ज्युलिओ एफ. रिबेरो

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांची ‘अस्तित्वाची लढाई’ अद्याप सुरू आहे आणि ती काही काळ सुरूच राहील, परंतु या लढाईतील ‘जेता’ कोण हे मात्र आताच दिसू लागले आहे! शिवसेना फुटल्यामुळे फायदा होणार तो भाजपलाच. या वर्षाअखेरीस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल, तेव्हा दोन्ही सेनांतील मतविभागणीची मदत निश्चितच भाजपला, तुलनेने सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनवण्यास पुरेशी ठरू शकते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील हा विषय भाजपसाठी अगदी परिसस्पर्शासारखा नव्हे, पण या पक्षाच्या वाटचालीस निर्णायक वळण देणारा ठरेल, महाराष्ट्रीय मतदारांमध्ये भाजपची लोकप्रियता वाढल्याचे त्यातून दिसेल. या लोकप्रियतेमुळे शिंदे गटावरही झाकोळ पसरेल. याउलट, मुंबई महापालिका शिवसेनेने गमावल्यास त्या गटाला आणखीच पांगळेपणा येऊन पुन्हा कार्यकर्ते पक्ष सोडू लागतील. याचाही लाभ भाजपलाच होणार, हे उघड आहे.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

या दोन शिवसेनांची लढाई किती हास्यास्पद पातळीला गेली आहे हेही आपण पाहातो आहोत! ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून येणार, हे अपेक्षितच होते. आणि झालेही तसेच. त्याऐवजी नवी नावे आणि नवी पक्षचिन्हे निवडा, असे निवडणूक आयोगाने दोन्ही सेनांना सांगितले. उद्धव गटाने ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव घेतल्यानंतर शिंदे गटाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव निवडले, म्हणजे दोघांनीही बाळासाहेबांच्या वारशावर दावा सांगितला! त्या वारशाशी जोडून घेतल्याखेरीज कोणताही गट उभाच राहू शकला नसता, याची ही कबुली!

हेही वाचा… पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

बाळासाहेब कोणाकडे?

पण खुद्द बाळासाहेब कोणत्या गटाच्या बाजूने गेले असते? प्रश्न ‘जर असते तर’ असा असला तरी उत्तर अगदी स्पष्ट आहे. जगभरात कोठेही जा, कोणत्याही संस्कृतीत पाहा. वडील स्वत:च्या मुलाचीच बाजू घेतात, हे भारतात तर फारच खरे. शिवाय शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनीच ‘माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा’ असे आवाहन जाहीरपणे केले नव्हते काय? तेव्हा महाराष्ट्रीयांच्या मनात तरी, बाळासाहेबांनी कुणाला प्राधान्य दिले असते याबद्दल संदेह असण्याचे कारण नाही. महाराष्ट्रीयांची ही खात्रीच शिंदे गटाच्या मतांना भोवणारी ठरू शकते.

तरीही खात्री नसेल, तर राज ठाकरे यांना आठवावे. बाळासाहेबांचे सख्खे बंधू श्रीकांत हे राज यांचे वडील. मीनाताई ठाकरे यांच्या भगिनी म्हणजे श्रीकांत ठाकरे यांच्या पत्नी, त्यांचे राज हे अपत्य. ‘राज, माझे फोटो वापरू नकोस’ हा बाळासाहेबांचा आदेश पाळूनच राज ठाकरे राजकारणात टिकण्याचा संघर्ष करत आहेत.

हेही वाचा… अलिबाग : अवधुत तटकरे भाजपच्या वाटेवर ; आज पक्षप्रवेश होणार

मुंबईतील सामान्य शिवसैनिक मात्र गोंधळले असतील. हे काय चालले आहे असे त्यांना वाटत असेल. मुळात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना शून्यातून उभी केली, ती याच मुंबईकरांच्या पाठिंब्याने. महाराष्ट्राच्या या राजधानीत कुणी तरी निरनिराळेच समाज येताहेत, वर आपल्यावरच कुरघोडी करताहेत, मग ‘मराठी माणूस’ जाणार कुठे? बाळासाहेबांनी अस्मिता जागवण्यासाठी या अस्वस्थ मुंबईकरांना आश्वस्त केले. त्यांच्यात उत्साह संचारला.

कारण ‘हिंदुत्वा’चे की…?

शिंदे गट हिंदुत्वाबद्दलच बोलत असल्यामुळे या कार्यकर्त्यांवर काही प्रभाव पडेल असे वाटत नाही. हिंदुत्व या मूळच्याच राजकीय संकल्पनेपेक्षा बाळासाहेबांना ‘मराठी माणूस’ पुढे जावा, त्याचा उत्कर्ष व्हावा असेच वाटत होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे लक्ष रस्त्यावरल्या हाणामाऱ्यांकडून निराळ्या पातळीच्या संघर्षाकडे आणि कामे करण्याकडे वळवले आहे. हा सारा प्रवास शिवसैनिकांना माहीत आहे आणि त्यांना हेही माहीत आहे की, राज यांच्यापेक्षा उद्धव यांची निवड बाळासाहेबांनी केली. हा शिवसैनिक बाळासाहेबांच्या इच्छेप्रमाणेच वागला… त्यांच्यासाठी बाळासाहेब देवासमान होते!

हेही वाचा… अन्वयार्थ : चित्त्यांसाठी हत्तींवर संक्रांत ?

उद्धव यांची साथ आपण का सोडली, याविषयी शिंदे देत असलेली कारणे शिवसैनिकांना पटलेली दिसत नाहीत, ती यामुळेच. शिवसैनिक शाखाप्रमुख आणि उपप्रमुखांचे आदेश ऐकतात. ते उद्धव आणि शिंदे यांची भाषणेही ऐकतात, पण त्यांना हेही माहीत असते की, शिंदे यांच्यासह आज असलेल्या प्रत्येक आमदार आणि मंत्र्याची आपापली- व्यक्तिगत अडचणींची आणि कुणाला न सांगण्याजोगी- कारणे आहेत म्हणून ते बंडात सामील आहेत. तरीही, कठीण प्रसंगात शिवसैनिक कुठे जाणार हे सांगता येत नाही.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा

पहिली मोठी कसोटी म्हणजे पुढील महिन्यात होणारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक. या भागातील शिवसेना आमदार मतदारांना अतिशय प्रिय, आदरणीय होते. हे आमदार स्वत: साधे, सामान्य माणसाच्या मदतीला उभे राहणारे. हे आमदार, रमेश लटके यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पाठिंबा जाहीर केला. पण दुर्दैव असे की, मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी निवडणुकीला उभे राहण्यासाठी राजीनामा पाठवला, तो मंजूरच झाला नाही म्हणून त्यांची उमेदवारी धोक्यात येणार की काय अशी वेळ आली. मला आठवते की, मुंबईच्या एका पोलीस आयुक्तांना जेव्हा लोकसभा निवडणूक लढायची होती, तेव्हा एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्यांचा राजीनामा झटदिशी मंजूर झाला होता… ऋतुजा लटके यांचे महापालिकेतील पद तेवढे मोठे नाही, हे नक्की.

या पोटनिवडणुकीच्या निकालातून शिवसेनेच्या दोन्ही गटांचे भवितव्य ठरेल. प्रत्येक शिवसैनिकाचीच नव्हे तर प्रत्येक मुंबईकराची आकांक्षा मुंबई महापालिकेवर नियंत्रण टिकवण्याची असते. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा देशातल्या एखाद्या लहान राज्याहूनही मोठा असतो. जर शिवसेनेने या महापालिकेवरील नियंत्रण गमावले- आणि सध्या तरी तसेच होईल असे दिसते- तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची कायमची घसरण सुरू होणार, अशीही भीती आहे.

तसे घडलेच तर आज शिंदे यांच्यासोबत असलेल्यांपैकी बहुतेक जण थेट भाजपकडेच जातील, आणि राजकीय रंग खुललेला भाजपही त्यांना सामावून घेईल. ‘सीबीआय’ आणि‘ईडी’ची थाप आपल्या घराच्या दारावर पडण्याची भीती या साऱ्यांना असेलच आणि ती ते टाळू शकणार नाहीत. याचा वापर शस्त्रासारखा कसा करावा, हे भाजपला माहीत आहे.

…पोलीस दलात काय सुरू आहे?

मुंबईकरांना एक अभागी माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) माहीत असतील… संजय पांडे त्यांचे नाव. आजही ते दिल्लीच्या तुरुंगात आहेत, कारण त्यांच्यावर बेकायदा फोन ‘टॅप’ केल्याचा आरोप आहे… आणि त्याच वेळी रश्मी शुक्ला- ज्या माजी मुख्यमंत्री आणि सध्या उपमुख्यमंत्री पदावर असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील म्हणून ओळखल्या जातात- त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस दलातील मोक्याची जागा देण्याचे घाटत असल्याचा दावा प्रसारमाध्यमांतील बातम्यांमधून होऊ लागला आहे. या रश्मी शुक्लांवरही फोन टॅप केल्याचा आरोप होताच, पण त्याबरोबरच, ज्या राजकीय नेत्यांची दूरध्वनींवरील संभाषणे चोरून ऐकण्यात आली त्या राजकारणी व्यक्तींच्या नावांच्या जागी, अस्तित्वातच नसलेल्या कुणा मुस्लिमांची (बनावट) नावे घालण्यात आली आणि ‘ते दहशतवादी होते’ असे त्या म्हणाल्या! ज्यांचे फोन ऐकण्यात आले त्यांपैकी कुणीही मुस्लीम नव्हते आणि त्या कुणाचाही दहशतवादाशी संबंध नव्हता! फोन क्रमांक होते विरोधी राजकारण्यांचे किंवा राजकीय आकांक्षांमध्ये खो घालू शकणाऱ्यांचे.
यातून मिळणारा धडा अगदी ढळढळीत आहे. जर तुम्ही भाजपच्या बाजूने असाल किंवा कोणत्याही प्रकारे भाजपला मदत करत असाल, तर तुम्ही गुन्हे केले तरी तुम्हाला शिक्षा मिळणार नाही! हा नवाच कायदा अद्याप पोलीस अधिकाऱ्यांना, ‘प्रशिक्षण कालावधी’त शिकवला जात नाही खरा, पण ते कार्यरत झाल्यावर लवकरच त्यांना तो अंगवळणी पडतो म्हणे!

(लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत)

Story img Loader