विठ्ठल कांबळे

आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार रा. स्व. संघाने केला, समरसतेची भूमिका ‘रिडल्स’ वा नामांतर अशा प्रश्नांवर घेतली, यामागे त्या-त्या वेळच्या सरसंघचालकांचे पाठबळ होते. या भक्कम पायावरच संघ आज ९९ व्या वर्षांत पदार्पण करत आहे..

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ २४ ऑक्टोबर २०२३ रोजी, विजयादशमीच्या दिवशी ९८ वर्षे पूर्ण करून शताब्दीच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. संस्था इतका मोठा काळ टिकून राहणे, वाढत राहणे हा त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या, नेतृत्वाच्या आणि हितैषी लोकांच्या दृष्टीने एक आनंदाचा आणि अभिमानाचा विषय असतो. त्याचबरोबर तो आत्मपरीक्षण आणि आत्ममूल्यांकनाचाही विषय असतो. संघटनेच्या वाढीबरोबरच तिने समाजाच्या दृष्टीने समकालीन, ज्वलंत प्रश्नांवर वेळोवेळी काय भूमिका घेतली आणि समाजाच्या घडणीमध्ये संस्थेचे काय योगदान राहिले याचाही यानिमित्ताने विचार करणे आवश्यक ठरते.

हेही वाचा >>> रावणाच्या प्रतिमेचे दहन कशासाठी?

गेली किमान २०० वर्षे भारतात हिंदू समाजातील जातिभेद, अस्पृश्यता याविषयी सतत मंथन चालू आहे. या प्रश्नाचे स्वरूप, उगम व निराकरण यावर विविध वैचारिक व कृतिशील प्रवाह विद्यमान आहेत. याविषयी संघाची भूमिका काय राहिली याचा यानिमित्ताने विचार करणे सयुक्तिक ठरेल. या समस्येमुळे झालेल्या समाजाच्या पतनास बाह्य आक्रमणापेक्षा आंतरिक शिथिलता हे कारण आहे, हे संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे मत होते. ‘‘आमच्या हीन स्थितीस आम्हीच जबाबदार आहोत. आम्ही सतत सिंहावलोकन करीत राहिल्यास दोष दिसतील. आम्ही स्वत:ला निर्दोष समजल्यास सुधारणा अशक्य आहे,’’ असे ते म्हणत. ‘‘स्नानसंध्या इत्यादी वैयक्तिक आचार यथासांग करणे म्हणजे धर्मपालन नव्हे’’ याचा उच्चार त्यांनी वारंवार केला. संघाच्या कार्यपद्धतीत त्यांनी जातिभेदास यित्कचितही जागा ठेवली नव्हती. १९२७ साली केलेल्या भाषणात ‘संघशास्त्र अस्पृश्यता मानत नाही. संघास गरीब-श्रीमंत, ब्राह्मण-महार, विद्वान-अविद्वान भेद मान्य नाहीत. संघात सर्वांना प्रवेश आहे’ हा विचार त्यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडला. हे नुसते सांगून ते थांबले नाहीत, तर ते त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवले. संघाच्या प्रत्यक्ष कार्यात बहुसंख्येने वंचित वर्गातील तरुणांचा मोठा सहभाग असल्याचा प्रत्यय म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आला होता.

द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि पुढील सर्व सरसंघचालकांनी संघविचाराची हीच दिशा कायम ठेवली. मद्रासला गेलेल्या बाबूराव तेलंग यांना गुरुजींनी पत्र पाठवले होते. त्या पत्रात ते म्हणतात, ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे सारे भेद नष्ट करून समाज एकसंध केला पाहिजे.’ १९६६ साली प्रयाग व नंतर उडुपी येथील धर्मसंमेलनात ‘न हिंदू पतितो भवेत’ (कुणीही हिंदू पतित नाही) आणि ‘हिंदूव: सोदर: सर्वे’ (सर्व हिंदू एकमेकांचे बंधू आहेत) हे ठराव पारित करून घेण्यामागे श्रीगुरुजींची प्रमुख भूमिका होती. इतिहासातील जुन्या जखमांवरील मलमपट्टीचे महत्त्व जाणत त्यांनी उडुपी संमेलनानंतर म्हटले होते, ‘‘इतिहासात घडलेल्या चुकांचे प्रामाणिक भावनेने परिमार्जन करावे लागेल व अपेक्षित तो बदल साध्य करण्यासाठी शहरा-शहरांत, गावा-गावांत, घराघरांत एकेका माणसाशी संवाद साधायला लागेल, जे गैर आहे त्याबद्दल प्रबोधन करावे लागेल. हृदय-परिवर्तन करावे लागेल. वागण्यात-बोलण्यात, आचरणात नैतिक व भावनिक पातळीवर बदल करावे लागतील, स्वीकारावे लागतील..’’  आंतरजातीय विवाहाचे त्यांनी केलेले स्वागत व अशा विवाहातील त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती ही संघाची याबाबतीतील भूमिका स्पष्ट करणारी आहे.

गुरुजींनंतर संघाची धुरा बाळासाहेब देवरस यांनी सांभाळली. सर्व तत्कालीन विषयांवर त्यांनी संघाची भूमिका अत्यंत सुस्पष्ट शब्दांत मांडली. वर्ण, जाती, अस्पृश्यता, आरक्षण, आंतरजातीय विवाह हे समाजाच्या घडणीवर, एकजुटीवर परिणाम करणारे विषय होते.  त्याबद्दल त्यांचे विचार अत्यंत मूलगामी आणि स्पष्ट होते. ८ मे १९७४ रोजी, म्हणजे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी, पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतील भाषणात ते म्हणतात, ‘‘अस्पृश्यता ही चूक आहे.  It must go lock,  stock and barrel..’’  ते पुढे म्हणाले, ‘‘If untouchability is not wrong,  nothing in the world is wrong..’’ याच भाषणात दलितांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचेसुद्धा त्यांनी अत्यंत आग्रहपूर्वक आणि स्पष्ट शब्दांत समर्थन केले. या सवलती मागण्याचा दलितबंधूंना हक्क आहे आणि त्या सवलती पुढे किती काळ चालू ठेवायच्या हाही त्यांचाच प्रश्न आहे असेही ते म्हणाले होते.  या भाषणात, आंतरजातीय विवाहाचा ठामपणे पुरस्कार करताना ते म्हणाले होते, ‘‘ज्याप्रमाणे रोटीव्यवहार सर्वत्र सुरू झाला आहे त्याप्रमाणे बेटीव्यवहारदेखील सर्रास सुरू व्हायला पाहिजे. यासंबंधी संकोच करण्याचे कारण नाही. स्पष्टपणे हे म्हटले पाहिजे.  ज्याप्रमाणे रोटीव्यवहाराची बंधने तुटली आहेत त्याप्रमाणे जातिभेदाची तीव्रता दूर होण्याच्या दृष्टीने, हे भेद दूर होण्याच्या दृष्टीने, बेटीव्यवहाराची बंधनेदेखील तुटली पाहिजेत.’’  विषमता निर्मूलन व हिंदू संघटन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे प्रतिपादन ते करीत.

हेही वाचा >>> भारतीय (जनता पक्षाच्या) राजकारणाचा विश्वकर्मा

संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनीसुद्धा या विषयावरील संघाची भूमिका अनेक कार्यक्रमांतून वारंवार मांडली आहे. सर्वांना मुक्त मंदिरप्रवेश, एक स्मशान आणि समान जलस्रोत असले पाहिजेत याचे नि:संदिग्ध प्रतिपादन ते करीत आहेत. त्यानुसार अनेक स्वयंसेवक धार्मिक, व्यावहारिक, सांस्कृतिक क्षेत्रांत सर्वांना समान अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. 

कृतीवर संघाचा भर

डॉ. हेडगेवारांचे मूलभूत चिंतन आणि त्यांच्या नंतरच्या सर्व सरसंघचालकांचे समयोचित चिंतन व विचार-प्रकटीकरण यातून साकार झालेली संघाची भूमिका कृतीत उतरावी म्हणून संघ अत्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहिलेला आहे. याचे प्रतििबब संघाच्या अधिकृत भूमिकेवरील दस्तावेजात आणि विविध कार्यक्रम व उपक्रमांतून उमटलेले दिसते. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने संमत केलेले ठराव हे संघाचे अधिकृत दस्तावेज असतात. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने १९८१ साली आरक्षण व्यवस्था पुढेही चालू राहावी असा आग्रह धरणारा, १९९० साली नवबौद्धांना सरकारने आरक्षण दिल्याचे स्वागत करणारा, १९९४ साली धर्मातरित अनुसूचित जातिबंधूंना आरक्षण देणे उचित नाही अशी भूमिका मांडणारा असे तीन ठराव संमत केले आहेत आणि ते दस्तावेज म्हणून आजही सहजपणे उपलब्ध आहेत.

समाजाच्या सर्व घटकांना संघशाखेत मुक्त प्रवेश, स्वयंसेवकांना नित्य कार्यक्रमांतून नकळतपणे आणि सहजपणे दिला जाणारा समतेचा, समरसतेचा संस्कार, संघगीते, चर्चा आणि बौद्धिक वर्गातून केलेल्या विषय मांडणीतून विकसित होत जाणारी स्वयंसेवकांची समतेची भूमिका या संघाच्या अंतर्गत व्यवस्थेबरोबर विशेष कार्यक्रम आणि उपक्रमांतून संघाने समाजात एक निश्चित भूमिका केली आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, ‘रिडल्स’ अशा अनेक समाजात दुही पसरवणाऱ्या आंदोलनप्रसंगी समाजपरिवर्तनाची भूमिका संघाने निभावली आहे. संघाच्या प्रयत्नातून वंचित समाजातील बांधवांकरिता तिरुपती आणि नाशिक येथील देवस्थानांनी पुजारी प्रशिक्षण वर्ग केले. त्यातून वंचित समाजामधून पुजाऱ्यांची निर्मिती झाली, होत आहे. अयोध्येतील राम मंदिराचा शिलान्यास १९८९ साली रामकृपाल चौपाल या अनुसूचित जातिबंधूच्या हस्ते झाला व ते आज तीर्थक्षेत्र न्यासाचे न्यासी आहेत. ही घटना एका वैचारिक आणि सामाजिक क्रांतीची द्योतक आहे. 

भक्कम वैचारिक पाया

काळाच्या ओघात विविध विषयांच्या मांडणीची शब्दयोजना बदलत राहिली. तरीदेखील सर्व हिंदू समाजाचे, जन्माने ठरणाऱ्या उच्च-नीचतेच्या कल्पनांना त्यागून, वैभवशाली वारशाच्या अभिमानास्पद पायावर एक बलशाली संघटन उभे करण्याचे प्रयत्न मात्र कायम चालू राहिले आहेत. हिंदू संघटन या आपल्या ध्येयावर संघ कायम राहिला आहे. या ध्येयातच समाजातील भेदाभेद नष्ट करणे हे अंतर्निहित आहे. हिंदू एकतेच्या या कामात अडचण ठरणाऱ्या सामाजिक समस्यांवर संघ सातत्याने कार्यरत राहिला आहे. याबाबत खूप काही काम झाले आहे, पण आणखी बरेच करायचे बाकी आहे. यासाठीचा भक्कम वैचारिक पाया उपलब्ध आहे. शतकपूर्तीच्या या काळात संघाचे हे सामाजिक कार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यवाह आहेत.