सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या समृद्ध सिंधू संस्कृतीचे अवशेष जपणाऱ्या मोहेंजोदारोला पाकिस्तानातील अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला आहे. संततधार पावसामुळे या स्थळाचे नुकसान होऊन त्याला जागतिक वारशाचा दर्जा गमवावा लागण्याची भीती पाकिस्तानातील माध्यमे व्यक्त करत आहेत.

इसवी सन पूर्व १८०० च्या सुमारास सिंधू नदीला वारंवार आलेल्या पुरांमुळे समृद्ध हरप्पा संस्कृती नामशेष झाली, असा सिद्धांत जलतज्ज्ञ रॉबर्ट राइक्स आणि पुरातत्त्व संशोधक जॉर्ज डेल्स यांनी १९६० साली मांडला. सध्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात सुरू असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे मोहेंजो दारोच्या जागतिक वारसा दर्जाला धोका निर्माण होण्याची भीती पाकिस्तानच्या पुरातत्त्व विभागाने गेल्याच आठवड्यात व्यक्त केली आहे. प्रागैतिहासिक काळात सिंधू नदीच्या पश्चिम काठावर विकसित झालेल्या मोहेंजो दारोचे महत्त्व ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’चे राखल दास बॅनर्जी यांनी १९२२ साली जगासमोर आणले. कराचीपासून ५१० किलोमीटर अंतरावर आणि सिंध प्रांतातील लरकानापासून २८ किलोमीटरवर आढळलेल्या या शहराच्या अवशेषांना १९८० साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Over 2400 people died in extreme weather events like floods heatwaves and landslides
हवामान प्रकोपाचे गतवर्षांत देशात २४०० बळी, जाणून घ्या, उष्णतेच्या झळांची स्थिती काय
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट

सध्या सिंध प्रांतात आलेल्या पुरापासून या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थळाला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान तेथील यंत्रणांपुढे आहे. या पुरामुळे या वारसास्थळाला आणि तिथे सुरू असलेल्या जतनाच्या प्रयत्नांना धक्का बसण्याची आणि त्यामुळे मोहेंजो दारोला जागतिक वारस स्थळाचा दर्जा गमावावा लागण्याची भीती संबंधित यंत्रणांनी व्यक्त केली आहे. तेथील ‘डॉन’ या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. या बातमीत दिलेल्या माहितीनुसार या स्थाळाचे क्युरेटर इहसान अली अब्बासी यांनी संस्कृती आणि वारसा मंत्रालयाच्या संचालकांना गेल्या महिन्यात पत्र पाठविले होते. ‘आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या सहाय्याने या स्थळाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र जलसंपदा, रस्ते, महामार्ग आणि वन विभागानेही या प्रयत्नांना हातभार लावण्याची गरज आहे. या भागातील जमीनदार आणि शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी मोहेंजो दारोमध्ये वाहून जावे म्हणून पर्जन्यजलवाहिन्या तयार केल्या आहेत, कालवे आणि रस्ते फोडले आहेत.’

‘डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार १६ आणि २६ ऑगस्टदरम्यान मोहेंजो दारो परिसरात ७७९.५ मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे या वारसा स्थळाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भिंती अर्धवट कोसळल्या आहेत, स्तुपाची संरक्षक भिंतही कोसळली आहे.

भीषण अतिवृष्टीमुळे मोहेंजो दारोतील डीके, मुनीर, स्नानगृह परिसराला आणि या अवशेषांच्या इतर भागांना धोका निर्माण झाला असल्याचे वृत्त ‘द नेशन’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. ‘विशेषत: तेथील पायऱ्या, स्तूप आणि डीके भागाची स्थिती अतिशय गंभीर आहे,’ असेही या वृत्तात नमूद केले आहे. ‘हे भाग जलमय झाले नसले, तरीही सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे त्यांची झीज झाली आहे,’ अशी माहिती क्युरेटर अब्बासी यांनी दिल्याचेही ‘द नेशन’ने म्हटले आहे.

‘द फ्रायडे टाइम्स’ने ३१ ऑगस्टला दिलेल्या वृत्तानुसार ‘मोहेंजो दारोचा बहुतेक भाग संततधार पावसामुळे उद्ध्वस्त झाला आहे. उत्खनन करण्यात आलेल्या भागांत खड्ड्यांमधील पाणी झिरपल्यामुळे अवशेषांचे नुकसान झाले आहे.’ ‘द नेशन’ने सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार अवशेषांचे विलोपन होण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यटकांना या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

हरप्पाप्रमाणेच मोहेंजो दारो ब्राँझ युगातील नागरी संस्कृतीसाठी ओळखले जाते. ही संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात इसवी सन पूर्व ३,३०० ते इसवी सन पूर्व १३०० दरम्यान विकसित झाली. इसवी सन पूर्व २६०० आणि इसवी सन पूर्व १९०० दरम्यान या संस्कृतीची भरभराट झाली. इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्त्रकाच्या मध्यावर सिंधू संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागला. या संस्कृतीच्या ऱ्हासाला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचा अंदाज वर्तवला जातो.

वारसा दर्जा जपण्याचे प्रयत्न

पाकिस्तानातून आलेल्या काही वृत्तांनुसार या जागतिक वारसा स्थळाला अतिवृष्टीचा फटका बसला असला, तरीही परिसर जलमय झालेला नाही. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस या आठवड्यात पाकिस्तानला भेट देणार असल्याचे वृत्त ‘द नेशन’ने प्रसिद्ध केले आहे. अवशेषांवर साचलेली माती आणि गाळ दूर करण्याचे काम सुरू असल्याचेही ‘द नेशन’ने म्हटले आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत साधारण ११०० स्थळांचा समावेश आहे. गतवर्षी जागतिक वारसा समितीने इंग्लंडमधील लिव्हरपूल मेरिटाइम मर्कंटाईल सिटीला या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला. या स्थळाला जागतिक वारसा स्थळ ठरवणारी अनेक वैशिष्ट्ये नामशेष झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. २००७ मध्ये युनेस्कोच्या समितीने ओमान येथील अरेबियन ऑरिक्स सँक्च्युरीला वारसा स्थळांच्या यादीतून वगळले. जलचरांच्या अधिवासाचा ऱ्हास आणि शिकार यामुळे हे स्थळ वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader