रोहन बॅनर्जी

“तुम्हाला कोणत्याही बाह्य गोष्टीमुळे त्रास होत असेल, तर वेदना त्या घटकामुळे होत नसतात तर तुम्ही स्वत: त्या घटकाबद्दल जो विचार केलेला असतो, अंदाज बांधलेला असतो, त्यामुळे होत असतात; आणि या वेदना थांबवण्याची ताकद तुमच्या स्वत:मध्येच असते.” असे दुसऱ्या शतकातील रोमन तत्त्वज्ञानी-सम्राट मार्कस ऑरेलियस याने आपल्या ‘मेडिटेशन्स’ या लेखसंग्रहात लिहिले आहे. तो असे म्हणू शकला कारण त्याने कोल्ड प्ले या बॅण्डच्या मुंबईत होऊ घातलेल्या कॉन्सर्टसाठी तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय असते, ते कधीच अनुभवले नव्हते. वेगवेगळ्या डिव्हाइसेसवरून लॉग इन करणे, आसन निवड कशी करायची हे ठरवणे, अपडेट्ससाठी इन्स्टाग्राम रीफ्रेश करणे आणि डिजिटल रांगेत उभे राहून तिकिटे नाहीत, हे समजणे म्हणजे काय असते हे त्याने कधीच अनुभवले नव्हते. मग, त्याला जगण्यातील वेदना आणि त्रास काय असतो, हे कसे कळणार?

Ajna card stealing gang , mobile tower, Vasai,
वसई : मोबाईल टॉवरमधील आझना कार्ड चोरणारी टोळी गजाआड, परदेशातून गुन्ह्यासाठी व्हायचा वापर
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Success Story Harshita In marathi
Success Story : एक मोठी जबाबदारी अन् गृहकर्जाच्या जोखमीचं मूल्यांकन करण्यासाठी तयार केलं नवं मॉडेल; वाचा हर्षिता यांची प्रेरणादायी कहाणी
IPL Auction 2025 Mohammad Kaif given advice to RCB about Rohit Sharma
‘रोहित शर्माला कर्णधार म्हणून घ्या…’, मोहम्मद कैफने IPL 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोणाला दिला सल्ला? पाहा VIDEO
shreyas Iyer buy apartment in Mumbai
Shreyas Iyer : श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईने मुंबईतील वरळी भागात खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट; किंमत ऐकून थक्क व्हाल!
dispute in Bhandara Adv Gunaratna Sadavarte ST Bank meeting Throwing chairs on police
भंडारा : ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेच्या सभेत तुफान राडा! पोलिसांवर फेकल्या खुर्च्या, धक्काबुक्की…
chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
california senator marie alvarado gil
Who is Senator Marie Alvarado-Gil: ‘नोकरी टिकवायची असेल तर लैंगिक सुख दे’, महिला सेनेटरच्या बळजबरीमुळे पुरुष कर्मचाऱ्याला दुखापत

कोल्ड प्ले बॅण्डच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर चा एक भाग म्हणून कोल्ड प्लेच्या भारत भेटीची घोषणा करण्यात आली, तेव्हा उत्साहाची एक लाटच पसरली. सर्वाधिक लोकप्रिय अशा या म्युझिक बॅण्डचे जोरदार स्वागत होणार हे स्पष्ट होते. पण या कॉन्सर्टच्या तिकिटांच्या विक्रीदरम्यान आणि नंतर काही विचित्र गोष्टी घडल्या. या कार्यक्रमासाठी तिकिटे होती दीड लाख आणि ती घेण्यासाठी उत्सुक लोक होतो, एक कोटींहून अधिक. त्यामुळे मग या तिकिटांच्या बुकींगसाठी, बुक माय शो (BMS) या तिकीट प्लॅटफॉर्मने यादृच्छिकतेच्या (रॅण्डमायझेशन) तत्त्वावर चालणारी प्रणाली निश्चित केली. या तिकिटांसाठी लॉग इन करणाऱ्या काही लाख आशावादी लोकांच्या काही सेकंदातच लक्षात आले की केवळ नशिबाची कृपा असलेल्या काही लोकांनाच तिकिटे मिळाली आहेत.

मागणी आणि पुरवठ्यामधील या विसंगतीने अपरिहार्यपणे काळ्या बाजाराला जन्म दिला. या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली आणि काही वेळातच, वेबसाइटवर जास्त दराने तिकिटांची पुनर्विक्री केली गेली. वर्ग नियंत्रणात आणण्याचा एखाद्या पर्यायी शिक्षकाचा प्रयत्न जसा विफल ठरतो, तसेच बुक माय शो या बुकींग प्लॅटफॉर्मने जारी केलेल्या सूचना आणि इशाऱ्यांबाबत झाले. या सूचना आणि इशारे बुक माय शो च्या अधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या चौकशीपासून वाचवू शकले नाहीत. त्यानंतरच्या दिवसांमध्ये, केवळ नफा मिळविण्यासाठी तिकीट काढून ती विकणाऱ्यांचा अनेकांनी निषेध केला. काहींनी संख्येने तुलनेत थोड्या असलेल्या, चैनीची आवड असलेल्या आणि त्याबाबत जराही न लाजणाऱ्या भारतीय शहरी उच्चभ्रू वर्गाच्या वाढत्या भुकेवर भाष्य केले. परंतु या कॉन्सर्टभोवतीच्या गोंधळामुळे ऑनलाइन वर्तनातील विखारीपणा आणि समाजमाध्यमामधील वाद हा एक महत्त्वाचा समकालीन सांस्कृतिक ट्रेंड पाहण्याची संधी मिळाली.

हे ही वाचा…शिक्षणाच्या प्रांगणातील राजकीय गणिते! : एक विजय आणि अनेक प्रश्न

इंटरनेटचे कायदे सांगतात की जसे अतिरेकी प्रेम करणारे ऑनलाइन फॅन्स असतात तसेच त्यांच्यावर टीका करणारे बोलघेवडेही असतात. ते यासंदर्भात मोबाइल फोनच्या पडद्याबाहेर होणाऱ्या तुंबळ लढाईतही दोन हात करण्यासाठी तयार असतात. या संघर्षाची मुळे श्रेष्ठतेच्या भ्रामक संकल्पनेत असतात.

प्रत्येकजण असे मानत असतो की तो खास आहे आणि बाकीच्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. स्वतःच्या वेगळेपणावरचा हा विश्वास त्याला इतरांपेक्षा वेगळी अभिरुची ठेवण्यास प्रोत्साहित करतो. आपल्याला ज्यातून सामाजिक भांडवल मिळेल अशा विशिष्ट आवडी आपल्याला हव्या असतात. ही समृद्ध करणारी प्रवृत्ती असू शकते आणि विशिष्ट संवेदनांना आकार देऊ शकते. पण यामुळे लोकप्रिय आणि पारंपारिक अशा सर्व गोष्टींना काहीही विचार न करताच नकार दिला जाऊ शकतो. केवळ इतरांपेक्षा वेगळे असे उठून दिसणे, स्वत:ला श्रेष्ठ समजणे हे आपल्याला विरोधाभासी वृत्तीचे बनण्यास प्रवृत्त करू शकते. आणि समाज माध्यमांवर, आपण श्रेष्ठ आहोत, हे ठसवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे विरोधक बनणे. हे द्वेष्टे विरोधक इतरांवर कटू टीका करण्यातच आनंद मानतात.

कोल्ड प्लेच्या पॉप गाण्यांमध्ये एक प्रकारचे व्यापक आवाहन आहे. सहज गाता येईल असा साधेपणा आहे. या गोष्टींमुळे ते त्यांच्या द्वेष्ट्यांसाठी सोपे लक्ष्य ठरले आहेत. मुंबईतील कॉन्सर्टचा पास मिळाला नाही म्हणून हजारो लोक दु:खी झाले असताना, या कोल्ड प्ले द्वेष्ट्यांनी तुम्हाला काय या सुमार गोष्टी आवडतात, असे म्हणत त्यांची चेष्टामस्करी केली. कोल्ड प्लेचे संगीत कसे अगदीच सामान्य आहे, २०२४ च्या कॉन्सर्टमध्ये कोल्ड प्ले ऐकताना लोक कसे चेहरे करतील अशा पोस्ट एक्स (पूर्वीचे ट्वीटर) वर लिहिल्या. हे सगळं कसं निव्वळ फॅड आहे, असं म्हणून हे द्वेष्टे थांबले नाहीत. आपण कसा तिकीट-बुकिंगच्या फसवणुकीत भाग घेण्याचा अट्टाहास केला नाही हे ते सारखे सांगत राहिले. यातून त्यांना ते कसे सामाजिक पातळीवर श्रेष्ठ आहेत हे ठसवायचे होते. कोल्ड प्ले द्वेष्टे नेहमीच कोल्ड प्लेच्या उत्साही चाहत्यांवर असे हल्ले करत असतात. पण ज्यांना कोल्ड प्ले बॅण्डची तिकिटे मिळाली नाहीत, त्यांच्या प्रतिक्रियांवरून ही श्रेयवादाची लढाई चाहत्यांमध्ये कसा मतभेद निर्माण करू शकते, ते लक्षात येते.

हे ही वाचा…राजकीय आकलनाची पहिली इयत्ता

रेडिटवरील विविध पोस्ट्सवर पासेस मिळवलेल्या आणि कोल्ड प्ले बॅण्डवर प्रेम आहे, असा दावा करणाऱ्या लोकांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या लोकांना बॅण्डमधील गायक वादकांची नावे तरी माहीत होती का? त्यांनी या बॅण्डची सुरुवातीची गाणी तरी ऐकली होती का? ते सगळ्या कोल्ड प्ले अल्बम्सची काळानुसार नावे सांगू शकतात का? या प्रश्नांच्या आडून खरेतर ज्यांना तिकीटे मिळाली आहेत, त्यांना विचारले जात होते की आम्ही खरे चाहते आहोत. आम्हाला तिकीट मिळालेले नाही. पण मग ही तिकिटे मिळवायची आणि या कॉन्सर्टला जायची तुमची लायकी तरी आहे का?
द कन्सोलेशन्स ऑफ फिलॉसॉफी, या आपल्या पुस्तकात, ॲलेन डी. बॉटन यांनी निराशेच्या परिणामांचा शोध घेतला आहे. या परिणामांचे वर्णन त्यांनी ‘इच्छा आणि निर्दयी वास्तव यांची टक्कर’ असे केले आहे. रोमन तत्त्वज्ञ सेनेका यांनी या बाबत केलेल्या कामाचे संदर्भ घेत डी. बॉटन यांनी आपल्या इच्छा शमवल्या जातात, तेव्हाचा भावनिक प्रतिसाद कसा असतो त्याचे वर्णन केले: राग आणि आत्म-दयेपासून सुरू झालेला रस्ता कटुता आणि अन्यायाच्या भावनेकडे जातो. आपली इच्छा असलेली एखादी गोष्ट आपल्या हातामधून निसटली की आपण रागावतो, चिडतो. ती गोष्ट दुसऱ्याला मिळाली तर आपल्याला लुटले गेल्यासारखे वाटते.

जी गोष्ट आपली असायला हवी होती ती आपल्याला मिळत नाही, तेव्हा आपण आपण त्यांच्याकडे संशयाने पाहू लागतो. ज्यांना कोल्ड प्लेच्या आधीच्या गोष्टींबद्दल काहीही सांगता येत नाही, त्यांना या बॅण्डचे तिकिट का मिळावे असे आपल्याला वाटत राहते. आपण त्याबद्दल आपली तीव्र नापसंती व्यक्त करतो. तुम्ही कोल्ड प्लेचे द्वेष्टे असाल किंवा फारसे चाहते नसाल, तर तुम्ही थट्टा करणे सुरू ठेवता. किंवा, मार्कस ऑरेलियसचा सल्ला तुम्हाला पुन्हा एकदा आठवतो. “पुरे झाले हे दुखीकष्टी आयुष्य, या न संपणाऱ्या कुरबुरी, हे माकडचाळे… अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही उशीर झालेला नाही. प्रयत्न केलात तर अजूनही तुम्ही साधा, देवाच्या नजरेत चांगला असा माणूस बनू शकता.” तेव्हा अजूनही तुम्ही मुंबईत होणाऱ्या ग्रीन डे या बॅण्डच्या कार्यक्रमासाठी तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. तो खरं तर आणखी चांगला बॅण्ड आहे. लेखक मुंबईस्थित वकील आहेत.