अ‍ॅड. हर्षल प्रधान

‘शिवसेनेचे सध्याचे हिंदूत्व डीपफेक आहे’, असे म्हणणाऱ्या भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या लेखाचा प्रतिवाद-

National Institute of Nutrition, Dietary Guidelines,
‘योग्य तेच खा’ सांगणारे धोरण अपुरे…
voting compulsory, Citizens who do not vote, vote,
मतदान न करणाऱ्यांना शिक्षा हवीच! हक्क बजावणे बंधनकारकच…
mahavikas aghadi
‘संविधान बचाव’ आणि ‘गद्दारी’ कालबाह्य?
environmentally sustainable alternatives sustainable
पर्यावरणातील शाश्वत पर्याय खरोखरच शाश्वत आहेत का?
Women Founder of Religion Dominant Personality
स्त्रियांनी धर्म संस्थापक व्हावे…
dhangar reservation loksatta article
धनगर आरक्षणाच्या पल्याड…
Sri Lankan parliamentary election 2024
लेख : ‘एक असण्या’चा श्रीलंकेतला ‘अर्थ’
India relations with other countries considerations of national interest side effects
भारताचा शेजार-धर्म ‘खतरेमें’ असणे बरे नव्हे!
How to save society from perilous summation
घातक सुमारीकरणापासून समाजाला कसे वाचवायचे?

प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे हिंदूत्व कधीच वेगवेगळे नव्हते आणि नसेल. उद्धव ठाकरे यांचे वैचारिक अधिष्ठान मजबूत असल्याने आणि पिढीजात कणखरपणा त्यांच्या रक्तात असल्याने ते आपापल्या परीने लढत राहिले आहेत. प्रबोधनकारांना सनातनी हिंदूंशी लढावे लागले होते, बाळासाहेबांच्या काळात हिंदू-मुस्लीम द्वेष पुढे आला होता आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात हिंदूत्वाच्या बुरख्याआड सत्तेचा बाजार मांडण्याचे राजकारण आणि स्वकीयांच्या गद्दारीने डोके वर काढले हा फरक आहे. हिंदूत्व तेच आहे, काळानुरूप त्याचे खच्चीकरण करणाऱ्यांचे चेहरे बदलले आहेत. 

..तेच उद्धव ठाकरे करत आहेत

जॉर्ज फर्नाडिस, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी यांच्यासोबत प्रबोधनकारांनी काम केले होते. बाळासाहेबांनी शिवसेना आणि प्रजा समाजवादी यांची युती केली होती. काँग्रेसशीही जुळवून घेतले होते. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस. एम.जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले.  प्रबोधनकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत युती केली. उद्धवजींनी त्यांचा नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती केली. बाळासाहेब ठाकरे यांनी जॉर्ज फर्नाडिस यांच्या सोबत युती केली, उद्धवजींनी नितीशकुमार आणि समाजवादी साथींसोबत युती केली. विखुरलेल्या २१ पक्षांना सोबत घेतले. गद्दारांना त्यातले मर्म कळणार नाही.

हेही वाचा >>> पहिली बाजू : ..यांचे सध्याचे हिंदूत्व ‘डीपफेक’!

केवळ सत्तेपुरते हिंदूत्व

भाजपने आजपर्यंत सगळय़ांचा वापर करून त्यांना फेकूनच दिले आहे. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात आणीबाणीविरोधात लढा दिला गेला तेव्हा हे त्यात जनसंघ म्हणून घुसले आणि मंत्रीपदे मिळवली. मग जनसंघाची शकले उडाल्यावर भाजप स्थापन केला आणि एक एक करत इतर पक्ष संपवायला सुरुवात केली. गोव्यातील मगोप, तमिळनाडूतील डीएमके- एआयएडीएमके, केरळमधील एलडीएफ, कर्नाटकमधील जेडीयू देवेगौडा (सध्या परत भाजपसोबत आहेत).  महाराष्ट्रातील उदाहरण म्हणजे शिवसेना.

गुजरातमध्ये भाजपनेच भाजपच्या अनेक नेत्यांना संपवले. बिगुल पार्टी आठवते? मध्य प्रदेशमधील उमा भारती आज कुठे आहेत? शिवराजसिंह यांच्या जीवावर मध्य प्रदेशमध्ये तीन वेळा सरकार आणले, आज त्यांनाच कोणी विचारेनासे झाले आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंसोबतही तेच केले गेले. उत्तर प्रदेशमध्ये मायावती, हरियाणातील दृश्यंत सिंग, बिहारमध्ये नितीशकुमार, जम्मू-काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी.. भाजपचा एकच वादा, वापरा आणि फेका. हे ओळखून भाजपने आपल्याला फेकून देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच फेकले. पण हिंदूत्व सोडले नाही आणि सोडणारही नाहीत.

मोदी नुकतेच मुंबईत येऊन ऑलिम्पिक भारतात आयोजित करणार अशी घोषणा करून गेले. म्हणजे आता विश्वचषकासारखेच ऑलिम्पिकच्या नावाखाली भरपूर पैसे गुजरातला वळवता येतील. भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्याच्या वेळी पाकिस्तानी खेळाडूंचे स्वागत करताना त्यांच्यावर फुले उधळली गेली. देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा हा अपमानच आहे. पाकिस्तानी खेळाडूंना क्रिकेट खेळायला बोलावणे हाच मोठा गुन्हा आहे. बाळासाहेबांना भेटायला जावेद मियांदाद आला होता. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळण्यास संमती द्यावी, असे त्याचे म्हणणे होते. त्यावर बाळासाहेब म्हणाले होते तुम्ही अतिरेकी कारवाया थांबवा, मग आम्ही विचार करू. बाळासाहेबांचे आणि उद्धव ठाकरे यांचे हिंदूत्व समजून घ्यायला किमान माणुसकीची झालर असायला हवी. त्याचा अभाव सध्या भाजपच्या नेत्यांमध्ये आणि अंधभक्तांमध्ये आहे म्हणून देशाची अवस्था बिकट झाली आहे. हा महाराष्ट्राबद्दलचा आकस आहे आणि त्याची कारणे वेगळी आहेत. ती समजून घ्यायला हवीत.

मुंबई मिळाली याचा राग

संयुक्त महाराष्ट्र झाला आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली, याचा राग आजही काही इतर भाषिकांना आणि बलाढय़ राजकारण्यांना आहे. म्हणूनच गेल्या नऊ वर्षांत आज मुंबईची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.  त्यामुळे मुंबईतील सगळे व्यापार, उद्योग गुजरातला किंवा इतर राज्यांत नेले जात आहेत.

दुर्दैवाने त्याला महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षांची साथ मिळते. गुजरातमध्ये असे काय आहे जे महाराष्ट्रात नाही? सगळी अर्थव्यवस्था ही केवळ अदानी, अंबानीच्या दावणीला बांधून ठेवण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरलं आहे. आता धारावीसारखा मोठा प्रकल्प अदानींना आंदण दिला आहे.

शेतकऱ्याचा विचार करणार की नाही?

कृषीप्रधान देश ही आपली ओळख पुसण्याचे पाप गेल्या नऊ वर्षांत प्रकर्षांने समोर आले आहे. देशातील एकूण शेतकरी कुटुंबांपैकी ४३.४२ दशलक्ष म्हणजेच ४८.६ टक्के शेतकरी कुटुंबावर औपचारिक किंवा अनौपचारिक अथवा दोन्ही प्रकारच्या कर्जाचा बोजा असल्याचे ‘शेतकरी कुटुंबांचा कर्जबाजारीपणा’ या नावाने राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. शेतकरी आत्महत्यांचा आकडा देशात चार लाखांच्या घरात आहे, तर महाराष्ट्रात लाखाच्या घरात. तो रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे. मात्र आमदार-खासदार फोडण्याचा आकडा सतत वाढतोय.

महिला अत्याचार

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी १५ मे २०२३ रोजी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च दरम्यान महाराष्ट्रातील ३ हजार ५९४ मुली (वय १६ ते २५) बेपत्ता झाल्या आहेत. या माहितीनुसार महाराष्ट्रातून दररोज ७० मुली बेपत्ता होतात. डान्स बार, कुंटणखाने, महिलांना नोकरी लावून देणारे रॅकेट यांसारख्या अनेक बेकायदेशीर, अनैतिक ठिकाणी महिला, मुली बळी पडतायत का? कुठे टेलिरगच्या नावाखाली, कुठे मसाज पार्लरच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये सुरू आहेत. महाराष्ट्रात तर महिलांना शिवीगाळ करणारे, अत्याचार करणारे मंत्रिमंडळात आहेत. हेच भाजपचे हिंदूत्व आहे का?

महाराष्ट्रात हे नसते उद्योग का?

राज्यघटनेला सत्तेचे विकेंद्रीकरण अभिप्रेत आहे. परंतु राज्यातले सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देत नाही. निवडणूक आयोग त्यावर तोंड उघडत नाही. न्यायालयात त्यावर सरकार वेळकाढूपणा करते. देशाचे पंतप्रधान मुंबई मनपाच्या ठेवी निरुपयोगी असल्याचे धक्कादायक विधान करतात. शिवसेनेने ही मनपा तुटीतून उभी करत मुंबईकरांच्या साहाय्याने फायद्यात नेली. आज या ठेवीतून प्रशासकाच्या माध्यमातून अनाठायी खर्च केला जात आहे. अनावश्यक निविदा काढून जनतेच्या पैशातून विशिष्ट लोकांना कसा फायदा मिळेल याची तरतूद केली जाते. पावसाळय़ाच्या तोंडावर सिमेंट रस्ते करण्याची अनाकलनीय घोषणा केली जाते. महानगरपालिकेत पालकमंत्र्यांच्या नावाने कक्ष स्थापले जाताहेत. हे कुठल्या नियमात बसणारे आहे? भाजपच्या ताब्यातील कोणत्याही राज्यात मनपाच्या किती ठेवी आहेत? अहमदाबाद? बंगलोर? उत्तर प्रदेशबद्दल तर बोलायलाच नको. पुणे, नागपूर मनपा भाजपच्या ताब्यात आहेत. काय उल्लेखनीय कामगिरी तिथे झाली?

चौघांची लोकशाहीवर एकाधिकारशाही..

महाराष्ट्रात बहुमत मिळत नाही म्हणून मग शिवसेना, राष्ट्रवादी आता काँग्रेस फोडण्याचे उद्योग सुरू आहेत. दोन उद्योगपती आणि दोन नेते या चार लोकांची लोकशाहीवर एकाधिकारशाही आहे. भ्रष्टाचाराचे, लैंगिक शोषणाचे असे कोणतेही आरोप असलेले नेते स्वत:च्या पक्षात घ्यायचे आणि नीतिमत्ता मात्र इतरांना शिकवायची अशी नवीन कार्यशाळा भाजपने सुरू केली आहे. ईडी, सीबीआय, आयकर खाते हे भाजपने विरोधकांवर उगारलेले शस्त्र आहे. महाराष्ट्रात ते मराठी नेत्यांवर वापरले जाते आणि देशात हिंदू नेत्यांवर वापरले जाते. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या सोबतच सत्ता स्थापन करणे ही भाजपची नैतिकता आहे. महागाई, बेरोजगारी, हिंसाचार वाढतोच आहे. लोकांना त्यांच्या राजकारणाचा वीट येऊ लागला आहे.

तो अधिकार आम्हालाही मिळणार का?

हे सगळे मुद्दे सतत लोकांसमोर आहेत. पण त्यांची उत्तरे मात्र मिळत नाहीत. भाजपला प्रश्न विचारले की वेगळय़ाच विषयावर ज्ञान वाटले जाते. गोबेल्स नीती वापरून सतत लोकांना भ्रमात ठेवले जाते. आजच्या काळात राम मंदिर हा भावनेचा मुद्दा असला तरी हाताला काम हा जिव्हाळय़ाचा मुद्दा आहे त्याचे उत्तर भाजपकडे नाही. त्यांच्याकडे आहे ते केवळ भ्रम निर्माण करण्याचे निवडणूक रणनीती यंत्र. त्याचा वापर ते सतत करत आहेत. भाजप समान नागरी कायद्याचा उदोउदो करत धर्माच्या आणि रामाच्या नावाने मते मागतो. मग तोच अधिकार निवडणूक आयोग आम्हालाही देणार का? लेखक शिवसेना जनसंपर्क प्रमुख आहेत.