विजय देवधर

राज्यातील १४२ नद्यांतील गाळ काढण्याचे धोरण निश्चित करण्यासाठी दीर्घकालीन योजना आखल्याचे वृत्त वाचले. यापूर्वीही अशी घोषणा करण्यात आली होती. शासनाने राज्यातील सर्व जलाशय ज्यात धरण, पाझर तलाव, तलाव, वाहते पाणी प्रवाह, नद्या, नाले ओढे यातील गाळ दरवर्षी काढण्याबाबत एकच धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची सर्व स्तरांवर अमलबजावणी करावी. त्याचबरोबर सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतींतील सांडपणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जाते त्यास कायद्याने पूर्ण आळा घालणे आवश्यक आहे. पाण्याच्या वाढत्या मागणीस हे गाळाने भरलेले जलाशय पुरेसे पडणार नाहीत हे वास्तव आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पाणी पुरवठ्यासाठी टँकरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यातून आर्थिक गैरव्यवहार होणे हे तर नेहमीचेच आहे. धरणातील/ जलाशयातील पाणीसाठा कमी होण्याचे प्रमुख कारण आहे- दरवर्षी पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाहून येणारा गाळ. नद्यांतून वाहून येणारा हा गाळ धरणांच्या भिंतींजवळ साठतो. परिणामी धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होते. ही प्रक्रिया कित्येक वर्षे सातत्याने घडत आहे आणि वर्षानुवर्षांचा गाळ धरणांत साठत आहे. यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे धरणातील/ जलाशयातील गाळ दरवर्षी काढणे. त्यासाठी आता आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. काढलेला गाळ शेतकरी, कुंभार यांन देऊन त्यातून अर्थिक लाभही मिळवता येईल. पावसाळा संपल्यावर साठवण क्षेत्रातील गाळ काढण्यास सुरुवात करणे ऑक्टोबर/ नोव्हेंबरमध्ये आरंभ करून मे महिन्याच्या मध्यापर्यंत हे काम पूर्ण करणे उपयुक्त ठरू शकते. सातत्याने आणि दरवर्षी हा उपक्रम राबविल्यास खोली वाढवल्याने पाण्याची साठवण क्षमताही वाढेल आणि तरीही धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ न होता, ती दरवर्षीप्रमाणचे राहील.

आणखी वाचा-आरक्षण संपविणारे कंत्राटीकरणाचे षड्यंत्र वेळीच ओळखा…

सटाळेतील उपक्रम अनुकरणीय

सटाळे ग्रामस्थांनी राबवलेल्या उपक्रमाचे गावोगावी अनुकरण झाल्यास पाणी टंचाईवर कायमची मात करता येईल. नांदगाव तालुक्यातील सटाळे येथील १९७२ च्या भीषण दुष्काळात काळात बांधलेला पाझर तलाव गेली ४२ वर्षे दुर्लक्षित होता. गाळाने पूर्णपणे भरला होता. अंकाई डोंगराच्या उतारावरून येणारे पाणी आडकाठी नसल्याने वाहून जाणारे पाणी अडवून वाड्या वस्त्यांना दुष्काळाच्या तावडीतून मुक्त करण्याचा गावाने एकमुखी निर्णय घेतला. त्याची महसूल खात्याला कल्पना दिली. सरपंच अरुणाबाई गंगाधर माळुंगे यांच्या पुढाकारातून गावातील एक हजार हातांनी टप्प्याटप्प्याने पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली. काम मोठे असल्याने महसूल खात्याने यंत्रसामुग्रीची जोड मिळवून दिली. पाझर तलावातील एक लाख ३५ हजार ब्रास म्हणजेच तीन लाख २६ हजार ७०० घनमीटर क्षेत्रावरील गाळ उपसण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतल्याने जवळपास ४६५ एकर जमीन सुपीक झाली. येत्या पावसाळ्यात पाण्याचा थेंब अन् थेंब अडविला जात आहे. गाळ काढल्याने तलावाच्या पाणी साठवणक्षमतेत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तीही पाण्याची पातळी न वाढता.

खडकवासला धरणातील गाळ काढण्यात गणेश मंडळे आणि ‘ग्रीन थंब’ यांनी पुढाकार घेतला असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. पुण्यातही कात्रज, पाषाण येथील तलावातील गाळ वीट भट्टी चालवणारे काढून नेत असत, परंतु आता गाळास महत्व आले आहे, कारण त्यात ‘अर्थ’ आहे.

आणखी वाचा-अनंतनागच्या चकमकीनंतरही सैनिकांची व्यथा कायमच राहणार?

जलपर्णीचा प्रश्नही सुटेल

नद्या तलावांत वाढलेली जलपर्णी ही वरवरच काढली जाते. मुळासकट काढली जात नाही त्यामुळे ती परत वाढते. जर प्रवाहातील वा जलाशयातील गाळ काढला तर जलपर्णी मूळासकट निघेल. त्यासाठी गाळ काढणे हा एकच खात्रीशीर उपाय आहे.

जानेवारीपासून धरण, जलाशय, पाझर तलाव, बंधारे, नद्या, नाले, ओढे पाण्याचे वाहते प्रवाह यांतील गाळ काढण्यास सुरवात करावी. पाण्याचे वाहते प्रवाह नांगरल्याने जमिनीत पाणी मुरण्यास गती येइल आणि त्यमुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात खूप मोठ्या प्रमाणात वृद्धी होईल. यासाठी स्थानिक जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे.

अर्थात हा हंगाम गेलाच, पण किमान पुढल्या वर्षी तरी, मे अखेरीस हे काम पूर्ण करावे लागेल आणि त्यासाठी स्थानिकांनीच पुढाकारही घ्यावा लागेल. अशा पुढाकाराची परंपरा महाराष्ट्रात नव्हतीच, असे नाही. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात गाजर गवताने हाहा:कार माजविला होता. पण त्यावर सातत्याने उपाय केल्याने आता गाजर गवत क्वचित आढळते. गावोगावच्या गावकऱ्यांनी आता एकत्र येऊन श्रमदानाने विहिरी, तलाव, नाले, ओढे यातील गाळ काढण्याचे काम हाती घेणे गरजेचे आहे.

deodharvg43@gmail.com

Story img Loader