डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनांच्या घटना आपल्या देशात अनेकदा घडतात. मग त्याचा निषेध करणारे मोर्चे , आंदोलने केली जातात. कधी कधी या आंदोलनांचा काही समाजकंटक समाजात विद्वेष निर्माण करण्यासाठी वापर करतात आणि संपूर्ण संविधानिक आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. संविधानवादी, आंबेडकरवादी जनसमूहाला, चळवळीला टीकेचे लक्ष कसे करता येईल याचा विचार करून प्रतिगामी शक्ती कार्यरत होतात. हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने घडत आहे. ते यावेळी ही परभणीच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध आले आहे. परभणीमधील मूळची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व संविधान शिल्पाची झालेली विटंबना ही आहे. ही विटंबना करणारी व्यक्ती कोण ? त्या मागे नेमके कोण गुन्हेगार आहेत? त्याचा ‘मास्टरमाईंड’ कोण आहे? याचा तपास होऊन गुन्हेगारांना कठोर शासन होणे, आवश्यक असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब व संविधानाचा झालेला अवमान, या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या आंबेडकरी चळवळीलाच किंबहुना संविधानरक्षकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. नव्हे तर हे आंदोलन दडपण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून, सरकारकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. तसा आरोपही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते करीत आहेत. या सगळ्या प्रकारात नाहक एका कायद्याच्या पदवीधराचा – सोमनाथ सूर्यवंशी याचा- हकनाक बळी गेला, तोही न्यायालयीन कोठडीमध्ये असताना.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा