हर्षल प्रधान
गांधीजींच्या ‘क्विट इंडिया’ चळवळीला संघ परिवाराने विरोध केला होता. त्यांचा वारसा सांगणाऱ्या भाजपला ‘घराणेशाही क्विट इंडिया’ अशी घोषणा देण्याचा काय अधिकार आहे? अन्य पक्षांतील घराणेशाहीवर बोट ठेवणाऱ्यांना स्वत:च्या पक्षातील घराणेशाही दिसत नाही का? ‘घराणेशाही क्विट इंडिया, कशासाठी?’ (२९ ऑगस्ट) या भाजपेतर पक्षांतील घराणेशाहीवर बोट ठेवणाऱ्या लेखाला प्रत्युत्तर देणारे टिपण..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारताला घराणेशाहीची मोठी परंपरा असली, तरी देशाने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आणि गेली ७५ वर्षे ती योग्य पद्धतीने राबविली. यापुढेही ही लोकशाही अनंत काळ अबाधित राहील, यात शंका नाही. एखाद्या घराण्याने केलेली देशसेवा आपण कदापि विसरू शकत नाही, म्हणूनच आपण आजही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, पंडित जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करतो. त्यांचा आदर्श सतत नव्या पिढीच्या समोर राहावा म्हणून त्यांची उदाहरणे देत राहतो. त्यांच्या पुढच्या पिढय़ांना राजकारणात अग्रस्थानी किंवा मुख्य प्रवाहात ठेवण्याचाही प्रयत्न करतो. भाजपनेही हे केले. छत्रपतींच्या वंशजांना खासदारकी, आमदारकी बहाल केली. त्यांना मानणाऱ्या समाजाची मते मिळवण्याचा घाट भाजपनेही अनेकदा घातला, हे विसरता येणार नाही.
हेही वाचा >>> पहिली बाजू : ‘घराणेशाही क्विट इंडिया’, कशासाठी?
एखाद्या घराण्यातील एखाद्या व्यक्तीने शौर्य गाजविले किंवा काही उल्लेखनीय कार्य केले, म्हणून त्यांच्या पुढच्या पिढय़ाही त्यांच्यासारख्याच शूर, तल्लख आणि हुशार असतीलच, असे मानण्याचे कारण नाही. मात्र तरीही डॉक्टरांची पुढची पिढी डॉक्टर आणि वकिलांची पुढची पिढी वकील होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ही स्थिती राजकारणातही दिसून येते. या पुढील पिढय़ांना स्वीकारायचे की नाही, हे मात्र नेहमीच सामान्य जनतेच्या हातात असते आणि हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. अशा वेळी घराणेशाहीलाच ‘क्विट इंडिया’ म्हणण्याची आवश्यकता नाही. त्याउलट बेबंदशाही, हुकूमशाहीलाच ‘क्विट इंडिया’ म्हणण्याची गरज आहे.
‘मी’, ‘माझं’ आणि ‘मला’ या भूमिकेतून इतर सर्वावर अन्याय काही प्रसंगी अत्याचार करण्याची मानसिकता या देशातून हद्दपार व्हायला हवी. ‘चंद्रयान-३’ चंद्रावर पोहोचले तेव्हा संपूर्ण जगाला ती दृश्ये पाहण्याची उत्सुकता होती, अशा वेळी मलाच पाहा अशी भूमिका घेणे घातक नव्हे काय? या यशाचा पाया शास्त्रज्ञांनी आणि तत्कालीन नेतृत्वाने म्हणजे पं. नेहरूंनी घातला याचे स्मरण अयोग्य कसे? हे देशाचे यश आहे, शास्त्रज्ञांचे यश आहे, त्यांना श्रेय देण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, मात्र आजच्या नेतृत्वात त्याचाच अभाव आहे. ज्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचे स्टेडियम स्वत:च्या नावे करून घेतले, त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार? कोणीही काहीही केले, तरी देशाचा इतिहास कोणी पुसू शकणार नाही.
मुळात ज्या भाजपचे स्वातंत्र्य लढय़ात कोणतेही योगदान नव्हते, जो संघ परिवार स्वातंत्र्य लढय़ात गांधीजींचा विरोधक म्हणून परिचित होता, ज्या संघाने ‘क्विट इंडिया’ चळवलीला विरोध केला, त्यातूनच पुढे आलेल्या भाजपने देशातील घराणेशाहीला विरोध करताना ‘क्विट इंडिया’ या घोषणेचा आधार घेणे अयोग्य आहे. घराणेशाही नको म्हणणाऱ्या भाजपने आपला पक्ष वाढवण्यासाठी घराणेशाहीचे उदाहरण असणाऱ्या नेत्यांनाच जवळ केल्याचे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपने विविध पक्षांशी केलेली युती पाहता सहज लक्षात येते. अगदी मुफ्ती मोहम्मद सईद, मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, रामविलास पासवान, तेलगू देसमचे चंद्राबाबू आणि आता जगन मोहन ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.
हेही वाचा >>> कुठे आहे आंबेडकरी राजकीय चळवळीचा आवाज?
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्यावरच भाजप वाढला, हे नाकारता येणार नाही. शरद पवारदेखील अनेकदा भाजपच्या आसपास राहिले. आधी विरोध नंतर पाठिंबा अशाच भूमिकेत राहिले. त्यामुळे भाजपने स्वत:च्या राजकीय वाटचालीचा इतिहास चाळला असता तरी आपण त्याच घरणेशाहीमुळे टिकलो, वाढलो याचा साक्षात्कार त्यांना झाला असता. आपल्या पक्षात नेतृत्व तयार करता येत नसावे, म्हणूनच त्यांनी इतर पक्षांतील नेते आयात केले. आयारामांची आरती करणे एवढेच काम केले. ईडी, आयटी, सीबीआयच्या भीतीने भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात आलेल्या आयरामांच्या घराणेशाहीचा या पक्षाला नेहमीच सोयीस्कर विसर पडतो.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि त्यांचे खासदार चिरंजीव, केंद्रातले सूक्ष्म आणि लघु उद्योगमंत्री आणि त्यांचे आमदार पुत्र, भाजपचे स्वपाक्षातील खासदार आणि त्यांचे आमदार पुत्र या आणि अशा घराणेशाहीवर भाजपची भविष्यातील भूमिका काय असेल? त्यांना बाजूला करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे का? केवळ वापरायचे आणि फेकून द्यायचे हा प्रकार भाजपमध्ये वाढला आहे. त्याचा अनुभव याआधी अनेकांनी घेतला, सध्या नितीन गडकरी घेत आहेत. देवेंद्र फडणवीसही त्यांच्याच रांगेत उभे आहेत. सध्या भाजपला काही प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. तुमच्या पक्षाचा नेमका वैचारिक डीएनए कोणता? स्वकर्तृत्व नसल्याने कधी महापुरुषांना नावे ठेवायची, कधी बजरंग बली की जय म्हणायचे, कधी हिजाबचा मुद्दा उकरून काढायचा, कधी मुस्लीम महिलांकडून
राखी बांधून घ्यायला सांगायचे, तर कधी जय श्रीरामचा जयघोष करायचा, हेच सुरू असल्याचे दिसते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत, देशद्रोही असणाऱ्याला खुलेआम शिक्षा करा, त्याची जात, पात, धर्म, पंथ, घराणे पाहू नका. त्यांच्या या वक्तव्याचा विचार करताना प्रश्न पडतो की, अमित शाह यांनी देशद्रोह कायदा का बदलला? जय शहाचे बीसीसीआय अध्यक्ष होणे, कोणत्या कतृत्वाचे फळ? घराणेशाही नको म्हणणारा भाजप घराणेशाही नको म्हणजे नेमके काय नको हे कधी स्पष्ट करणार? केवळ आत्ममग्न राहायचे, विकास केवळ आपल्याच मित्राचा करायचा, देशातील विमानतळ, बंदरे आणि विदेशातील सर्व कंत्राटे आपल्याच मित्राला द्यायची ही बेबंदशाही भाजपला चालते का? संघ परिवार याबाबत काहीच कसे बोलत नाही? की त्यांनाही बाजूला सारण्यात आले आहे?
हेही वाचा >>> सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे का?
आत्ममग्नता हुकूमशाहीकडे नेते, याचा साधा अभ्यास भाजपच्या नेत्यांनी संघ परिवाराने करू नये? ‘भारत छोडो’ आंदोलनाला ज्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जीनी विरोध केला, इंग्रजांना मदत केली, तत्कालीन राज्यपालांना पत्र पाठवून ‘मैं आपके साथ’ म्हटले, त्यांचाच वारसा सांगणाऱ्या भाजपने आज ‘घराणेशाही क्विट इंडिया’ अशी घोषणा द्यावी, हे हास्यास्पद आहे. आपला देश कुठे चालला आहे, याचा विचार संघपरिवार करणार आहे की नाही? या देशाने ज्ञानदेव, सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, संत एकनाथ अशा महानुभावांकडून शिकवण घेतली आहे. महिलांचा सन्मान करण्याची परंपराही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याने या देशाला शिकवली आणि आपण सगळय़ांनी ती जोपासली. याच देशातील मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेविषयी ज्यांना वैषम्यही वाटत नाही आणि भलतेच मुद्दे ज्यांना महत्त्वाचे वाटतात, त्यांच्याविषयी काय बोलावे?
‘क्विट इंडिया’ चळवळीला विरोध करणाऱ्यांना या चळवळीचे नाव वापरण्याचा अधिकार आहे का, याचा विचार होणे गरजेचे आहे. भाजपने इतरांच्या पक्षांतील घराणेशाहीवर बोट ठेवण्यापूर्वी स्वत:च्या पक्षात रुजलेली हुकूमशाहीची पाळेमुळे पाहणे आणि अन्य पक्षांतून आयात करण्यात आलेल्या घराणेशाहीचा हिशेब मांडणे गरजेचे आहे.
लेखक शिवसेना जनसंपर्कप्रमुख आहेत.