“भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक वाढीमध्ये १६ टक्क्यांहून अधिक योगदान” अशा बातम्या सध्या येत आहेत (‘लोकसत्ता’नेही तसे वृत्त २० डिसेंबर रोजी दिले होते). सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये आपण जगात पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा आनंद आणि अभिमान साजरा करताना आपण मुळीच थकत नाही, असे यातून दिसून येते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीही आपल्या वाढत्या दराची प्रशंसा करीत आहे. आपला जलद गतीने विकास होत आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु या विकासाची फळे सामान्य जनतेला चाखायला मिळत आहेत काय, हे पाहण्याचीही तेवढीच गरज आहे. खरे तर देशाचा विकास म्हणजे देशातील सर्व नागरिकांचा विकास होय. कारण देश म्हणजेच मुख्यत्वे करून देशातील सर्व नागरिकच होत. त्यासाठी देशाचा खरोखरच विकास होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी आपण दरडोई वार्षिक उत्पन्नाचे प्रमाण काय आहे, हेही बघितले पाहिजे. याच उद्देशाने केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने २८ फेब्रुवारी २३ रोजी जारी केलेल्या पत्रकामधील आकड्यांच्या आधारावर पुढील विवेचन केलेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा