अलका साहनी

भारतीय चित्रपटसृष्टीतील दोघा लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्यांनी – अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी – अलीकडेच मनोरंजन उद्योगातील सेन्सॉरशिप आणि ट्रोलिंगला ठळकपणे अधोरेखित करणारी वक्तव्ये केली, तेव्हा अनेकांची पहिली प्रतिक्रिया सारखीच होती : ‘उशिराने का होईना, हे बोलण्याची गरज होतीच!’

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”
Sharad Pawar News
Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये, पराभव स्वीकारावा आणि..”, भाजपाच्या ‘या’ नेत्याची टीका

या दोघाही दिग्गज अभिनेत्यांची ही वक्तव्ये एकाच दिवशी (गेल्या गुरुवारी) एकाच व्यासपीठावरून झाली. निमित्त होते २८व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाचे. त्या समारंभात बोलताना बच्चन यांनी चित्रपट क्षेत्रात – फिल्म इंडस्ट्रीमध्ये – मुक्त भाषण आणि ‘सेन्सॉरशिप’चा मुद्दा उपस्थित केला तर खान यांनी समाजमाध्यमांवरून चालणाऱ्या ‘संकुचितपणा’कडे लक्ष वेधले. त्यांच्या आगामी ‘पठान’ या चित्रपटातील एका गाण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख बोलत असल्याचा अनेकांचा समज होणे स्वाभाविकच होते. त्या चित्रपटामधील एका गाण्यातील दीपिका पदुकोणच्या वेशभूषेवर आक्षेप घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राज्यात चित्रपटावर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.

अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज राजकीय हल्ल्यांना तोंड देत गप्प राहिल्यामुळे बच्चन आणि खान यांच्या भाषणांना महत्त्व आहे. सरकारकडून वारंवार भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून उल्लेखल्या जाणाऱ्या या उद्योगाला गेल्या काही वर्षांत कोणत्या ना कोणत्या कारणाने बदनामीच्या मालिकेला सामोरे जावे लागले आहे, परंतु तरीही बच्चन गेल्या काही वर्षांपासून मूक राहिले आहेत. शाहरुख खान यांना वादाच्या भोवऱ्यात ओढण्याचा प्रयत्न या सर्व काळात अनेकदा झाला… कधी चित्रपटांपायी तर कधी धर्मापायी लक्ष्य केले जात असतानाही, कोणतेही सार्वजनिक विधान करण्यापासून शाहरुख खान दूर राहिले. वास्तविक शाहरुख खान हे बुद्धिमान अभिनेता म्हणून ओळखले जातात, उपरोधिक विनोदही उत्तम करतात, पण तरीही ते अशा वादांच्या वेळी शांतच राहिले होते.

शाहरुख खान किंवा आमिर खानदेखील, ज्या प्रकारे असहिष्णुतेला सामाजिक मान्यता मिळते आहे, त्याबद्दल जरूर यापूर्वीच बोलले होते. मात्र तेव्हा या दोघांनाही तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. चित्रपट उद्योगाच्या एकत्र येण्यास असमर्थता – जरी हे जाणते की ही विधाने केवळ ध्रुवीकरण आणि सामाजिक विभाजनांबद्दल त्यांची चिंता दर्शवितात – ट्रोलिंगच्या मागे असलेल्यांना प्रोत्साहन दिले आहे. आपल्या फायद्यासाठी उद्योगावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारी शक्तींचा प्रयत्न ही नवीन घटना नसली तरी २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर चित्रपट आणि शो सेन्सॉर करण्याकडे जास्त लक्ष दिले जाते.

गेल्या काही वर्षांत, हिंदी चित्रपट उद्योग हा विशेषत: केंद्रीय तपास संस्थांचे – सीबीआय, सक्तवसुली संचालनालय आणि अमली पदार्थविरोधी विभाग (एनसीबी)चे लक्ष्य ठरल्याच्या बातम्या वारंवार आल्या आहेत. ‘बॉलीवूडवर सत्ता गाजवण्यामध्ये’ स्वारस्य नसल्याचा दावा भाजपने केला असला तरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) या उद्योगात ‘रुची’ असल्याचे मान्य केले आहे. “उद्योग जे काही बनवतो, ते भारतातील लोकांसाठी बनवतो आणि आरएसएसला भारतातील लोकांसाठी जे काही केले जात आहे त्यात रस आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, ” असे रा. स्व. संघाचे एक वरिष्ठ प्रमोद बाजपत यांनी २०२० मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते.

प्रसारमाध्यमे (विशेषत: हिंदी वृत्तवाहिन्या) तसेच समाजमाध्यमांतून हिंदीतील काही लोकप्रिय चित्रपट कलावंतांच्या विरोधात भावना भडकावल्या जात असल्याचेही गेल्या काही वर्षांत दिसू लागले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक प्रकारची दुही (पूर्वीपेक्षा अधिकच प्रमाणात) दिसू लागली. याचा एक परिणाम असा होतो आहे की, चित्रपट जरी परिनिरीक्षण मंडळाकडून (सेन्सॉर बोर्डाकडून) संमत झाला तरीही त्यातील व्यक्तिरेखा तसेच त्यांच्या कामांची सतत छाननी केली जाते. आक्षेप घेण्याची संधी शोधली जाते. हीच ती अघोषित सेन्सॉरशिप.

या पार्श्वभूमीवर कोलकात्यातील समारंभात बच्चन यांनी जाहीरपणे व्यक्त केलेली चिंता जमिनीवरील वास्तव प्रतिबिंबित करणारीच ठरते. सेन्सॉरशिपच्या इतिहासाचा संदर्भ देत ते इतकेच म्हणाले की, “आताही… नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.” जरी समाजमाध्यमांवरून अनेकांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर खोचक टीका म्हणून प्रक्षेपित केले, तरीही हे स्पष्ट होते की, आपल्या काळातले सुपरस्टार सर्जनशील स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याबद्दलच बोलत होते.

सत्यजित रे यांच्या महत्त्वाच्या कलाकृतींपैकी एक असलेल्या ‘गणशत्रू’ या चित्रपटाचा संदर्भ देऊन बच्चन म्हणाले, “हा तसा एकाच खोलीत घडणारे नाट्य टिपणारा चित्रपट. त्यात दूषित पाण्यामुळे काविळीची साथ पसरत असल्याचे डॉक्टर अशोक गुप्ता या नायकाला दिसते आहे, परंतु राज्ययंत्रणा आणि स्थानिक मंदिर या दोघांनीही ही साथ दडपली असून ती माहिती बाहेर काढणाऱ्या नायकाला लोकांचा शत्रू ठरवले जाते. वास्तविक हा नायक लोकांसाठी, न्यायासाठी लढत आहे.”

किशोरकुमार, देव आनंद आणि शबाना आझमीपासून अनुराग कश्यप आणि प्रकाश राजपर्यंत – आणि प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या इतर चित्रपट व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे गेल्या अनेक दशकांपासून दिसत असली तरी, ती आज दुर्मीळ झाली आहेत. बऱ्याच ‘सेलेब्रिटीं’नी जगण्याची पद्धतच बदलून व्यवसायनीतीवर अवलंबून ठेवली आहे – जसे की कमी बोलणे आणि वादग्रस्त ठरू शकणाऱ्या सर्व विषय आणि व्यक्तींपासून ‘सुरक्षित अंतर’ राखणे, कोणताही संघर्ष टाळणे आणि सर्वसाधारणपणे नाकासमोर चालणे. दुसरीकडे ऋचा चढ्ढा, स्वरा भास्कर आणि हंसल मेहता यांसारखे धर्मांधतेच्या विरोधात आवाज उठवणारेही समाजमाध्यमांवर दिसतात, पण त्यांना अद्वातद्वा शिव्या देणारे, त्यांच्याबद्दल समाजमाध्यमांत वाट्टेल ते लिहिणारे कमी नाहीत.

त्यामुळे, जेव्हा खान यांनी समाजमाध्यमांतल्या ‘नकारात्मकते’चा विषय काढला, “अशा प्रकारचे प्रयत्न अनेकदा कुठल्याशा सामूहिक कथानकवादावर आधारलेले असतात, आणि त्यामुळे ते अधिक विभाजनकारी आणि विध्वंसक बनवतात,” असे ते म्हणाले, तेव्हा ते अतिशय कमी शब्दांतले अर्थपूर्ण भाष्य ठरले. या दिग्गज अभिनेत्याने यावर उपायही सुचवला. ते म्हणाले की, ‘‘विविधतामय संस्कृती, रंग, जाती आणि धर्माच्या लोकांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चित्रपट-माध्यमाच्या शक्तीचा एक वाहन म्हणून वापर करून भविष्यातील पिढ्यांसाठी एक चांगले जग निर्माण करणे ही काळाची गरज आहे.”

भारतीय चित्रपट निर्माते हे आव्हान स्वीकारतील का, हा प्रश्न उरतोच! कारण अनेकदा दिसते उलटेच- ते असे की, चित्रपटाच्या दृश्य-भाषेचा वापर करून द्वेषपूर्ण अजेंडा आणि हल्ल्यासाठी प्रतिहल्लाच शिकवणारे चित्रपट मात्र कोणत्याही वादाविना येतात आणि ते जणू लोकप्रियच आहेत किंवा श्रेष्ठसुद्धा आहेत असे भासवण्यात येते.

बच्चन आणि खान यांनी केलेल्या विधानांचा अर्थ अशा उद्योगाच्या आतून आलेला प्रतिरोध म्हणून लावला जाऊ शकतो. हिंदी चित्रपटसृष्टी बऱ्याच काळापासून मूकपणे सहन करत आहे. आत्ता तरी, या इंडस्ट्रीतील दोन दिग्गजांनी सिनेमाची ताकद सांगण्यासाठी उचललेले हे एक छोटेसे पाऊल असल्याचे दिसते. खान आणि बच्चन यांनी जे गेल्या गुरुवारी केले, ते हॉलीवूड आणि युरोपमधील चित्रपटकारांनी किंवा अगदी इराणसारख्या देशांतल्या चित्रपट-दिग्दर्शकांनीही दीर्घकाळ केलेले आहेच. त्यामुळे म्हणावेसे वाटते की, खान वा बच्चन यांनी सुरुवात करून दिली… अख्ख्या हिंदी चित्रपट उद्योगातले विचारी लोक संघटित होऊन विनाकारण सेन्सॉरशिप लादणाऱ्यांविरुद्ध किंवा व्यर्थ ओरड करणाऱ्यांविरुद्ध मोठी झेप घेऊ शकतात का, हे पाहणे बाकी आहे.

Story img Loader