राखी चव्हाण

विकास आवश्यकच, पण पर्यावरणाचा बळी देऊन तो साधला जात असेल तर त्याला विकास म्हणायचा की विनाशाची सुरुवात? भारताची वाटचाल त्याच दिशेने चालल्याचे संकेत इंग्लंडस्थित ‘युटिलिटी बीडर’ या संस्थेने दिले आहेत. २०१५ ते २०२० या काळात भारताने सहा लाख ६८ हजार ४०० हेक्टरवरील जंगल गमावले. गेल्या ३० वर्षातील ही सर्वाधिक जंगलतोड आहे.

Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
forest lands latest news in marathi
वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात
State government approves subsidy of Rs 165 crore for orange producers
संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी
Forest Minister Ganesh Naik Challenges
लोकजागर : नाईकांसमोरचे आव्हान!
Plantation trees , Municipal Corporation,
कांदिवली – दहिसरमध्ये महापालिकेतर्फे पाच हजार झाडांचे रोपण, वृक्षारोपणात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

पर्यावरण असंतुलन, हवामान बदलाचे दुष्परिणाम जगभरातील अनेक देशांना भोगावे लागत आहेत. भारत त्याहून वेगळा नाही. त्यानंतरही केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरणाशी निगडित कायदे बदलाचा जो घाट घातला आहे, त्याचेच दुष्परिणाम आता समोर येत आहेत. या कायदेबदलांमुळे प्रकल्प वेगाने मार्गी लागत आहेत आणि तेवढ्याच वेगाने जंगलदेखील तोडले जात आहे. सहा लाख ६८ हजार ४०० हेक्टरवरील जंगलतोड अवघ्या पाच वर्षात हाेणे, यावरूनच हे चित्र स्पष्ट होते. ब्राझील या देशानंतर जंगलतोडीच्या क्रमवारीत भारताचा दुसरा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये या कालावधीत १६ लाख ९५ हजार ७०० हेक्टर वनक्षेत्र नाहीसे झाले. या दोन्ही देशांच्या आकडेवारीने विकास की पर्यावरण हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. एकीकडे हवामान बदलाचा सामना कसा करावा यासाठी जागतिक पातळीवर बैठका होतात. या बैठकांमध्ये करार होतात आणि त्यावर विविध देशांच्या सह्या होतात. पण प्रश्न पुन्हा तोच! या करारातील बाबी किती लोक पाळतात? त्या पाळल्या असत्या तर एवढा मोठा विनाश दिसलाच नसता.

मार्च २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालात १९९० ते २००० आणि २०१५ ते २०२० या कालावधीतील जंगलतोडीचे विश्लेषण या संस्थेने ‘डेटा ॲग्रीगेटर अवर वर्ल्ड इन डेटा’च्या मदतीने केले. गेल्या ३० वर्षांतील ९८ देशांतील जंगलतोडीचे विश्लेषण त्यांनी केले. १९९० ते २००० या कालावधीत भारताने तीन लाख ८४ हजार हेक्टर वनक्षेत्र गमावले. तर २०१५ ते २०२० या काळात सहा लाख ६८ हजार ४०० हेक्टरवरचे जंगल गमावले. म्हणजेच दहा वर्षांत जेवढी जंगलतोड भारतात झाली, त्यापेक्षा दुपटीने जंगलतोड पाच वर्षांत झाली. या दोन्ही कालावधीत जंगलाच्या विनाशात दोन लाख ८४ हजार ४०० हेक्टरची वाढ झाली. लोकसंख्येतही भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि वाढत्या लोकसंख्येचे परिणाम पर्यावरण विनाशाच्या स्वरूपात भोगावे लागत आहेत. लोकसंख्या वाढली की माणसाच्या गरजा वाढतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणसाची धाव ही जंगलाकडेच असते, असेही मत या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

झांबिया या आफ्रिकी देशातदेखील या कालावधीत सर्वात जास्त जंगलतोड नोंदवण्यात आली. १९९१-२०२० मध्ये या देशात ३६ हजार २५० हेक्टरवरील जंगल तोडण्यात आले. मात्र, २०१५ ते २०२० या कालावधीत एक लाख ८९ हजार ७१० हेक्टरची वाढ झाली. झांबियामधील जंगलतोडीमधील ही वाढ दुसऱ्या क्रमांकाची असून तीदेखील दखल घेण्यासारखीच आहे. २०१५ ते २०२० यादरम्यान १६ लाख ९५ हजार ७०० हेक्टर जंगलतोड करून ब्राझील वनक्षेत्र गमावणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या अहवालात ब्राझीलने जंगल गमावण्याचे कारण हवामान बदल असल्याचे नोंदवण्यात आले आहे. मात्र, १९९० ते २००० दरम्यान या देशाने जे ४२ लाख ५४ हजार ८०० हेक्टरवरचे वनक्षेत्र गमावले त्यापेक्षा अलीकडच्या पाच वर्षात गमावलेले वनक्षेत्र खूप कमी आहे. तुलनेने भारतात जंगलतोडीच्या प्रमाणात दोन लाख ८४ हजार ४०० हेक्टरचा वेग हा सर्वाधिक आहे. भारतीय वनसर्वेक्षणाची अलीकडच्या अहवालातील आकडेवारी पाहिली तर २०१९ ते २०२१ या कालावधीत वनक्षेत्रात १.६ लाख हेक्टरची तोकडी वाढ दर्शवण्यात आली आहे. तर ‘सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एनव्हायर्नमेंट’च्या विश्लेषणात भारतातून जवळजवळ २.५९ कोटी हेक्टर म्हणजेच उत्तर प्रदेशच्या आकाराचे जंगल बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. वनसर्वेक्षण अहवालात मात्र, याबाबत कोणतेही विश्लेषण करण्यात आले नाही, असेही या संस्थेचे म्हणणे आहे.

‘युटिलिटी बीडर’च्या अहवालात जंगल नष्ट होण्याची अनेक कारणे दिली आहेत. इंडोनेशियामध्ये पाम तेलाच्या लागवडीमुळे सहा लाख ५० हजार हेक्टर जंगलांचा नाश झाला, ज्यामुळे ते भारताच्या खालोखाल जगातील तिसरे सर्वात मोठे नुकसान झाले. या अभ्यासात पुढे असे दिसून आले की जागतिक जंगलतोड होण्याचे प्रमुख कारण पशुपालन हे आहे आणि त्यामुळे दरवर्षी २१ लाख पाच हजार ७५३ हेक्टरचे नुकसान होते. त्यानंतर तेलबियांच्या लागवडीमुळे नऊ लाख ५० हजार ६०९ हेक्टर वनसंपत्तीचे नुकसान झाल्याचेही या अहवालात सांगितले आहे. या अहवालात सुरुवातीलाच असे नमूद करण्यात आले आहे की पाम तेल हे अनेक वर्षांपासून जंगलतोडीचे एक मोठे कारण आहे. मात्र, वनसंपत्तीच्या नुकसानास ते एकमेव जबाबदार नाही, असेही या अहवालाचे म्हणणे आहे. सोयाबीनमुळे आपल्याला भरपूर पोषक आणि आरोग्यविषयक फायदे मिळतात. मात्र, या पिकाचे उत्पादन घ्यायला जागा निर्माण करण्यासाठी अनेक हेक्टर गवताळ प्रदेश आणि जंगले नष्ट करण्यात आल्याचेदेखील हा अहवाल सांगतो. मांस आणि तेलबीज लागवडीनंतर गुरेढोरे चराई हा वृक्षतोडीच्या कारणामागील तिसरा सर्वात मोठा घटक आहे. यामुळे जागतिक स्तरावर सुमारे सहा लाख ७८ हजार ७४४ हेक्टर वार्षिक जंगलतोड होते. अहवालात पुढे असे दिसून आले आहे की, ब्राझीलने २०१५ ते २०२० या कालावधीत २५ लाख ५९ हजार १०० हेक्टरने जंगलतोड कमी केली आहे आणि त्याच कालावधीत इंडोनेशियाने १८ लाख ७६ हजार हेक्टरने जंगलतोड कमी केली आहे.

या दोन देशातील जंगलतोडीची आकडेवारी पाहिली तर भारताच्या जंगलतोडीत लक्षणीय वाढ झाली आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader