डॉ. उज्ज्वला दळवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

.. औषधाच्या पाकिटावर नमूद मुदत संपली की लगेच औषधं टाकाऊ किंवा घातक होतात का? ही औषधी उधळमाधळ पृथ्वीला तरी परवडेल का?

रमेशला शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी आली. त्याचा श्वास कोंडला. तशा वेळी जीव वाचवण्यासाठी पटकन घ्यायचं, एपिनेफ्रीनचं भरलेलं इंजेक्शन त्याच्या खिशात होतं. ते वेळीच घेतलं की इतर औषधांना काम करायला वेळ मिळतो. अ‍ॅलर्जीवर मात करता येते. पण ते खिशातलं इंजेक्शन महिन्यापूर्वी कालबा झाल्याचं दिसलं. ‘त्याचा काही उपयोग होणार नाही. झाला तर त्याने भलता त्रासच होईल,’ असं वाटून रमेशनं ते घेतलं नाही. हॉस्पिटलात पोहोचेपर्यंत त्याचा श्वास थांबलाच. चार दिवस व्हेंटिलेटरला (श्वसनयंत्राला) जखडून राहावं लागलं. रमेश जेमतेम जगला.

 जीवघेण्या आणीबाणीतही घेऊ नयेत इतकी घातक, कुचकामाची असतात का कालबा औषधं?

१९६३-६५च्या दरम्यान कालबा टेट्रासायक्लीन (एक अँटिबायोटिक) घेतल्यामुळे अनेक लहान मुलांच्या मूत्रिपडांवर दुष्परिणाम झाला. त्यांना मुडदूस झाला, त्यांची वाढ खुंटली. कालबाह्यतेमुळे त्या टेट्रासायक्लीनमध्ये घातक पदार्थ तयार झाले होते. बरीच वर्ष त्यांच्यावर ऊहापोह झाला आणि शेवटी, १९७९साली अमेरिकेच्या अन्न-औषध-नियंत्रक विभागाने प्रत्येक औषधावर त्याच्या कालबाह्यतेची तारीख (एक्सपायरी डेट = शब्दश:, मरणाची तारीख) छापणं सक्तीचं केलं. जगभरातल्या सरकारांनी त्याचं अनुकरण केलं.

 त्या तारखेपर्यंत ते औषध १०० टक्के कार्यक्षम आणि निर्धोक असायलाच हवं, अशी अपेक्षा असते. औषधनिर्माते त्या नियमांवरून योग्य तारीख ठरवतात. औषध तयार झाल्याक्षणापासून त्याची कार्यक्षमता प्रत्येक क्षणाला, मंदगतीने घटत जाते हे खरं आहे. पण तरीही हवाबंद औषधाभोवताली तापमानाची आणि आद्र्रतेची योग्य पातळी जपली तर कालबाह्यतेची तारीख औषध तयार झाल्यापासून साधारण एक ते ५ वर्षांनंतरची असते. औषधावर तारीख छापताना मात्र निर्माते अधिक सावध राहतात. छापलेली तारीख नेहमी खऱ्या कालबाह्यतेच्या तारखेच्या आधीचीच असते. त्याच्यानंतर किती काळ ते औषध कार्यक्षम राहतं याच्याशी नियंत्रक-विभागाला काहीही देणंघेणं नसतं. म्हणजेच ती तारीख उलटताक्षणी ते औषध कुचकामी किंवा घातक होत नाही.

घरातली, महागडय़ा औषधांची दोन-चार पाकिटं कालबाह्य झाली म्हणून टाकून देताना सामान्य माणसाच्याही पोटात तुटतं. अमेरिकेचं सेनादल तर कोटय़वधी डॉलर्स किमतीची औषधं खरेदी करतं. त्यांच्यातली डोंगरभर महागडी औषधं न वापरता टाकून देणं त्या अमेरिकनांच्याही जिवावर आलं. १९८५मध्ये त्यांनी कालबाह्यतेचा शिक्का बसलेल्या औषधांतली धुगधुगी शोधली. ८४ टक्के औषधं शिक्क्याची तारीख उलटल्यानंतरही पाच वर्ष किमान ९० टक्के काम करतात, हे ध्यानात आल्यावर त्यांनी १९८६मध्ये ‘साठवणीचा कालावधी वाढवायचा प्रकल्प’ (शेल्फ लाइफ एस्क्टेंशन प्रोग्राम) सुरू केला. कालबाह्यतेच्या तारखेनंतर औषधांची कार्यक्षमता तपासून ती वापरणं सुरू केलं. अनेक औषधांचं आयुष्य कित्येक वर्षांनी वाढलं. सेनादलाच्या पैशाची प्रचंड बचत झाली.

त्या अभ्यासाच्या अनुमानावरून औषध-नियंत्रक-विभागाने औषध कंपन्यांसाठीचे आपले कालबाह्यतेचे नियम बदलले असते तर गोरगरिबांवर अनंत उपकार झाले असते. पण सेनादलासाठी नियमांत झालेले फेरफार औषध कंपन्यांसाठी लागू झाले नाहीत. तरी २०१०मध्ये त्यांना थोडी पळवाट काढावीच लागली. त्या वर्षी फ्लूच्या वराहावताराने (स्वाइन फ्लू किंवा ‘एचवनएनवन’) धुमाकूळ घातला होता. त्यावरचा उपाय असलेलं टॅमीफ्लू नावाचं औषध कालबाह्यतेची तारीख उलटून गेल्यावरही वापरायला नियंत्रक-विभागाने परवानगी दिली.

‘मरणावर शिक्कामोर्तब झालेल्या’ औषधांनी अनेक ठिकाणी आपल्या जिवंतपणाचे पुरावे दिले. २०११-१२च्या सुमारास एका औषध-दुकानातल्या अडगळीत काही जुन्या औषधांची खोकी मिळाली. निर्मितीच्या तारखेनुसार हिशेब केला असता औषधं २८ ते ४०वर्षांपूर्वी कालबाह्य झालेली होती. पण प्रत्यक्षात चाचणी केल्यावर त्यांतल्या १२ औषधांनी २८ वर्ष आणि आठ औषधांनी तर ४०वर्ष उलटल्यावरही आपल्या मूळ क्षमतेच्या ९० टक्के काम सुरू ठेवलं होतं.

दक्षिण ध्रुवावर गेलेल्या ब्रिटिश वैद्यकीय पथकाच्या जहाजाच्या पोटात काही औषधं होती. ती तीन आठवडे उष्ण (२५-३०अंश सेल्शियस) कटिबंधात राहिली आणि मग ध्रुवावर पोहोचल्यावर हाडं गोठवणाऱ्या थंडीत राहिली. कालबातेची छापील तारीख उलटून गेल्यावरही ती औषधं काम करायला तत्पर आणि सक्षम  होती.  २०१३मध्ये एका रुग्णवाहिकेत बंदिस्त राहून गेलेलं, उकाडय़ा-गारठय़ात भटकलेलं, कालबाह्य एपिनेफ्रीन ठणठणीत कार्यक्षम असल्याचं सिद्ध झालं. जोएल डेव्हिस हे अमेरिकेच्या अन्न-औषध-नियंत्रक विभागाच्या कालबातेच्या उपविभागाचे प्रमुख होते. त्यांचं अभ्यासपूर्ण मत आपण मान्य करायला हरकत नाही. त्यांच्या मते तापलेल्या मोटारगाडीत, न्हाणीघरात, उन्हापावसात, उघडी ठेवलेली औषधं लवकर खराब होतात. मधुमेहासाठी घेण्याचं इन्सुलिन कालबातेच्या तारखेनंतर वापरणं धोक्याचं ठरू शकतं. हृदयाच्या तीव्र वेदनांसाठी घ्यायचं नायट्रोग्लिसरीन एकदा उघडलं की झपाटय़ाने खराब होतं. प्रतिबंधक लशी, रक्त किंवा इतर रक्तद्रव सांगितलेल्या तारखेनंतर वापरण्यायोग्य राहत नाहीत. प्रतिजैविकांची द्रावणं (लिक्विड अँटिबायोटिक्स) आणि इंजेक्शनाने द्यायची बहुतेक औषधं लवकर कामातून जातात. डोळय़ांत घालायची द्रवरूप औषधं उघडल्यावर फार दिवस वापरात ठेवली तर जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. टेट्रासायक्लीनच्या ज्या प्रकाराने लहान मुलांच्या मूत्रिपडांना त्रास झाला होता तो प्रकार केव्हाचाच बाजारातून हद्दपार झाला आहे.

घरात कालबा औषधं असली तर त्यांचं काय करायचं?

काही शहाणी माणसं उरलेली औषधं कालबा होण्यापूर्वीच औषध-दुकानात परत करतात किंवा औषधाच्या खोक्यात येणाऱ्या सूचनांप्रमाणे त्यांची विल्हेवाट लावतात. काही घरांत त्या अडगळीला अढळपद लाभतं. बरेच लोक तशी राहून गेलेली औषधं केरात नाहीतर शौचालयात टाकतात.

केरात टाकलेली औषधं कुत्रीमांजरं खातात. त्यांच्या जिवाला अपाय होऊ शकतो. शौचालयातून सांडपाण्यात जाणाऱ्या प्रतिजैविकांनी तिथल्या जंतूंचं शिक्षण होतं. त्यांच्यातून प्रतिजैविकांना न जुमानणारे अजिंक्यजंतू निर्माण होतात. टाकाऊ औषधं शक्यतो सुक्या कचऱ्याबरोबर, कुत्र्या-मांजरांच्या विष्ठेबरोबर बंद पिशवीत घालून कचऱ्यात द्यावीत. मॉर्फीन, कोडीनसारखी अंमली औषधं तशा कचऱ्यातूनही वेचली जाऊ शकतात. म्हणून ती काही कारणाने टाकायची असली तर मात्र शौचालयात टाकून फ्लश करावीत.

पण तेवढे मोजके अपवाद सोडले तर बाकीची बरीचशी औषधं सैन्यदलाच्या प्रयोगांत दिसलं तशी टाकाऊ नसून टिकाऊ असतात.

जोएल डेव्हिसच्या मते शीतकपाटात किंवा थंड कोरडय़ा जागेत, घट्ट झाकणाने बंदिस्त ठेवली तर बहुतेक औषधांचा दर्जा फार धीम्या गतीने खालावतो. ती गरजेला घ्यायला हरकत नाही. ते मार्गदर्शन मनात बाळगावं आणि प्रत्येक वेळी आपलं तारतम्य वापरून निर्णय घ्यावा.  बाळाला खोकला झाला म्हणून ताईला दोन वर्षांपूर्वी दिलेले, घरात राहून गेलेले प्रतिजैविकांचे थेंब बाळाला देऊ नयेत. रंग उडालेलं, दुर्गंधी येणारं, गढूळलेलं औषध किंवा इंजेक्शन घेणं, सुकून भेगाळलेलं मलम वापरणं मूर्खपणाचं आहे. पण कालबाह्यतेची तारीख उलटून गेलेलं, ‘मेलेलं’ एपिनेफ्रीन रमेशसारख्याचा जीव वाचवू शकतं. सिप्रोफ्लॉक्सॅसिनसारख्या काही महागडय़ा पण बहुगुणी प्रतिजैविकांच्या सुक्या गोळय़ा कालबाह्यतेच्या तारखेनंतर काही वर्ष कार्यरत असतात. त्यांनी टायफॉइडसारख्या भयानक आजारांवर मात करता येईल. डोकेदुखी वगैरे साध्या दुखण्यांसाठी माजघरातल्या कपाटात, चारपाच वर्ष पाकीटबंद राहिलेली पॅरासेटॅमॉल (क्रोसिन, मेटासिन), अ‍ॅस्पिरिनसारखी औषधं अडल्या वेळी तरी वापरता येतील.

 अमेरिकेच्या सैन्यदलामुळे जगाला आंतरजाल मिळालं हे सर्वाना माहीत असतं. आता त्यांच्या काटकसरीमुळे जगाला एक वेगळं मार्गदर्शन लाभतं आहे. त्यामुळे कित्येक चांगल्या स्थितीतली, ‘मेलेली’ औषधं, त्यांच्या दफनभूमीवर- उकिरडय़ावर न जाता सत्कारणी लागू शकतात, गरीब देशांतल्या रयतेचे जीव वाचवू शकतात. इतक्या मोठय़ा प्रमाणात गुणी औषधं फेकून द्यायची उधळमाधळ पृथ्वीग्रहालाही परवडणार नाही. त्यांना वापरात आणणं हे त्याही दृष्टीनं मोठं सकारात्मक पाऊल असेल. त्याला अधिकृत मान्यता कशी आणि कधी मिळेल कोण जाणे!

लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.

ujjwalahd9@gmail.com