कच्छ ही भूमीच अशी आहे की ती तुम्हाला प्रश्न विचारायला उद्युक्त करते. इथे क्षितिजांचं संमेलन झालेलं आहे. इथे निरभ्र आकाशाखाली समुद्र आणि वाळवंट एकमेकांना भेटतात. भूभागांचे वैविध्य, पुन्हापुन्हा होणारे भूकंप, गुजरात, सिंध आणि राजस्थानपासून ते अफगाणिस्तान, इराण आणि पूर्व आफ्रिकेपर्यंतच्या वेगवेगळ्या वंशांच्या आणि संस्कृतींच्या लोकांचे एकमेकांमध्ये मिसळून जाणे, याबरोबरच राष्ट्-राज्यवादाची वाळूने आखली गेेलेली सीमारेषा जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देते. कच्छा तुम्हाला आत्ताच्या आत्ता, ताबडतोब या पिंजऱ्यातून, ब्रेकिंग न्यूज, निवडणूक निकाल, युद्ध आणि घोटाळे या सगळ्या चक्रातून मुक्त करते आणि शांत बसून विचार करायचा अवसर देते.

त्यामुळे मग या सगळ्यापेक्षाही मोठे प्रश्न पुढे येतात. ते म्हणजे आपलं भविष्य नेमकं कसं असणार आहे? आपण त्याला आकार देणार असू तर ते कसं असायला हवं आहे? आपल्याला नेमका कशा प्रकारचा भारत अपेक्षित आहे? आपण पाठलाग करत आहोत, त्या आधुनिक, विकसित, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त तसेच १० ट्रिलियन एवढा आकार असलेल्या अर्थव्यवस्थेच्या मृगजळाच्या स्वप्नापलीकडे आपण काही कल्पना करू शकतो का? आत्ता जे आहे त्यापेक्षा वेगळं जग शक्य आहे का?

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
India 2025 astrology predictions in Marathi
India 2025 Astrology Predictions: सोन्या-चांदीचा वाढत राहणार भाव; भारतासाठी २०२५ हे वर्ष कसे असणार? वाचा ज्योतिषाचार्य उल्हास गुप्तेंचा अंदाज
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार

इथे “आम्ही” म्हणजे ‘विकास संगम’शी निगडित एक गट. ९० हून अधिक संस्था आणि चळवळी त्यात समाविष्ट आहेत. हे सगळे मिळून परिवर्तनवादी पर्यायांचा शोध घेतात. हे कार्यकर्ते, अभ्यासक आणि विकासाच्या प्रक्रियेमधले लोक आहेत. ते केवळ तक्रारी आणि निषेध करत बसत नाहीत; तर ते ‘पृथ्वीवरचा कचरा न वाढवता आणि निम्म्या लोकसंख्येला वगळून’ मानवी गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचे पर्यायी मार्ग तोही फक्त कागदावरच नाही तर वास्तवातही शोधतात. हा ‘विकास संगम’चा दहावा वर्धापन दिन होता. म्हणजे या वाटचालीचे सिंहावलोकन करण्याचा भविष्याचा विचार करण्याचा दिवस होता.

हेही वाचा…‘एक्स’चे युझर्स ‘ब्लूस्काय’, ‘थ्रेड्स’कडे का वळतायत? याचा अमेरिकी निवडणुकांशी काय संबंध?

कच्छ आपल्याला भविष्याचा विचार करण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून देते. कच्छबाहेरच्या लोकांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कच्छ, हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे एक पडीक जमीन आहे. ही सगळी जमीन रखरखीत असल्यामुळे ती शेतीसाठी उपयोगाची नाही. ती आपल्याला कुणीतरी येऊन विकसित करावं याची वाट पहात आहे. २००१ च्या भूकंपानंतर येथे सर्व प्रकारच्या आधुनिक, बहुमजली इमारती आल्या. उद्योग (अर्थातच अदानीशिवाय दुसऱ्या कुणाच्या नेतृत्वाखाली येणार!) आले. वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर कच्छ हे वैविध्यपूर्ण आहे. ते पर्यावरणीय वैविध्य, हस्तकला आणि कला यांचे माहेरघर आहे. भूज येथील विलक्षण एलएलडीसी संकुलातील भरतकामांचे संग्रहालय महानगरातील कोणत्याही संग्रहालयाला लाजवेल. एकुणातच कच्छ हे कठीण परिस्थितीत मानवी लवचिकता आणि सर्जनशीलतेचे संग्रहालय आहे.

पण येथील उंच इमारती आणि कारखान्यांपेक्षाही सर्वत्र दिसणारे एक काटेरी झाड हे माझ्यासाठी कच्छमधील आधुनिकतेचे प्रतीक आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ त्याला प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा म्हणतात. स्थानिक लोक याला गांडो बावल (किंवा खारो बाबुल), वेडे झाड म्हणतात. हे झाड मूळचे मेक्सिकोमधले, ते भारतात आणले गेले आणि कच्छवर टाकण्यात आले. होय, अक्षरशः सरकारी हेलिकॉप्टरमधून त्याच्या बिया टाकण्यात आल्या. कच्छचे वाळवंटीकरण रोखणे हा त्यामागचा हेतू होता. वेगाने वाढणारे आणि उपटून टाकणे अशक्य असलेले हे झाड येथील बन्नी या भारतातील सर्वात मोठ्या गवताळ प्रदेशात सर्वदूर पसरले आहे. त्याने इथली मूळ स्थानिक झाडे, गवत यांच्या जागेवर आक्रमण केले आहे. ते भूगर्भातील दुर्मिळ पाणी वापरत आहे, शिवाय त्याची पाने खाणाऱ्या प्राण्यांनाही हानी पोहोचवत आहे. आणि यालाच आपण विकास म्हणतो.

यावर काही मार्ग आहे का? काही उपाय आहेत का? स्थानिक शेती पद्धतीला प्रोत्साहन देण्याचे आणि ती कसणाऱ्या मालधारी सारख्या खेडूत जमातीला मदत करण्याचे मार्ग आहेत का? तर पर्याय शोधणाऱ्या अनेक प्रयोगांचे कच्छ हे माहेरघर आहे. इथे तब्बल १३ संस्थांनी या दशवार्षिक ‘विकास संगम’चे आयोजन केले होते. वनहक्क कायद्यांतर्गत मालधारी समाजाला मिळणाऱ्या सामुदायिक वन हक्कांच्या मागणीसाठी या समाजाचे संघटन करण्यात सहजीवन संघटना सहभागी आहे. आक्रमकपणे वाढणाऱ्या या झाडाच्या जागी स्थानिक (मीठा) बाबुलचे पुनर्रोपण करण्याचा प्रकल्पही त्यांनी सुरू केला आहे. खमीर या संस्थेच्या आवारात यावेळी हा संगम आयोजित केला होता. ही संस्था पारंपारिक हस्तकलेचा प्रचार करणे, स्थानिक संस्कृती, समुदाय आणि स्थानिक वातावरणाचे जतन करणे हे काम करते. त्यांनी औद्योगिकीकरणामुळे नष्ट झालेल्या काला या कापसाच्या स्थानिक जातीची लागवड आणि विणकाम सुरू केले आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणे आणि स्व-राज्य प्रत्यक्षात आणणे यासाठी इतर संस्था काम करत आहेत.

या दशवार्षिक सभेतील चर्चा साहजिकच कच्छपुरती मर्यादित नव्हती. महाराष्ट्रातील गडचिरोली आणि कर्नाटकातील दुसऱ्या एका चमूने आदिवासी समुदायांनी सामुदायिक वन हक्क कसे मिळवले आणि सामूहिक भल्यासाठी त्यांच्या समूहाच्या साधनसंपत्तीचे व्यवस्थापन कसे केले याची यशोगाथा मांडली. देशभरातील कार्यकर्त्यांनी पर्यायी प्रयोग, यशोगाथा आणि पर्यावरणीय शेती, पाणी, पर्यावरण, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि लोकशाहीतील आव्हाने यावर चर्चा केली.

हेही वाचा…चिनी असंतोषाच्या झळा जिनपिंगपर्यंत?

गेल्या दहा वर्षांत, ‘विकास संगम’ने त्यांच्या https://vikalpsangam.org या वेबसाइटवर देशभरातील अशा जवळपास दोन हजार यशोगाथांचे दस्तावेजीकरण केले आहे आणि त्यातील काही “पृथ्वी मंथन” या माहितीपटात दाखवल्या आहेत. या यशकथांमध्ये गोव्यातील एक जोडप्याचा समावेश आहे. हे जोडपे माती तसेच इतर कोणत्याही रसायनाचा वापर न करता भाज्या पिकवते आणि मासे वाढवते. कोलकात्याच्या आसपासचे यशस्वी झालेले ऑफ-ग्रीड, स्मॉल स्केल, छतावरचे सौर प्रयोग, स्पिती आणि लडाखमधले पारंपारिक वास्तुकलेचे पुनरुज्जीवन यात आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ‘मृत’ नद्यांचे पुनर्भरण, तामिळनाडूमधील आदिवासींसाठीचे आणि त्यांनीच चालवलेले पर्यायी रुग्णालय, शहरी नियोजनात फेरीवाले आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना एकत्र करण्यासाठीची प्रारुपं तसेच मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये हस्तकला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हुन्नरशाळा यांचा त्यात समावेश आहे. आशा (अलायन्स फॉर सस्टेनेबल अँड होलिस्टिक ॲग्रीकल्चर) या संस्थेने पर्यायी शेतीतील यशस्वी प्रारुपे एकत्र आणण्यासाठी पाच किसान स्वराज संमेलने आयोजित केली आहेत. आत्ताच गेल्या आठवड्यात, दिल्लीमध्ये एक पीपल्स फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये तळागाळातील, परवडणाऱ्या नवकल्पना मांडण्यात आल्या होत्या. थोडक्यात काय तर आपल्याकडे पर्यायांची कमतरता नाही.

तुम्ही विचाराल की हे सगळे आधुनिक विकासाचे खरे पर्याय आहेत का? जागतिकीकरण झालेल्या बाजारपेठांच्या अर्थव्यवस्थेत ते कॉर्पोरेट्च्या आव्हानांचा सामना करू शकतात का ? टिकून राहू शकतात का? बहुसंख्याकवादी लोकशाहीमध्ये भावी पिढ्यांची आणि निसर्गाची चिंता केली जाईल का? हे प्रश्न बरोबरच आहेत. पण मग आणखीही काही प्रश्न विचारले पाहिजेत. ग्लोबल नॉर्थमधील प्रत्येकासाठी उपलब्ध असलेली जीवनशैली प्रत्येक भारतीयाला देण्याचा कोणी गंभीरपणे विचार करू शकतो का? हे प्रारुप प्रतिकृती बनवण्यासारखे आहे का? ‘विकासा’ची अपरिहार्य किंमत म्हणून निसर्गाचा, जीवनाचा आणि उपजीविकेचा नाश करणे आपल्याला परवडेल का? आपण या प्रश्नांचे महत्त्व ओळखले की, पर्याय शोधणे हा वेड्या ठरणाऱ्या अल्पसंख्याकांचा ध्यास राहत नाही. एकदा आपल्याला हे समजले की पर्याय म्हणजे आपल्या भूतकाळाकडे परत जाणे नव्हे, तर आपल्या भविष्याची कल्पना करणे आणि आकार देणे, तेव्हा पर्याय शोधण्याचे हे काम सामूहिक बनते. हे मूलगामी पर्याय कसे व्यवहार्य बनवायचे? आपण जिथे आहोत तेथून आपल्याला जिथे जायचे आहे त्या प्रवासाचा पथदर्शी कार्यक्रम काय आहे? कुणीतरी या प्रश्नांचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी कोणालातरी स्वत:ला ‘वेडे’ म्हणवून घेण्याचा धोका पत्करावा लागतो आणि आपल्या सगळ्यांकडे विचार करण्यासारखे काहीही उरले नाही, अशी वेळ येण्याआधीच पर्यायांचा विचार करावा लागतो. हे मोठे प्रश्न विचारण्यासाठी कच्छ आपल्याला आमंत्रित करते.

हेही वाचा…भारतीय नौदलातील स्त्रीशक्ती…

(मी हा लेख लिहीत असताना अभियंता आणि विचारवंत डॉ. राकेश सिन्हा, यांच्या निधनाचे वृत्त आले. असा युक्तिवाद केला की आधुनिक, मोठ्या आकाराच्या, औद्योगिक विकासाच्या प्रारुपामध्ये बेरोजगारी अंतर्निहित आहे; असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा अर्थव्यवस्थेच्या आणि तंत्रज्ञानाच्या पर्यायी प्रतिमानावर विश्वास होता. लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत. yyopinion@gmail.com

Story img Loader