लोकसभा निवडणुकीत जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिली, त्यामुळे निराश झालेला भाजप उद्धव ठाकरे यांना राजकारणातून नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा करणारा आणि ‘ठाकरेंचे वक्तव्य नैराश्याचे द्योतक’ या ‘पहिली बाजू’चा (६ ऑगस्ट) प्रतिवाद करणारा लेख…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेली दहा वर्षे भाजप उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून सत्तेचा मलिदा स्वत:च्या मित्रांना वाटून महाराष्ट्र ओरबाडण्याचा प्रयत्न करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा अनुयायी या मनोवृत्तीला कधीही यशस्वी होऊ देणार नाही. या मनोवृत्तीचे निर्मूलन करण्यासाठीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शड्डू ठोकला आणि ‘एक तर तू राहशील अन्यथा मी,’ असे आव्हान दिले.

भाजपला सध्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेच दिसू लागले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरेंना राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न अलीकडे भाजपकडून सातत्याने होताना दिसतो, मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी त्यांना ते शक्य होणार नाही. हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल गैरसमज पसरवण्यास सुरुवात केली. कधी ‘औरंगजेब फॅन क्लब’ तर कधी ‘मुसलमानांचे मसीहा’ कधी ‘मराठ्यांचे विरोधक’ तर कधी ‘दलित समाजाचा तारणहार’ असा उल्लेख करून विविध मार्गांनी जाती- धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ भाजपच्या वरिष्ठांना खूश करण्यासाठी सुरू आहे. परंतु हे सर्व प्रयत्न सातत्याने फोल ठरत आले आहेत.

हेही वाचा >>> पहिली बाजू : ठाकरेंचे वक्तव्य नैराश्याचे द्योतक

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपले राजकारणातील वेगळेपण, सहृदयीपण मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उभ्या जगाला सिद्ध करून दाखवले. राज्याचा, देशाचा नेता कसा असावा, त्याने कसे वागावे याचा वस्तुपाठच त्यांनी पुढच्या असंख्य पिढ्यांसाठी घालून दिला. जागतिक साथीच्या काळात ते छातीचा कोट करून उभे ठाकले. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेपासून ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनीच उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. त्यांच्या या स्वकर्तृत्वाने मिळवलेल्या यशामुळे भाजपचे नेते बावचळले, खचले आणि काहीही करून उद्धव ठाकरेंना राजकारणातून नामशेष करण्याचा चंगच त्यांनी बांधला. तसे केले नाही, तर आपल्याला महाराष्ट्र कधीच ओरबाडता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते.

तिथून पुढील काळात भाजपने ईडी, सीबीआय, आयटी यांचा गैरवापर करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील गळतीवीरांना, कमजोर मनोवृत्तीच्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना गळाला लावले आणि सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबईची सफर घडवून सत्ता आपल्या हातात घेतली. एवढे सारे करूनही उपयोग होईना. राजकीय प्रतिमाभंजन होईना. उद्धव ठाकरे यांच्याविषयीचे जनतेतील प्रेम काही कमी होईना, हे पाहून पहाटेचा शपथविधीफेम नेत्यांनाही सोबत घेतले. मराठा ओबीसी अशी मोळी बांधून उद्धव ठाकरेंना नमोहरम करण्याचा प्रयत्न झाला; अगदी उद्धव ठाकरे यांना ‘नकली संतान’देखील म्हणून झाले, मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत ‘‘मी पुन्हा येईन’’ना धुडकावून जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिली आणि भाजपच्या नाकावर टिच्चून तब्बल ३१ खासदारदेखील निवडून दिले. त्यामुळे निराश झालेल्या भाजपच्या नेत्यांनी मग त्यांना ‘औरंगजेब फॅन क्लब’ची उपमा दिली. पुन्हा पुन्हा तोच डाव खेळण्याचा प्रयत्न ते करू पाहत आहेत. पण ठाकरे समजून घेण्यासाठी आणि त्यांची कार्यपद्धत अभ्यासण्यासाठी अशा आणखी काही पिढ्या खर्च कराव्या लागतील.

उद्धव ठाकरे हे कधीही दिखाव्याचे राजकारण करत नाहीत. नक्कलवीर, खुशमस्करे अशी त्यांची प्रतिमा नाही. त्यामुळे त्यांनी स्वकर्तृत्वाने भाजपच्या भल्या भल्या नेत्यांना आस्मान दाखविले. महाराष्ट्राची माती काय आहे, याची झलक दाखविली. सर्व शासकीय कंपन्या विकायच्या; सर्व प्रकल्प आपल्या मित्रांच्या- अदानी-अंबानी यांच्या घशात घालायचे; गोमाता गोमाता करून हिंदूंना भुलवत ठेवायचे आणि गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडून निवडणूक रोखे घ्यायचे; देशातील भोळ्या जनतेकडून रामाच्या नावाने मंदिर उभारण्यासाठी पैसे गोळा करायचे आणि जागतिक साथीच्या नावाखाली पीएम केअर फंड म्हणून पैसे गोळा करून त्यातून स्वहितासाठी मित्रांची कर्जे फेडायची अशी भाजपची कार्यपद्धती आहे. महाराष्ट्रातील सर्व उद्याोग गुजरातला पळविण्यात येत आहेत. तरुणांच्या हातून रोजगार हिसकावून घेतले गेले. देशातील बहुसंख्य बुद्धिजीवींना परदेशांत जाण्यास भाग पाडले गेले. मोठे उद्याोगधंदे आपल्या मित्रालाच मिळतील, याची व्यवस्था केली गेली. ही यादी न संपणारी आहे.

कलम ३७० रद्द केल्याचा गवगवा करण्यात येतो, मात्र त्यामागचा हेतू होता तेथील लिथीयमयुक्त जमिनींचा ताबा आपल्या मित्रांना देणे. महाराष्ट्रातील – मुंबईतील विजेपासून ते अगदी जीवनावश्यक अन्नपदार्थांपर्यंत सगळ्याचा व्यापार; दूध डेअऱ्या, मोक्याच्या कचराभूमीचे (क्षेपणभूमी) भूखंड सारे काही मित्रांना दिले जात आहे. धारावीसारखी झोपडपट्टी गिळंकृत करून तेथील रहिवाशांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न होत आहेत. हे आणि असेच उद्याोग गेली दहा वर्षे बिनदिक्कत सुरू आहेत. राज्यातील भाजप नेते केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. महाराष्ट्र ओरबाडला जात असताना हे सर्वजण केवळ उद्धव ठाकरे यांच्या द्वेशाने एकवटले आहेत. ज्यांना हाताला धरून राजकारणात आणले ते सारेच उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या परिवाराला राजकारणातून उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा वेळी ‘‘एक तर तू राहशील नाहीतर मी,’’ असे म्हणायचे की ‘‘आवो घर आपडोच छे,’’ म्हणायचे?

विश्वासघात कोणी केला? प्रथम युती कोणी तोडली? पहाटेचा शपथविधी कोणी केला? अलीकडच्या भाजपमधील खुशमस्कऱ्यांचा अभ्यास थोडा कमीच असतो. नीट इतिहास माहीत नसतो आणि केवळ आपल्या वरिष्ठांचा उदोउदो सुरू असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढला. त्यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या जोडीवर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम केले. वाजपेयी, अडवाणी यांचा सन्मान केला आणि आपल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला साथ दिली. मात्र आपल्याच पक्षातील नेत्यांचा काटा काढण्याची मनोवृत्ती बाळगलेला अलीकडचा भाजप हे सारे विसरला आहे.

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांना स्वपक्षात मानसिक, भावनिक यातना भोगाव्या लागल्या आणि आज त्यांच्या कुटुंबाला त्या भोगाव्या लागत आहेत. तशीच अवस्था आज नितीन गडकरी, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, प्रकाश जावडेकर यांचीही केली गेली आहे. किरीट सोमैया हेदेखील त्याच पिढीचे. आज त्यांची अवस्था तर, फारच दयनीय आहे. वापरून फेका, दुर्लक्ष करा, खिल्ली उडवा, एकटे पाडा, विरोधकांच्या माध्यमातून बदनाम करा, सतत खोटे बोला आणि रेटून बोला ही आजच्या भाजपची कार्यपद्धत आहे. जो आपल्याच पक्षातील व्यक्तींना नेस्तनाबूत करू पाहतो आणि वरिष्ठांची खुशमस्करी करण्यासाठी आपल्या राज्याचा बळी देतो, तो राजकारणी नव्हे.

महाराष्ट्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन झाल्यावर लागलीच ‘‘आता आपली वेळ आली’’ अशा कृतघ्न मनोवृत्तीने भाजपने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्याचा डाव टाकला. २०१४ मध्ये सर्वप्रथम भाजप कार्यालयात एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही शिवसेनेशी असलेली युती तोडत आहोत अशी आरोळी ठोकली, त्यानंतर आलेल्या प्रसंगाला सामोरे जाताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले आणि आपल्या नेतृत्वाची चुणूक दिल्लीच्या भाजपच्या नेतृत्वाला दाखवून दिली. शरद पवार यांनी जाहीर पाठिंबा देऊ केला आणि भाजप सत्तेत बसला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर लाजेकाजेखातर शिवसेनेला सोबत घेऊन भाजपने पाच वर्षे सत्ता केली मात्र यात सतत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना चुचकारणे, धमकावणे, घाबरवणे सुरूच होते. उद्धव ठाकरे बधत नाहीत म्हटल्यावर हळूहळू बदनामीचे फास आवळण्यास सुरुवात झाली.

महापालिकेत विरोधात लढून सत्ता मिळवताना दमछाक झाल्यावर पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मातोश्रीवर अंदाज घेण्यासाठी आले. सर्व मागण्या मान्य करत उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवत त्यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील यश पदरात पाडून घेतले आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा तोच डाव कटकारस्थानाचा खेळ सुरू केला. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोर उमेदवार देऊन शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा डाव टाकून पाहिला. तरीही काही उपयोग झाला नाही कारण भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही मग अजित पवार यांना चुचकारून पहाटेचा शपथविधी चोरवाटेने उरकला मात्र दीड दिवसात तेही सरकार पडले आणि भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावली.

त्या धक्क्यातून भाजप अद्याप सावरलेला नाही. १०५ आमदार निवडून आणलेले सर्वांत मोठा पक्ष असूनही ईडी, सीबीआय आणि आयटीच्या पडद्याआड याला धमकाव त्याला धमकाव करत बसले. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतले पण सत्ता सारी शिंदे आणि अजित पवारांच्या हातात गेल्याचे दिसते. भाजपच्या नेतृत्वाची ससेहोलपट महाराष्ट्र पाहत आहे. स्वत:च्याच पक्षातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, पूनम महाजन, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे कारस्थान करता करता ते दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर नाचत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही संपवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत, मात्र त्यात त्यांची दमछाक होत आहे. महाराष्ट्रातील मराठे, कुणबी, माळी अशा अठरापगड जातींतील सामान्यांतील सामान्य त्यांच्या विरोधात गेले आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वकर्तृत्वाने प्रकाशमान झालेले व्यक्तिमत्त्व आहेत. ते सहृदयी राजकीय नेते आहेत. बाळासाहेबांनी दिलेला विचारांचा आणि संघटनेचा वारसा ते जपत आहेत, वाढवत आहेत, पुढे नेत आहेत.

प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे