डॉ.अनिल कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रत्येकालाच कोटा शहरात जाऊन शिकायचं आहे कारण पुढे आयुष्यात नोटा मिळवायच्या आहेत. शिक्षण क्षेत्रात देश-विदेशात आपली वेगळी ओळख बनवणारं, राजस्थानातलं कोटा. गेल्या ३० वर्षापासून तिथल्या क्लासेसनी स्वतःची ओळख बनवली आहे. इयत्ता आठवी पासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंत व्यवसायिक पद्धतीने यशाची खात्री देणारं ठिकाण म्हणजे कोटा. दरवर्षी दोन लाख विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. त्यातून साचेबद्ध अभ्यास करत यशोशिखर गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण या अशा आभासी यशोशिखरावरून जर आत्महत्या करून विद्यार्थी आपलं जीवन संपवत असतील तर त्या शिखराकडे जायचं कशाला?
ही मुलं- त्यांची संख्या अगदी कमी असेल, पण्- शिकताना जीवन संपवत आहेत, याचा अर्थ आपण कुठेतरी चुकतो आहोत… शिक्षण ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, हे विसरू न आपण ‘पॅटर्न’ला महत्त्व देत आहोत. ‘यशाला कधीच ‘शॉर्टकट’ नसतो, खोटं ठरवण्याच्या पद्धती विकसित होत आहेत.
पालकांनीच विद्यार्थ्यांना ९९.९ टक्क्यांची झापड बांधल्यामुळे त्यांना इतर काही दिसत नाही. आजचा विद्यार्थी ज्ञानासाठी शिक्षण घेत नाही तर स्पर्धेसाठी शिक्षण घेत आहे, त्याची परिणती म्हणजे, स्वतःचं अस्तित्व विसरून मृत्यूला ते जवळ करत आहेत. कोटा येथे एका दिवसात तीन आत्महत्या होत असतील तर हे भयानक आहे. शिक्षणाने मतपरिवर्तन अपेक्षित आहे, सुयोग्य वर्तनबदल अपेक्षित आहे. स्पर्धेने अस्तित्व दुभागणार असेल तर ती हवी कशाला? थोडक्यात, शिक्षण आज आदर्शापासून फारकत घेत आहे. शिक्षणाचे उद्देश व जगण्याचे उद्देश वेगवेगळे झाले आहेत. ज्ञानासाठी नव्हे तर हवें तेवढेच व माहिती पुरतेच शिकायचे. समाजासाठी नव्हे तर फक्त स्वतःसाठीच उपयोगी होईल यासाठी शिकायचे. पुन्हा एकदा आदर्श, मूल्यें यांची जाणीव झालेली आहे व त्या दृष्टीने आदर्शाचा विचार करणे आवश्यकच बनले आहे.
आदर्श जपत असताना माणसें गुरूसमोर नतमस्तक होतात. विश्वाची जडणघडण सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडची आहे हे विश्व अमर्याद व अनाकलनीय आहे हे त्याला माहीत असतं आणि त्याला समर्पित होणं यातच तो धन्यता मानतो मग अशा परिस्थितीत तो जवळपासचे आदर्श शोधतो. व्यक्ती परत्वे प्रत्येकाचे आदर्श असतात. एकाच घरात वेगवेगळे आदर्श असतात, वेगवेगळ्या विचार प्रणाली असतात. माणसांना आवश्यक ते वैचारिक पोषण मिळत नाही बुद्धीवर संस्कार करण्यासाठी मुळात मनाची तयारी करावी लागते. माणसांचं केवळ फुलणं महत्त्वाचं नाही तर जाणिवा फुलायला हव्यात. जाणिवा फुलल्याशिवाय वैचारिक संपन्नता येत नाही व ती येण्यासाठी समोर काहीतरी आदर्श व विचार प्रणाली आवश्यक ठरतें. विचारप्रणालीसाठी माणसे इतिहासातील, भूतकाळातील आदर्श व त्यांची विचार प्रणाली अनुकरण करत राहतो आणि म्हणूनच संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहत राहते व शिल्लक राहते. आदर्शाचे व विचार प्रणालीचे वाहक समाजात असतात व ते दुसऱ्यांना हस्तांतरित करतात, म्हणूनच आदर्श आणि विचार प्रणाली या कधीही न संपणाऱ्या बाबी आहेत. एखादा विचार व विचार प्रणाली एकासाठी आदर्श असला तरी दुसऱ्यासाठी तो असत नाही पण ज्यांच्यासाठी तो आदर्श असतो ते आपले अनुयायी कळत नकळत तयार करत असतात.
हिटलर ,नेपोलियन हे राक्षसी वृत्तीने झपाटलेले होते असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती त्यांची विचारसरणी असते. विचारसरणी स्वीकारणे हा कधीकधी अपरिहार्यतेचा व जगण्याचा भाग असतो तो माणसाचा आदर्श नसतो. अनेक पिढ्या आदर्शावर जगल्या आहेत. पोसल्या गेल्या आहेत एकरूप झालेल्या आहेत. अध्यात्म आदर्श मानण्यासाठी भावनिक क्षमता रुजवतं. विज्ञाननिष्ठ विचार किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन हा या आदर्शांकडे डोळसपणे पाहायला शिकवतो. यातलं काय आधी, हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे औद्योगिकीकरणामुळे इतकी भौतिक सुखाची रेलचेल झाली आहे की मुलांचे आदर्श बदलले आहेत.
श्यामच्या आईचे संस्कार आज पालक करू शकत नाहीत कारण मुले कार्टून पाहत माणसांना तुच्छ समजत आहेत. पोकेमन, हल्क अवेंजर, स्पायडरमॅन हे त्यांचे आदर्श आहेत जे अस्तित्वात नाहीत. स्वप्नातले आदर्श कामाला येत नाहीत, वास्तवातलें आदर्शच जगणं अर्थपूर्ण करतात. मुला समोरच्या आभासी आदर्श मुळे मुलें आज हतबल झाली आहेत. मृत्यूला कंटाळात आहेत. आदर्शाचा रिमोट कंट्रोल आज कोणाकडेच नाही त्यामुळे सैरभैर झालेल्या या पिढीसाठी एखादी आदर्श जीवनप्रणालीच खऱ्या अर्थाने माणूस बनवू शकते. अशी आदर्श जीवनप्रणाली एखाद्या साध्या तत्त्वावरही आधारलेली असू शकेल : दुसऱ्याचे दुःख समजून घेणे व त्याचे निवारण करणे!
स्वत:च्या बाहेर, जगाकडे पाहण्याची नितांत गरज आहे आजच्या मुलांना. आणि आजच्या पालकांनासुद्धा.
anilkulkarni666@gmail.com