तुषार अशोक रहाटगावकर
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आज साजरा होत आहे. सालाबाद प्रमाणे लाल किल्ल्यावरून आणखी एक भाषण, जागोजागी झेंडे आणि दिवसभर देशभक्तीपर गाणी, सरकारी कामे, कारखाने आणि शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, या सर्व सोपस्कारांत स्वातंत्र्याचा हा ७६ वा वर्धापनदिनसुद्धा साजरा होईल. या दिवशी देशभरात जे लोक खांबावर झेंडे फडकवताना आणि माईकवर देशभक्तीचे सल्ले देताना दिसतील, त्यातील बहुतेकांच्या देशभक्तीबद्दल लोकांच्या मनात दाट आणि ठाम शंका आहे. ज्यांनी आज या देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आणले आहे, तेच उद्या मोठमोठ्या गोष्टी बोलताना दिसतील आणि स्वातंत्र्याचा आणखी एक वर्धापन दिन साजरा होईल.
गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या सहित तमाम महापुरुषांना फक्त चबुतऱ्यांवर स्थान मिळाले आहे. अशा भारतात अनेक लोक आज स्वत:ला स्वतंत्र समजण्यात समाधानी आहेत. आत्मसंतुष्टतेची ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक आहे. भारतासारख्या निष्प्रभ लोकशाहीत एक प्रकारची बेचैनी, मतभिन्नता आवश्यक आहे. आज जेव्हा लोकसंख्येचा एक मोठा भाग स्वत:च्या जगण्यापलीकडे विचार करण्याच्या स्थितीत नाही, तेव्हा या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. इथे निवडणुकींचे सातत्य हे लोकशाहीचे सातत्य, स्वातंत्र्याचा पुरावा म्हणून स्वीकारले गेले आहे, ही भारताची शोकांतिका आहे, पण या देशातील बहुसंख्य जनतेला न्याय मिळण्याची ना संधी आहे ना अधिकार आहे. बहुतेकांच्या दृष्टीने कागदावर असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. अशा देशात स्वातंत्र्याची जयंती आनंदी होण्याच्या कारणांपेक्षा कितीतरी पटीने जास्त खंत घेऊन येते की, अशा स्वातंत्र्यासाठी या देशात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले?
स्वातंत्र्यदिनी स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्याच्या दुर्दशेवर शहर-शहर, खेडे-गाव येथे लोकांमध्ये र्चा व्हायला हवी. जेव्हा दांभिकपणा प्रतीकाच्या रूपात परंपरा बनतो तेव्हा तो अधिक नुकसान करतो. ज्याप्रमाणे धार्मिक कीर्तन हे लोकांची विचारशक्ती आणि समजूतदारपणा नष्ट करण्याचे षङ्यंत्र आहे, त्याप्रमाणे लोकशाही जलसे आणि त्यामध्ये मोठमोठाली भाषणे, मोकळेपणाचे ढोंग हे जनतेला फसवण्यांचे षङ्यंत्र आहे, बाकी काही नाही. स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक बडबड आहे ज्यात जनतेच्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार केवळ निवडणुकीच्या राजकारणात अडकला आहे आणि खऱ्या लढ्याचा वावच नष्ट झाला आहे. गुलामगिरीपेक्षा स्वातंत्र्याचा हा भ्रम अधिक धोकादायक आहे आणि आज भारताची अधिकांश जनता त्याचीच बळी आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने उत्सव, जलसे ठीक पण यानिमित्ताने आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षणही व्हायला हवे. स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त जेव्हा स्वातंत्र्य-स्वातंत्र्य हे शब्द चौफेर गुंजतात, तेव्हा त्यांचा पोकळपणा अधिकच स्पष्ट होतो.
आज या देशात अनेक धर्माच्या लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आक्रमण होत आहे, महिलांची सामूहिक धिंड काढली जात आहे. देश स्वतंत्र झाल्यामुळे जणू काही केवळ इंग्रजांनी हस्तगत केलेला भूभाग मुक्त झाला आहे पण त्यापलीकडे राज्यकर्ते, बलाढ्य व्यापारी, सावकार यांच्यापासून इथली जनता खरोखरच मुक्त होऊ शकली आहे का? स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवात सर्वसामान्यांचे स्वातंत्र्य, गरीब, दलित आणि अल्पसंख्यकांच्या जगण्याचा अधिकार वाढला आहे, तसाच राहिला आहे की कमी झाला आहे? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी शहरी, श्रीमंत, सुशिक्षित, उच्चवर्णीय आणि सत्ताधारी लोकांच्या पलीकडे दूरवरच्या वर्गात जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून, समजून घेतले तर ज्यांना स्वतंत्र म्हटले जाते त्यांचा प्रवास स्वातंत्र्याच्या दिशेने गेला आहे की स्वातंत्र्याच्या विरुद्ध दिशेने चालला आहे? एक अडचण अशी आहे की जेव्हा स्वातंत्र्याला अशा उन्मादी आणि आक्रमक राष्ट्रवादाची जोड दिली जाते जी कोणत्याही काल्पनिक शत्रूशिवाय विकसित होऊ शकली नसती, तेव्हा लोक त्या राष्ट्रवादी उन्मादाला, त्याच्या प्रतीकांनाच स्वातंत्र्य मानतात आणि त्या प्रतीकांच्या विरोधात असलेल्यांना शत्रू मानून त्यांचा खून करण्याला राष्ट्रवादाचं स्वतंत्र्य किंवा स्वातंत्र्याचा राष्ट्रवाद मानतात. वर्धापनदिनानिमित्त ही गोष्ट सांगितली जाते, की या देशात आता झुंडीला तुकडे करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण दुर्बलांना राहण्याचे स्वातंत्र्य नाही.
स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या वेषातील शत्रू ओळखता येत होता, पण आज या देशाचे शत्रू, येथील लोकांचे शत्रू, येथील स्वातंत्र्याचे शत्रू इथलेच नव्हे तर आतलेच आणि आपलेच असल्यामुळे त्यांना वेगळे ओळखणे सहज शक्य नाही. म्हणूनच हा धोका १९४७ पूर्वीच्या धोक्यापेक्षा मोठा आहे. इंग्रजानी जर या देशाला लुटले असेल, तर आजचे भारतीय राज्यकर्ते त्यांच्यापेक्षा जास्त लूट करत आहेत. अशा वातावरणात स्वातंत्र्याचा जल्लोष करण्याला कितपत अर्थ आहे, असा प्रश्न रास्त ठरतो. स्वातंत्र्याच्या निमित्ताने कवी-शायर अदम गोंडवी यांची आठवण बाकीच्या दिवसांपेक्षा जरा जास्तच येते. त्यांचे शब्द एक भयाण वास्तवाची जाणीव करून देतात-
सौ में सत्तर आदमी, फिलहाल जब नाशाद है।
दिल पे रखकर हाथ कहिये, देश क्या आजाद है।।
कोठियों से मुल्क के, मेयार को मत आंकिये
असली हिंदुस्तान तो, फुटपाथ पर आबाद है।
सत्ताधारी लड़ पड़े है, आज कुत्तों की तरह
सूखी रोटी देखकर, हम मुफ्लिसों के हाथ में!
जो उलझ कर रह गई है, फाइलों के जाल में
रोशनी वो गांव तक, पहुँचेगी कितने साल में।
(हे काव्य अदम गोंडवी यांचे आहे)
tushar.rahatgaonkar@gmail.com