थॉमस फ्रीडमन
‘इस्रायलने गाझा पट्टीत युद्ध जरूर करावे, पण हजारो नागरिकांचे प्राण जाणार नाहीत एवढी जरा काळजी घ्यावी’ अशा सुरात बायडेन प्रशासन इस्रायली नेतृत्वाला सुनावते आहे! वास्तविक अमेरिकेने वेळ न दवडता गाझात पूर्ण युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला पाठिंबा द्यायला हवा, पण तसे झालेले नाही. हमासचा नायनाट करणे हे जर या युद्धातून इस्रायलला साध्य करायचे असेल, तर तसे अशक्य तरी आहे किंवा अमेरिका हे खपवून घेणार नाही, हेही इस्रायलला ठणकावून सांगायला हवे. झाले एवढे बस झाले. इस्रायलने आता विजय जाहीर करावा आणि युद्ध थांबवावे. हे अमेरिकेनेच इस्रायलला सांगावे लागेल, कारण इस्रायलच्या सध्याच्या पंतप्रधानांची लायकी सिद्धच होते आहे- ते स्वत:च्या राजकीय कारकीर्दीला इस्रायलींच्या हितापेक्षा अधिक महत्त्व देताहेत. इस्रायलमित्र जो बायडेन यांच्या हिताची तर पर्वाच इस्रायली नेतृत्वाला नाही.
त्यामुळेच आता “सर्व (जिवंत)इस्रायली ओलिसांना हमासने मुक्त केल्यास इस्रायलही तातडीने युद्धबंदी करून सैन्यही मागे घेईल, पण इस्रायली तुरुंगांतून एकाही पॅलेिस्टिनीला सोडले जाणार नाही आणि हा समझोता कायमस्वरूपी टिकून राहावा यासाठी अमेरिका, नाटो देश अरब देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले आंतरराष्ऱ्रीय पर्यवेक्षक मंडळ स्थापन करावे” – असा स्पष्ट युद्धबंदी प्रस्ताव इस्रायलने द्यावा, यासाठी अमेरिकेने आपले वजन खर्च केले पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा