शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सरकारी संस्थांच्या खासगीकरणाचा धडका भाजपाने सुरू केल्यामुळे आपोआपच आरक्षण संपणार आहे. ‘दलित आणि भटक्या विमुक्तांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारसह सर्व अर्थसंकल्पांमध्ये आर्थिक तरतूद करण्यात यावी’ अशी योजना संविधानाने केली; तिची पायमल्ली सध्या सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने असे साडेपाच लाख कोटी रुपयांचे बजेट गायब केले आहे तर महाराष्ट्रात असे ४० हजार कोटींचे बजेट गायब झाले आहे. महाराष्ट्रात तर मागासवर्गीय समाजाचा निधी तीर्थयात्रांसाठी वळवण्यात आला. यामागे एकच सूत्र आहे. ते म्हणजे अप्रामाणिकपणा. मागासवर्गीय, दलित, आदिवासी यांच्या विकासासाठी काम कसे होणार नाही याची काळजी घेत राहायची. या व्यवस्थेने त्यांना मते देणाऱ्या घटकांवरही अन्याय आणि फसवणूक-लुबाडणूक केल्याचे दिसून येते.

अमित शहा ज्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना आजही शोषित, पीडित समाजांच्या प्रश्नांशी घेणे देणे नाही. या घटकांनी भारतात ज्यांना जगण्याचेच हक्क नाकारले, त्यांच्या मनात किंवा खुद्द बाबासाहेबांच्या मनात तेव्हा प्रक्षोभक विचार आले नसतील का? बाबासाहेबांच्या ‘बहिष्कृत भारत’मध्ये १२ जानेवारी १९२८ रोजी ‘सत्यमेव जयते’ या मथळ्याखाली दत्तात्रय रामचंद्र रारावीकर (अकोला) यांचे पत्र प्रकाशित झाले त्यात जातिवादाचे भयाण चटके आणि त्याचे परिणाम लिहिताना ते म्हणतात, ‘मृतमांसाहार हा अस्पृश्यांना ज्या स्थितीत ठेवले गेले आहे, तीमुळे तो करणे हे अगदी क्रमप्राप्तच होते. (अस्पृश्यांना मेलेल्या जनावरांचे मांस खावे लागत असे.) कारण निर्वाहाची सारी साधने व दरवाजे या वर्गाला बंद केले गेले आहेत. त्यामुळेच ही रुढी नष्ट होत नाही असे मला आढळून आले आहे. अस्पृश्य वर्गाने एकतर धर्मांतर करावे किंवा स्पृश्य वर्गाविरुद्ध एकदम बंड करावे हा एकच मार्ग त्यांच्या उद्धाराचा आता राहिलेला आहे.’ पुढे, ‘रक्ताच्या बलिदानाशिवाय अस्पृश्यांचा मार्ग मोकळा होणे शक्य नाही, अशी माझी ठाम समजूत बनलेली आहे,’ असेही ते स्पष्ट करतात. मात्र बाबासाहेबांनी सांविधानिक मार्गांनीच देशाला एकसंध राखण्याचा मार्ग स्वीकारला आणि जपला, याची जाण अमित शहा आणि मंडळींनी ठेवली पाहिजे.

बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याआधी ‘बुद्धा ॲण्ड हिज धम्म’ हा ग्रंथ लिहिला. त्याविषयी त्यांनी १२ मे १९५६ रोजी बीबीसी (लंडन) वरील भाषणात ते म्हणतात, ‘जगातील इतर धर्म परमेश्वर, आत्मा आणि मृत्यूनंतरची मानवाची स्थिती यासंबंधी विचार व उपदेश करतात पण या तीन गोष्टींशिवाय मानवी जीवन सुखमय व्हायला जी तत्त्वे कारणीभूत आहेत ती तत्त्वे बौद्ध धर्माने सांगितली व उपदेशिली. ती तत्त्वे म्हणजे प्रज्ञा, करुणा व समता. मनुष्याने बुद्धिनिष्ठ राहावे, प्राणिमात्रांवर प्रेम करावे आणि त्यांच्याशी आपुलकीने व सम पातळीने वागावे, हा या तीन तत्त्वांचा अर्थ. या प्रमाणे सर्व मानव वागू लागले तर जग स्वर्गमय होईल.’

बाबासाहेबांच्या विचारातला खरा स्वर्ग हा असतो. अमित शहा यांच्या सारख्यांना हा स्वर्ग कळणे शक्य नाही.

लेखक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता आहेत.

mane.sunil@gmail.com

Story img Loader