आता सरकार स्थापन झाले, म्हणजे संसार सुरू झाला म्हणून नांदा सौख्यभरे म्हणायचे. कोण कुठून कुठून आले, त्यात रुसवे फुगवे झाले, कुणी कुणाला काय (अहेर) दिले, घेतले याचे व्यावहारिक हिशेब झाले. ते पुढेही होत राहतील. घरच्यांना सांभाळायचे, बाहेरून आलेल्याचा पाहुणचार करायचा, प्रत्येकाला हवे नको ते बघायचे म्हणजे यजमानांसाठी तारेवरची कसरत. पत्रिका जुळल्या म्हणून स्वभाव जुळतील याची खात्री नसते. सरकारच्या संसारातही तडजोडी कराव्याच लागतात. कुणाचे घराणे मोठे, कुणाचा अनुभव दांडगा, कुणाचे आर्थिक पाठबळ मोठे, शिवाय जाती धर्माची समीकरणे वेगळी… हे सारे तोलून मापून पुढे जायचे म्हणजे तारेवरची कसरत. पण ती करताना फक्त आपापला विचार करू नका. ज्यांनी तुमचे हे लग्न जमवून आणले त्या वरातीतल्या वऱ्हाडी मंडळींचा विचार करा. त्यांनीच तुम्हाला सत्तेच्या बोहल्यावर बसवले हे विसरू नका. मधुचंद्र फक्त चार आठ दिवसांचा असतो. नंतरचा संसार, त्यातले जमाखर्च, उत्पन्न, विकास हा जास्त मोलाचा असतो. फक्त स्वार्थाचा, स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचा विचार न करता, जनतेचा विचार करा. अवतीभवती कुणाला काय हवे नको ते बघा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा