पद्माकर कांबळे
लोकसभेसाठी मुंबई (१९५२) निवडणूक तसेच भंडारा (१९५४) पोटनिवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाला जबाबदार कोण होते, याबद्दल  तत्कालीन पुराव्यांच्या आधारे निघालेले स्पष्ट निष्कर्ष वारंवार डावलून भलतेच आरोप करण्यामागे कोणाचा राजकीय स्वार्थ असतो?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी पर्यायाने महाविकास आघाडी बरोबर, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा झालेला ‘राजकीय बेबनाव’ आता सर्वज्ञात आहे. त्याबद्दल महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘पहिली बाजू’ या सदरात ‘संगीत खंजीर कल्लोळ’ हा लेख (२ एप्रिल) लिहून केलेले मतप्रदर्शन आणि सवंग शेरेबाजी यांचा प्रतिवाद करण्यासाठी नव्हे; पण उपाध्ये या लेखातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो खोटा इतिहास पसरवू पाहात आहेत, त्याबद्दल लिहिणे भाग आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना स्वाभिमानी ठरवण्याच्या भरात उपाध्ये यांनी, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा क्रियावान पंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीतील पराभवास काँग्रेस ‘पक्ष कसा जबाबदार आहे…!’ अशा अर्थाचा तथ्यहीन आरोप केला आहे.

unemployed youth cheated under mukhyamantri yuva karya prashikshan yojana
भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

तसा हा आरोप जुना आहे. दहा वर्षांपूर्वी २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन भाजप नेते स्मृतीशेष गोपीनाथ मुंडे यांनी हाच आरोप केला होता आणि सदर आरोपाचा प्रतिवाद/ सविस्तर परामर्श प्रस्तुत लेखकाने ‘लोकसत्ता’ दैनिकातच केला होता. (बुधवार ५ फेब्रुवारी २०१४). तोच सूर आता परत एकदा, भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आळवला आहे. ‘काँग्रेस नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा पराभूत केले,’ असे उपाध्ये म्हणतात. डॉ. आंबेडकर १९५२ च्या उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीत तसेच नंतर भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाले होते, हे खरे. पण  खरोखरच तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाच्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला का?

हेही वाचा >>> भाजपला वंचितचा उमाळा नक्की कशामुळे?

मुळात त्याआधी आज प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार निवडून दिला जातो; मात्र ही पद्धत स्वातंत्र्योत्तर काळात आरंभीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरसकट अवलंबिण्यात येत नव्हती. मतदारसंघ द्विसदस्यीय असला तर त्यातील एक जागा सर्वसाधारण आणि एक जागा राखीव अशी विभागणी केलेली असे. द्विसदस्यीय मतदारसंघात प्रत्येक मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार असे. मतदाराने दोन्ही मते विभागलीच पाहिजेत असे कायदेशीर बंधन नव्हते; पण मतदाराला देण्यात येणाऱ्या दोन्ही मतपत्रिका त्याने एकाच उमेदवाराच्या बाजूने टाकल्या, तर १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील ६३ (१) भागातील तरतुदीनुसार अशा मतपत्रिका मतमोजणी करताना बाद ठरवल्या जात असत.

डॉ. आंबेडकर आणि अशोक मेहता हे दोघेही ‘शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन व समाजवादी पक्ष यांच्या युतीचे’ उमेदवार होते. यांच्याखेरीज १९५२ मध्ये तेव्हाच्या उत्तर मुंबई मतदारसंघात श्रीपाद अमृत डांगे, डॉ. गोपाळ विनायक देशमुख, विठ्ठल बाळकृष्ण गांधी, केशव बाळकृष्ण जोशी, नीलकंठ बाबुराव परुळेकर, द. रा. घारपुरे, नारायण सदोबा काजरोळकर, रामचंद्र सदोबा काजरोळकर आणि शांताराम सावळाराम मिरजकर या नऊ उमेदवारांची नामांकनपत्रे वैध ठरली होती. त्यापैकी द. रा. घारपुरे, रा. स. काजरोळकर हे काँग्रेसचे आणि शां. सा. मिरजकर कम्युनिस्ट पक्षाचे असे तीन ‘डमी’ उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे प्रत्यक्षत: एकूण ११ उमेदवारांपैकी आठ जणांनीच निवडणूक लढवली.

त्यांपैकी वि. ना. गांधी एक लाख ४९ हजार १३८ आणि नारायणराव काजरोळकर एक लाख ३८ हजार १३७ मते मिळवून विजयी झाले. पराभूत उमेदवारांपैकी डॉ. आंबेडकरांना एक लाख २३ हजार ५७६ मते मिळाली, तर अशोक मेहतांना एक लाख ३९ हजार ७४१ मते मिळाली. डांगे यांना ९६ हजार ७५५, डॉ. गोपाळराव देशमुख यांना ४० हजार ७८६, के. बा. जोशी यांना १५ हजार१९५ आणि नीलकंठ परुळेकर यांना १२ हजार ५६० मते मिळाली होती. (डॉ. आंबेडकर आणि अशोक मेहता यांनी निवडणूक आयोगाला केलेला निवडणुकीसंबंधीचा अर्ज, परिच्छेद ७ व ८).

हेही वाचा >>> हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?

या मतदारसंघात सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतांची एकूण संख्या सात लाख १५ हजार ८८८ इतकी होती. परंतु बाद मतांची संख्याही मोठी होती. प्रत्येक उमेदवाराच्या (निरनिराळय़ा) मतपेटीतील मते मोजण्यात आली तेव्हा मतगणना अधिकाऱ्याने बाद ठरवलेल्या मतांचा उमेदवारनिहाय तपशील असा होता : डॉ. आंबेडकर दोन हजार ९२१, अशोक मेहता पाच हजार ५९७, डांगे ३९ हजार १६५, डॉ. देशमुख सहा हजार ६३४, वि. बा. गांधी १० हजार ८८१, के. बा. जोशी एक हजार १६८, ना. स. काजरोळकर सहा हजार ८९२  आणि नी. बा. परुळेकर एक हजार २५.

इंजिन हे डांगे यांचे निवडणूक चिन्ह होते. हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या मतपेटीत दोन्ही मतपत्रिका टाका, असे आवाहन डांगे यांनी तसेच त्यांच्या पाठीराख्यांनी निवडणूक मोहिमेतील प्रचारसभांमध्ये तसेच तेव्हा वितरित केलेल्या पत्रकांमध्ये केले होते. कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘युगांतर’ने तसेच आवाहन केले होते. तसे करणाऱ्या मतदारांची मते बाद होतात याची कल्पनाही मतदारांना देण्यात आली नव्हती. डॉ. गोपाळराव देशमुख यांनी, सवर्ण हिंदू मतदारांनी राखीव जागा लढवणाऱ्या डॉ. आंबेडकरांना दोहोंपैकी एकही मत न देता दोन्ही मतपत्रिका अन्य उमेदवाराच्या मतपेटीत टाकून आपले एक मत कुजवावे म्हणजे मत बाद होईल, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली. ‘नाही तर दोन्ही अस्पृश्य उमेदवार निवडून येतील,’ असा डॉ. देशमुखांनी मतदारांना बागुलबोवा दाखवला.

डॉ. आंबेडकरांना नारायणराव काजरोळकरांपेक्षा १४ हजार ५६१ मते कमी पडल्यामुळे ते पराभूत झाले. डांगे यांच्या बाद मतांची संख्या ३९ हजार १६५ इतकी होती. एक मत कुजवा असे त्यांनी मतदारांना आवाहन केले नसते तर डॉ. आंबेडकर निश्चितच निवडून आले असते हे उघड दिसते. म्हणजे डॉ. आंबेडकरांचा पराभव झाला तो केवळ काँग्रेसमुळे नाही. हा सर्व तपशील संदर्भासहित उपलब्ध आहे. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनाही डॉ. आंबेडकरांच्या पराभवाचे आश्चर्य वाटले.

याउलट, विरोधी पक्षातील चांगले आणि अभ्यासू राजकारणी संसदेत दिसले पाहिजेत, म्हणून जाणीवपूर्वक पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अभ्यासू, विचारी, विद्वान विरोधी पक्षातील उमेदवारा समोर कमकुवत प्रतिस्पर्धी उमेदवार उभा करत असत. जेणेकरून विरोधी पक्षातील अभ्यासू राजकारणी संसदीय लोकशाहीत निवडून यावा, असे दाखले इतिहासकार देतात. नारायण काजरोळकर हे असेच कमकुवत उमेदवार होते.

हेही वाचा >>> निवडणुकांतील डिजिटल प्रचारतंत्रामागे मानसशास्त्राचा अभ्यास

डॉ. आंबेडकरांच्या विरुद्ध नारायण काजरोळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यावर एका इंग्रजी दैनिकात एक बोलके व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. ते असे की, डॉ. आंबेडकर उभे असून त्यांच्या भव्य पायापाशी बुटाच्या टाचेच्या उंचीइतकी उंची असलेले काजरोळकर दाखविले होते. पहिल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. आंबेडकर व अशोक मेहता यांनी मुंबईतील लोकसभेची निवडणूक रद्द करावी, असा अर्ज निवडणूक आयोगापुढे केला. त्यात त्यांनी म्हटले होते की, दुहेरी मतदारसंघातील एकाच उमेदवाराला दोन मते देण्याविषयी प्रचार झाल्यामुळे त्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून त्या निवडणुका रद्द ठरवाव्यात. त्या अर्जाविरुद्ध डांगे, देशमुख, डॉ. गांधी, नारायणराव काजरोळकर इत्यादी प्रतिपक्षी होते. १९५२ सालच्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगापुढे अर्जाची सुनावणी झाली. डॉ. आंबेडकर स्वत: आपली बाजू मांडताना म्हणाले, ‘मते कुजविण्यासाठी केलेला प्रचार अवैध होता. अशा तऱ्हेने मतदारांच्या मनामध्ये जातीय भावना चेतविणे हे कायद्याला विकृत स्वरूप दिल्यासारखे आहे.’ तथापि डॉ. आंबेडकर व अशोक मेहता यांचा अर्ज आयोगाने फेटाळला.

पुढे विदर्भातील भंडारा लोकसभा पोटनिवडणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढवली. त्या पोटनिवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आठ हजार ३८१ मतांनी पराभव झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी, डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकर यांनी भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचे विश्लेषण आपल्या आत्मकथनात केले आहे. त्या म्हणतात : ‘‘तत्कालीन दलित समाजातील, विशेषतः विदर्भातील तत्कालीन महार जातीत असलेल्या ‘महानुभाव’ या पोटजातीने कृतघ्नपणे प्रत्यक्ष आपल्या मुक्तीदत्यालाही पराभूत करण्यास कमी केले नाही, ही फार मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे.” (आंबेडकर सविता, १९९०, डॉ. आंबेडकरांच्या सहवासात, तथागत प्रकाशन, पृष्ठ २१५) वंचित बहुजन आघाडीची, महाविकास आघाडी बरोबर निवडणूकपूर्व आघाडी झाली नाही, याचा भलताच आनंद केशव उपाध्ये यांना झालेला दिसतो. त्यामुळे सदर लेखात जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केशव उपाध्ये यांनी संदर्भहीन उल्लेख केला आहे.

Story img Loader