* राम प्राणप्रतिष्ठा सोहळयानंतर भाविकांची अयोध्येत गर्दी वाढणार आहे. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मुंबईवरून अयोध्यासाठी लवकरच विशेष रेल्वे गाडया सोडण्यात येणार आहेत. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे नियोजन सुरू आहे. मुंबईहून अयोध्येला रेल्वेने जाण्यासाठी सुमारे १,५९० किमी अंतर प्रवास करावा लागतो. रेल्वेने प्रवास करताना साधारणपणे ६०० रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

* गाडी क्रमांक २२१८३ एलटीटी – अयोध्या साकेत एक्स्प्रेस एलटीटीवरून दर बुधवारी, शनिवारी सकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहचते. अयोध्येला पोहोचण्यासाठी सुमारे २६ तास लागतात. ही एक्स्प्रेस यादरम्यान २० थांब्यावर थांबा घेते. साकेत एक्स्प्रेसच्या शयनयानचे तिकीट भाडे ५९५ रुपये आहे. तर, तृतीय श्रेणी वातानुकूलितचे भाडे १,६०५ रुपये, द्वितीय श्रेणी वातानुकूलितचे भाडे २,३५० रुपये आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

* गाडी क्रमांक २२१२९ एलटीटी – अयोध्या तुलसी एक्स्प्रेस एलटीटीवरून दर मंगळवारी, रविवारी सकाळी ६ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता अयोध्याला पोहचते. अयोध्येला पोहोचण्यासाठी सुमारे ३० तास १० मिनिटे लागतात. तुलसी एक्स्प्रेस यादरम्यान २८ थांब्यावर थांबा घेते. तुलसी एक्स्प्रेसच्या शयनयानचे तिकीट भाडे ६९५ रुपये, तृतीय श्रेणी वातानुकूलितचे भाडे १,८२५ रुपये, तर द्वितीय श्रेणी वातानुकूलितचे भाडे २,६२५ रुपये आहे.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : तुम्ही राहता त्यांच्या ‘समृद्ध भारता’त?

* गाडी क्रमांक २२१०३ एलटीटी अयोध्या एक्स्प्रेस दर सोमवारी एलटीटी – अयोध्येदरम्यान धावते. एलटीटी येथून दुपारी १.३५ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचते. अयोध्येला पोहोचण्यासाठी सुमारे २७ तास ५५ मिनिटे लागतात.

* या रेल्वेगाडयांनी अयोध्येला जाण्याचा प्रवास सुकर होणार आहे.

* यापैकी काही रेल्वेगाडयांना अयोध्याला थांबा आहे. तर, काहींना बस्ती, गोंडा, गोरखपूर रेल्वे स्थानकाला थांबा आहे. या स्थानकावरून रेल्वे, रस्ते मार्गाने अयोध्या गाठता येणार आहे.

* गाडी क्रमांक ०२५९८ एलटीटी – गोरखपूर विशेष एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक १५१०२ एलटीटी – छाप्रा, छाप्रा अंत्योदय एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक १५०६८ वांद्रे – गोरखपूर, गोरखपूर साप्ताहिक एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक २२५३८ एलटीटी – गोरखपूर, कुशीनगर एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक २२९२१ वांद्रे – गोरखपूर, गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक २०१०३ एलटीटी – गोरखपूर, गोरखपूर एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक १२५९८ सीएसएमटी – गोरखपूर, गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक ११०७९ एलटीटी – गोरखपूर, गोरखपूर एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक १५०६६ पनवेल – गोरखपूर, गोरखपूर एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक १९०३७ वांद्रे – बरौनी, अवध एक्स्प्रेस

* गाडी क्रमांक ११०५९ एलटीटी – छाप्रा, छाप्रा एक्स्प्रेस