राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. एका बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूला भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती अशा दोन भक्कम आघाड्या राज्याची सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळ्या आडाखे, रणनीती आखत आहेत. तर तिसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी व छत्रपती संभाजी राजे यांची परिवर्तन महाशक्ती आघाडी, मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील, आरपीआयचे नेते डॉ. राजरत्न आंबेडकर आणि इतर यांची आघाडी, ओबीसी पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे, रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांची आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची स्वतंत्र आघाडी तसेच बसप, बीआरएसपी, आरपीआय (आंबेडकर) व इतर छोटे पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. याखेरीज दोन्ही प्रस्थापित आघाड्या तसेच तिसरी, चौथी, पाचवी आघाडी यात स्थान न मिळालेले पक्ष स्वतंत्रपणे अपक्ष लढत आहेत. या सर्वांमध्ये आंबेडकरी चळवळीतील पक्षांना दोन्ही प्रस्थापित आघाडीत असो वा अन्य कोणत्याही आघाडीत योग्य ते स्थान न मिळाल्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यात प्रचंड अस्वस्थता आणि संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्यात स्वतंत्रपणे आंबेडकरवादी राजकारण उभे राहू नये, असाच सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांचा अजेंडा आहे की काय, असे म्हटले जात आहे. आंबेडकरवादी राजकारणाला प्रस्थापित राजकीय पक्षांकडून ‘खो’ घातला गेला आहे, असेच दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा