मकसूद अलीच्या ‘लकी’ प्रवासाचा शिल्पकार ठरलेल्या गीतकाराचे हे आत्मकथन, हिंदी पॉपसंगीताच्या गतकाळाला उजाळा देणारे…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘पॉप म्युझिक’ किंवा गैरफिल्मी हिंदी भावगीते दूरदर्शनच्या पर्वातही लोक ऐकत-पाहत. नव्वदीच्या जगबदलू प्रवाहाआधी शॅरोन प्रभाकर किंवा त्रिनिदादमधील आयात पार्वती खान यांची ‘डीडी-वन’ वाहिनीवर लागणारी पॉप गाणी आता लोकांच्या विस्मृतीच्या कोशात असतील. कारण त्यांना छायागीत, चित्रगीतांचा दर्जा कधीच नव्हता, तर ते रात्री साडेनऊ-दहानंतर लागणारे पर्यायी आणि वेळकाढू मनोरंजन होते.
हसन जहांगीर यांच्या ‘हवा हवा’ काळात भारतीय चित्रपट संगीताच्या उथळोत्साहाने निर्माण झालेल्या पोकळीला नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद आणि जतिन-ललित प्रभृतींनी भरून काढले. पण ते फक्त प्रेमातिरेकी शब्दांशी सुरांना झगडवत. जगायसाठी अन्न-हवा-पाणी या गोष्टी फुसक्या ठरविणाऱ्या अर्थांची ‘प्यारपढीक’ गीते नव्वदीच्या आरंभी ‘सुपरहिट’ होती. (‘साँसो के बिन शायद जी लू, तुझबिन जीना मुश्कील है’, ‘बस एक सनम चाहिये, आशिकी के लिये’ ही नायक-नायिकेची अभिव्यक्ती.) या प्रेमरागी बुरुजाला दक्षिणी गीतांमुळे मोठे भगदाड पडले. कारण ती खरेच कचकड्यांची होती. पण पुढे दक्षिणी अनुवादित गाण्यांनाही प्रेमरोग जडला. मग या काळाच्या सांध्यावर काही काळ भारतात ‘इंडी पॉप’ गाण्यांची चळवळ उभी राहिली. जिला नुकत्याच सुरू झालेल्या ‘एमटीव्ही’, ‘व्ही चॅनल’ आणि अद्यायावत होत चाललेल्या ‘एफ.एम.’ रेडिओने साथ दिली.
भारतीय पॉप संगीतात ‘अल्बम’ घेऊन सुुनीता राव पहिल्यांदा अवतरली. ‘धून’ (१९९१) या तिच्या अल्बममधील ‘परी हूं मैं’चा बोलबाला ‘एमटीव्ही’उत्तर काळात अधिक झाला. पण खऱ्या अर्थाने ‘इंडी पॉप’ची चळवळ कुणी ढवळून काढली असेल, तर ती लकी अलीने, त्याच्या ‘सुनो’(१९९६) आणि ‘सिफर’ (१९९८), ‘अक्स’ (२०००) या तीन अल्बम्सनी. पैकी तत्कालीन प्रेमतकलादू गीतांना छेद देणारे ‘सुनो’तील ‘ओ सनम मुहोब्बत की कसम’ हे वरवर प्रेमगीताचाच भास निर्माण करत कानांना नव्या सुरावटींची जाणीव करून देत होते. १९९६ ते ९७ या एक वर्षात या गाण्याने एमटीव्ही-व्ही चॅनलवरूनच नाही तर दूरदर्शनच्या पहिल्या-दुसऱ्या वाहिनीवरूनही संचार केला. प्रख्यात अभिनेते मेहमूद यांचा अनेक वर्षे ओळख हरविलेला मुलगा मकसूद अली पुुढली चारएक वर्षे प्रसिद्धीवलयात झळाळून निघाला. या झळाळीआधी आणि नंतरच्या अनेक नोंदी सईद अस्लम नूर यांच्या ‘माय जर्नी इन लिरिक्स अॅण्ड म्यूझिक’ (२०२२) या आत्मकथनात्मक पुस्तकात वाचायला मिळतात.
लकी अलीची गाणी नव्वदीच्या अखेर तरुणांसाठी तत्त्वज्ञानाच्या मोठ्या पेटाऱ्यासारखी उघडली. पहिल्या तीन अल्बम्समधील गाण्यांमधील साऱ्या गीतरचना या पूर्णपणे भिन्न होत्या. त्याचे रेकॉर्डिंग लंडनच्या प्रख्यात स्टुडिओमध्ये झाल्यामुळे त्यांची गुणवत्ताही त्या काळातील देशी गाण्यांहून वरच्या पातळीवरली होती. पण ही गाणी बेंगळूरुमधील इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या सोळा-सतरा वयाच्या मुलाने लिहिली असल्याचे तेव्हा कुणाला खरे वाटले नसते. प्रेमातही न पडलेल्या सईद अस्लम नूर या मुलाने बेंगळूरुमध्ये गालिचे-सतरंजी सफाईचा व्यवसाय करणाऱ्या गिटारवादकाच्या चालीबरहुकूम तयार केले. पुढे गाण्यांचा हा प्रवास कसा वाढत गेला, मकसूद अलीमधला ‘लकी अली’ कसा विस्तारत गेला, याचे दाखले या ग्रंथातून सापडत राहतात.
सौरव सत्यदर्शी रे यांनी शब्दांकन केलेल्या या आत्मकथनात नव्वदीच्या दशकातील लकी अलीचे ‘पॉप पर्व’ अनुभवणाऱ्यांसाठी भरपूर खाद्या आहे. मकसूद अली या नावाने श्याम बॅनेगल यांच्या ‘त्रिकाल’मध्ये लकी अली महत्त्वाच्या भूमिकेत झळकला. पुढे काही मालिकांमधूनही (भारत एक खोज वगैरे) त्याचा अभिनयात वावर राहिला. पण हे आपले क्षेत्र नाही, याची जाणीव झाल्याने आपल्या जन्मभूमी बेंगळूरुमध्ये वलयविरहित आयुष्य जगण्यासाठी गेला. तिथे गालिचे धुण्याचा त्याचा छोटा व्यवसाय होता. तिथेच राहणाऱ्या सईद अस्लम नूर या दहावीतल्या शाळकरी मुलाशी त्याची ओळख झाली. या सईद अस्लम नूरची कौटुंबिक पार्श्वभूमी काश्मीरची. आत्मकथनाचा आरंभच त्याने आपल्या आजोबांच्या काव्यलेखनातील दाखल्यांनी केला आहे. काश्मीरमध्ये तरुण वयात अंध झालेल्या त्याच्या वडिलांचा मुंबई या अनोळखी जगात प्रवेश, तिथे सिनेमासारख्या घटना घडूून त्यांचे बेंगळूरुमध्ये स्थलांतर, छोट्या-मोठ्या व्यवसायांमधील गुंतवणुकीतून सईद अस्लम नूर याला वाढविताना त्याच्यात उपजत असलेल्या उर्दू भाषेवरील प्रेमाला मिळालेले प्रोत्साहन अशा प्रसंगांनी पुस्तकाचा सुरुवातीचा भाग व्यापला आहे. बेंगळूरुमधील इंग्रजी शाळांतील हिंदी-उर्दू कविता स्पर्धा गाजवत सईद अस्लम नूरची शब्दांची उमेदवारीही त्यात आली आहे. पण आत्मकथनाला वेग येतो, त्याच्या मकसूद अलीशी झालेल्या ओळखीनंतर. पूर्वी कधी तरी दूरदर्शनच्या मालिकांच्या चित्रीकरणासाठी जाणारा, एका मोठ्या कलाकाराचा सर्वसामान्य माणसांमध्ये वावरणारा गिटारवादक मुलगा ही सईद अस्लम नूरची लकी अलीबाबतची छबी. थोड्या भेटींतून तयार झालेल्या मैत्रीत मकसूद अलीने त्याला आपल्या काही धून ऐकवल्या.
‘रात चांदनी छायी हुई है, चमक रहा है तारा’ हे सईद अस्लम नूरने पुढल्या आठवडाभरात तयार केलेले पहिले गाणे. (हे गाणे सुनो अल्बमच्या ‘बी’ साइडला पहिले वाजते.) देवावर लिहिल्या गेलेल्या या गाण्यातली वाद्यावळ खास ऐकण्यासारखी आहे. तितकेच त्याच्या शब्दावळीचे किस्सेही सुंदर आहेत. बेंगळूरुमधून फक्त एकदाच मुंबईचा प्रवास केलेल्या या मुलाने ‘ये मुंबई नगरिया, मै ढूंढू डगरिया’ हे गाणे लिहिताना इथल्या स्थानकांच्या नावांचा वापर केला आहे. मकसूद अलीकडून वीस रुपये घेऊन सायकलवर शहराचा एकट्याने प्रवास करत तयार झालेले ‘क्या मौसम हे, फुलो गलियो मे दिल है’, एका अवघड आर्थिक अडचणीत बनलेले ‘ये जवानी, उसपे आयी परेशानी’ अशा प्रत्येक गाण्यांच्या निर्मितीचे क्षण-किस्से यात वाचायला मिळतात. १९९३ साली गाण्यांचा अल्बम करण्याचा निर्णय मकसूद अलीने घेतला. निर्माता मिळवून त्या गाण्यांना लंडनमध्ये ध्वनिमुद्रितही केले. विविध कॅसेट कंपन्यांनी त्या काळातील खपाऊ मालासारखी ही गाणी नसल्याने अल्बम नाकारला. बीमजी क्रेसेण्डोने तो फार उशिराने स्वीकारला. महेश मथाय या मकसूद अलीच्या सिनेमॅटोग्राफर मित्राने स्वत: पैसे ओतून या गाण्याचे इजिप्तमध्ये चित्रीकरण केले. अल्बममधील सहभागी असलेल्या कुणालाही वाटले नव्हते, त्याहीपेक्षा अधिक प्रसिद्धी एमटीव्हीने या गाण्याला दिली. पुढे मकसूद अली हा ‘लकी अली’ नावाने पॉपस्टार झाला आणि मुख्य धारेतील सिनेमात नव्या आवेशात साकारला. त्याने पार्श्वगायनातही मोलाची कामगिरी केली आणि ‘काँटे’सारख्या मल्टिस्टार सिनेमात मुख्य भूमिका मिळवल्यानंतर सिनेमातून लोकप्रिय जगापासून पुन्हा अलिप्त राहणे पसंत केले.
या सगळ्या इतिहासकाळात लकी अलीसह सईद अस्लम नूर या गीतकाराचे मोठे होत जाणे या पुस्तकात वाचायला मिळते. लकी अलीने सेलिब्रेटी बनल्यानंतर आपल्या कुटुंबाविषयी बरेच राखून ठेवलेले संदर्भ यात मर्यादित प्रमाणात आलेले आहेत. ‘शाम और सवेरे तेरी याँदे आती है’ या अतिपरिचित गाण्याचे आधीचे शब्द ‘भोलेपन का राजू सबका सच्चा साथी था’ यापासून मुंबई-लंडन प्रवासात तयार झालेले ‘देखा है ऐसे भी’ आणि पुढल्या सर्व अल्बम्समधील नूर याच्या सहभागाचे तपशील या आत्मकथनात आहेत. पुढे दोन हजारोत्तर काळात भारतीय चित्रपट संगीतात सुफी, कव्वाली, मव्वाली ते अनाकलनीय वाद्यावळीच्या अनेक परंपरा शिरल्या, एमटीव्ही-व्ही चॅनल रिअॅलटी शोजमध्ये गुंतल्यावर ‘इंडी पॉप’ चळवळ ठप्पच झाली. या सगळ्याशी संलग्न या पुस्तकातील साऱ्या नोंदी आहेत.
बऱ्याच वर्षांच्या अलिप्ततेनंतर लकी अली पुन्हा काही सिंगल गाण्यांसह आणि कन्सर्टसह सध्या अवतरत असताना त्याचा भरभक्कम शब्दांचा पाया कुठे होता, हे कळून येण्यासाठी नव्वदीच्या एका पिढीला किंवा इंडी पॉप गाण्यांबाबत उत्सुकता असणाऱ्यांना या पुस्तकाची उपयुक्तता खूप आहे.
‘माय जर्नी इन लिरिक्स अॅण्ड म्यूझिक’
लेखक : सईद अस्लम नूर (शब्दांकन : सौरव सत्यदर्शी रे)
पृष्ठे : २९३
किंमत : (किंडल आवृत्ती) १४९ रु.
pankaj.bhosale@expressindia.com