डॉ. शशांक जोशी
‘आंतरराष्ट्रीय मधुमेह दिन’(१४ नोव्हेंबर) साजरा करताना काही साध्या उपायांकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे- गरजेपुरते पौष्टिक आणि देशी पदार्थ खा, ते सावकाश खा, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी दरमहा अर्धा किलोपेक्षा कमीच तेल वापरा- म्हणजे फ्रीझमधले ‘तळण्यास तयार’ खाद्यपदार्थ टाळा.. असे अगदी साधे सल्ले, वैद्यकीय कसोटीवरही खरे ठरतात. व्यायाम ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. एकाच जागी तासच्या तास बसणे हे घातक ठरू शकते (म्हणून हल्ली विनोदाने ‘बसणे हे नवीन धूम्रपान’ असा वाक्प्रचारही रूढ होतो आहे). बैठेपणा कुणाला टाळता येणारा नाही कबूल, पण यावर साधा उपाय असा की, दर ३० मिनिटांनी तुमची बसण्याची पद्धत बदला आणि बैठक बदलण्यापूर्वी पाच मिनिटे वेगवान चालणे करा. पण म्हणून मधुमेह हटवता येईल? काही ठिकाणी असे प्रयोग सुरू झालेले आहेत, त्याहीबद्दल इथे लिहिणार आहे.
‘अमेरिकन डायबेटिक्स असोसिएशन’ (एडीए) आणि ‘युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबेटिस’ या संस्था मिळून काही व्यापक निष्कर्षांना मान्यता देतात, या सहमतीला ‘एडीए- ईएएसडी कन्सेसस’ असे म्हटले जाते. या सहमतीचा निष्कर्ष असा की दररोज कमी वेळ (पाच मिनिटे) पण वारंवार वेगवान चालणे हे तुम्हाला चार वर्षे अधिक जगण्यास मदत करते. दिवसातून १०,००० पावले अशी शिफारस केली जाते; परंतु सध्याची आकडेवारी सांगते की, किमान ६,००० ते ८,००० पावले तरी चालाच. भारतातील अनेक मधुमेहींमध्ये, व्याधी जडण्याच्या आधीपासूनच स्नायूंची शक्ती कमी असल्याचे दिसून येते, याला सारकोपेनिया म्हणतात. म्हणून स्नायू बळकट करणारा व्यायाम (शास्त्रीय सूर्यनमस्कार/ सिटअप) हवा. आपण आपल्या बैठय़ा सवयी मोडल्या पाहिजेत, दीर्घकाळ बसणे टाळले पाहिजे. जरी आपण स्थिर असलो तरीही आपण हालचाली केल्या पाहिजेत, यामुळे ‘नीट’ म्हणजेच ‘नॉन एग्झरसाइज अॅक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस’ला- अर्थात व्यायाम नसलेल्या क्रियाकलापातून ऊर्जाव्ययाला- प्रोत्साहन मिळते. तंदुरुस्त असणे आणि तग धरण्याची क्षमता असणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे हालचाल करणे, चालणे, धावणे किंवा वैद्यकीय डॉक्टरांनी मंजूर केलेल्या कोणत्याही खेळाची किंवा शारीरिक हालचालींची शिफारस मधुमेहात केली जाते. अनेकांकडे नियमित व्यायामशाळा सदस्यत्व असते आणि बऱ्याचदा आपण तंदुरुस्त सदस्याचा अचानक मृत्यू झाल्याचे ऐकतो. म्हणूनच, व्यायामशाळेत नावनोंदणी करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास पाहणे आणि वैद्यकीय तपासणी करणे (ईसीजी/ स्ट्रेस टेस्ट, इको किंवा कार्डिअॅक चेकअप) आवश्यक आहे. मधुमेहासह अनेक व्याधी आटोक्यात ठेवण्यासाठी योग आणि ध्यान हे उपकारक ठरू शकतात. योग म्हणजे फक्त योगासने नव्हेत तर नेती, धौती इत्यादीसारख्या शुद्धीकरण प्रक्रियेपासून सुरुवात करून आसनापर्यंत जाणे आणि शेवटी ‘प्राणायाम’- श्वासोच्छवासाचे व्यायाम. हे सर्व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केल्यास नेहमीच्या काळजीव्यतिरिक्त काही उत्कृष्ट फायदे मिळू शकतात. ध्यान, ‘माइंडफुलनेस’ आणि गायत्री मंत्रासारख्या मंत्रांचा जप हे सारे उपाय तणाव, चिंता कमी करण्यात आणि झोपेचा दर्जा वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
ताणतणावाचा विचार आधुनिक वैद्यक करीतच नव्हते, हे खरे.. परंतु त्याचा आरोग्यावर आणि रोगांवर मोठा प्रभाव पडतो. ताणतणावांशी किंवा तणावपूर्ण परिस्थितीशी जुळवून घेणे ही एक कला आहे आणि विशेषत: हसतमुखाने आणि सकारात्मक ऊर्जेने तणावमुक्त राहाणे ही तर मोठीच कला आहे. झोप ही आज जगामध्ये आरोग्याचा एक प्रमुख मापदंड आहे. आपल्या जैविक घडय़ाळासाठी वेळेवर झोपणे महत्त्वाचे आहे, विशेषत: रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत- किमान सात तास झोप आरोग्यदायी. पाच तासांपेक्षा कमी किंवा १० तासांपेक्षा जास्त झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. घोरण्याची समस्या कुणाला असल्यास कृपया योग्य झोपेचा अभ्यास करा आणि तज्ज्ञांना भेटा. झोपेचे आरोग्य महत्त्वाचे आहे. तंबाखू, मद्यपान, धूम्रपान यांसारख्या व्यसनांसाठी आपल्याकडे व्यसनमुक्तीच्या पद्धती आणि योजनांची अत्यंत आवश्यकता आहे. वर्तन-उपचार, समुपदेशन तसेच सामायिक निर्णय घेणे हेही मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या काळजीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, असे नवनव्या प्रयोगान्ती सिद्ध होते आहे.हे प्रयोग दोन्ही प्रकारच्या – म्हणजे ‘टाइप वन’ आणि ‘टाइप टू’ मधुमेह झालेल्यांवर करून पाहण्यात आले तेव्हा असे लक्षात आले की, ‘टाइप वन’ मधुमेह असलेल्या लोकांना, मधुमेहासह गर्भधारणा तसेच मधुमेह ही जोडव्याधी (सेकंडरी डायबेटिस) असलेल्यांना इन्सुलिनची आवश्यकता असतेच असते. त्याला पर्याय नाही. निव्वळ ‘आहार आणि व्यायामा’ने या प्रकारचा (टाइप वन) मधुमेह आटोक्यात ठेवता येऊ शकत नाही. अशा रुग्णांमध्ये इन्सुलिन घेण्याचे थांबवणे हे जीवघेणे देखील ठरू शकते. त्यामुळे, आज ज्याला ‘रेमिशन’ किंवा ‘रिव्हर्सल प्रोग्राम’ म्हटले जाते, त्यावर ‘टाइप वन’ मधुमेह असलेल्यांनी भरवसा ठेवू नये, हे बरे.
‘टाइप टू’ मधुमेहाच्या व्याधीत मात्र, विशेषत: निदान झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांच्या आत, औषधोपचारांशिवाय मधुमेह हटवता येणे (‘रेमिशन’ ही त्यासाठीची नुकतीच जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली नवीन संज्ञा- मराठीत ‘परावृत्ती’ म्हणू) शक्य आहे. काही वर्षांपूर्वी ब्रिटिश डायरेक्ट ट्रायल (डायबिटीज रिमिशन क्लिनिकल ट्रायल) या काही महिने चाललेल्या चाचण्यांचे निष्कर्ष सांगतात की, रुग्णांच्या शरीरातील दैनंदिन उष्मांक ८०० किलो कॅलरींपेक्षा (‘ ८०० केकॅल’ पेक्षा) कमी करून ही ‘परावृत्ती’ शक्य आहे (२०१७ ला पहिले निष्कर्ष आले होते) तसेच शस्त्रक्रियेसह इतर अनेक उपाय टाळणे शक्य आहे. पण यात धोका असा की, आहार-नियंत्रणाचे कठोर पालन करणे कठीण आहे. शरीरातील उष्मांकांचा निचरा होण्यासाठी ठरावीक क्रियाकलापांचे अनुसरण करत राहाणेही आणखी कठीण आहे. नेमके याचमुळे, अशा उपाययोजनांना कमी यश मिळते. सध्या (विशेषत: कोविड-१९ नंतरच्या काळात) तंत्रज्ञानाने डिजिटल डायबेटिस केअरमध्ये प्रवेश केला आहे आणि हे तंत्रज्ञान एव्हाना उपचार सुचवण्यासाठी सक्षम बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी प्लॅटफॉर्म) यांचा प्रभावीपणे वापर करून, एकेका रुग्णाच्या शरीरासारखेच संपूर्ण शरीर डिजिटलरूपात तयार करता येऊ शकते. व्यावसायिक प्रशिक्षक आणि डॉक्टर यांचा समावेश असलेल्या आरोग्य पथकांच्या मदतीने कोणीही ‘रेमिशन’चा – म्हणजे मधुमेह हटवण्याचा किंवा उलट फिरवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा रुग्णांचे ग्लूकोज, वजन, शरीराची रचना, अन्न / क्रियाकलाप / झोपेच्या सवयी साऱ्याबद्दल सेन्सर्सकडून तासातासाला माहितीसंदेश (इनपुट) मिळवून वैयक्तिक आरोग्य सेवा उपाय सुचवले जातात. तसेच हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब तर दूरस्थ ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तुमच्या मोबाइल अथवा हातातील घडय़ाळवजा उपकरणातून सतत मोजले जातच असते आणि त्या माहितीचे वेळोवेळी विश्लेषण करून तसतशा सूचना केल्या जातच असतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराला इथे वैयक्तिक प्रशिक्षक आणि वैद्यकीय डॉक्टरांची जोड दिली जाते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीला रोग चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी आणि बहुतेक प्रकरणांमध्ये औषधांविना सक्षम करण्यासाठी (परावृत्तीसाठी) अचूक सल्ला मिळत राहातो.
पण अखेर, मानवी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे प्रतिबंध आणि आनंद आहे. मधुमेहाचा प्रतिबंध करण्यासाठी माझा मंत्र अगदी सोपा आहे : सावकाश खा, वेळेवर खा, कमी खा, नीट खा, हालचाल करा आणि जास्त चाला, योग आणि ध्यान करा, वेळेवर झोपा आणि चांगली झोप आणि हसत राहा!
आपण सर्वजण डिजिटल ओव्हरलोड जगात राहतो आणि हे करणे अनिवार्य आहे. तरीही आपण मोबाइल फोन, संगणक आणि टीव्ही यांच्यापासून दररोज एक तास तरी दूर राहावे (याला ‘डिजिटल डिटॉक्सिफिकेशन’ म्हणतात) आणि गाण्या-वाजवण्यासाठी किंवा इतर प्रकारच्या छंदांसाठी वेळ द्यावा. या वर्षीच्या मधुमेह दिनासाठी ‘आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघा’ची (आयडीएफ- इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन) मध्यवर्ती कल्पना ‘‘शिक्षित, सक्षम आणि जागरूकता निर्माण करणे’’ ही आहे. आज आपल्यासमोर असलेले सर्वात मोठे आव्हान हे आहे की पृथ्वीवरील प्रत्येक दुसऱ्या माणसाला हे माहीत नसते की त्याला ‘टाइप टू’ प्रकारचा मधुमेह आहे आणि या व्याधीचे छुपे ओझे त्वरेने शोधणे किंवा उघड करणे महत्त्वाचे आहे. तसेच तरुणवर्ग आता वेगवान जीवनशैलीची धकाधकी आणि तणाव यांमुळे ‘टाइप टू’ मधुमेहाकडे ढकलले जात आहेत, पण त्यांच्या व्याधीला साध्या सुधारात्मक कृतींद्वारे सहजपणे परावृत्त केले जाऊ शकते. ‘टाइप टू’ मधुमेह टाळता येण्याजोगा आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला संवेदनशील करणे ही मुख्य गोष्ट आहे, लवकर निदान झाल्यास रुग्णाची आरोग्यस्थिती पूर्ववत केली जाऊ शकते किंवा व्याधीला परावृत्त केले जाऊ शकते आणि पुढली गुंतागुंत टाळता येते.
भारतीय स्वातंत्र्याच्या या ७५ व्या वर्षांत आपण सारे मिळून, मधुमेह असलेल्या लोकांचे जीवन आनंदी आणि निरोगी बनविण्यासाठी काम करूया. त्यांचे जीवन चांगले बनवण्यासाठी, त्यांच्या अंतर्गत आणि बाह्य अडथळय़ांना तोंड देऊन त्यांना सक्षम बनवूया!
लेखक ‘इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन’चे दक्षिणपूर्व आशिया प्रदेश अध्यक्ष आहेत.