रामजन्मभूमीच्या मुद्द्याने १९९० च्या दशकात भारतीय राजकारणात उलथापालथ घडवली होती. येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी या मुद्द्याने एक प्रकारचा कळस गाठलेला दिसेल. अनेक बातम्यांनुसार, त्या दिवशी एका मोठ्या सोहळ्यात अयोध्येतील मंदिरात रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. वेगवेगळ्या १३६ सनातन परंपरांमधील हजारो धार्मिक नेते या कार्यक्रमाला उपस्थित असतील. या घटनेचा यापुढच्या काळातील देशातील राजकारण आणि समाजावर दीर्घकालीन परिणाम होणार आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी हे उद्घाटन होत आहे. सत्ताधारी पक्ष आणि सरकार समाजमाध्यमे तसेच पारंपरिक माध्यमांचा वापर करून मंदिराचे प्रतीक आणि संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न करतील. अलीकडेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशभरातील लोकांना त्यांनी आपापल्या घराजवळील मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी जोडलेल्या विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना या सोहळ्याचे ‘लोकोत्सवा’मध्ये रुपांतर करण्यासाठी किती कठोर मेहनत घेतील, हे यातून लक्षात येते. हा सोहळा लोकांच्या मनावर कायमचा ठसवला जावा, त्यांना त्याचा अभिमान वाटावा यासाठी सगळे प्रयत्न केले जातील.

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे

हेही वाचा – इस्रायल-हमास संघर्ष लोकांना नको असला तरी नेत्यांना हवा आहे का?

हिंदू मतदार म्हणून उदयास आलेला वर्ग आणि या वर्गाच्या वर्तनावर व मानसिकतेवर रामजन्मभूमी मंदिर उद्घाटनासारख्या घटनांचा सामाजिक आणि राजकीय परिणाम जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. हे उद्घाटन ही एक स्वतंत्र घटना म्हणून वेगळी काढता येणार नाही. हा गेल्या किमान तीन दशकांतील विविध घटनांच्या मालिकेचा आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय मानसिकतेचा एक भाग आहे. रामाच्या स्मृती या घटकात असलेली जबरदस्त क्षमता आपण गेल्या काही वर्षांत अनुभवली आहे. या घटकात हिंदूंच्या एकत्रिकरणाचा हेतू मोठ्या प्रमाणात साध्य करण्याची, जाती-वर्गांपलीकडे जाऊन हिंदूंना एकत्र आणण्याची आणि त्याद्वारे भाजपला राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याची क्षमता आहे.

याव्यतिरिक्त राममंदिराच्या आवारात रामायणात नमूद असलेले शिव, गणपती, हनुमान इत्यादी देव विविध संत आणि शबरी, जटायू, वाल्मिकी इत्यादी देवतांचीही मंदिरे उभारण्यात येणार आहेत. हे देव, देवता, संत विविध उपेक्षित वर्गांना वंदनीय आहेत. त्यामुळे प्रतिकात्मकतेतून सर्वसमावेशकतेचे एक कथ्य (नॅरेटिव्ह) प्रस्थापित केले जाऊ शकते. त्यामध्ये राजकीय लाभ मिळवून देण्याची प्रचंड क्षमता आहे.

मंदिराच्या उद्घाटनाचे भाजपला तीन प्रकारे राजकीय लाभ मिळवता येतील…

पहिला लाभ – दोन धर्मांमध्ये या परिसराविषयी प्रदीर्घ काळ सुरू असलेला वाद सोडविण्यात यश आल्याचा आणि आपल्या अनेक जाहीरनाम्यांत दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचा दावा करता येईल.

दुसरा लाभ – याने पंतप्रधान मोदींच्या ‘राजकीय भांडवला’त भर पडते. ‘मोदी आश्वासनांची पूर्तता करतात’ हे कथ्य पक्के करता येईल.

तिसरा लाभ – हे मंदिर हिंदूंसाठी अभिमानबिंदू ठरून त्यातून हिंदू धर्मियांकडून येत्या लोकसभा निवडणुकांत अधिक एकसंधपणे मतदान केले जाईल.

काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस यांसारख्या विरोधी पक्षांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि या मतपेढीला आकर्षित करण्याचे नवनवे मार्ग शोधणे भाग पडेल. कदाचित सौम्य हिंदुत्व या संकल्पनेच्या आधारे कथ्य तयार केले जाईल. कदाचित विरोधकांची मदार असलेला जातीआधारित जनगणनेचा मुद्दा या मंदिर उद्घाटनाच्या मुद्द्यापुढे निष्प्रभ ठरेल. कदाचित डीएमके किंवा नवबौद्धांतील काही पंथांसारख्या गटांकडून सनातन धर्मावर सध्या केल्या जात असलेल्या टीकेवर हिंदू धर्मीयांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतील.

हेही वाचा – मराठा आरक्षण मिळणार कसे?

अशाप्रकारे रामजन्मभूमी मंदिराचे उद्घाटन एक घटना म्हणून किंवा जनमानसात पोहोचवलेला एक संदेश म्हणून भाजपच्या राजकारणासाठी लाभदायक ठरेल. ‘इंडिया’ आघाडी पुढील सार्वत्रिक निवडणुकांत महत्त्वाचा मुद्दा म्हणून विकसित करू पाहत असलेल्या जातीआधारित राजकारणाचा प्रतिकार करण्यास हे मंदिर उद्घाटन सहाय्यभूत ठरेल. ही घटना ‘प्रभावशाली पंतप्रधान’ ही नरेंद्र मोदींची जनमानसातील प्रतिमा अधिक मजबूत करेल. त्याचा भाजपला राजकीय लाभ मिळू शकतो.

लेखक अलाहाबाद येथील गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.

Story img Loader