व्ही. एम. देशमुख

गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देणारा आकर्षक पर्याय असल्याचे दर्शवून व्हॉट्सॲप ग्रुप व फेक गुंतवणूक ॲपच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक केली जाऊ लागली आहे…

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

सायबर गुन्हेगारी, शेअर बाजारातून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून लुबाडणे हा काही आज आश्चर्याचा मुद्दा राहिलेला नाही, मात्र गुन्हेगार सर्वसामान्यांना भयचकित करणे थांबवण्यास तयार नाहीत. एका प्रकारच्या गुन्ह्याविषयीच्या चर्चा सर्वदूर पसरून लोक जागरुक होईपर्यंत फसवणुकीचे नवे मार्ग शोधले जातात आणि नवनवे लोक बळी जात राहतात.

मधल्या काळात शेअर बाजारातील तेजीच्या बातम्यांनी अनेकांना भुलविले. अनेकजण यात पैसे गुंतवून श्रीमंत होण्यासाठी सरसावले, मात्र कोणत्याही गुंतवणूक पर्यायाविषयी काही मूलभूत गोष्टी जाणून घेतल्याशिवाय त्या वाटेला जाऊ नये, हे पथ्य आजही अनेकजण पाळत नाहीत आणि मग मोठा फटका बसल्यावरच शहाणपण येते. असे ‘अर्धशिक्षित’ गुंतवणुकदार सायबर भामट्यांचे सहज लक्ष्य ठरतात. त्यांना भुलविण्यासाठी आता हे भामटे व्हॉट्सॲप ग्रुप्सचा मार्ग अवलंबू लागले आहेत. 

अलीकडे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो आणि त्यावर व्हॉट्सॲपही हमखास असते. सायबर भामटे त्यावर फेक मेसेज पाठवतात. काही वेळा फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा यूट्यूब अशा लोकप्रिय माध्यमांतून एखादा व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यासाठीच्या लिंक प्रसारित केल्या जातात. या लिंक्सचा सतत मारा केला जातो. सर्वसामान्य माणूस सहज विश्वास ठेवत नाही. दुर्लक्ष करतो. लिंक डिलीट करतो, मात्र तरीही सतत लिंक येतच रहातात. मग कोणी ना कोणी उत्सुकतेपोटी त्या लिंकवर क्लिक करते आणि तो ग्रुप जॉइन केला जातो. मग त्यांचे शेअर मार्केट ट्रेडिंगचे ॲप (बनावट) डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यात ओटीसी आणि आयपीओ असे दोन ट्रेडिंग चे प्रकार असतात. त्यानंतर त्या भामट्यांच्या ‘व्हॉट्सॲप डिस्कशन ग्रुप’वर संबंधित गुंतवणुकदाराला ॲड केले जाते. त्या ग्रुपवर जवळपास ८०-९० टक्के हे त्यांच्याच गँगचे भामटे असतात. त्यांचे फेक ट्रेडिंग ॲप जॉइन केल्यानंतर ते त्यात संबंधिताचे अकाऊंट उघडतात. लॉगिन, पासवर्ड दिला जातो. त्याचबरोबर बँक डिटेल्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाइल नंबर घेऊन सर्व सोपस्कार पार पाडले जातात. नंतर ते अकाऊंट रीचार्ज करण्यास सांगतात. म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी त्यात पैसे टाकण्यास सांगतात. ही रक्कम कमीत कमी पाच हजारांपासून जास्तीत जास्त कितीही असू शकते. ते पैसे जमा करण्यासाठी ते एक अकाऊंट नंबर देतात. हे अकाऊंट फक्त ३० मिनिटेच ॲक्टिव राहील असे ते सांगतात. त्या दरम्यान त्यात पैसे नाही टाकता आले तर वेगळा अकाऊंट नंबर देतात. अशा प्रकारची अनेक अकाऊंट त्यांचेकडे असतात. मग त्या ॲपमधील जमा रकमेनुसार आपल्याला ओटीसी अन्डर शेअर खरेदी करण्यास सांगतात. ते एका कंपनीचे नाव देऊन त्या कंपनीचे शेअर खरेदी कारायला सांगतात. जमा असलेल्या रकमेनुसार त्या शेअरवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येते.

शेअर खरेदी केल्या केल्या लगेच त्यात फायदा झाल्याचे दिसते. हा प्रकार दुपारी २ ते ४ दरम्यान चालतो. मग दुसऱ्या दिवशी आपण खरेदी केलेल्या शेअरमध्ये  ५० ते १०० टक्के फायदा झालेला दिसतो. ग्रुपमध्ये सामील असलेले त्या गँगचे भामटेही लाखोंचा फायदा झाल्याचे स्क्रीनशॉट त्या ग्रुपवर टाकत रहातात. ते पाहून नवखी व्यक्ती भुलते. आपणही एवढे पैसे कमवू शकतो, असे तिला वाटू लागते. मग ती व्यक्ती अधिक पैसे टाकत रहाते. आपल्याला त्या अकाऊंटवर लाखो रुपये फायदा झाल्याचे दिसते. तसेच रोज त्या फायद्यात भरघोस वाढ होत असल्याचे दिसत राहते. मग हे भामटे नवीन आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास २०० ते ५०० टक्के फायद्याचे आमिष दाखवतात. ग्रुपमधील अनेक तेवढा फायदा झाल्याचे स्क्रीन शॉट टाकत रहातात. मग नव्या आयपीओचे नाव ॲपमध्ये टाकले जाते. आता नवख्या व्यक्तीला मोह आवरत नाही. त्याने आयपीओच्या पर्यायावर टॅप केल्याक्षणी आयपीओ सबस्क्राइब्ड असे दिसते. हीच फसवणुकीची सुरुवात असते.

पहिल्या दिवशी तो आयपीओ किती रुपयांचा आहे हे दिसत नाही. मात्र दुसऱ्या दिवशी त्या खात्यातील पूर्ण रक्कम त्या आयपीओमध्ये लॉक झालेली दिसते. जमा रकमेपेक्षा जास्त रकमेचा आयपीओ खरेदी केल्याचे त्यात दिसते. समजा अकाउंटमध्ये १० लाख रुपये जमा असतील तर १५ लाखांची आयपीओखरेदी (Subscribed) केल्याचे दिसते. मग अकाऊंटमधील आपले १० लाख रुपये त्या आयपीओत लॉक केले जातात. ते अनलॉक करायचे असल्यास परत पाच लाख त्या अकाऊंटवर जमा करावे लागतील, असे सांगितले जाते. मग नवखी व्यक्ती दहा लाख अनलॉक करण्यासाठी आणखी पाच लाख रुपये जमा करते. पाच लाख रुपये जमा केल्यानंतर ती पूर्ण रक्कम अनलॉक झाल्याचे त्या ॲप अकाऊंट वर दिसते. मग त्या अकाऊंटमध्ये १५ लाख रुपये दिसतात. संबंधित व्यक्ती त्यातील काही रक्कम काढून घेण्याचा विचार करते आणि ॲपवर अप्लाय करते. पैसे काढून घेण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे भामट्यांना कळते आणि ते परत ही रक्कम नवीन आयपीओमध्ये लॉक करून टाकतात. पुन्हा रक्कम अपुरी असल्याचे दाखवत आणखी पैसे जमा करण्यास सांगतात. हे असेच सुरू राहते.

आपली फसवणूक झाल्याचे जेव्हा संबंधितांच्या लक्षात येते, तेव्हा हे सायबर भामटे संबंधिताचे ॲप अकाऊंट वापरण्याचे अधिकार लॉक करतात. व्हॉट्सॲप ग्रुपमधून त्या व्यक्तीचा नंबरही डिलीट करून टाकतात. फोन उचलणे बंद करतात. साहजिकच त्यांच्याशी संपर्काचे सर्व मार्ग बंद होतात. आपली पूर्णपणे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित व्यक्ती काय करणार हे सायबर गुन्हेगाराला माहीत असते. ऑनलाइन पोर्टलवर किवा हेल्प लाइन नंबरवर तक्रार नोंदविली जाणार हे भामट्यांना माहीत असते. पोलीस संबंधितांचे अकाऊंट लॉक किंवा होल्ड करतात, मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. कारण हे भामटे पैसे जमा केलेले अकाऊंट फक्त ३० मिनिटांसाठीच वापरत असतात. त्याच दरम्यान त्या अकाऊंटमध्ये जमा झालेली पूर्ण रक्कम ते लगेच काढून घेतात. त्यामुळे सायबर क्राइम पोलीसही काही करू शकत नाहीत. हे भामटे परराज्यांतील किंवा परदेशांतील सुद्धा असू शकतात. अशा भामट्यांपासून गुंतवणुकदारांनी अतिशय सावध राहणे आणि कोणतीही गुंतवणूक करताना त्याविषयी स्वत: नीट अभ्यास करणे अपरिहार्य आहे.

Story img Loader