मी राहतो त्या इमारतीच्या मागे असलेल्या पोलीस लाईन्समध्ये दत्त जयंतीनिमित्त गेल्या शनिवारी झालेल्या पूजेत सहभागी होण्यासाठी तीन सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल मला आमंत्रित करण्यासाठी आले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर मला आणखी अनेक सेवानिवृत्त आणि काही सेवारत पोलीस भेटले. त्यांना मी तिथे गेल्याचा मनापासून आनंद झाला होता. माझ्यासाठी ही सर्वोत्तम ख्रिसमस भेट होती. तुमच्या कारकिर्दीच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तुम्ही ज्यांचे नेतृत्व केले आहे अशा व्यक्तींनी तुम्हाला लक्षात ठेवणे आणि तुमच्यावर प्रेम करणे यापेक्षा मोठा पुरस्कार नाही.

१९८२ मध्ये मी शहर पोलीस आयुक्त असताना पोलीस छावणीतील एका मंदिराचे उद्घाटन केले होते. मंदिराच्या भिंतीवर या उद्घाटनाचा फलक लावण्यात आला होता. जमलेल्या लोकांनी माझ्या नावाच्या फलकासमोर माझ्याबरोबर छायाचित्र काढण्याचा आग्रह धरला होता.

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर

माझी पत्नी हयात नसल्यामुळे मला कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर संपर्कात राहण्याची कसरत प्रामुख्यने करावी लागते ती ख्रिमसच्या काळात. एरवी या वयात आठवड्यातून एकदा घरातून पडणेदेखील माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असते. पण या दिवसात मला जवळपास रोजच आमंत्रणे असतात.

या वर्षीचा ख्रिसमस माझ्या आयुष्यामधला ९६ वा ख्रिसमस आहे. आयुष्यातले पहिले सात ख्रिसमस मला आठवत नाहीत. माझा जन्म १९२९ मध्ये झाला तेव्हा माझे वडील बडोद्यात पोस्टाचे अधीक्षक होते. त्यांची १९३० मध्ये रेल्वे मेल सेवेचे अधीक्षक म्हणून पुण्यात बदली झाली.

हेही वाचा : भारत सर्पदंशाची राजधानी म्हणून का ओळखला जातो? ही ओळख बदलण्यासाठी काय करता येईल?

त्यानंतर अनेक वर्षांनी १९६४ मध्ये माझी पुणे शहर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. भगव्या कपड्यातील एक हिंदू पुजारी माझ्या कार्यालयात आले आणि त्यांनी मला सांगितलं की मी दोन वर्षांचा असल्यापासून ते मला ओळखत आहेत. पोस्टल अधीक्षक कार्यालयात त्यांचे वडील माझ्या वडिलांचे मुख्य लिपिक होते, असं त्यांनी सांगितलं. धार्मिक बांधिलकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जे नाव स्वीकारले होते, त्या नावाने त्यांनी स्वतःची ओळख करून दिली.

त्यानंतर ३० वर्षांनंतर मी कारने मुंबईहून राजगुरुनगरला जाताना लोणावळा येथे थांबलो होतो. रस्त्याच्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये मी आल्याची माहिती मिळताच हाच माणूस जवळच चालवत असलेल्या आश्रमात काम करणारी दोन-तीन माणसे धावतच आली. मी आणि माझी पत्नी असे आम्ही दोघेही बसलो होतो त्या टेबलापाशी येऊन त्यांनी आम्हाला अभिवादन केले आणि बाबांनी समाधी घेतल्याचे सांगितले. बाबांनी त्यांच्याशी बोलताना कधीतरी दोनचार वेळा माझा उल्लेख केलेला होता त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष भेटून आनंद झाला, असं ते मला सांगत होते.

बाबांच्या पुण्यातील माझ्या कार्यालयात भेटीप्रमाणे ही भेटही माझ्या स्मरणात कायमची कोरलेली आहे. आमच्या एका भेटीत बाबांनी ‘समाधी’ घेण्याचा विचार असल्याचे मला सांगितले होते आणि मला आठवते की त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण माझ्यासाठी खेदाची गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षांनी मला त्यांचं नाव अजिबातच आठवत नाही.

हेही वाचा : अविद्योचा ‘अंमल’

मला माझ्या आयुष्यामधले दोन ख्रिसमस आठवतात एक १९५६ चा आणि दुसरा १९८९ चा. १९५६ मध्ये मी नाशिक विभागाचा सहाय्यक पोलीस अधीक्षक होतो. देवळाली माझ्या कार्यक्षेत्रात होते. आर्टिलरी रेजिमेंटल सेंटर देवळाली येथे होते. मी नाशिकहून मुंबईला निघालो होतो. माझ्याबरोबर कारमध्ये व्हॅलाडेरेस नावाचा एक तरुण ख्रिश्चन लष्करी अधिकारीही होता. आम्ही दोघेही एका आठवड्यासाठी सुट्टीवर होतो आणि आमचे पालक मुंबईत असल्याने आम्ही ख्रिसमससाठी तिकडे निघालो होतो.

तो तरुण लष्करी अधिकारी वांद्रे येथील होता. मी त्याला त्याच्या निवासस्थानी सोडायला गेलो. ते वर्ष होतं १९५६. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मी इतकं सुंदर सजवलेलं ठिकाण कधीही पाहिलं नव्हतं. पन्नासच्या दशकात वांद्रे हे जवळजवळ बहुतांश ख्रिश्चन लोकवस्तीचे होते. आज ते तेवढं राहिलेलं नाही, थोड्याफार प्रमाणातच आहे, पण तरीही ख्रिसमसला वांद्र्यात आजही तशीच रोषणाई केली जाते.

१९८९ मध्ये माझी नियुक्ती पूर्व युरोपमधील रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे झाली होती. ते एकमेव वर्ष असे होते की त्या वर्षी मी ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये प्रार्थनेला उपस्थित राहू शकलो नव्हतो. रोमानियन हुकूमशहा, निकोल कॉसेस्कू याला नुकतेच पदच्युत केले गेले होते. जगाला दाखवण्यासाठी त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्याला आणि त्याची पत्नी एलेना यांना ख्रिसमसच्याच दिवशी फाशी देण्यात आली. ख्रिसमसच्याच दिवशी त्याच्या हुकूमशाहीविरुद्ध एक छोटीशी क्रांती झाली होती. आम्ही तेथील राजदूताच्या निवासस्थानातून बाहेरच पडू शकलो नाही. निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर सशस्त्र माणसे भयभीतपणे फिरताना पाहण्यात आम्ही दिवस घालवला. आम्ही रोमानियन टीव्ही बघत होतो. त्या टीव्हीवर सतत ती फाशी दाखवत होते. कधीतरी असाही ख्रिसमस साजरा केला जाईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती.

या वर्षी मी मुंबईत पारंपारिक पद्धतीने ख्रिसमस साजरा करणार आहे. चर्चमध्ये प्रार्थना, त्यानंतर उपस्थितांशी गप्पाटप्पा, नंतर कुटुबीयांसह भोजन. काही शेजारी आणि जवळचे मित्रही भेटतील. त्यांच्यासोबत केक आणि वाईन होईलच.

माझी एक मैत्रीण, लीना गांधी तिवारी, वाकोला येथील झोपडपट्टीत तिच्या आजीच्या नावाने एक केंद्र चालवते. दरवर्षी ख्रिसमसच्या सुमारास या मुलांचा वार्षिकोत्सव असतो. ही मुलं तिने जवळपास दत्तकच घेतलेली आहेत. तिने या कामाची सुरूवात मुलींपासून सुरुवात केली, पण आता तिथे मुलग्यांनाही प्रवेश दिला जातो. ही बहुतेक सगळी मुलं घरगुती मदतनीस तसेच ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्यांची आहेत. या मुलांना शास्त्रीय नृत्य, नाटकांमध्ये अभिनय आणि कला आणि संस्कृतीचे इतर प्रकार शिकवले जातात. यातून त्यांना आत्मविश्वास मिळतो. संयम येतो आणि ज्ञान मिळतं. शाळेतील निपुण शिक्षक या केंद्रात येऊन मुलांना शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करतात.

हेही वाचा : आंबेडकरांचे नाव घेण्याची अपरिहार्यता

तिच्या अनेक वर्षांच्या या कामातून फक्त मुलांना आणि त्यांच्या पालकांनाच नाही तर लीना, तिचे पती प्रशांत आणि या उपक्रमात मदत करणारे कर्मचारी या सगळ्यांनाच समाधान मिळालं आहे. लीनाने केवळ स्वत:चा पैसा आणि वेळच नाही तर गरजू आणि वंचितांचे जीवनमान सुधारण्यासाठी तिची उर्जाही निष्ठेने खर्च केली आहे. यावर्षी दोन मुलींनी एमबीए (फायनान्स) परीक्षा पास केली, तीन मुलींनी बीएमएस (विपणन) आणि दोन मुलींनी लेखा आणि वित्त मध्ये बीएएफ पदवी मिळवली आहे. नोकरीच्या बाजारपेठेत असलेल्या स्पर्धेत उतरता यावं यासाठी त्यांची कौशल्ये विकसित केली जात आहेत.

आपल्या संपत्तीमधला काही वाटा स्वतःहून वंचितांसाठी खर्च करू इच्छिणाऱ्या अशा अनेक लीनांची देशाला गरज आहे. माझ्या स्वत:च्या दोन्ही मुली, आता त्यांच्या वयाच्या साठीत आहेत, दिल्लीतील एका बिगरसरकारी संस्थेच्या माध्यमातून काही मुलींना मार्गदर्शन करण्याचे काम त्या करतात. उदयन शालिनी फाउंडेशन असे त्या बिगरसरकारी संस्थेचे नाव आहे. संस्थेने आता मुंबईत शाखा उघडली आहे. त्या मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी काम करतात.

मुमताज आणि शमीम या माझ्या ओळखीच्या दोन मुस्लीम स्त्रिया, त्यांच्या मृत वडिलांनी स्थापन केलेला बोटावाला ट्रस्ट चालवतात. हा ट्रस्ट लहान वयात अनाथ झालेल्या ५० मुस्लिम मुलींना आश्रय देतो. त्या या मुलींना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत ठेवतात, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात आणि त्यांना भावनिक आधार देतात.

ही दुर्दैवी मुले मुंबईत नीट जगू शकतात ते अशा दयाळू स्त्रियांमुळेच.

लेखक मुंबईचे पोलीस आयुक्त होते.

Story img Loader