राहुल धारणकर
शाश्वतता! गेल्या काही वर्षांत, हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत झाला आहे. प्रत्येकजण या विषयी विचार करत, बोलत आहे, चर्चा करत आहे, संवाद साधत आहे, वादविवाद करत आहे आणि शाश्वततेसाठी आपापल्या पद्धतीने कार्य करत आहे. ही अल्पकालीन लाट आहे की पाषाणयुग, हिमयुग यांसारखे ‘शाश्वततायुग’ आले आहे?

विचार केला तर असे लक्षात येते की आपल्याच बऱ्याचशा कृतींमुळे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास झाला. वारंवार वाढणारी मागणी आणि वाढती लालसा, अत्याधिक शहरीकरण, जंगलतोड, वेगाने कमी होत चाललेल्या नैसर्गिक संसाधनांचे उत्खनन आणि वापर, प्रचंड लोकसंख्या वाढ, प्लॅस्टिकसारखे शोध आणि त्याचा अनिष्ट आणि अनावश्यक गोष्टींवर अतिवापर, अशा अनेक घटकांमुळे हवामानात तीव्र बदल होत आहेत. पर्यावरणावर सखोल परिणाम होत आहे. मानवी जीवन आणि नैसर्गिक घटकांवर अतिशय वाईट परिणाम होत आहेत.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात

हेही वाचा >>>धनगर आरक्षणाच्या पल्याड…

हे काही एक-दोन दशकांत घडलेले नाही. हे शतकानुशतके चाललेले आहे. परंतु या आणि मागील शतकात हे प्रमाण अतिप्रचंड वेगाने नकारात्मक परिणामांकडे चालले आहे. शाश्वततेला जे आव्हान निर्माण झाले आहे ते कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रत्येकजण जीवन आणि पर्यावरण निरंतर राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, बऱ्याचवेळा असे दिसते की, विविध संस्था आणि लोकांमध्ये घाई, त्वरा आणि नकळत स्पर्धा सुरू झाली आहे.

काहीतरी कमी करण्यासाठी, आपण काहीतरी नवीन तयार करत आहोत, जे शाश्वत असेल याची काही ग्वाही देता येईलच असे नाही. बहुदा शाश्वततेचे दुरून डोंगर साजरे म्हणतात, ते हेच असावे. याबाबत काही मुद्दे महत्त्वाचे- सर्वांत प्रथम इंधन, जे सर्वांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. शतकापूर्वी, इंधनाचा वापर नगण्य होता किंबहुना अस्तित्वातच नव्हता. वेळो वेळी येणारी नवीन औद्योगिक क्रांती, ऑटोमोबाईल क्रांती, वाढीव वीजनिर्मिती इत्यादींमुळे तेल उत्खनन गगनाला भिडले. या नैसर्गिक संसाधनांच्या झपाट्याने होणाऱ्या ऱ्हासामुळे परिसंस्थेवर विलक्षण दुष्परिणाम होत आहेत. याचा नकारात्मक परिणाम लक्षात येऊ लागला तेव्हा शाश्वततेशी संबंधित कामाला वेग आला. सध्या आपण गरजा कमी करण्याऐवजी पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहोत.

ऑटोमोटिव्ह उद्योगात इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण आहे. हे निःसंशयपणे इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करेल, परंतु हे कोणत्या किंमतीवर होणार आहे हे ही लक्षात घावे लागेल? इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) बॅटरी बनवण्यासाठी आपण नैसर्गिक खनिजे वापरतो. ती हळूहळू नष्ट आणि दुर्मीळ होत आहेत. जमिनीमधून खनिजे काढण्यासाठी आपल्याला अधिक खोलवर जावे लागत आहेत. आपण निर्माण करत असलेल्या घनकचऱ्याचे काय होणार आहे? घनकचऱ्यामुळे पर्यावरणाला अधिक धोका निर्माण होतो आणि तो अधिकच प्रदूषणकारक आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे जास्त वेळखाऊ आणि कष्टदायक असते. इलेक्ट्रिक वाहनांचे वजन कमी करण्यासाठी, कार किंवा बाईकचे बॉडीवर्क करण्यासाठी फायबरचा वापर केला जातो; वजनदार बॅटरीमुळे टायर्स पूर्वीपेक्षा जास्त मजबूत लागतात म्हणजे ते बनविण्यासाठी अधिक प्रक्रिया केलेले अधिक मटेरियल लागते; बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणाऱ्या विजेसाठी अधिक वीज निर्मिती आवश्यक आहे. ही जंत्री एवढ्यावरच संपत नाही.

हेही वाचा >>>धनगर आरक्षणाच्या पल्याड…

दुसऱ्या स्थानी येते, वीजनिर्मिती. औष्णिक, जलविद्युत, अणुऊर्जा निर्मिती हे सामायिक वीज निर्मितीचे स्रोत आहेत. प्रत्येक स्त्रोताचा पर्यावरणावर होणारा परिणाम खूप मोठा असतो. जसे वायूप्रदूषण, जलप्रदूषण, मानवी आणि प्रजातींचे बिघडणारे आरोग्य, किनारपट्टी आणि धूप यांचे रक्षण करणारे प्रवाळ कमी होणे, अंटार्क्टिका खंड आणि हिमनद्यांचा ऱ्हास ही जंत्री सुद्धा न संपणारी आहे. पर्यायी ऊर्जा स्रोत ही एक निश्चितच भविष्याची एक सुस्पष्ट दिशा आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, समुद्राची भरती-ओहोटी आणि कचऱ्यापासून मिळणारी ऊर्जा, बायोमास यासारखे अक्षय ऊर्जा स्रोत अधिकाधिक प्रचलित होत आहेत. परंतु उदाहरणच द्यायचे झाले तर सौर उर्जे साठी भव्य, सौर ऊर्जा प्रकल्प उभारले गेले आहेत किंवा नियोजित आहेत. सौरउर्जेसाठी फोटोव्होल्टेइक सेल बनवण्यासाठी आपण पृथ्वीवरून अधिक नैसर्गिक संसाधने घेत आहोत का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. आपण व्यवस्थेत आणखी एक प्रकारचा घनकचरा तर तयार करत नाही ना?

मोठ्या ओसाड जमिनीवर किंवा नदीपात्रावर, बॅकवॉटरवर किंवा समुद्रातही सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. हे निसर्गचक्र, जलचक्र खंडित करणार नाहीत ना? नापीक जमिनी वाऱ्याला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मोठ्या आकाराच्या पवनचक्क्या तयार करण्यासाठी अधिक खनिजे जमिनीतून काढणे आवश्यक आहे. पवनचक्क्या उभारण्यासाठी अधिक घन सामग्रीची, मजबूत पायाभरणीची आवश्यकता असते. स्थलांतरित पक्षी स्थलांतराच्या प्रवासात आपला जीव गमावतात कारण त्यांच्या वर्षानुवर्षे असलेल्या प्रवासी मार्गावर अचानक पवनचक्क्या येतात. पाऊस आणि ऋतू यांनी त्यांचे वेळापत्रक बदलले आहे. ढगांचे गडगडणे, अतितीव्र वादळे, चक्रीवादळ या नित्याच्या घटना झाल्या आहेत. ढगफुटी आता वारंवार होऊ लागली आहे.

तिसऱ्या स्थानी येते पेपर ते डिजिटल परिवर्तन! आपण गेली दोन ते तीन दशके डिजिटल तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहोत. त्यामुळे कागदाच्या वापरात लक्षणीय घट झाली, असे वाटू शकेल. विचित्र वास्तव हे आहे की दरवर्षी मागील वर्षाच्या तुलनेत कागदाचा वापर वाढत आहे. कागदनिर्मितीसाठी वृक्षतोड, जंगलतोड सुरू आहे. १९९० पासून, जागतिक पातळीवर प्रत्येक वर्षी ६० लाख हेक्टर जंगले नष्ट होत आहेत.

हेही वाचा >>>घातक सुमारीकरणापासून समाजाला कसे वाचवायचे?

बहुसंख्य संपर्क (कम्युनिकेशन) समस्यांवर डिजिटलायझेशनने मात केली आहे. लोकांना अक्षरशः एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येण्याची आणि जगभरातील लोकांशी संवाद साधण्याची किमया साधता येत आहे. आजकाल, AI-ML चा उपयोग मानवी मेंदूवरील कामाचा भार कमी करण्यासाठी हाती घेतला जात आहे. परंतु ही अल्गोरिदमस प्रोसेस करण्यासाठी उच्च-शक्तीच्या कॉम्प्युटर्सची आवश्यकता आहे. याचाच अर्थ अधिक वीज वापर, अधिक डेटा निर्मिती आणि डेटा स्टोरेजची अधिक गरज, डेटा आणि माहिती संचयित करण्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या डेटा सेंटर्सची आवश्यकता. प्रचंड डेटा सेंटर्स जमिनीवर किंवा पाण्याखाली उभारण्यात येतात. डेटा सेंटर्स खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा / उष्णता उत्सर्जित करतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कूलिंग सिस्टम / एअर कंडिशनर्स लागतात. या सिस्टम्स खूप प्रमाणात उष्णता उत्सर्जित करतात आणि अधिक ऊर्जाही घेतात. डेटा सेंटर्स पाण्याखाली असतील तर खोलवरील पाण्याच्या उष्णतेची पातळी वाढते. म्हणजे पुन्हा जीवसृष्टीला बाधा.

वाढत्या डिजिटल गरजा म्हणजे अधिकाधिक जोडलेली उपकरणे. ह्या उपकरणांच्या निर्मितीसाठी मोठ्या फॅक्टरीजची आवश्यकता भासते. त्यामुळे लागते अधिक ऊर्जाशक्ती आणि अधिक संसाधने…. म्हणजे हे दुष्टचक्र सतत चालूच राहते…ही काही ठळक उदाहरणे आहेत जी माझ्या मते, आपल्याला शाश्वततेसाठी अधिक चांगला विचार आणि कार्य करण्यास प्रेरित करतात. प्रत्येकजण शाश्वत होण्याच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आणि योगदान देण्याची तयारी करत आहे, हे खरंच उत्साहवर्धक आहे.आपण शाश्वतते संबंधित कार्य करत असताना अधिक प्रमाणात उत्पादन करत आहोत जे जास्त नुकसानकारक आहे, असे तुम्हाला वाटते का?

स्वयंसेवी संस्था आणि जवळजवळ प्रत्येक उद्योग हे शाश्वततेसाठी योगदान देणाऱ्या अनेक स्रोतांपैकी काही स्रोत आहेत. परंतु शाश्वततेसाठी योग्य पावले उचलणे, जागरुकता वाढवणे गरजेचे आहे. शाश्वततेच्या क्रियाकलापांना चालना देण्यासाठी, हवामान बदलाशी निगडीत मोठमोठ्या परिषदा आणि परिसंवाद आयोजित केले जातात. ते आपल्यासाठी आवश्यकच आहे. तथापि, या कार्यक्रमांची ठिकाणे, सुविधा प्रमाण बाहेर मोठ्या, आधुनिक असतात ज्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची प्रकाश व्यवस्था असलेले विशाल, वातानुकूलित कॉन्फरन्स हॉल्स वापरले जातात. या परिषदा आणि प्रशिक्षणांमध्ये सहभागी होण्यासाठी लोक जगभर सर्वत्र प्रवास करतात, ज्यामुळे इंधन, वीज, अन्न, पाण्याचा आणि संसाधनांचा वापर वाढतो. कळत नकळत अधिक प्लास्टिक वापरले जाते. उच्च-गुणवत्तेचे व्हिडीओ आणि कॉन्फरन्स दरम्यान घेतलेले डिजिटल फोटो मोठ्या प्रमाणात डेटा निर्माण करतात आणि तो संग्रहित करण्यासाठी आणखी मोठ्या डेटा सेंटर्सची गरज भासते.

असा वापर नक्कीच हेतुपुरस्सर आणि मुद्दामही असू शकत नाही, कारण शाश्वतते बद्दलचा हेतू हा उदात्त आणि शुद्ध आहे; परंतु या वाढत्या उपभोगाची आपल्याला कदाचित जाणीव होत नसेल.अशाप्रकारे, खरोखर पुन्हा एकदा तोच प्रश्न पुन्हा उभा ठाकतो. शाश्वततेचे ‘दुरून डोंगर साजरे’ म्हणजे नक्की हेच का? कदाचित तसेच असावे.

rahuldharankar@orange.com

Story img Loader