इरफान इंजिनियर
दरवर्षी जाणाऱ्या पंढरपूरच्या वारीमध्ये मी यावर्षी सामील झालो होतो. वारी ही गेले जवळपास हजारभर वर्षे सुरू असलेली एक मराठी परंपरा आहे. त्यात पुण्याजवळील आळंदी आणि देहू येथून ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या घेऊन निघालेले लाखो वारकरी २१ दिवस चालत चालत २५० किलोमीटरवर असलेल्या पंढरपूरला जातात. पंढरपूर हे श्रीविठ्ठलाचे चीर्थस्थान आहे आणि मराठी माणसांचे आद्यदैवत आहे. मी गेली अनेक वर्षे वारीबद्दल एकून होतो. कधीतरी वारीमध्ये चालण्याचा अनुभव घ्यायचा, असे मी ठरवले होते. आणि यावेळी ते जमून आले होते. त्यानुसार यावर्षी रविवार, ७ जुलै २०२४ रोजी मी एक दिवसासाठी या वारीत सहभागी झालो आणि ८ कि.मी. म्हणजे बारामती ते सणसरपर्यंतचे अंतर वारीबरोबर पायी चाललो. या वारीचे अनुभव आणि माझ्या मनात आलेले विचार मी मांडत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वारीत येणारे लाखो वारकरी वेगवेगळ्या दिंड्याचे सदस्य असतात. या दिंड्या नोंदणीकृत आणि सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध आहेत. या दिंड्या दररोज सकाळी सहा वाजता सुरू होतात आणि या काळात रोजचे जेवण तसेच विश्रांतीसाठी ठरलेल्या ठिकाणी थांबतात. इतर धार्मिक मिरवणुकांमध्ये लोक देव-दैवतांची प्रतिमा घेऊन जातात, पण वारकरी परंपरेमध्ये वारकरी/भक्त/ अनुयायी संत तुकारामांच्या आणि ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीतून मंदिरात घेऊन जातात. या प्रदीर्घ परंपरेत वारकऱ्यांकडून इतरांवर किंवा इतरांकडून वारकऱ्यांवर कधीही हिंसाचार झाल्याचे ऐकिवात नाही.
हेही वाचा : भाजपच्या अहंकाराला पायबंद घालण्याचे सरसंघचालकांचे काम खुद्द प्रभू रामचंद्रांनी केले…!
वारीमध्ये आजवर कधीही खंड पडलेला नाही. वारीच्या वाटेत विविध जाती समुदायाचे लोक, त्यांची धार्मिक स्थळे – मंदिरे, मशिदी इत्यादी असतात. इद किंवा इतर मुस्लीम सण असताना वारी मुस्लीम वस्तीतून जात असते, तेव्हा काही वेळा मुस्लीम समुदायातील लोकांनी त्यांचे उत्सव पुढे ढकलले आहेत किंवा वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नाही तर अनेक मुस्लिमही वारीचा भाग आहेत.
संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे वारकरी परंपरेतील संत आहेत. वारकरी चळवळीने धर्म, मंदिर, कर्मकांड आणि पांडित्य यांचे संरक्षक म्हणून ब्राह्मणांना असलेले अधिकार नाकारले, जातीव्यवस्था नाकारली. ब्राह्मणवादी व्यवस्थेने नाकारलेले, तळच्या श्रेणीतील, जाती जमातील लोक, समानतेच्या तत्त्वामुळेच वारकरी चळवळीकडे आकर्षित झाले.
“एक दिवस तरी वारी अनुभवावी” असे म्हणतात. त्यानुसार मी ती अनुभवायला निघालो होतो. मी, दिंडी क्रमांक २६१ चा भाग होतो. आमच्या या दिंडीत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, मराठीतील कवी अरुण म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह सुमारे ४०० लोक होते. गेल्या ११ वर्षांपासून राष्ट्र सेवा दल या पुरोगामी-समाजवादी संघटनेशी जोडल्या गेलेल्या शरद कदम आणि इतरांनी या दिंडीचे आयोजन केले होते. पुरोगामी लेखक, कलाकार, कार्यकर्ते आणि तरुणांना वारीमध्ये सहभागी करून घेणे हा त्यांचा उद्देश आहे. ते वारीकडे प्रगतीशील सांस्कृतिक उत्सव म्हणून पाहतात.
हेही वाचा : उद्दिष्टच विसरलेली अधिवेशने…
शरद कदम यांनी सांगितले की, वारकरी परंपरा ही जात, वर्ग, संस्कृतीचा विचार न करता समता, सर्व मानवांचा आदर आणि गरजूंची सेवा यांना महत्त्व देते. ही सगळी संविधानिक मुल्येदेखील आहेत. ते पुढे म्हणाले की, वारी पुण्यात पोहोचल्यानंतर, पहिल्या रविवारी ही दिंडी पालखीबरोबर वारीत सामील होते. ते शनिवारी पुण्यात रात्रभर मुक्काम करतात आणि रविवारी पहाटे ते वारीबरोबर चालतात. कारण काही लोक फक्त रविवारीच त्यांच्या दैनंदिन कामातून वेळ काढू शकतात. वारीमध्ये महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात असतो. आंघोळ, कपडे बदलणे, नैसर्गिक विधी या सगळ्यांसाठी स्त्रियांसाठी स्वतंत्र आणि खासगी व्यवस्था नसते. मात्र त्यांच्याकडे कुणीही वाईट नजरेने बघत नाही. त्यामुळे त्या नि:संकोचपणे मोठ्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतात.
वारीतील माझे अनुभव
या प्रचंड मोठ्या जनसमुदायात मी अगदी वाळूच्या कणाएवढा आहे, असे मला वाटत होते. जिकडे तिकडे माणसांचा – स्त्री पुरुषांचा जणू समुद्रच दिसत होता. सर्वजण संतांचे अभंग तल्लीन होऊन गाताना दिसत होते. मी या आनंदमय वातावरणाचा भाग होऊन गेलो होतो. स्वत:ची ओळख (जात, धर्म इत्यादी) गौण होऊन एका भक्तीमय वातावरणात आम्ही विलीन झालो होतो. आम्हाला आठ किलोमीटर चालायचे होते, कडाक्याचे उन होते. पण कुणाच्याच चेहऱ्यावर थकवा दिसत नव्हता. सर्वजण एकमेकांना प्रेमाने सहकार्य करत होते. एकमेकांना अनोळखी असलेले लोक इथे आपण सगळे एकच आहोत, एकाच विठ्ठलाची लेकरे आहोत याच भावनेने चालत होते, एकमेकांना उर्जा देत होते. टाळ-मृदुंगाच्या लय-तालावर “ज्ञानोबा- माऊली- तुकाराम!, माऊली ! माऊली! ग्यानबा तुकाराम” या गजराच्या ठेक्यावर नाचणारे पाय बघत, माझे पाय जणू आपसूकच चालत होते. वारीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांमध्ये भक्तीचा जणू सुगंध दरवळत होता. हे मंत्रमुग्ध वातावरण उन्हापासून लक्ष विचलित करत होते.
वारीतून बाहेर पडून सणसर येथे पोहोचल्यावर मात्र मला थकवा जाणवायला लागला. मात्र तो विशाल महाकाय मानवी समुद्र माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. वेगवेगळ्या जाती-धर्माचे, संकृतीचे, वेगळ्या प्रांताचे, स्त्री-पुरुष त्या वारीत आनंदाने, सारख्याच भक्तिभावाने चालताना अजूनही दिसत होते, आम्हा सगळ्यांना बांधून ठेवणारा तो अदृश्य प्रेमाचा धागा मला जाणवत होता.
हेही वाचा : शेतकऱ्यांना कुबड्या नको, स्वातंत्र्य द्या!
या दिंडीमध्ये माझी डॉ. पिल्लई यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी बोलताना समजले की त्यांची मातृभाषा मल्ल्याळम आहे. ते सध्या बारामतीमध्ये राहतात आणि ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी तुकारामांवर लिहिलेली कविता त्यांनी मला दाखवली. त्या कवितेचे सार असे होते की “तुकारामांनी अल्लाह आणि विठ्ठल यांमधला फरक मिटवला, तसेच जाती-जमातीतील भेदभाव नाहीसा केला.” त्यांची ही कविता मराठीमध्ये असल्याचे बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. समाजातील वाढत्या जातीय विद्वेषाला वैतागून डॉ. पिल्लई अनेक वर्षे हा प्रवास करत होते. वारी प्रेमाचा आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देते असे त्यांना वाटते.
वारीमध्ये कुणीच कुणाला तुम्ही कोणत्या जातीचे किंवा धर्माचे आहात असा प्रश्न केला नाही. कारण वैयक्तिक ओळखीच्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण माणसेच आहोत, सगळेजण सारखेच आहोत, हे आमच्या सर्वांच्याच मनाने स्वीकारले होते. आणि म्हणूनच धार्मिक, जातीय, प्रांतीय इत्यादी ओळखींच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाच्या, संतांच्या भक्तीत आम्ही सगळेजण भिजून गेलो होतो. सगळीकडेच आनंद दिसत होता. सगळीकडे प्रेममय भाव दिसत होता. त्यामुळेच गरज पडली तर न विचारता आपसूकच एकमेकांच्या मदतीसाठी एकमेकांचा हात पुढे येत होता.
या महाकाय मानवी समुद्रात प्रचंड उर्जा दिसत होती. तरीही सगळेजण शिस्तबद्धरीत्या आणि शांततेने चालले होते. भक्तीमध्ये लीन होऊन एकमेकांना पंढरपूरला पोहोचवण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट सगळ्यांमध्ये दिसत होते. काही वारकरी २५ वर्षे नित्यनेमाने वारीत सहभागी होत असल्याचे समजले. शरीर साथ देईल तोपर्यंत वारीत सहभागी होण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. या वारीत सहभागी होण्यामागे फक्त आणि फक्त विठ्ठलावरचे प्रेम, बांधिली हेच कारण असल्याचे अनेकांनी सांगितले.
वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली… तुकाराम…’ असा जयघोष करत होते. माऊली हा शब्द भगवान विठ्ठलाला अनुसरून वापरतात. माऊली म्हणजे “आई” (वडील नव्हे). आई ज्या प्रकारे आपल्या लेकरांची प्रेमाने, मायेने पण सक्षमतेने काळजी घेते, तिच्याकडे तिची लेकरे सहज तक्रार करू शकतात, आपली दु:ख, निराशा बद्दल बोलू शकतात, त्याच प्रकारे भगवान विठ्ठल ही प्रेमाची देवता आहे, काळजी घेणारी देवता आहे.
हेही वाचा : ‘आणीबाणी’बद्दल संघ- भाजप तुम्हाला हे सांगणार नाहीत…
एकीकडे प्रेम, आदर, शांतता आणि समावेशकतेच्या मुल्यांचा प्रसार करणारी वारी इतकी निर्मळ आणि शांत आहे, तर दुसरीकडे अलीकडच्या काळात रामनवमीच्या मिरवणुका, जल अभिषेक शोभा यात्रा (नूह, हरियाणामध्ये), हनुमान जयंती शोभा यात्रांमध्ये जातीय हिंसाचार दिसतात.
काही पारंपारिक रामनवमी आणि हनुमान जयंती शोभा यात्रा अनेक दशकांहून अधिक काळ काढल्या जात आहेत. त्या आजही शांततेत पार पडतात. मुस्लिम समुदायाने काही ठिकाणी नारळ, थंड पेय किंवा अल्पाहार देऊन त्यांचे स्वागत करण्याची प्रथा आहे. मुस्लिमांना शांततेने प्रार्थना करता यावी यासाठी काही पारंपारिक यात्रा मशिदीजवळून जाताना संगीत वाजवणे थांबवतात. तथापि, हिंदुत्ववादी राजकीय विचारसरणीच्या अनुयायांनी संघटित केलेले लोक अनेकदा पोलिसांनी दिलेल्या परवाना/परवानगीच्या अटींचे उल्लंघन करतात. ते यात्रेच्या पारंपारिक मार्गापासून वेगळा जाण्याचा आग्रह धरतात आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जातात, प्रार्थनेच्या वेळेसह मशिदींजवळ मोठ्या आवाजात संगीत वाजवतात आणि हिंदूंचे श्रेष्ठत्व सांगून राजकीय घोषणा देतात. या सगळ्याचे तथ्य-शोधन अहवालांचे दस्तऐवजीकरण ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम’ ही मुंबईस्थित संस्था करते.
हिंदू धार्मिकांनी आयोजित केलेल्या हनुमान जयंती, शोभा यात्रा इत्यादी अशा यात्रांमध्ये मुस्लीम समुदायातील लोक आनंदाने सहभागी व्हायचे किंबहुना आजही काही ठिकाणी होताना दिसतात. परंतु हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रा, हनुमान जयंतीमध्ये सहभागी होण्यास मुस्लीम समुदायातील लोक घाबरतात. हिंदुत्ववादी लोकांनी आयोजित केलेल्या मिरवणुका आणि धार्मिक भावनेतून लोकांनी आयोजित केलेल्या मिरवणुकांमध्ये हाच एक मोठा फरक दिसतो. धार्मिक मिरवणुका अध्यात्मिक आणि धार्मिक मूल्यांनी बांधलेल्या असतात तर हिंदुत्ववादी लोकांमध्ये राजकीय विचारसरणी आणि राजकीय उद्देश दिसतो.
हेही वाचा : शिक्षणाची नवी दिशा, नवी संकल्पना- कौशल्य विद्यापीठ!
या विठ्ठलाच्या वारीमध्ये मला एकच ट्रॅफिक पोलीस दिसला. तो एकटा इतक्या जनसमुदायासामध्ये वाहतुकीचे नियमन करत होता. गाड्या जवळ येत होत्या, तेव्हा आपोआप वारकरी थांबत होते आणि वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा करून देत होते. याउलट हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या मिरवणुकांमध्ये मोठा प्रमाणात पोलीस दल तैनात करून देखील, नियमांचे उल्लंघन होत असेल तर ते रोखू शकत नाहीत, ज्याचे रुपांतर हिंसाचारात होताना दिसते.
वारीमध्ये सहभागी झालेले लोक शांत होते. त्याउलट हिंदुत्ववादी शोभा यात्रेतील सहभागींमध्ये एकीकडे श्रेष्ठत्व आणि अभिमानाची भावना दिसते तर दुसरीकडे त्यांच्यामध्ये असलेले अल्पसंख्याकांबद्दलचे पूर्वग्रह, लहानसहान कारणासाठी त्यांना हिंसक बनवतात. एका वारकऱ्याने मला सांगितले की, एकदा वारीत सहभागी झाले की वर्षभर चांगले शिस्तबद्ध आणि धार्मिक जीवन जगण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते, म्हणून मी दरवर्षी वारीत जाताे.
या वारीमुळे मला व्यक्तिशः एक अविस्मरणीय अनुभव दिला आहे. माझं मन अगदी प्रेममय झालं आहे. मी कधी हज यात्रेला गेलो नाही. पण ज्या भक्तीपोटी लोक वारीला येतात, तसाच अनुभव मला तिथेही आला असता असे मला वाटते.
विठ्ठल! विठ्ठल! मी प्रार्थना केली की देवाने आपल्याला शांततापूर्ण सहजीवनाने जगण्यास शिकवावे.
लेखक सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी ॲण्ड सेक्युलॅरिझम या संस्थेचे संचालक आहेत.
irfanengi@gmail.com