डॉ. संजय मंगला गोपाळ

थोर क्रांतिकारक, साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारवंत साने गुरुजी यांची येत्या २४ डिसेंबर रोजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आहे. त्यानिमित्ताने २१२२ डिसेंबर रोजी पुण्यात, ‘साने गुरुजी १२५ अभियान’ सांगता सोहळा आयोजित होत आहे. त्यानिमित्त…

Cabinet Portfolio Allocation
Cabinet Portfolio Allocation : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कोणतं खातं कोणाकडे? वाचा संपूर्ण यादी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta chadani chowkatun Rajya Sabha Prime Minister Narendra Modi Constitution Amit Shah
चांदणी चौकातून: कुठं आहे ती राज्यसभा?
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
atharvaveda bhumi suktam
भूगोलाचा इतिहास: वसुंधरेच्या कायापालटाची कहाणी
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?

सध्या राजकारण, समाजकारण, शिक्षण या सर्वच क्षेत्रांत संस्कृती रक्षणाचा मुद्दा वारंवार मांडला जातो. आपल्याला भारताच्या गौरवशाली परंपरेचे रक्षण करायचे आहे या नावाखाली अनेक बुरसटलेल्या वा मागास संकल्पना रेटल्या जातात. अशा वेळी येत्या २४ डिसेंबरला ज्या महात्म्याची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आपण साजरी करत आहोत, त्या साने गुरुजींच्या ‘भारतीय संस्कृती’ बाबतच्या विचारांची उजळणी प्रेरणादायी ठरेल.

सर्वसाधारणपणे संस्कृती म्हटले की काहीतरी पुरातन, सनातन आणि संकुचित विचार तर नाहीत ना, अशी शंका घेतली जाते. साने गुरुजी मात्र प्रतिपादन करतात की, भारतीय संस्कृती म्हणजे हृदय, बुद्धी आणि निर्मळ ज्ञान यांचा संयोग आहे. यातूनच आपल्या जीवनात सुंदरता निर्माण होत आहे. भारतीय संस्कृतीवर मी अपरंपार प्रेम करीत आलो आहे. ही संस्कृती ज्ञानमय आहे, संग्राहक आहे, कर्ममय आहे. ही संस्कृती सर्वांना जवळ घेईल, नवीन नवीन प्रयोग करील, अविरत उद्याोग करील. भारतीय संस्कृती म्हणजे सर्वांगीण विकास. सर्वांचा विकास. भारतीय संस्कृतीचा आत्मा स्पृश्यास्पृश्ये मानीत नाही. हिंदू-मुसलमान जाणत नाही. प्रेमाने व विश्वासाने सर्वांना मिठी मारून, ज्ञानमय व भक्तिमय कर्माचा अखंड आधार घेऊन मांगल्यसागराकडे, खऱ्या मोक्षसिंधूकडे जाणारी ही संस्कृती आहे.

हेही वाचा >>>अमित शहांना आंबेडकर ‘फॅशन’च वाटणार!

अद्वैत तत्त्वज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन

गुरुजींच्या मते भारतीय संस्कृती म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान. हे तत्त्वज्ञान हा एक प्रत्यक्ष व्यवहाराचा मार्ग आहे. या व्यवहाराचा समाजाला विसर पडला की क्रांती होते. गौतम बुद्ध, समर्थ रामदास, संत तुलसीदास, संत एकनाथ आदींनी अशीच क्रांती घडवून आणली आणि ‘भेदाभेद अमंगळ’ ही संस्कृती वृद्धिंगत केली. स्वत:पुरते पाहणारा पापी. केवळ माझे भले व्हावे अशी आस धरणारा संकुचित असतो. खरे कृतिशील वेदांती म्हणजे धर्म झूठ म्हणणारे साम्यवादी, इथवर गुरुजी आपल्याला घेऊन जातात.

अंधश्रद्धेला भारतीय संस्कृतीमध्ये स्थान नाही, हे गुरुजी मांडतात. भारतीय संस्कृती म्हणजे भगवान गौतम बुद्धाची शिकवण, ‘अत्त दीप भव’ अर्थात तूच स्वत:चा मार्ग शोध. तूच तुझा ज्ञान दिवा आहेस. ‘मन:पूत समाचारेत’ किंवा कुणी सांगितले म्हणून नाही तर तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ते कर, ही भारतीय संस्कृती. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली नवीन विचारांचे वारेच वाहू नयेत म्हणून सनातनी मंडळी किल्ले कोट बांधू पाहात आहेत. मात्र हे संस्कृती रक्षक नसून हे संस्कृती भक्षक आहेत. हे खरे सनातनी नसून अ – सनातनीच आहेत, अशा शब्दांत साने गुरुजींनी त्यांची निर्भर्त्सना केली आहे. गुरुजींच्या मते, लोकांच्या सुख- दु:खाशी एकरूप होणे, त्यांच्या वेदनांनी विव्हळ होणे, त्या वेदनांची मीमांसा करणे, त्यातून जे उपाय सुचतील त्यातील कोणते उपाय अधिक योग्य ते पाहणे आणि अशा उपायांसाठी सारे आयुष्य वेचणे हे ऋषींचे महान ध्येय असते.

कर्मशून्य होऊन नुसत्या जप-जाप्याने काहीही परिवर्तन शक्य नाही, असे बजावताना गुरुजी स्पष्ट सांगतात की, भारतीय संस्कृती म्हणजे सेवेचा, कर्माचा अपरंपार महिमा! समाजात सर्वांच्या सेवेसाठी कर्म करणारे शेतकरी, दलित, कारागीर कष्टकरी हे सारे बहिष्कृत मानले जातात आणि धर्माच्या नावाने काहीही काम न करता, समाजाला लुबाडणाऱ्यांना मात्र आपण पूजित आहोत, हे थांबविणे आवश्यक आहे, असे आवाहन ते करतात.

हेही वाचा >>>अमित शहांना आंबेडकर ‘फॅशन’च वाटणार!

भारतीय संस्कृतीचा खरा वाहक

कर्मात ज्ञान नसेल तर कर्म काय उपयोगी, असा रोकडा सवाल ते करतात. भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान यांचा संगम होय. जसे काम करण्यास दोन्ही हात लागले तर चांगले तसेच हे आहे. हिंसा, शस्त्रास्त्र यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान काय कामाचे! भगवान गौतम बुद्धापासून महात्मा गांधीजींपर्यंत आणि भगवान महावीरांपासून अनेक संत- महात्म्यांपर्यंत अनेकांनी संयमाचे गुणगान केले आहे. संयम म्हणजे सर्वांचे समायोजन. अनेक भाषा, प्रांत, चालीरीती, धर्म, पंथ यांच्या सुयोग्य समायोजनासाठी परस्पर सामंजस्य हवे. अर्थात, संयम म्हणजे नेभळटपणा नाही, हेदेखील भारतीय संस्कृती सांगते. संयम म्हणजे इतरांना शरण जाणेही नाही! संयमात आपले सार्वभौमत्व शाबूत ठेवणे महत्त्वाचेच, असे गुरुजी बजावतात.

गुरुजी नेमकेपणाने विचारतात, ‘धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे का शेंडी? धर्म म्हणजे का गंध? का माळ – हार? का जानवे? का हरिहरी म्हणणे? का जप करणे? का घंटा वाजवणे? शंख फुकणे? का वाद्या बंदी? का वाद्या वंदन?’ भारतीय संस्कृतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना म्हटलंय की, ‘धारणात धर्म:! धारयते इति धर्म:’!! सर्व समाजास धारण करतो तो धर्म. सकळ समाजाचे धारण ज्याने होते तो धर्म! धर्मात सकळ मानव जातींचा, सर्व मानवांचा विचार आहे. ‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया:, सर्वे भद्रणि पश्यन्तु’॥ ही भारतीय संस्कृतीची ध्येये आहेत. साम्यवादी लोक म्हणत असतात की ‘धर्म वगैरे आम्हांस काही समजत नाही. धर्म म्हणजे अफूची गोळी आहे. आम्हाला सर्वांना सुखी कसे करावे याची प्रखर चिंता आहे. हाच आमचा धर्म.’ असे सांगत गुरुजी विचारतात, ‘साम्यवादी लोक ‘धर्म’ या शब्दाला का कंटाळणार नाहीत? जो धर्म लाखो लोकांची दैना आनंदाने बघतो, तो का धर्म? त्या धर्माचे नाव त्यांना कसे सहन होईल?’ भारतीय संस्कृतीचा खरा आत्मा, एक खरा साम्यवादीच ओळखू शकेल! संपत्तीचे समान वाटप आणि सर्व साधने समाजाच्या मालकीची असे सांगणारा साम्यवाद ही खरी भारतीय संस्कृती, असे सिद्ध करत गुरुजी प्राचीन विचार आणि आधुनिक मांडणी यांचा सुरेल संगम घडवून आणतात.

स्त्री – पुरुष सहजीवन

स्त्री – पुरुष सहजीवनावर गुरुजी लिहितात, ‘स्त्री-पुरुष संबंध ही महत्त्वाचीच गोष्ट आहे. या संबंधांवर समाजाचे स्वास्थ्यच नव्हे तर समाजाचे अस्तित्वही अवंलबून आहे. स्त्री -पुरुषांचे परस्पर संबंध प्रेमाचे हवेत. स्त्री म्हणजे काही सत्तेची एक वस्तू नाही. तिला हृदय आहे, बुद्धी आहे, तिला भावना आहेत. तिला स्वाभिमान आहे. तिला आत्मा आहे. तिला सुख-दु:ख आहे. या सर्व गोष्टींची जाणीव पुरुषाने ठेवली पाहिजे.’ स्त्रीला प्रत्यक्षात कशी वागणूक दिली जाते, यावर गुरुजी निरीक्षण नोंदवतात. ‘आपल्या कुटुंबात काय अनुभवास येते? स्त्री सर्वांची सेवा करीत आहे. ती सर्वांची प्रेममयी दासी आहे, परंतु तिचे दास कोण आहे? तिला सुख व्हावे, तिला आनंद व्हावा, तिच्या हृदयाला विसावा मिळावा म्हणून कोणाला चिंता का? स्त्रीच्या मनाच्या व हृदयाच्या भुका कोणाला माहीत आहेत का? तिची आन्तरिक दु:खे कोणाला कळतात का? तिची कोणी प्रेमाने विचारपूस करतो का?’

मूर्तिपूजा, मूर्तिभंजन आणि प्रतीके

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे, हे सांगताना गुरुजी लिहितात, ‘मानवाला उत्तरोत्तर स्वत:चा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील मूर्तिपूजा हे एक महान साधन आहे. मूर्तिपूजेचा जितका जितका विचार करावा, तितका तितका तिच्यातील भाव खोल असा वाटू लागतो. मनुष्यप्राणी हा विभूतिपूजक आहे. आपणांमध्ये ही प्रवृत्ती स्वयंभूच आहे. ती आपणांत नसती, तर आपला विकास होता ना. विभूतिपूजा हे विकासाचे प्रभावी साधन आहे.’ अर्थात, मूर्तिपूजा म्हणजे अंध भक्ती नव्हे, हे स्पष्ट करताना गुरुजी म्हणतात, ‘डोळस मूर्तिपूजा सुरू झाली पाहिजे. मूर्तीपुढे धनद्रव्य टाकणे बंद झाले पाहिजे. जेथे सर्वांनी विनम्र भावाने यावे असे स्थान म्हणजे मंदिर. ते स्थान सरकारने स्वच्छ, पवित्र राखावे. तेथे मंगल भाव मनात येतील असे करावे म्हणजे झाले.’

आजही गुरुजींचे विचार समयोचित आहेत! खऱ्या भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी सक्रिय होणे, हीच गुरुजींना त्यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने आदरांजली ठरेल.

साने गुरुजी १२५ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे पूर्व अध्यक्ष व जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (एनएपीएम) चे राष्ट्रीय समन्वयक

sansahil@gmail.com

Story img Loader