योगेंद्र यादव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या ९९ जागा अनेकांना विस्मयचकित करणाऱ्या ठरल्या. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’पासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या चढत्या आलेखाने काँग्रेसबद्दलचे अनेक गैरसमज खोडून काढले.
यंदाच्या लोकसभेत काँग्रेसला मिळालेल्या जागांची ९९ ही संख्या भाजपच्या २४० च्या तुलनेत फार मोठी वाटणार नाही. गेल्या ७५ वर्षांतल्या काँग्रेसच्याच कामगिरीचा विचार केला, तरी काँग्रेसची ही तिसरी सर्वात कमी संख्या आहे. पण राजकारणात निव्वळ एखादी संख्याच सारे काही सांगू शकत नाही, तिचे राजकीय संदर्भही पाहावे लागतात. राजकीय वस्तुस्थिती अशी आहे की काँग्रेस गाळात गेल्याचे वाटत असतानाही १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसने जशी उसळी घेतली होती, त्यानंतरची ही दुसरी सर्वोत्तम उसळी आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस केवळ ४४ आणि ५२ जागांच्या हताशेत अडकली होती. सर्वात वाईट म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत ५२ जागांपैकी ३२ जागा फक्त केरळ, पंजाब आणि तमिळनाडू या तीन राज्यांतून आल्या. तीनपैकी एकाही राज्यात भाजप हा प्रमुख प्रतिस्पर्धी नव्हता. तमिळनाडूमध्ये काँग्रेस हा द्रमुकचा कनिष्ठ भागीदार होता.
काँग्रेसची उसळी
भाजपच्या ‘४०० पार’च्या रेट्यामागील खरे लक्ष्य काँग्रेसला आणखी खाली ढकलणे आणि देशव्यापी वावर, प्रतिस्पर्धी विचारसरणी आणि संभाव्य नेता असलेल्या एकमेव पक्षाचा नाश करणे हे होते. काँग्रेस ४० जागांपेक्षाही खाली घसरून फक्त दक्षिण भारतीय पक्ष ठरेल, अशीही चर्चा होती. काँग्रेसने या सर्व शक्यता धुडकावून जागांची संख्या जवळपास दुप्पट केली, याला उसळी नाही तर काय म्हणायचे?
हेही वाचा >>> मराठी लघुपटांच्या वाढत्या दर्जाला राज्य शासनाचीही दाद हवी!
काँग्रेसने मिळवलेल्या जागा देशाच्या सर्व भागांतून आहेत. हरियाणा ते बिहारपर्यंतच्या हिंदी पट्ट्यात हा पक्ष अवघ्या पाचवरून २३ वर गेला. महाराष्ट्रात जवळपास सर्व जागा राखून आणि पंजाबात भाजपला खातेही उघडू न देता, पारंपरिक गड तर काँग्रेसने राखलेच. पण मणिपूरमधील दोन्ही जागा तसेच नागालँडची, मेघालयातील गारो हिल्सची अशा जागा जिंकून काँग्रेसने ईशान्य भागातही ठसा उमटवला. विरोधी पक्षांमधला सर्वांत हतबल दिसणारा हा पक्ष आता राजकीय रस्सीखेचीत पाय रोवताना दिसतो आहे.
मतटक्का वाढला
मतांचा टक्का सखोलपणे पाहिल्याखेरीज काँग्रेसचे यश पुरेसे उमगणार नाही. एकंदरीत देशभरच्या मतांमध्ये काँग्रेसचा वाटा १.७ टक्के टक्क्यांनी वाढल्याचे दिसते, परंतु ही दिशाभूल करणारी आकडेवारी आहे, कारण काँग्रेसने या वेळी २०१९ पेक्षा ९३ कमी जागा लढवल्या. आपण काँग्रेसने लढलेल्या मतदारसंघातील मतांच्या वाट्यावर अधिक योग्य रीतीने लक्ष केंद्रित केले तर, २०१९ मधील कामगिरीपेक्षा काँग्रेसने यंदा तब्बल ९.८ टक्क्यांची झेप घेतली आहे. भाजपने लढलेल्या जागांवर १.६ टक्के मते कमी झाली, याच्याशी या वस्तुस्थितीची तुलना करा. केरळ, ओडिशा आणि पंजाब वगळता सर्व प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये सकारात्मक बदल झाला आहे. निश्चितपणे, काँग्रेसच्या मतांच्या वाटा वाढीचा बराचसा भाग हा ‘इंडिया’ आघाडीचा कनिष्ठ किंवा समान भागीदार म्हणून लढलेल्या राज्यांमधून आला आहे. काँग्रेसने लढलेल्या प्रत्येक मतदारसंघात सरासरीने २३ टक्के मते मिळवली. ज्या जागांवर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली किंवा ‘इंडिया’ आघाडीतला प्रबळ भागीदार म्हणून काँग्रेस ज्या जागांवर लढली, तेथे मात्र तीन टक्के अधिक मतांचा लाभ काँग्रेसला झाला.
महत्त्वाचे म्हणजे, ‘भारत जोडो यात्रे’पासून सुरू झालेला काँग्रेसचा गेल्या २१ महिन्यांचा प्रवास हा काँग्रेसबद्दलच्या अनेक गैरसमजांना आणि या पक्षाबद्दल तयार केल्या गेलेल्या मिथकांना फाटा देणारा ठरला आहे. यापैकी काही मिथके तर खुद्द काँग्रेसजनांनीही मान्य केली होती, त्यामुळे या निवडणुकीत कोणकोणत्या समजांना सुरुंग लागला याची यादीच पाहिल्यावर, काँग्रेसने उभारी धरल्याचे लक्षात येईल.
हेही वाचा >>> शेतकरी हितात मोदींचे आणि देशाचे हित
काँग्रेसबद्दलच्या मिथकांना फाटा
एकदा का एखाद्या राज्यात काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला, की तिथे या पक्षाला कधीही सावरता येत नाही : लोकसभा २०१९ मध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवूनही, तेलंगणा राज्याच्या निवडणुकीत विजय मिळवून काँग्रेसने हा समज मोडून काढला आहे. लोकसभा- २०२४ मध्येही मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती (८ जागांनिशी) झाली.
लोकसभा निवडणुकीत, विशेषत: हिंदी पट्ट्यामध्ये काँग्रेस भाजपशी एकहाती लढत करू शकत नाही : गेल्या वेळी १९० जागांवर भाजप आणि काँग्रेस दोघेही वरचढ दिसत होते. प्रत्यक्षात यापैकी अवघ्या १५ जागा काँग्रेसने जिंकल्या. या वेळी काँग्रेसने २१५ पैकी ६२ मतदारसंघ घेतले. या जागांवर भाजपच्या विजयाची शक्यता निम्म्याने कमी करण्यात काँग्रेसला यश आले. हिंदी पट्ट्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला नाकारले जाते, हा समज राजस्थान आणि हरियाणामध्येही मोडला गेला. तिथे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीतील आपल्या कामगिरीत सुधारणा केली.
प्रादेशिक तसेच बहुसंख्याकांचे राजकारण करणाऱ्या भाजपसारख्या पक्षाने हिरावून घेतलेली जागा काँग्रेस कधीही परत मिळवू शकत नाही : काँग्रेसने आसाममधील बद्रुद्दीन अजमलच्या एआययूडीएफला ज्या पद्धतीने पराभूत केले ते पाहता गेल्या दोन दशकांमध्ये आपले जे स्थान गमावले आहे, ते पक्ष परत मिळवतो आहे. त्याचबरोबर हरियाणातील जेजेपीचा सामाजिक पाया काँग्रेसने ज्या पद्धतीने ताब्यात घेतला आहे, ते पाहता हा समज चुकीचा सिद्ध होतो.
काँग्रेस ‘ऑपरेशन कमळ’ला तोंड देऊ शकत नाही : लोकसभेच्या वेळीच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत, लोकसभेसाठी भाजपला अनुकूल असलेल्या याच हिमाचलच्या मतदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या निम्म्या आमदारांना नाकारले.
काँग्रेसचा सगळा भार त्याच्या सहकारी पक्षांवर आहे: असे एके काळी होते. पण काँग्रेसने या वेळी ते झटकून टाकले आहे. फक्त तमिळनाडू आणि महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरमध्येही, त्यांच्यापेक्षा प्रबळ असलेल्या पक्षापेक्षा त्यांच्या जागा वाढल्या नसतील पण त्यांचा मतटक्का वाढला आहे. अपवाद फक्त झारखंडचा होता, तिथे जेएमएमपेक्षा काँग्रेसच जास्त प्रबळ होता. सर्वच राज्यांमध्ये, काँग्रेसने केवळ मतांची भर घातली नाही तर स्वत:ची सॉफ्ट-पॉवर आणि वैचारिक सुसंगतता यातून आघाडीमध्ये मोलाची भर घातली आहे.
विधानसभा निवडणुकीतील अत्यंत वाईट कामगिरीनंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संपले होते : अवघी दोन टक्के मते मिळवलेल्या पक्षासाठी हे आश्चर्यकारक वळण आहे. काँग्रेसची परिस्थिती सपापेक्षा वाईट होती, पण त्याने ऐतिहासिक विजय मिळवला. प्रत्येकजण ज्या दोन जागांबद्दल चर्चा करत आहे, त्या दोनच जागा नाही, तर अलाहाबाद, सहारनपूर, सीतापूर आणि बाराबंकी या जागांवरदेखील काँग्रेसचा विजय ऐेतिहासिक होता. बसपपासून दूर जाऊ पाहणाऱ्या दलितांना आणि तसेच बसपाच्या मुस्लीम मतदारांना आपल्याकडे खेचून घेऊन काँग्रेसने इंडिया आघाडीतील आपले स्थान महत्त्वाचे असल्याचे सिद्ध केले.
काँग्रेस चळवळींच्या ऊर्जेशी स्वत:ला जोडून घेऊ शकत नाही: अनेक दशके सत्तास्थापनेचा खेळ करत राहिल्यानंतर, काँग्रेसने अखेर प्रस्थापितविरोधी राजकारणाची ऊर्जा मिळवायला शिकला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी आंदोलन आणि मुस्लीम नागरिकांच्या नेतृत्वाखालील सीएए- एनआरसी विरोधी निदर्शने यांचा काँग्रेसला ज्या प्रकारे फायदा झाला त्यावरून हे दिसून आले. (खाणविरोधी चळवळीशी जोडून घेण्यात काँग्रेसला आलेले अपयश हे छत्तीसगडमधील काँग्रेसच्या अपयशाचे गमक असू शकते.) भारत जोडो अभियान (प्रस्तुत लेखक या व्यासपीठाशी संबंधित आहेत) तसेच पक्षविरहित राजकीय चळवळी, लोकसंघटना आणि नागरिकांना इंडिया आघाडीशी जोडून ठेवण्यात नागरी संघटनांचा मोठा आणि संघटित सहभाग होता.
आव्हानेही आहेत…
ही फक्त सुरुवात आहे आणि आता आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही. या सगळ्या यशांमध्ये, अनेक अपयशांचाही हिशोब करावा लागेल. तेलंगणात आघाडीवर असलेल्या काँग्रेसला बीआरएसचा सामाजिक आधार मिळवण्यात अपयश आले. ओडिशात, भाजप आणि बीजेडी यांच्यात सुरू असलेल्या जुगलबंदीत आपण समर्थ पर्याय आहोत, हे ठसवण्याची सुवर्णसंधी काँग्रेसने गमावली. कर्नाटकात, त्यांच्या राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीतील दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचा फायदा घेण्यात ते अपयशी ठरले. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्ये अद्याप पक्षाला त्याचा मार्ग सापडलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये, काँग्रेसची निवडणूक रणनीतीच अशी होती की पक्षाला राजकीय सद्भावनेबरोबरच एक संभाव्य सहकारी गमवावा लागला. परिणामी भाजपला सहा जागा भेट मिळाल्या. ज्या दिल्लीत काँग्रेसने १५ वर्षे यशस्वीपणे राज्य केले आहे, तिथे पक्षाला अजूनही सूर सापडलेला नाही.
राजकारणाच्या या अमर्याद षटकांच्या कसोटी सामन्यात काँग्रेसला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण अत्यंत आक्रमक गोलंदाज, तडजोड करणारे पंच आणि विरोधात असलेले समालोचक यांच्यासमोर खराब खेळपट्टीवर दिवसाअखेर नाबाद ९९ ही धावसंख्या काही वाईट नाही.
लेखनसहाय्य राहुल शास्त्री, श्रेयस सरदेसाई
लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.
yyopinion@gmail.com