सतीश कान्हेरे

गांधी चष्म्याची फ्रेम जर थोडी मॉडिफाय (modify) केली, वेगळ्या शब्दांत सांगायचं तर गांधी चष्म्याची फ्रेम खालच्या बाजूने थोडी ओढली की जो आकार तयार होईल साधारण त्या आकाराचा चष्मा. चेहऱ्याच्या रंगात मिसळून जाईल अशी काळसर लाल रंगाची फ्रेम आणि आधीच मोठ्या असणाऱ्या डोळ्यांना जास्तच मोठं करतील अशा भिंगांच्या काचा. चेहऱ्यावर सदैव मिश्कील भाव. कपड्यांचा मूळ रंग सांगता येणार नाही असा बुशकोट. तळ हरवलेल्या स्लीपरवजा चपला. या सगळ्यामुळे हजारांतही ओळखता यईल असे हे रूप म्हणजे आमचे संत सर. अर्थात प्रभाकर संत.

Naxal couple surrendered to Gadchiroli police on October 14
नक्षल चळवळीत वैवाहिक आयुष्य धोक्यात… दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दाम्पत्याचे आत्मसमर्पण
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
mentally ill woman Sangli, mentally ill woman damaged vehicles,
सांगलीत मनोरुग्ण महिलेने केले ५० हून अधिक वाहनांचे नुकसान
Father arrested for beating minor boy by hanging him upside down nashik crime news
नाशिक: अल्पवयीन मुलास उलटे टांगून मारहाण करणारा पिता अटकेत
Vishwas Ugle captured motherly moment on camera with little Tara lovingly cuddling her calf
ताडोबातील “छोटी तारा” च्या मातृत्वाचा क्षण…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
What are cities doing with land reclaimed from garbage dumps under Swachh Bharat Mission
Swachh Bharat Mission: स्वच्छ भारत मिशन मोहिमेच्या अंतर्गत कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपासून मुक्त झालेल्या जमिनीचा वापर कसा केला जातोय?
HDFC Bank employee dies in Lucknow office
HDFC Bank Employee Death : HDFC बँकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू, सहकाऱ्यांचा आरोप

पण त्याहूनही वयाच्या नव्वदीतही तरुणालाही लाजवेल अशी उमेद, जबरदस्त धावपळ, कामाचा विलक्षण ध्यास. खाण्याचे कसलेच चोचले नाहीत. “शहाणे करीन सकळाला” या व्रताने झपाटलेल्या या विद्वानाला सर्व महाराष्ट्र हा कल्याण-डोंबिवलीमधल्या अंतराइतका वाटत असावा. त्यामुळे अवघा महाराष्ट्र अनेकदा पालथा घातला. त्यांच्या पायात चपला नसून भिंगऱ्या लावल्या आहेत की काय असं वाटावं इतका प्रचंड प्रवास अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांनी अनेकदा केला असेल. आज एखादा नगरसेवकही मोठ्या गाडीत दिसला नाही तर त्याच्या प्रतिष्ठेला फाऊल होतो. संत सर तर अतिशय चांगला लौकिक असणारे माजी आमदार, पण प्रवास मात्र सदैव भारतीय रेल्वे किंवा आपल्या एसटीच्या लाल डब्यातूनच. कोणताही कार्यक्रम, भाषण आणि भेटींच्या वेळा पाळण्याचा शिरस्ता नक्कीच होता. त्यासाठीच्या प्रवासाला मात्र वेळ आणि काळाची कोणतीही बंधनं त्यांना कधीच मानवत नव्हती.

संत सर म्हणजे आपलं आडनाव सर्वार्थाने सार्थ करणारे एक अवलिया होते. शिक्षण क्षेत्रात त्यांची कर्तबगारी अतुलनीय अशीच होती. पण त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील अनेक कामं, राजकारण, साहित्य अगदी महाराष्ट्राचे आर्थिक नियोजन अशा असंख्य विषयात त्यांना प्रचंड गती होती. विविध विषयांतील अभ्यासही दांडगा होता, वाचन अफाट होतं. सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आणि चेहऱ्यामागे दडलेल्या अनेक गुणावगुणांचा अभ्यास हाही एक विशेष त्यांच्यापाशी होता.

सध्या प्रचलित मराठीत ज्याला ‘सेन्स ऑफ ह्युमर’ असं म्हणतात ती विनोदबुद्धी आणि विनोदाची जाण संत सरांकडे भरभरून होती. आताशा राजकीय पटलावर तर सेन्स ऑफ ह्युमरमधल्या सेन्सलाच ऑफ करून रिव्हेंज ऑफ ह्युमर घडताना गेल्या काही वर्षांत आपण महाराष्ट्रातही अनुभवलंय.

कोणतीही गोष्ट करताना “लोक काय म्हणतील” हा सर्वसामान्यांचा विचार असतो आणि “लोकांनी काय म्हणावं” असा विचार करणाऱ्या माणसांमध्ये असामान्यत्व दडलेलं असतं. अशा माणसांच्या जगण्याच्या संकल्पनाच वेगळ्या असतात. वैयक्तिक हौशी मौजी त्यांच्या या व्रताच्या, त्यांनी अंगीकारलेल्या कार्याच्या आड येऊ शकत नाहीत. संत सरांच्या फाटक्या चपलेच्या आणि कर्दमलेल्या कपड्यांच्या आत समाजातल्या तरुणाईला शिक्षणाने सुजाण करण्याचं झपाटलेपण दडलेलं होतं. खरंतर आमदारकीचं पेन्शन होतं, शिक्षक म्हणून निवृत्तिवेतनही असावं. म्हटलं तर महिन्याला एकच काय चार चार नवीन जोड आणि हवे तसे आणि हवे तेव्हा झकपक कपडे मिरवता आलेही असते, पण आपल्या पेन्शनचे पूर्ण पैसे नितांत गरज असणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठी आणि तिथल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे अर्पण करणाऱ्या माणसाचं असं झपाटलेपण कळायला समाजाला नेहमीच उशीर होत असतो. आपल्या चपलेहूनही त्या विद्यार्थ्यांचं चालणं सुसह्य व्हावं, त्या पैशातून त्या शिक्षण संस्थांचं चालणं गतिमान व्हावं असा विचार करणारी मुळातच कमी असतात आणि अशी प्रत्यक्ष कृती अव्याहतपणे करणारी माणसं तर फारच दुर्मीळ असतात. यालाच संतांचं लक्षण असं म्हणतात. हे संतांचं लक्षण संत सरांनी आयुष्यभर व्रतस्थपणे अंगीकारलं होतं. यामुळेच शिक्षण, सामाजिक आणि साहित्य विश्वातील अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ आणि मार्गदर्शक होते.

विद्यादानाचं कार्य करणारी, पेशाने शिक्षक असणारी आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी आयुष्यभर गुरुवर्य, सर किंवा शिक्षक म्हणूनच उल्लेखली किंवा नावाजली जायची. पण आता ती जागा ‘सम्राट’ या शब्दाने घेतली. शिक्षणसम्राट असा उल्लेख फ्लेक्सवर नसला तर या क्षेत्रातील मंडळींना चालत नाही. साहजिकच आहे म्हणा, पेड सीट्समधून येणारा पैशाचा ओघ आणि त्याच पैशाच्या जोरावर सत्तेकडे जाण्याचा मिळालेला हा जवळचा मार्ग. मात्र संत सर हे अखेरपर्यंत संत सरच राहिले, शिक्षणसम्राट झाले नाहीत हे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थांचे आणि शेकडो शिक्षण संस्थांचे भाग्य. संघाच्या विचारातून आणि संघ संस्कारातून अशी लखलखती असंख्य रत्न या मातृभूमीसाठी आपली आयुष्य वेचीत आली आहेत.

१९५० ते ६० या दशकात माधवराव काणे, भगवानराव जोशी, माजी राज्यपाल रामभाऊ कापसे, आबासाहेब कान्हेरे, वामनराव साठे, संत सर, गोपाळराव टोकेकर आणि काही सहकारी आदी त्या वेळच्या तरुण मंडळींनी कल्याणमध्ये मुखर्जी हॉलची स्थापना केली. गम्मत म्हणजे मुरलीधर आळीमधील माधवराव काणे यांच्या वाड्यातील ओटीवरच्या एका छोट्याशा खोलीचं मुखर्जी हॉल असं नामकरण केले गेलं होतं. थोडक्यात “फडताळात बसून चिंता करतो विश्वाची” असाच काहीसा प्रकार होता. आश्चर्य म्हणजे याच मुखर्जी हॉलच्या सभासद मंडळींनी त्या नंतरच्या ३० वर्षांत ठाणे जिल्ह्यात म्हणजे आताच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं. ‘संघाचं कार्य’ या मूळ प्रेरणेतून सुरू झालेला हा सारा प्रवास जवळपास सहा दशकांहूनही अधिक काळ अव्याहत सुरू आहे.

छत्रपती शिक्षण मंडळ ही या सर्व मंडळींनी सुरू केलेली बहुधा पहिली शिक्षण संस्था. संत सरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या शिक्षण संस्थेचा विस्तार जिल्ह्यातील विविध भागांत ३० पेक्षा अधिक शाळा इतका व्यापक झाला आहे.

या सर्व मंडळींनी अतिशय नेटाने, परस्पर सहकार्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय धागे गुंफत शेकडो कार्यकर्त्यांची फळी उभारली. त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरून विविध क्षेत्रांतील नेतृत्वाची धुरा त्यांच्या हाती दिली. म्हणूनच शिक्षणापासून सेवा कार्यापर्यंत, सांस्कृतिक संस्थांपासून सहकारी बँकांपर्यंत असंख्य संस्था उभारल्या गेल्या आणि त्या आजही यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. आपल्या अंगभूत गुणांनी, अभ्यासू वृत्तीने आणि उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर रामभाऊ कापसे यांनी विधानसभा आणि संत सरांनी विधान परिषदेत आपला असा खास ठसा उमटवला होता.

या सगळ्यांचे संघाशी असणारे अतूट नाते, आपले काम हे ‘ईश्वरी कार्य’ या भावनेतून कार्यरत असणे, परस्परांशी योग्य असा समन्वय आणि निरपेक्षवृत्ती यांचंच हे फळ असावं. ज्यांना सामजिक कार्याची आवड आहे, राजकीय क्षेत्रांत कारकीर्द घडवायची इच्छा आहे त्या संवेदनशील मंडळींनी मुखर्जी हॉलच्या सर्व सदस्यांचा हा सर्व प्रवास नक्कीच अभ्यासावा. या दोन्ही क्षेत्रांतील अभ्यासक मंडळींना या विषयी संशोधन करून डॉक्टरेट पदवीही मिळवता येऊ शकेल.

दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कुठल्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने संत सर दादरला आले होते. पाय घसरला असावा किंवा कोणाचा मागून जोराचा धक्का लागून असेल रेल्वे ब्रिजवर संत सर पडले. बसकण मारल्या स्थितीत अक्षरशः वीसएक पायऱ्या आदळत खाली पोहोचले. मणक्याला जबर मार लागला होता. पाठीच्या हाडांमध्ये काही ठिकाणी फ्रॅक्चर होते. वय वर्ष ८५ कडे सरकणारे. नंतर मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. सरांना कूस बदलून झोपताही येत नव्हते. बरे होण्यास चार-सहा महिने लागू शकतील अशी परिस्थिती होती आणि पूर्ण बरे होतील की नाही याचीही शाश्वती नव्हती. त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारं दुखणं अचानक ओढवलं होतं. चेहऱ्यावर नैसर्गिक वेदना होत्या. पण मुलं, सुना आणि नातवंडं त्यांची जी काळजी घेत होते आणि प्रेमाने करत होते त्याचं मोठं समाधान त्यांच्या बोलण्यातून प्रतीत होत होतं. हे साहजिकच होतं. पण आश्चर्य म्हणजे भविष्यात कधी बेडवरून उठता येईल की नाही याची शाश्वती नसताना तीन-चार महिन्यांनंतरच्या कामांची आणि योजनांची उजळणी सुरू असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. खरंतर या वयात हे असं पडणं म्हणजे शरीरासह मनाचं कोलमडणंच असतं. संत सर मात्र लढवय्ये होते. पडले होते पण उमेद हरले नव्हते. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अपेक्षेहूनही अतिशय कमी काळात ते पुन्हा उभे राहिले आणि दुप्पट जोमाने पुढे अनेक वर्षे पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले.

सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला माझी विनम्र आदरांजली

satish.kanhere@gmail.com