इंदिरा संतांना अगदी अलीकडच्या काळामध्ये काही ओव्या मिळाल्या आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रदेशामधल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये एक ओवी – ‘जातं ओढताना, बाई गं, माझ्या हाताला येती फोडं।’ आमच्या केशवसुतांनी पुढे सांगितलं, ‘गाण्याने श्रम वाटतात हलके, हेही नसे थोडके।’ हे त्यांनी श्रम न करता म्हटलेलं आहे, परंतु या बायका श्रम करता करता म्हणताहेत की ‘गाण्याच्या नादात तुला ओढीते दगडा ।। जात्या तू इसवरा नको मला जड जाऊ ।। सयाच्या दुधाचा बया पाहतात अनुभवू।।’ सयीचं दूध म्हणजे आईचं दूध, ‘मायमाऊलीचं दूध माझ्या मनगटी खेळतं’ कारण माझ्या माउलीची परीक्षा करतात लोक. ‘आईने काय वळण लावलं तुझ्या’, आईने नाही का शिकवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजसुद्धा आईचा उद्धार होतो, तर तेव्हा तर होतच होता. तेव्हा माझ्या आईला कमीपणा यायला नको म्हणून मी ते सगळं करत असते, कष्टाची कामं करत असते. पुरुष वर्गाकडून माझ्यावर अन्याय होतो, अपमान होतो हे मला कळत नाही असं नाही. त्याच्याही शेकडो ओव्या आहेत, दोन-तीन महत्त्वाच्या ओव्या ज्या अनेक वेळेला मी सांगते त्या परत सांगते, ‘कडुविंद्रावन डोंगरी त्याचा रहावा’ – विद्रावन नावाचं कडू फळ डोंगरात असते. ‘‘कडुविंद्रावन डोंगरी त्याचा रहावा। पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा।।’’ आता हे तिचं येड पांघरून पेडगावला जाणं आहे की नाही? ही पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा असं म्हणणारी जात्यावर दळण दळणारी जी बाई आहे तिला तथाकथित ‘शुद्ध’ बोलता येत नसेल, पण तिला ‘शुद्ध’ भान आहे की काय चाललं आहे त्याचं!