छगन भुजबळ म्हणजे आक्रमक नेते. त्यांच्या भाषणात नेहमीच आक्रमकता असते. इतर नेत्यांची खिल्ली उडविण्याची त्यांची शैलीही वेगळीच. पण त्या दिवशी अशाच आक्रमक शैलीतील भाषणात भुजबळांना बहुधा भान राहिले नाही. त्यातून त्यांची गाडी सुसाट सुटली मग चूक लक्षात येताच त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचे झाले असे की, सावित्रीबाई फुले यांच्या साताऱ्यातील नायगाव या जन्मभूमीतील कार्यक्रमात बोलताना भुजबळ सांगत होते की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर ही महाराष्ट्राची शक्तिस्थळे आहेत. यांच्यामुळे पुरोगामी राज्याची ओळख होते. साताऱ्यातील नायगाव हे सावित्रीबाईं फुलेंचे जन्मभूमी तर पुणे कर्मभूमी. येथे आल्यावर प्रत्येकाला स्फूर्ती मिळते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा कायम येत जा तुम्हालाही येथून नक्की स्फूर्ती मिळेल असे भुजबळ बोलून गेले, व्यासपीठासह सभास्थळी एकच हशा पिकला. तेव्हा काही तरी आपल्याकडून चूक झाल्याचे भुजबळ यांच्या लक्षात आले. मग आपलं भाषण सावरत भुजबळ म्हणाले, तुम्ही कायम मुख्यमंत्री राहिला म्हणून हरकत नाही, पण मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणजे काटेरी खुर्ची असते याची आठवण शिंदे यांना करून दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा