जसप्रीत बिंद्रा

समाज माध्यमांच्या बाबतीत गेला काही काळ सातत्याने धोक्याची घंटा वाजवली जात आहे. सगळ्यात आधी ती वाजवली केंब्रिज ॲनॅलिटिकाने. मग ती वाजली २०२० मध्ये आलेल्या ‘सोशल डायलेमा’ या माहितीपटातून. मानवी वर्तनावर प्रभाव टाकण्यासाठी ‘मेटा’सह (तेव्हाचे फेसबुक) इतर बड्या समाज माध्यम कंपन्यांनी मानवी वर्तनशास्त्र तसेच जीवशास्त्रात कशी विदारक चलाखी केली हे नेटफ्लिक्सवरच्या या माहितीपटाने दाखवून दिले. इन्स्टाग्रामवर आत्महत्या तसेच आत्मपीडा यांबद्दलची छायाचित्रे, व्हिडिओ सतत पहाणाऱ्या इंग्लंडमधल्या एका १४ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली. या उदाहरणातून समाज माध्यमांचा मुलांवर होणारा परिणाम आणखी भयंकर पद्धतीने पुढे आला. ‘मेटा’च्या बेकायदा कृत्यांची जाहीर वाच्यता कागदपत्रांसह केली, ती २०२१ मध्ये फ्रान्सिस हौजेन या ‘मेटा’मध्येच काम करणाऱ्या जागल्याने (व्हिसलब्लोअरने)! इन्स्टाग्राममुळे किशोरवयीन मुलींची स्वशरीराच्या बाबतची प्रतिमा कशी गुंतागुंतीची झाली आहे आणि इन्स्टाग्रामला कसे हे माहीत आहे, हे काही गोपनीयत दस्तावेजांच्या सहाय्याने प्रसिद्ध करून त्याने या आरोपांच्या गदारोळात आणखी भर घातली. अगदी अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्था- प्रमुखांनीदेखील या मुद्द्याची दखल घेऊन त्यावर आपली भूमिका मांडली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही समाज माध्यमांचा मानसिक-आरोग्यावरचा परिणाम दखलपात्र वाटला आणि त्यांनी त्यांच्या वार्षिक भाषणात (स्टेट ऑफ द युनियन ॲड्रेस) त्यांचा समावेश करून काँग्रेसला याला सामोरे जाण्यासाठी द्विपक्षीय कायदा करण्यास सांगितले.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
Digital Arrest is biggest crisis of future and police department and banks should show seriousness now
‘डिजीटल अरेस्ट’ हे भविष्यातील सर्वात मोठे संकट
A school van driver molested a minor student for six months
नागपूर : संतापजनक! ‌अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूलव्हॅन चालकाचा तब्बल सहा महिने अत्याचार

तथापि, विशेषत: मेटा आणि इतर बलाढ्य समाज माध्यम कंपन्यांसाठी अखेरची असू शकते अशी चेतावणी दिली आहे अमेरिकेतील ४२ महान्यायवादींनी (ॲटर्नी जनरल). त्यांनी इन्स्टाग्राम आणि त्याची पालक कंपनी असलेल्या मेटावर तेथील न्यायालयांमध्ये खटला दाखल केला आहे. समाजमाध्यमांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांचे मानसिक आरोग्य बिघडले असून त्याला या कंपन्याच कारणीभूत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. बायडेन यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना हा एकप्रकारे दुजोराच आहे. या खटल्याच्या माध्यमातून करण्यात आलेले आरोप खूपच गंभीर आहेत. यात एक आरोप असा आहे की तरुण आणि किशोरवयीन मुलांना इतरांकडून कौतुक होणं, इतरांची झटपट मान्यता मिळणं याचं अप्रूप असतं हे माहीत असूनही मेटा ही कंपनी तरुण मुलं समाजमाध्यमांवर जास्तीतजास्त वेळ कसा घालवतील यावर भर देते. तरुणांना या माध्यमाची चटक किंवा एकप्रकारे व्यसन लावण्याच्या हेतूनेच आपल्या अल्गोरिदमची निर्मिती करण्यात आली आहे हे मेटाने कधीच उघड केले नाही,’ असेही या तक्रारीत म्हटले आहे. डोपामाइनला आनंदी संप्रेरक असेही म्हटले जाते. ते एक न्यूरोट्रान्समीटर आहे. ते आनंदी भावनांशी संबंधित आहे. अभ्यासातून असे आढळून आले आहे की, फेसबुकवर लाइक केल्याने मुलांमध्ये डोपामाइन वाढते. कॅलिफोर्नियासह ३३ राज्यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत म्हटले आहे की, “मेटाने तरुण आणि किशोरवयीन मुलांना भुरळ घालण्यासाठी, गुंतवून ठेवण्यासाठी आणि शेवटी अडकवण्यासाठी शक्तिशाली आणि अभूतपूर्व तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यांचा हेतू नफा मिळवणे हाच आहे.’’

आणखी वाचा-प्रदूषण नियंत्रणात ठेवून बांधकाम सुरू ठेवायचे असेल, तर एवढे कराच!

यातल्या नफेखोरीच्या मुद्द्यावर मी याआधी अनेक वेळा लिहिले आहे. तंत्रज्ञान, उत्पादन किंवा संस्थापकांचा प्रारंभिक हेतू ही समाज माध्यमांची समस्या नाही. समाजमाध्यमांचे बिझनेस मॉडेल- त्यांच्या व्यवसायाचे प्रारुप- हीच त्यांची खरी समस्या आहे. समाज माध्यमांचे जाळे त्याच्या नावाप्रमाणेच, मानवी संबंध वाढवण्यासाठी, लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी तयार केले गेले होते. ते त्यांच्या कार्यात वाखाणण्याजोगे यशस्वी झाले, यात शंकाच नाही. कारण त्यांच्यामुळेच अंतर या कारणामुळे दूर गेलेले जुने मित्र एकमेकांशी जोडले गेले. शाळासोबती पुन्हा एकमेकांशी जोडले गेले. दूरचे नातेवाईक पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. आपल्याकडे आता परिचित लोकांचे सामाजिक जाळे नाही, तर त्यांचे रुपांतर सामाजिक माध्यमांमध्ये झाले आहे. त्याचा जाहिरातदारांना वापर करायचा असतो. आता आपण माणसे नाही, तर निव्वळ डेटा किंवा विदा झालो आहोत. आपल्याला नाव नाही, पण आपली नावांच्या माध्यमातून असलेली ओळख विरून आपण आकड्यांच्या रुपात दृश्यमान आहोत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे नवे नायक ठरले आहेत. किशोरवयीन मुलांनाही त्यांच्यासारखेच व्हायचे आहे. या समाज माध्यमांना चालविणारा अल्गोरिदम हा एक प्रचंड भुकेलेला राक्षस आहे. त्याला आपला अधिकाधिक डेटा आणखी मोठा व्हायला हवा आहे. या संघर्षात राज्ये जिंकली तर, मेटाला प्रत्येक उल्लंघनासाठी पाच हजार डॉलर्सचा दंड होऊ शकतो. वरवर ही रक्कम लहान वाटत असली तरी, ती अब्जावधी डॉलर्सची होऊ शकते. अमेरिकेत १६ कोटी लोक इन्स्टाग्राम वापरतात. ते कंपनीच्या मृत्युघंटा वाजवत आहे, असे असू शकते.

मेटासाठी हा धोक्याचा इशारा आहे कारण हे सगळे अमेरिकेपुरते मर्यादित नाही. इंग्लंड आणि युरोपातील नियामकांना यामुळे त्यांच्या देशात तसे कायदे करण्यासाठी नीट आधार मिळेल. भारतात तर जगातील सर्वाधिक म्हणजे जवळजवळ २३ कोटी लोक इन्स्टाग्राम वापरतात. त्यामुळे भारतदेखील अमेरिकेतील या मुद्द्यासाठी उभा राहू शकतो. अमेरिकेतील या खटल्यानंतर भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी लगेचच म्हटले की: “समाजमाध्यमे काय करतात, त्यांच्या व्यासपीठावर कोणता आशय असतो, आपल्या व्यासपीठावर कॉण्टेंट टाकण्यासाठी ते कोणाला परवानगी देतात याबाबत त्यांनी अधिक उत्तरदायी असणे गरजेचे आहे. मला वाटते की समाज माध्यमांच्या व्यासपीठांनी त्यांना हवे ते करण्याचे दिवस संपले आहेत.”

आणखी वाचा-इस्रायलचा, युक्रेनचाही संघर्ष संपेल कसा आणि त्यानंतर काय?

बदल कराल, पण किती?

मेटाने मात्र या सगळ्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की किशोरवयीन मुले आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी मेटाने आधीच ३० हून अधिक वेगवेगळी टूल्स सुरू केली आहेत. या राज्यांनी न्यायालयात जाण्याचे पाऊल उचलले याबाबतही कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीच्या मते हे पाऊल उचलून संघर्षाची भूमिका घेण्यापेक्षा एकत्र येऊन या मुद्द्यावर काहीतरी नीट करता आले असते. त्यांचे असे म्हणणे असले आणि त्यांनी त्या दिशेने प्रयत्न करण्याचा कितीही दावा केला तरी इन्स्टाग्रामचा जास्तीतजास्त वापर केल्यामुळे पैसे मिळणार असेच या व्यवसायाचे प्रारूप असेल तर बदल होणे अवघड आहे. कदाचित, असे होऊ शकते की समाज माध्यमांचे हे जाळे काही वेगळ्या पद्धतीने चालवले जाऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्याला चॅटजीपीटी वापरायचं असेल तर तिथे जाहिराती करण्यापेक्षा चॅटजीपीटीसाठी ओपनएआयच्या प्लेबुकमधून सदस्यत्व देणे असे प्रारूप असू शकते. याचा परिणाम असा होऊ शकतो की त्याचे वापरकर्ते आणि कमाईमध्ये प्रचंड घट होईल परंतु, दीर्घकाळ टिकून रहायचे असेल तर असे काही मार्ग शोधावेच लागतील. जॉन डोनचे एक वाक्य आहे, “धोक्याची घंटा वाजत असेल तर ती इतरांसाठी वाजते आहे, असे मानू नका. ती तुमच्यासाठीच वाजत असू शकते.’

(लेखक इंग्लंडमधील ‘टेक व्हिस्पर लिमिटेड’या कंपनीचे संस्थापक आहेत आणि अशोका विद्यापीठात शिकवतात)

Story img Loader