अभिजीत ताम्हणे

या एका प्रश्नासाठी, त्यांच्या लिखाणाचा आणि ‘म्हणण्या’चा थोडक्यात मागोवा..

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान

‘बुकरायण’ या सात वर्ष चाललेल्या सदरातून पंकज भोसले यांना गेल्या तीन वर्षांत ज्या कादंबऱ्या त्या-त्या वर्षी आवडल्या, त्या तिन्ही ५० हजार पौंडांचं ‘बुकर पारितोषिक’ मिळवणाऱ्या ठरल्या. डग्लस स्टुअर्ट यांची ‘शगी बेन’ (२०२०), डॅमन गालगट यांची ‘द प्रॉमिस’ (२०२१) आणि आता शेहान करुणातिलक यांची ‘द सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ (२०२२). ‘एका देशाचा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक इतिहास असा भरगच्च ऐवज या (द प्रॉमिस) कादंबरीतून अनुभवायला मिळतो.’ (२०२०), ‘ जगाच्या कुठल्याही भूभागावर वास्तव्यास असलेल्या समाजाच्या भल्या किंवा बुऱ्या स्थितीमध्ये घटना-घटकांचे अनंत संदर्भ दडलेले असतात. वाताहतीनंतर उद्यमशीलता जोपासत झेप घेण्याऐवजी आणखी तळ गाठणाऱ्या स्कॉटलंडमधील शहरांच्या नाकर्तेपणाची भूमिका ‘शगी बेन’ ही कादंबरी, त्या साऱ्या संदर्भासहित स्पष्ट करते.’ (२०२१) आणि ‘अमेरिकी-ब्रिटिश संदर्भ पेरत या दरम्यानच्या काळात घडलेल्या श्रीलंकेतील नरसंहाराचा मोठा पट शेहान यांनी साकारला आहे. साहित्याच्या खडतर वाचनानंतर कथात्म शैलीत उभा केलेला श्रीलंकेचा हा कटू भूतकाळ सर्वाना झेपणारा नाही’ (२०२२) अशा शब्दांत ‘बुकरायण’नं या कादंबऱ्यांच्या कथानकाबाहेरच्या सामाजिक-राजकीय जाणिवांना दाद दिली होती. आता सोहळा सरला आहे (‘द पार्टी इज ओव्हर’ या वाक्प्रचाराचं भाषांतर) आणि शेहान करुणातिलक हे यंदाचे ‘बुकरविजेते’ म्हणून उरले आहेत. त्यांच्या मुलाखती वगैरे घेतल्या जात आहेत. बराच काळ जाहिरातक्षेत्रात काम केलेले करुणातिलक हजरजबाबी आहेतच, हे मुलाखतींतून कळतं आहे आणि ‘पुढे काय’ या प्रश्नाला ‘पुढल्या कादंबरीत क्रिकेट नसेल आणि भुतंसुद्धा नसतील, एवढं नक्की’ असं उत्तर देऊन ते हा विषय संपवत आहेत.

‘बुकर’विजेत्या पेक्षाही नवा, अगदी १५ दिवसांपूर्वीच भारतात प्रकाशित झालेला ‘द बर्थ लॉटरी अ‍ॅण्ड अदर सरप्रायझेस’ हा कथासंग्रहदेखील त्यांच्या लिखाणात मोजला जायला हवा. पण कथा आणि कादंबरी यांचा बाज निरनिराळा असल्याची पुरेपूर जाणीव करुणातिलक यांना आहे. पुढल्या कादंबरीविषयीचा प्रश्न नेहमीच बातमीवजा नसतो. त्यातून बातमी होण्याच्या शक्यता असल्या तरी त्यापलीकडचा लेखकाचा स्थायीभाव नेमका काय असेल याचा अंदाज अशा भावी/ नियोजित लिखाणाबद्दलच्या गप्पांतून पुढे जातो. करुणातिलक तसं काही सांगत नाहीत. पण त्यांच्या दोन्ही कादंबऱ्या आणि मुलाखती आपल्यासमोर असतात. ‘चायनामॅन’ या पहिल्या कादंबरीपेक्षा दुसरी (सेव्हन मून्स..) अगदी निराळी होती, हेही समोर आहेच, पण त्या दोन्ही कादंबऱ्यांतली साम्यस्थळंही  पाहाता येताहेत.

‘चायनामॅन’ ही आता बातम्या/मुलाखतींमधल्या उल्लेखापुरतीच उरली असली, तरी करुणातिलक यांची उत्तम कादंबरी आहे. दक्षिण आशियाई कल्पितसाहित्यासाठी दिलं जाणारं सर्वात मोठय़ा रकमेचं (२५ हजार डॉलर) ‘डीएससी प्राइज’ या कादंबरीला २०१२ मध्ये मिळालं होतं. कुणा प्रदीप मॅथ्यू या गाजलेल्या क्रिकेटरची- फिरकीचा जादूगार समजल्या जाणाऱ्या गोलंदाजाच्या आठवणी, डब्ल्यु. जी. करुणासेना हा माजी क्रीडापत्रकार सांगतो आहे. मुळातच क्रीडापत्रकार ही दुर्लक्षित जमात असताना आणि श्रीलंकेचं क्रिकेट पुरेसं बहरलं नसताना (श्रीलंकेनं १९९६ चा विश्वचषक जिंकला तेव्हा ते बहरल्याचं मानलं जातं) करुणासेना आणि प्रदीप मॅथ्यू होऊन गेले. भारतीय क्रीडाप्रेमी जसे सी. के. नायडूंच्या आठवणी सांगतात, तशा हा प्रदीप मॅथ्यूच्या सांगतो. मॅथ्यूला अस्सल शैलीचा अव्वल खेळाडू म्हणून वाचकांच्या डोळय़ांपुढे उभा करणारा हा डब्ल्यु. जी. करुणासेना सध्याच्या क्रिकेटबद्दल असमाधानी आहे, स्मरणरंजनातच समाधान शोधणारा आणि ढोसून दारू पिणारा आहे. वयाला न झेपणाऱ्या त्या सवयीमुळे तो आता झपाटय़ानं ‘पैलतीरी’ निघाला आहे. प्रदीप मॅथ्यू हा जसा उच्च गुणवत्ता असूनही दुर्लक्षित राहिलेला क्रिकेटपटू, तसे हे करुणासेना विचक्षण असूनही मागे पडलेले क्रीडापत्रकार. त्या दोघांना वाचकांपर्यंत पोहोचवणारे करुणातिलक, ‘गुणवत्तेचं चीज नाही, गुणांची धड ओळखही नाही, त्यामुळे असमाधान आणि त्यातून उतरंड’ ही अख्ख्या श्रीलंकेचीच कथा असल्याचं मानतात.. तसं ‘चायनामॅन’च्या निमित्तानं बऱ्याच आधी दिलेल्या मुलाखतीत सांगतातही.

हाच आत्मवंचनेचा आणि असमाधानाचा धागा ‘द सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’मध्ये मालीसह सात पात्रांमार्फत पुन्हा पोहोचवताना श्रीलंकेतली एकंदर अव्यवस्था, आहे ते स्वीकारत जगण्याची- आणि मरण्याची- सक्ती, त्या जगण्यातच चोरटं सुख शोधणं आणि पैसा कमावण्यासाठी जुगार खेळणं.. हे सारं कथानकाचा भाग म्हणून येतं. मरणोत्तर सोपस्कार पार पाडताना पहिल्याच प्रकरणात नायकाला श्रीलंकेतल्या मरणोत्तर नोकरशाहीचा जो काही अनुभव येतो, तिथपासून श्रीलंकेची ‘वैशिष्टय़ं’ उलगडत जातात. कथा आणि कादंबरी यांचा पैस भिन्न असू शकतो याची जाणीव असल्यामुळेच, गेल्या सुमारे २० वर्षांत करुणातिलक यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह (द बर्थ लॉटरी अ‍ॅण्ड अदर सरप्रायझेस) विविधांगी आहे. त्यापैकी श्रीलंकेबाहेरच्या श्रीलंकन कुटुंबात घडणारी, दोन घरकामगार (एक तमिळ आणि एक श्रीलंकन) महिलांच्या संवादातून उलगडणारी कथा ‘घरगुती ताणेबाणे’ कसे वंश, भाषा, देश यांच्याशी जोडलेले असतात हे दाखवणारी आहे, तर एक कथा श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षांच्या मोटारीत बॉम्ब ठेवला गेल्यानंतरची, दुसरी ‘मेला बहुतेक’ असे समजून ज्याचा शोध सर्वानीच थांबवला आहे, अशा इसमानं समुद्रकाठी एकांतात खरडलेल्या रोजनिशीतून फुलणारी.. पण या कथांपेक्षाही कादंबरीतलं त्यांचं रचनाकौशल्य आजघडीला तरी अधिक झळाळतं आहे, त्यामुळे लक्ष असणार ते त्यांच्या पुढल्या कादंबरीकडेच.

श्रीलंकेची नस माहीत असलेले, त्यासाठी भरपूर अभ्यास केलेले लेखक म्हणून करुणातिलक यांचं नाव घ्यावं लागेल. दोन्ही कादंबऱ्यांमधली कथानकं ‘कधीतरी घडून गेलेल्या घटनां’च्या उत्खननासारखी आहेत. कथा जरी लेखकीय युक्त्या-प्रयुक्त्यांतून उलगडणारी असली, तरी नायक हे अभिमानास्पद नसून त्यांच्याबद्दल फारतर सहानुभूती वाटू शकते. श्रीलंकेसारख्या देशाबद्दल जगाच्या ज्या भावना असतील, त्याच या नायकांबद्दल असू शकतात.

त्यामुळे करुणातिलक यांचं पुढलं लिखाण दोन दिशांपैकी एक निवडणारं असेल. एक बहिर्गामी.. जगाची श्रीलंकेबद्दलची मतं- त्यातून नायकावर लादला जाणारा बिचारेपणा, अशी दिशा. दुसरी पुन्हा आजपर्यंतच्या घटनाक्रमाकडे पाहणारी आणि आत्ता जो ‘कॅरिकेचर’पणा करुणातिलक यांच्या लिखाणात दिसतो, तो पूर्णत: टाळून पुढे जाणारी! कथानक नेमकं कसं असेल, हे तर खुद्द करुणातिलक यांनाही तिसऱ्या- चौथ्या खडर्य़ानंतर कळतं म्हणे. पण मोटारीसाठी पेट्रोल मिळाल्याबद्दल हायसं वाटणाऱ्या देशात ते राहात आहेत आणि न्यूझीलंड, नेदरलँरड्स आणि ब्रिटन इथल्या स्थानिकांच्या श्रीलंकेबद्दलच्या प्रतिक्रिया त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीपासून पाहिल्या आहेत, याचं प्रतिबिंब पुढे उमटणारच.