सॅबी परेरा

गुजरातच्या अर्थव्यवस्थेला गिफ्ट सिटीसारख्या सुसज्ज  शहराइतकीच ‘चल बसूया’ म्हणणाऱ्या स्पिरिच्युअल मित्राची आणि तशी बसण्याची सोय करणाऱ्या काळजीवाहू सरकारची गरज होती.

Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

गुजरात हे राज्य १९६० साली मुंबई प्रांतापासून वेगळे झाल्यापासून या राज्यात मद्यबंदी लागू आहे. येत्या महिन्याभरात, गुजरातमध्ये दहावे व्हायब्रंट गुजरात संमेलन होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या डीकिन विद्यापीठाच्या ऑफशोअर कॅम्पसचे गुजरातच्या गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजेच गिफ्ट सिटीमधे उद्घाटन होऊ घातले आहे. ही गिफ्ट सिटी जगातील आर्थिक आणि तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून उदयास येत असून तेथे आर्थिक गुंतवणुकीच्या निमित्ताने खूप विदेशी पाहुणे येणे अपेक्षित आहे. या विदेशी पाहुण्यांना आणि गुंतवणूकदारांना खूश करण्यासाठी गुजरात सरकारने, त्यांच्या साठहून अधिक वर्षांच्या मद्यबंदीच्या नियमात बदल करून गिफ्टसिटीपुरती दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

मध्यंतरी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला तेव्हा बंडखोर आमदारांना सुरुवातीला सुरत येथे ठेवण्यात आले होते. पण संध्याकाळी सातनंतर, ठरलेला डेली डोस न मिळाल्याने काही आमदारांचे हात म्हणे थरथर करत होते म्हणून सगळयांना गुजरातहून गुवाहाटीला न्यावे लागले. तेव्हाच, ऐनवेळी अवसानघात करू शकणारी ही मद्यबंदी हळूहळू उठविण्याचा विचार ऐरणीवर आला होता असे म्हणतात. खरे खोटे त्या विश्वेश्वरास ठाऊक!

‘इंग्लिश’ हा आपल्या देशवासीयांचा जिव्हाळयाचा विषय असला तरी आपली इंग्लिश भाषा यथातथा असल्याचा न्यूनगंडही बहुसंख्य लोकांना असतो. मद्यावरील बंदी हटविल्यास, स्थानिक व्यापाऱ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी व्यवहार करताना इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी फारशा शिक्षणाची किंवा टेलिप्रॉम्प्टरची मदत घ्यावी लागणार नाही. हे एखाद्या द्रष्टया नेत्याच्या लक्षात आले असणार. म्हणून या निर्णयाचे आणि निर्णय घेणाऱ्यांचे आपण स्वागत करायला हवे.

हेही वाचा >>> महानंद एनडीडीबीकडे देणे ही राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाची शोकांतिका

परकीय गुंतवणूक आणण्यासाठी कितीही आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवा, कितीही नियमांचे सुलभीकरण करा, पण जोवर गुंतवणूकदारांचे गळे योग्य त्या द्रवांनी ओले होत नाहीत तोवर धंद्यापाण्याच्या गोष्टी पुढे सरकत नाहीत हेच सरकारने अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे.

गुजरातमधे मद्यबंदी आहे म्हणजे तिथे अजिबात मद्य मिळत नाही असे नव्हे. निवृत्त संरक्षण दल कर्मचाऱ्यांना आणि वैद्यकीय कारणांसाठी सामान्य लोकांना काही नियमांच्या अधीन राहून आणि शुल्क भरून अधिकृतपणे मद्यपानाचा परवाना मिळतो. याव्यतिरिक्त अनधिकृतपणे मद्य उपलब्ध करून देणारे हजारो स्रोत गुजरातच्या हरेक गल्लीबोळात आहेत म्हणे. ते स्रोत प्रशासन, पोलीस आणि सरकार वगळता बाकी सर्व संबंधितांना ठाऊक आहेत, असं सांगितलं जातं. कुणीतरी म्हटलं आहेच की, बंदी असलेल्या वस्तू देवासारख्या असतात. मिळतात सगळीकडे, पण दिसत कुणालाच नाहीत!

गिफ्ट सिटीमधे मद्यबंदी उठविल्याची बातमी आल्यापासून, गिफ्ट सिटीमधील क्लब्जची मेंबरशिप घेण्यासाठी आजूबाजूच्या गावा-शहरातून हजारो लोकांची झुंबड उडाली आहे आणि संधीचा फायदा उठविण्यात तरबेज असलेल्या गुजराती क्लब मालकांनी मेंबरशिप फी अवाचे सव्वा वाढवायला सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे दमणसारख्या ठिकाणी दारू पिण्यासाठी येणाऱ्या आणि वीकेंडला मुंबईला विशेषत: मीरारोड-दहिसरच्या हायवेवरील बारमध्ये येणाऱ्या मद्यप्रेमी गुजरात्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महाराष्ट्राचा आणखी एक उद्योग गुजरातने पळवल्याची बोंब मारून रडण्याची मराठी माणसाची आयतीच सोय झाली आहे.

मुंबई ही भौगोलिकदृष्टया गुजरातला लागून असल्याने इतकी वर्षे गुजराती माणसं उद्योग-धंद्यासाठी आणि वीकेंडला दारू, बीयर, वाइन पिण्यासाठी मुंबईत येत होती. त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं गुजरातला खिलवणारे ‘शेजारी’ आणि पिलवणारे ‘पाजारी’ होतो. पण आता या उद्योगधंद्यांच्या बाबतीत गुजरात स्वत:च्या पायावर उभा राहत आहे आणि मद्यसेवनाच्या बाबतीत स्वत:च्या पायानेच लडखडणार आहे ही आनंदाची बाब आहे.

आजवर संपूर्ण गुजरातमध्ये मद्यबंदी असल्याने कुणाची फारशी तक्रार नव्हती. मात्र, एकाला काही मिळालं तर ते मला का नाही या मानवी स्वभावाला अनुसरून गुजरातमधील सुरत, राजकोटसारख्या इतर शहरातील कमर्शियल सेंटर आणि बिजनेस हब्जनी देखील अशा प्रकारच्या मद्यबंदीतून सुटकेची मागणी केली आहे. आपल्या घरची वीज गेल्यावर आपल्याला वाईट वाटते, संताप येतो. पण संपूर्ण गावाची वीज गेलीय असे कळल्यावर आपल्याला फारसे वाईट वाटत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. चालायचंच !

हेही वाचा >>> …तर बहुमतपासून भाजपला रोखणे शक्य आहे

थोर व्यक्तीला एका भौगोलिक कक्षेत सीमित करणे हा त्या व्यक्तीवर खरेतर अन्यायच आहे. पण आपल्या सगळयाच आदरणीय व्यक्तींचा असा हा अपमान आपण आनंदाने करीत आलो आहोत. गुजरात हे गांधीजींचं जन्मराज्य असल्याने त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्या राज्यात दारूबंदी असल्याचे म्हटले जाते. असे असेल तर मग ज्या राष्ट्राचे गांधीजी हे राष्ट्रपिता आहेत त्या संपूर्ण भारतात दारूबंदी असायला हवी होती. मद्य हे वाईट असेल तर त्यावर सगळीकडे सारखेच निर्बंध असायला हवेत आणि ते जर वाईट नसेल तर सगळीकडे सारखेच उपलब्ध असायला हवे. आमचे अण्णाकाका तर म्हणतात की, गांधीजींप्रति आदर म्हणून गुजरातेत दारूबंदी करायची असेल तर एखाद्या लोकप्रिय चिलीम-बहाद्दर साधू महाराजाप्रति आदर म्हणून त्यांच्या जिल्ह्यात पोरासोरांसहित सगळयांना चिलीम ओढण्याची सक्ती करायला हवी. असो. आपल्याला एखाद्या व्यक्तीचं, संस्थेचं, स्थळांचं दैवतीकरण करून, तिला देव्हाऱ्यात बसवून, तिथे पाळावयाचे कडक सोवळे ठरवून इतरत्र घाण करण्यात काही वावगे वाटत नाही. दांभिकपणा हा आपल्या समाजाचा अविभाज्य घटक असल्याने असल्या गोष्टी आपल्या मनाला जाणवतही नाहीत, मग टोचणे ही खूप दूरची गोष्ट.

३१ डिसेंबरला विशेष परवाने देऊन सरकार दारूला उत्तेजन देते, लोकांना दारूबाज बनवते आणि या दारूबाज लोकांना महात्मा गांधी कधी गेले हे कळावे म्हणून २ ऑक्टोबरला देशभर आणि गांधीजी कुठले होते हे कळावे म्हणून गुजरातसारख्या राज्यात वर्षभर ड्राय-डे ठेवते. आज, विशेषत: सोशल मीडियावर, गांधीजींचा द्वेष करण्याची जी लाट आली आहे त्यात या ड्राय-डे बाधित जनतेचा मोठा वाटा असल्याचा माझा कयास आहे.

गुजरातच्या गिफ्ट सिटीत अर्थविषयक सेवा आणि टेक्नॉलॉजी संबंधित कामं होणार आहेत आणि त्यानिमित्ताने तिथे मद्यविक्री तसेच मद्यप्राशनाला परवानगी दिली आहे. यावरून एक मुद्दा माझ्या लक्षात आलाय तो असा की, आपण भले आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाता मारीत असलो तरी, बायकोसमोर तोंड उघडल्यावर अजिबात भपकारा न येणारी साधी दारूदेखील आजतागायत आपल्याला बनवता आलेली नाही. हे विज्ञानाचं आणि जगभरातील वैज्ञानिकांचं घोर अपयश आहे. गुजरातच्या गिफ्ट सिटीने आपली बाकी आर्थिक उद्दिष्टे थोडी उशिरा साध्य केली तरी चालतील, पण त्यांनी या ज्वलंत समस्येवर काही ठोस उपाय शोधून सामान्य माणसांना मद्यपानानंतर बडीशेप आणि मेंटॉस खाण्याच्या तकलादू उपायांपासून मुक्ती मिळवून द्यावी अशी माझी मागणी आहे.

मुळात दारूला आपण उगीच बदनाम केलंय असा माझा आरोप आहे. माझ्या असं लक्षात आलं की, तुमच्या आंतरिक क्षमतेपेक्षा तुम्ही काय काम करता किंवा तुमच्याकडून कसल्या प्रकारचं काम करवून घेतलं जातं यावर समाजातील तुमची ओळख ठरते आणि त्यानुसार समाज तुमच्या नावावर ‘बरा’ किंवा ‘वाईट’ असा शिक्का उमटवतो. करोनाकाळात, ७०% अल्कोहोल असलेल्या एका द्रवाला आपण सेनेटायझर या गोंडस नावाने बिनदिक्कत दिवसभर हाता-तोंडाला चोळत होतो आणि जेमतेम ५% अल्कोहोल असलेल्या एका द्रवाला आपण ‘बीअर’ असं बदनाम नाव देऊन दारू कॅटेगरीमधे नेऊन ठेवलं आहे. ती बिचारी बीयर चिल्ड स्वभावाची असल्याने आपल्यावरील अन्यायाबद्दल दादही मागत नाही हे तिचं मोठेपण!

मागील वर्षी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार २३% अपघात हे दारू पिणाऱ्या माणसांमुळे होतात. याचा अर्थ इतकाच की उरलेले ७७% अपघात हे दारू न पिणाऱ्या मूर्ख माणसांमुळे होतात. दारू न पिणारे लोक दारू पिणाऱ्यांपेक्षा तीनपट अधिक धोकादायक आहेत. त्यांच्यापासून अधिक सावध राहायला हवे. अशी वस्तुस्थिती असताना आपण दारूवर बंदी वैगेरे आणतो हे चुकीचे आहे.

हा अन्याय केवळ बीयर किंवा दारूच्याच नशिबी नव्हे तर श्रमपरिहारासाठी कधीमधी मद्यसेवन करून राष्ट्राच्या तिजोरीत भर टाकणाऱ्या महसूल-सेवकांच्या देखील पाचवीला पुजलेला आहे. सगळेच लोक काही बेवडे आहेत म्हणून अतिमद्यपान करतात असे नव्हे. कधीकधी तर केवळ बाटलीचे झाकण मिळत नाही या कारणानेसुद्धा नाइलाजाने माझ्यासारख्या एखाद्याला दारूची अख्खी बाटली रिचवावी लागते.

आपल्या पुराणकथांपासून, आधुनिक कथा-कादंबऱ्या, कविता, नाटक-सिनेमे अशा सगळीकडे प्रियकर-प्रेयसीला संध्याकाळच्या वेळेस आपल्या प्रेमपात्राची येणारी सय आणि त्यामुळे तिची होणारी सैरभैर अवस्था ह्याची वर्णनं करताना त्या वेळेला ‘कातरवेळ’ असं गोंडस नाव दिलेलं असतं. कातरवेळेचं आणि प्रेमिकांचं भरभरून गुणगान करणारे हजारो उल्लेख आपल्याला साहित्यात दिसतात. पण सूर्य मावळत असताना आपल्या मद्याच्या आठवणीने बेचैन झालेल्या व्यक्तीसाठी कातरवेळ ही हीच ‘क्वाटरवेळ’ असते. त्या क्वाटरवेळचं कुणाला म्हणजे कुणालाच कौतुक नाही ही खेदाची बाब आहे.

केवळ पायाभूत सुविधा आणि इतर संसाधने पुरविली म्हणून आर्थिक विकास वेग घेईल असे नव्हे. या सगळया सुविधा असूनही गुजरातचं औद्योगिक आयुष्य संथ आणि बोअरिंग झालं होतं. विकसित राज्यांच्या स्पर्धेत आपण मागे पडत असल्याची बोच गुजरातला लागून राहिली होती. उद्योजकांना गुजरातेत उद्योग उभारणे आणि नोकरदारांना तिथे नोकरीसाठी जाणे निरस वाटू लागलं होतं. अशावेळी गुजरातच्या अर्थव्यवस्थेला गिफ्ट सिटीसारख्या सुसज्ज शहराइतकीच ‘चल बसूया’ म्हणणाऱ्या स्पिरिचुएल मित्राची आणि तशी बसण्याची सोय करणाऱ्या काळजीवाहू सरकारची गरज होती. ती गरज वेळीच ओळखून सरकारने, गिफ्ट सिटीपुरती का होईना मद्यबंदी शिथिल केली आहे त्याचे आपण आपापल्या घरी बसून चीयर्स करीत स्वागत करायला हवे!

sabypereira@gmail.com